स्वाईन फ्ल्यू च्या निमित्ताने

Submitted by limbutimbu on 10 August, 2009 - 02:25

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज इट टू लेटर Sad

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

लिंबू- ब-यापैकी सहमत.
एक अनुभव- सुमारे तिन आठवड्यांपूर्वी कार्यालयातील एका व्यक्तिस या आजाराने ग्रासले. ती व्यक्ति दिल्लीत असताना हे उघडकीस आले, त्यामुळे सर्व उपचार वगैरे दिल्लीत झाले. ती व्यक्ति आता सुखरुप आहे.
त्या व्यक्तिच्या बरोबर काम करणा-या दोघांसाठी माहिती काढायला मला पूर्ण एक दिवस, (आणि २५ फोन कॉल्स) लागला. तिनच आठवड्यांपूर्वी मुंबई नामक शहरात फक्त कस्तुरबा मध्ये टेस्टिंग होऊ शकत होते, आणि सँपल्स पुणे नगरातील एन आय व्हीत पाठवले जाणार होते.
ही मुंबईतील आपतकालीन यंत्रणा.
फोनवरील एकेक रिस्पॉन्स सांगवत नाहीत इतके थोर. फार वर्षांनी खरोखर कोणाच्या तरी कानाखाली जाळ काढावा असा संताप आला होता.

स्वाईन फ्लु च्या दिवसात मुंबईत प्रवास करणे कितपत धोक्याचे आहे सध्या? खास करून विमान प्रवास करणे? अमेरीकेतून मुंबईत येणे जाणे ठिक आहे का?

हा प्रश्ण मी कोणाला(जो कोणी) साधारण तिथील(मुंबईमधील) स्थिती माहीत असेल ह्या अंदाजावर विचारतेय. newspapers,online वगैरे बातम्यांवर किती अवलंबून रहावे ठरवणे कठीण झालेय.
सगळे ओळखीचे इथे रहाणारे ह्याच्या त्याच्या वाचलेल्या नूज सांगून सांगताहेत कि जाणे धोक्याचे आहे म्हणून.

कोणी प्रकाश टाकेल का?

एसजीरोडवरील आजचे प्रतिसाद Happy

rupali_rahul | 12 August, 2009 - 10:25
सुप्रभात लोक्स!
काल माझ्या वहिनीचा फोन आला होता( ती रहेजामध्ये डॉक्टर आहे). तिच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना हे करण्यासाठी सांगितले आहे. ह्या स्वाईन फ्लुपासुनच्या बचावासठी एक अगदी सरळ सोप्पा घरगुती उपाय सांगितला आहे.

आपल्या तर्जनीच्या आकाराचे १ सुंठीचे बारिक तुकडे
आपल्या तर्जनीच्या आकाराचे १ हळकुंडाचे बारिक तुकडे
१ वेखंडाचे(तेवढ्याच आकाराचे) बारिक तुकडे

साधारण १ लिटर पाणि घेउन त्यात चंगले उकळावाआअच्यहे. पाणि १ लिटरचे पाव लिटर झाले पाहिजे इतके उकळावे अणि मग तेच पणि थंड करुन प्यायचे. कमीत कामी ७-८ चमचे मोठ्यांनी प्यावे. हा उपचार तीन दिवस न चुकता करायचा आणि घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांनी हे पाणि प्यायचे.
आंही आज घरातले सगळे हे पाणि प्यायलो. माझ्या "श्रीयाला" पण हे २-३ चमचे पाणि पाजले.

प्लिज जितक्या लोकांना तुम्हाला हे सांगणे शक्य होईल तितक्या लोकांना सांगा. कालपासुन आम्ही हे आमच्या आजुबाजुच्या सगळ्यांना सांगत आहोत.

krishnag | 12 August, 2009 - 11:00 नवीन
मास्क ची आवश्यकता नाही सर्वांना!
स्वच्छ रुमाल ३-४ पदरी करून नाकाला बांधा! दिवसांतून दोनदा का बदला. नंतर व्यवस्थित गरम पाण्यात डेटॉल सारखे जन्तुनाशक टाकून धुऊन घ्या!
घरात गेलो की व्यवस्थित हात पाय स्वच्छ धुऊन मगच इतरत्र घरात फिरा. शक्यतो घरी घेल्यावर स्वच्छ स्नान करणे उत्तम! आपण मास्क वा रुमाल बांधल्यामुळे श्वसनात विषाणू नाहे एगेले तरी अंगावरील कपड्यांवर व शरीरावर असतील तेंव्हा घरी गेल्यावर कपडे लगेच धुवायला टाकून स्नान करणे जास्त चांगले! आवश्यकता नसेल तर कुणालाही घरा बाहेर जाऊ न देणे उत्तम!

व्यक्तीगत स्वच्छता कमालीची राखावी जेणे करून आपल्याबरोबरच इतरांनाही प्रादुर्भाव होणार नाही!

मनू
आम्ही सगळे आपापल्या हापिसात येतोय. गर्दी वगैरे काही कुठे कमी नाहिये. बाकी मिडीया रिपोर्टस मधूनच माहिती मिळते आहे (ती कितपत विश्वासार्ह आहे कोण जाणे).

जर शक्य असेल तर पोस्टपोन केल्यास उत्तम. उगीच रिस्क घ्या कशाला.
नाहीतर उत्तम प्रतिचे मास्क बरोबर आण. आणि बाहेर खाताना/फिरताना वगैरे फार जपून.
आमचे अमेरिकेतील नातेवाईक नुकतेच येउन बरेच फिरून गेले. टचवुड. सगळे उत्तम आहेत.

>>बाकी मिडीया रिपोर्टस मधूनच माहिती मिळते आहे (ती कितपत विश्वासार्ह आहे कोण जाणे).<<

हाच तर प्रॉबलेम आहे ना. किती विश्वास ठेवायचा ते. मी तिकिट बूक केले,१० वर्षाने गणपतीला येणार मुंबईत म्हणून तर आता प्रश्ण पडलाय की येवु का नको. सर्व मुंबईचे नातेवाईक म्हणताहेत नका येवू. ते तर सर्व वयाने ७० च्या पुढे(आजी आजोबा, काका अजोबा वगैरे) असल्याने कुठेच जात नाहीत. घरीच बसून टीवी बघतात तिच नूज सांगताहेत बिचारे.

काय कळत नाही काय करावे? आधीच मला तसेही तिथे आले की कसला ना कसला त्रास असतोच्(गेल्या दोन वेळेचा अनुभव).
धन्यवाद रैना पण. आणखी काहि माहिती असल्यास बरी.

मनुस्विनी, अमेरिकेने travel advisory वगैरे काही दिली आहे का ?
शक्यतो सध्या येणे टाळता आले तर बरे. अमेरिकेतून इथे येणे म्हणजे इथे परत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास, नातेवाईकांच्या भेटीगाठी, सार्वजनिक ठिकाणी जाणे वगैरे. याने संसर्गाची शक्यता वाढते हे एक. संसर्ग फक्त फिरणार्‍यालाच नव्हे, तर त्याच्याद्वारे इतरांनाही.
दुसरे म्हणजे खुद्द नातेवाईकसुद्धा तुम्हाला भेटायला येण्यास कितपत तयार असतील याचाही विचार करणे. वृद्ध लोकांना संसर्गाची शक्यता अधिक असते.
तिसरे म्हणजे परत जाताना port of arrival ला तुम्हाला चाचण्या वगैरेंना सामोरे जावे लागू शकते. त्यात वेळ जाऊ शकतो.
त्यातही येणे आवश्यकच असेल तर कृपया योग्य ती काळजी घ्या.

बहुतेक नाही येणार... अमेरीकेने कुठलीच travel advisory दिली नाही. ticket agency चे काय जातेय.

>>तिसरे म्हणजे परत जाताना port of arrival ला तुम्हाला चाचण्या वगैरेंना सामोरे जावे लागू शकते. त्यात वेळ जाऊ शकतो.<<
स्लार्टी, धन्यावाद तुम्हाला. कारण हा वरचा मुद्दा लक्षातच आला नाही. डोकेच चालायचे बंद झाले सकाळपासून उलट सुलट सगळीकडून विचारून ठरवण्यात. आता तिकिटच कॅनसल करेन सकाळी.

तिनच आठवड्यांपूर्वी मुंबई नामक शहरात फक्त कस्तुरबा मध्ये टेस्टिंग होऊ शकत होते, आणि सँपल्स पुणे नगरातील एन आय व्हीत पाठवले जाणार होते.
ही मुंबईतील आपतकालीन यंत्रणा.
फोनवरील एकेक रिस्पॉन्स सांगवत नाहीत इतके थोर. फार वर्षांनी खरोखर कोणाच्या तरी कानाखाली जाळ काढावा असा संताप आला होता.
>>>
रैना, तीन आठवड्यापूर्वी रोगाची स्थिती काय होती? स्थिती बदलल्यावर टेस्टिंग सेंटर्स वाढलेली आहेत की नाही?? आपतकालीन यंत्रणा म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे तुला? सर्व हॉस्पिटल्समधे सर्वच सोयी असतील अशी अपेक्षा का करावी? माझ्या मते सध्या मुंबईमधे असलेली सेंटर्स पुरेशी आहेत, तिथे जर ४००० मूर्ख (तथाकथित सुशिक्षित) लोकांनी गर्दी नाही केली तर...

आपल्याला झालेला रोग हा स्वाईन फ्लू आहे की नाही हे स्वतःच ठरवून टेस्टिंग सेंटरमधे जाऊन गोंधळ घालणारे लोक कालच पाहिले. वर मीडियाला हेच्क लोक जोरजोरात ओरडून सांगत होते की सरकारला आमची काळजी नाही इत्यादि इत्यादि.

तू कुठल्या न्.बरवर फोन केला होतास? कारण १०८ न्.बरवरती उत्तम माहिती मिळत आहे.
अर्थात त्याना ४ तासात ३९५ फोन आले. त्यामुळे ते पण वैतागलेले असतील तर त्याचा दोष नाही . त्याना पण फोन करणार्‍याच्या कानाखाली जाळ काढावा असेल असे वाटत असेल, नाही का??

कृपया सरकारी दवाखान्यामधे जाऊन गर्दी करू नका. तिथे स्वाईन फ्लु व्यतिरिक्त अजूनही पेशंट असतात आणि त्यापैकी कित्येकजण जीवनमरणाच्या रेषेत असतात. तिथली यंत्रणा आधीच अपुरी आहे, त्यावर अजून ताण देऊ नका. तुम्हाला स्वाईन फ्लुची लक्षणे आहेत असे वाटल्यास तुमच्या फॅमिली फिजिशेअनकडे जा. जर त्याला स्वाईन फ्लू आहे असे वाटले (शेवटी तो पण डॉक्टरच आहे) तर तो चिठ्ठी देऊन तुम्हाला सरकारी दवाखान्यात पाठवेल आणि तसे झाल्यास ताबडतोब तुमच्यावर उपचार केले जातील.

बाकी, ज्याच्यावर शास्त्रज्ञाना लस सापडली नाही अशा रोगावर आयुर्वेदावर लगेच "रेडिमेड" उपाय आहे हे बघून करमणूक होतेय. Light 1 बिचारे इतर देशातले लोक विनाकारण चिंता करत आहेत. Happy

नंदिनी- तुझा विरोध नक्की कशाला आहे? मला माझं मत असण्याला नसावा असं वाटतय.
तिन आठवड्यांपूर्वीही लोकं स्वाईन फ्लूनी आजारी पडत होते, पण त्यावेळेला टेस्टींगची सोय मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या शहरात उपलब्ध नव्हती. जगभरात जर तो एपिडेमिक घोषित झाला आहे तर मुंबईसारख्या शहरात जी उपाययोजना आत्ता होते आहे तर ती आधी होणे मला तरी अपेक्षीत होते. म्हणजे अधिक टेस्टींग सेंटर्स, प्रायवेट हॉस्पीटल्सना त्यात सहभागी करुन घेणे वगैरे. नवी मुंबईत आजारी पडणा-या माणसाला कस्तुर्बा मध्ये जाऊन चेक करुन घेणे आणि सॅम्पल्स एन आय व्हीत पाठ्वून पाच दिवसांनी निकाल येणे ही यंत्रणा सुरवातीपासूनच सदोष आणि अपूर्ण आहे असं मला वाटतं.
मी पब्लिक हेल्थ मधे कार्यरत असणा-या डॉक्टरांपासून सुरवात केली, त्यातल्या तिघांना तर टेस्टींग कसं आणि कुठे होतं हेही माहित नव्हतं.

हेल्पलाईनवाल्यांना ३ आठवड्यापूर्वी तेवढे फोन येत होते असं तुला म्हणायचय का?
मी कस्तुरबाला फोन करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्याची चुक केल्याबद्दल हा खरोखर माझ्याच बुद्धीचा दोष असणार- नाही का ? सरकारी इस्पितळात फोन करायचा, वर ते माहिती वगैरे देतील अशी अपेक्षा ठेवणा-याच्याच कानाखाली वाजवावी नाही का?

rainaa, maajhaa virodh tujhe mat asaNyaalaa bilkul naahiye.
sadhyaa malaa marathi madhe lihitaa yet naahee mhanun mee jaast lihat naahee tareepan...
तिन आठवड्यांपूर्वीही लोकं स्वाईन फ्लूनी आजारी पडत होते, पण त्यावेळेला टेस्टींगची सोय मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या शहरात उपलब्ध नव्हती. जगभरात जर तो एपिडेमिक घोषित झाला आहे तर मुंबईसारख्या शहरात जी उपाययोजना आत्ता होते आहे तर ती आधी होणे मला तरी अपेक्षीत होते.
>>> majhyaa mate epidemic jaaheer karanyaasaathee ek vishisht sankhyaa olaandaavee laagate. private hospitals naa sahabhaagee karataa yet naahee kaaraN WHO che kaahee rules aahet. (I dont know the exact rules but centrally air-conditioned hospitals can not admit swine flu patients. tyaamule infection vaadhate ase kaaheetaree aahe) krupayaa yaavar maahitee dyaa.

नवी मुंबईत आजारी पडणा-या माणसाला कस्तुर्बा मध्ये जाऊन चेक करुन घेणे आणि सॅम्पल्स एन आय व्हीत पाठ्वून पाच दिवसांनी निकाल येणे ही यंत्रणा सुरवातीपासूनच सदोष आणि अपूर्ण आहे असं मला वाटतं.
>>> malaa 18 joonalaa viral flu jhaalaa hotaa, mee maajhyaa family doctor kade gele hote aani vichaarale hote kee malaa swine flu asalaa tar??? doctor ne maajhee lagech blood test ghetalee tar tee viral fever chee aalee yaachaa arth mlaa swine flu navhataa. jar viral chee test negative aalee asatee tar lagech malaa vashi general hospital madhe daakhal karoon ghetale asate aani pudhachee upaay yojanaa kelee asatee.

pan sadhyaa jo shinkatoy jyaach.n a.ng dukhatay to dhaavatoy testing centre laa.

मी पब्लिक हेल्थ मधे कार्यरत असणा-या डॉक्टरांपासून सुरवात केली, त्यातल्या तिघांना तर टेस्टींग कसं आणि कुठे होतं हेही माहित नव्हतं.
>> too nakkee kasalyaa DokTorashee bolalees maahit naahee paN mee aaNi maajhyaa kaleegj jyaa DokTorashee bolale tyaanee vyavasthit maahitee dilee.
हेल्पलाईनवाल्यांना ३ आठवड्यापूर्वी तेवढे फोन येत होते असं तुला म्हणायचय का?
>> naahee, malaa as.n mhaNaayache naahee. muLaat helpalaaeenalaa too phonach na kelyaane yaabaddal aapaN kaay bolaNaar?

मी कस्तुरबाला फोन करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्याची चुक केल्याबद्दल हा खरोखर माझ्याच बुद्धीचा दोष असणार- नाही का
>>> ho, kaaraN kasturabaa he TesTi.ng se.nTar aahe. maahitee deNyaache se.nTar naahee. tulaa havee asalelee maahitee bee emaseechyaa aarogya vibhaagaat ki.nvaa DeejhaasTar mEnejame.nTamadhe miLoo shakel.

तुम्हाला स्वाईन फ्लुची लक्षणे आहेत असे वाटल्यास तुमच्या फॅमिली फिजिशेअनकडे जा. जर त्याला स्वाईन फ्लू आहे असे वाटले (शेवटी तो पण डॉक्टरच आहे) तर तो चिठ्ठी देऊन तुम्हाला सरकारी दवाखान्यात पाठवेल आणि तसे झाल्यास ताबडतोब तुमच्यावर उपचार केले जातील>>>>>>>>>>
सेम टु सेम आमच्या आकुर्डीतला डॉक्टर वैतागुन सांगत होता. अर्थात मी तर दवाखान्याला कुलुप घातल असत वैतागुन. ८०० लोक नुसती सर्दी किंवा तापासाठी गर्दी करत असतील तर तो एक काय करेल.
पण हेच आधी पेपरात छापुन आल पाहिजे होत. किंवा सरकारने तसे स्टेटमेंट दिले पाहिजे होते. आता तसा बोर्डच लावला असेल दवाखान्यात म्हणा.
आणि अर्थातच फॅमिली डॉ कडे गेल्यानंतर तो देखील लग्गेच पहिल्याच दिवशी काहीच न घाबरवता तुमची लक्षण नीट बघुन शंका असेल तरच चिठ्ठी देइल.
ह्यात नक्कीच सरकारी दवाखान्यातील ताण कमी होणार आहे.

झकोबा, गोष्ट तेवढीच नाहिये, पहिल्या वहिल्या रिदा शेखच्या केस मधे करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाया अन त्यान्ना मिळालेली प्रसिद्धी बघता, प्रायव्हेट डॉक्टर कुणाला दाराशी तरी उभे करतात की नाही याची शन्का आहे, अगदी नेहेमीचा फ्यामिली डॉक्टर असेल तरच तो एन्टरटेन करतो अन्यथा सरळ सरकारी इस्पितळाचा रस्ता दाखवतो, अन ते साहजिकच आहे!
उठसुठ नुकसानभरपाई मागणे, अमक्यातमक्याला कोर्टात खेचून धडा शिकवणे वगैरेसारखी कृत्ये एकन्दरीत खाजगी डॉक्टर सिरीयसली घेणारच ना? कोण रिस्क घेणार?
बर, पब्लिक पण अस की कधी एका डॉक्टरकडे जात नाही, दहा ज्योतिषान्कडे फिराव तशागत दहावेळा डॉक्टर बदलतात, जरा म्हणून धीर नाही! विश्वास नाही! मिळालेल्या सल्ल्याचे क्रॉसचेकिन्ग करणारे प्राणी ज्योतिषान्ना नवे नाहीत, पण डॉक्टरी पेशात ते खतरनाक ठरते, कारण नविन डॉक्टर आधीच्या डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन बघतो, अजुनही बरे वाटत नाही अशा तक्रारीमुळे अधीक जास्त डोसाची औषधे देतो व शेवटी पेशण्टला जास्त मात्रेच्या औषधान्ची सवय लागुन साध्या साध्या औषधान्नी बरा होणारा आजार देखिल त्याचे बाबतीत काबुत येत नाही, माझ्या घरातच असे एक उदाहरण आहे! (त्यास मी कारणीभूत नाही, किम्बहुना त्याकाळी कानीकपाळी ओरडून सान्गत होतो की सारखे सारखे डॉक्टर बदलू नका)
दुसरे असे की इन्जेक्शन देणारा डोक्टर तो भारी असा भयानक समज पब्लिक मधेच दिसतो, त्याचाही परिणाम शरिर रचनेवर होतच असतो! शरिर केवळ जास्त डोसान्च्या औषधान्नाच थोडाफार प्रतिसाद देते, कालान्तराने त्या त्या औषधान्ना प्रतिसाद देणे बन्द करते!

ही साथ पसरेल त्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधांशी निगडीत लोकांना ट्रेनिंग द्यायला हवं असा आरोग्य खात्याला इशारा देण्यात आला होता. मे मधेच पण त्यांनी तेव्हा लाइटली घेतलं.

आणि मुळात विमानतळांवर तपासणीमधे ढिलेपणा होता त्यामुळेच हे लोण भारतात आलं हे तर अमान्य करता येण्यासारखं नाही.

नाशिकमधला पहिला बळी केवळ यंत्रणेतल्या चुकीमुळे गेलाय. त्याचं नाव अहवालात चुकीचं लिहिल्यामुळे त्याच्यावर उपचार झाले नाहीत.

हे सगळे यंत्रणेतले दोष आहेतच ते नाकारता येणार नाही. आजही दहिहंडी वा गणपति उत्सवावर बंदी घालण्याइतकी हिम्मत आपल्या सरकारची नाही. सुदैवाने काही मंडळांना अक्कल आहे त्यामुळे त्यांनी यावर्षी उत्सव बंद ठेवायचं ठरवलंय. याबाबतीत कधी नव्हे ते उद्धव ठाकर्‍यांचे अभिनंदन. बाकी काही दहिहंडी मंडळं मास्क वाटप करणारेत म्हणे. त्याला काही अर्थ नाहीये. मास्क घ्यायच्या लायनीमधे संसर्ग होऊ शकतोच की.

आयुर्वेदीक उपचारांसबंधी. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय अतिशय उत्तम आहेत. तसेच प्राणायामही.
लस हा एक भाग आहे. व्हायरसवरची लस ही थोडी विचार करायला लावणारी गोष्ट आहे कारण व्हायरस हा म्युटेट होत असतो. त्यामुळे लशीचा तसा लाँग टर्म उपयोग नाही. (तज्ञ लोक सांगतीलच, पण लशीचा परिणाम दोन तीन महिन्याच्या पलिकडे टिकण्यासारखा नाही हे एका वाहीनीवर एका महत्वाच्या तज्ञाला सांगताना ऐकलं होतं.) तो शरीरात टिकावच धरू शकला नाही पाहीजे अशी प्रतिकारशक्ती मिळवणे हे महत्वाचे आहे. आणि सध्याच्या आपल्या लाइफस्टाइलमधे (लिंब्याने म्हणल्याप्रमाणे अतिसुरक्षित!) प्रतिकारशक्तीची पूर्ण वाट लागलेली असते.

Current status of novel H1N1 in Australia
27,663 confirmed cases and 95 deaths.
441 people currently in hospital (114 of these in ICU).
Since May, 3,281 people have been hospitalised with Pandemic (H1N1) 2009.
Source: Department of Health and Ageing, August 11th update.

अर्थात त्याना ४ तासात ३९५ फोन आले. त्यामुळे ते पण वैतागलेले असतील तर त्याचा दोष नाही . त्याना पण फोन करणार्‍याच्या कानाखाली जाळ काढावा असेल असे वाटत असेल, नाही का??>>>>>>>>दोष नाही कसा !! c'mmon, thats their job!! हेल्पलाइनच्या लोकांना फोन येणार नाही तर कुणाला ??
मला कळले नाही, हेल्पलाइन ची लोक किंवा डॉक्टर ने वैतागणे हे 'साहजिक' आहे वगैरे समर्थन कसं होउ शकतं ??

पोस्ट वाचून नंदिनीचा विरोध येथील पोस्टला का आहे हे मलाही कळेनासे झाले आहे.

माझी लिंव्यांचे व रैनाच्या पोस्टना सहमती. H1n1 ३ आठवड्यांपुर्वी सुरु झाला असे कोणीही म्हणने म्हणजे केवळ अज्ञान. रोज लाखो लोक जगात ये जा करतात, मेक्सीकोमध्ये साथ आली तर भारतात अन इथियोपिआ मध्ये पण लोक मरणार हि परिस्थिती. मग आरोग्य यंत्रनेने वेळीच पावले टाकायला काय प्रॉब्ल्मेम होता? हे कळत नाही.

ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या योग्य नाहीत, त्यांचे समर्थन का? १.२ करोड लोकांसाठी एकच टेस्टींग सेंटर ह्यात काहीच वावगं वाटू नये ह्याचे मला आश्चर्य वाटत आहे. आरोग्य सेवा ही पोस्ट मार्टेम नसते, प्रिकॉशन असते असे तुला वाटत नाही का? प्रत्येक तालुक्यात असे एक दोन सेन्टर हवेत जिथे सर्व प्रकारच्या टेस्ट व्हायला पाहिजेत. एपिडेमिक जाहीर आधीच झाल्यावर त्या गोष्टींचा पाठपुरावा न करणे म्हणजे फक्त हलगर्जी वा अ‍ॅरोगन्सी. आणि सर्वच जन तुझ्यासारखेच कसे असतील, फरक आहे म्हणूनच ४०० लोक फोन करत आहेत. रोग संसर्गजन्य आहे मग पॅनिक निर्माण होणारच. त्याला कंट्रोल जनता करु शकत नाही, यंत्रना करु शकते.

मैत्रेयी, मान्य आहे की हे त्याचे काम आहे. पण फोनवरच्या पलिकडे पण माणूसच बसलाय ना? तो माणूस डॉक्टर आहे, कॉल सेंटरमधला एकक्जेक्युटिव्ह नाही की ज्याला अशा भारंभार कॉल्सची सवय असेल... आणि प्लीज माझे विधान रैनाने जे लिहिलय त्याला धरून वाच. कसलेतरी विधान उचलून वादविवाद नकोत कृपया.

आपल्याला बॉसने एक्स्ट्रा काम सांगितले तर आपण नाही का वैतागत? आणि वैतागले म्हणून त्यानी माहिती दिली नाही असं मी थोडंच म्हटलय. पण अगदी बाळबोध प्रश्न पण विचारायला लागल्यावर ते वैतागणार नाहीत का?
अगदीच उदाहरण द्यायचं झाल्यास.. नुकतेच ग्रहण झालं म्हणून स्वाईन फ्लू वाढला का??? (हा मी ऐकलेला एक प्रश्न, असे अजून असतील यात वाद नाही. लोक घाबरले असतील यात पण वाद नाही, पण ज्या पद्धतीने हे सर्व "लोकांकडून" हाताळलं जातय ते बघून राग येतो. कधीतरी यंत्रणेला सहकार्य करा.) मी तरी फोन लावून जितक्या शंका विचारल्या त्याचं पूर्ण निरसन करण्यात आलं. आणि इतकंच नाही तर जास्त माहिती आणि अफवांना बळी पडू नका हेदेखील सांगितलं. Happy

(आजची ट्रेनमधे ऐकलेली अफवा: हा विषाणू मोबाईलमार्फतदेखील पसरतो, कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी.)

मुळात रैनाने लिहिलय की तिने हेल्पलाईनला फोन केलेलाच नाही, मग जाळ काढायची भाषा वापरावीच कशाला?

नीरजा, विमान्तळावरच्या मुद्द्याशी पूर्ण सहमत. मेमधे आप्ल्याकडे खातेवाटप होत असल्याने आणि गुलाम नबी आझाद हे आरोग्य कशाला म्हणतात हे शिकत असल्याने इशारा समजू शकले नसतील Happy

झकोबा, गोष्ट तेवढीच नाहिये, पहिल्या वहिल्या रिदा शेखच्या केस मधे करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाया अन त्यान्ना मिळालेली प्रसिद्धी बघता, प्रायव्हेट डॉक्टर कुणाला दाराशी तरी उभे करतात की नाही याची शन्का आहे, अगदी नेहेमीचा फ्यामिली डॉक्टर असेल तरच तो एन्टरटेन करतो अन्यथा सरळ सरकारी इस्पितळाचा रस्ता दाखवतो, अन ते साहजिकच आहे!
>>>> लिंबू हे विधान कशाच्या आधारावर आहे ते सांगशील का प्लीज??? रिदा शेखच्या पालकांनी सर्वाचा जाहीर लेखी माफी मागितलेली आहे हे वाचलं असशीलच ना तू?? कुठलीही कायदेशीर कारवाई ते लोक करणार नाही आहेत.. (याबद्दल जास्त माहिती मी उद्या परवा देऊ शकेन)

=======================

या सर्व विषयाशी संबंधित नसलेला पण मला पडलेला एक प्रश्नः किती "सुजाण आणि सुशिक्षित" लोक सार्वजनिक आरोग्य सुविधेचा फाय्दा घेतात? बहुतांशी तर तिथे गरीब लोक दिसतात. त्याना यंत्रणा कशीही असली तरी कमी पैशात काम होतं हे महत्वाचं. आणि पैसेवाले इथे उपचार नीट मिळत नाहीत म्हणून फिरकत नाहीत. त्यापेक्षा खाजगी हॉस्पिटल्स मधे "पैसे दिले आहेत, नीट उपचार करा" असा जाब विचारता येतो. सार्वजनिक यंत्रणेला जाब विचारणारं कुणी नसल्यानी ते अजूनच कोडगे होत जातात आणि मग नवजात अर्भक पळवण्यापर्यंत त्याची यंत्रणा ढिली होते.

किंबहुना, मायबोली हे उच्च मराठी मध्यमवर्गाचेच प्रतिनिधित्व करते असं मानल्यास इथल्या किती लोकांनी सार्वजनिक इस्पितळात कधीतरी उपचार घेतलेले आहेत?? कितीजणांनी किमान अशा इस्पितळाना भेटी दिल्या आहेत?? हे मला जाणून घ्यायला आवडेल.

>>मुळात विमानतळांवर तपासणीमधे ढिलेपणा होता त्यामुळेच हे लोण भारतात आलं हे तर अमान्य करता येण्यासारखं नाही.

विमानतळांवर कशाप्रकारची तपासणी होतेय ते मला माहिती नाही. पण H1n1 हा विषाणु इन्क्युबेट व्हायला (आणि रोगाची लक्षणं दिसायला) जर एक आठवडा लागतो, तर आज मी ह्या विषाणूंच्या संपर्कात आले आणि आजच भारतात यायला निघाले, डायरेक्ट फ्लाईटने १४-१५ तासात पोचले, तर इतक्या कमी वेळात कुठल्याही सर्वसामान्य तपासणीत, रक्त किंवा थुंकीच्या सॅपल्सचा real time PCR किंवा तत्सम चाचणी न करता, काही निदान शक्य नाही. अश्या परिस्थितीत काय करणार?

नंदिनी - मला फोनवरुन ज्या प्रकारची माहिती आणि ज्या भाषेत कस्तुरबाकडून आणि यंत्रणेच्या काही व्यक्तिंकडून मिळाली त्या अनुषंगानी मी ते लिहीलं आहे. आय स्टँड बाय माय वर्डस. अंगाचा तीळपापड होण्याइतपत संतापजनक आणि निराशाजनक पदरी पडलं. (भाषेच्या जहालपणाबाबत मला वाटतं आजपर्यंतचा माझा मायबोलीवरील ट्रॅक रेकॉर्ड पुरेशी साक्ष असावा. मी अशा प्रतिक्रिया सहजासहजी देत नाही.)
इस्पितळातील आणि यंत्रणेतील लोकांनी काय प्रकारे एनक्वायरी हँडल कराव्यात अशी माझी नागरीक म्हणून माफक अपेक्षा होती /आहे आणि त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.

हेल्पलाईनला फोन केला नसताना त्याबद्दल मी काहीही लिहीलेले नाहीये. हेल्पलाईनच्या माहितीबद्दल धन्यवाद. हे मी आता गरजू व्यक्तिंना जरुर सांगेन.

प्रत्येक तालुक्यात असे एक दोन सेन्टर हवेत जिथे सर्व प्रकारच्या टेस्ट व्हायला पाहिजेत. एपिडेमिक जाहीर आधीच झाल्यावर त्या गोष्टींचा पाठपुरावा न करणे म्हणजे फक्त हलगर्जी वा अ‍ॅरोगन्सी. आणि सर्वच जन तुझ्यासारखेच कसे असतील, फरक आहे म्हणूनच ४०० लोक फोन करत आहेत. रोग संसर्गजन्य आहे मग पॅनिक निर्माण होणारच. त्याला कंट्रोल जनता करु शकत नाही, यंत्रना करु शकते.
>> केदार, बोलायला कित्ती सोप्प्पय.. याला खर्च किती येतो हे माहिती आहे का तुला? भारतातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे हे मीही मान्य करतेय. पण ती कुचकामी आहे हे लक्षात केव्हा आलय??? तर साथ पसरल्यावर!! कुणी पाहिलीये का अवस्था या हॉस्पिटल्सची??? एक जेजे सोडलं तर बाकीची "बकाल" म्हणावी अशी आहेत. अशा अवस्थेत्त साधी सर्दी ताप आलेल्यानी तिथे धाव घ्यावी, आणि आधी आम्हाला तपासावं असं म्हणणं कितपत योग्य?
"मी असल्या घाण ठिकाणी जास्त वेळ उभा राहणार नाही, माझे आधी टेस्टिंग करा" ही विधानं मी स्वतः ऐकलीयेत. हे तुला अ‍ॅरोगन्सी वाटत नाही का? की बोलणारा श्रीमंत एन आर आय आहे म्हणून डॉक्टरने त्याच्याकडे आधी पहायचं आणि बाकीचा एक गरीब मेला तरी चालेल??? अपेक्षा तरी काय आहेत तुमच्या यंत्रणेकडून? आपणही त्याच यंत्रणेचा एक भाग आहोत हे सोडून विचार करून चालेल का?

एपिडेमिक जाहीर होण्यासाठी रूग्णाची ठराविक संख्या ओलांडावी लागते, ती त्या लोक्संख्येच्या प्रमाणात असते. सध्या फक्त महाराष्ट्रात एपिडेमिक जाहीर केलाय, अख्ख्या भारतात नाही. १.२ करोडच्या लोकासाठी सध्या १२ सेंटर्स आहेत आणि ती पुरेशी आहेत जर तिथे १०,००० लोक जाऊन गर्दी करत नसतील तर... आणि लोक हेच करत आहेत!!!

जर लोकाची बेफिकीर वृत्ती बघाय्चीच असेल तर हे उदाहरण घे. स्वाईन फ्लूपासून वाचण्यासाठी जो मास्क लोक वापरत आहेत (ज्याच्या किमती वाढतच आहेत) तोच मास्क रस्त्यावर किन्वा रेल्वे ट्रॅकवर फेकतायत. मला रोग नाही झाला पाहिजे, बाकीच्यांना झाला तरी चालेल!!!! हा हलगर्जीपणा नाहीतर काय आहे??

माझा विरोध लोकाच्या या वृत्तीला आहे, सरकारच्या नावाने खडे फोडायचे, आरडाओरड करायची, पण त्याच सरकारला आणि त्याच यंत्रणेला थोडेफार सहकार्य केले तर जास्त फायदा आपल्यालाच होइल, हे कुणीच मान्य करत नाहिये.

माझे कुणालाही उद्देशून असलेले हे शेवटचे पोस्ट, मला जर काही माहिती द्यायची असेल तरच मी इथे लिहिन. कुणाला अजून काही शंका असल्या तर बिन्धास्तपणे विचारा मी शक्य तितकी मदत करेन
बाकी वाद विवाद चर्चा चालू द्या. Happy

केदार, बोलायला कित्ती सोप्प्पय.. याला खर्च किती येतो हे माहिती आहे का तुला? >>>> भारतातल्या सर्वच सार्वजनिक संस्था आणि महामंडळे 'मनात आणलं तर' किती एफिशियन्टली काम करु शकतात आणि 'मनात नसताना' किंवा त्यांना गरज वाटली नाही म्हणून किती पराकोटीचं दुर्लक्ष आणि ढीलाई दाखवू शकतात याचा माझा पुरेसा वैयक्तिक अनुभव आहे. पैसा हा फॅक्टर भारतीय सरकारी संस्थांच्या एफिशियन्सीच्या आड कधीच येत नाही. पुरेसा निधी असला तरी त्याचा काहीही वापर न करता तो सडवत ठेवण्यात यांचा हात कोणी धरु शकत नाही. याउलट काही अत्यंत कार्यक्षम जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय सेवक असतात ते कुशलतेने कितीतरीवेळा अशी परिस्थिती प्रतिकुल अवस्थेतही हाताळतात.
आळशीपणा आणि कॅज्युअल वृत्तीच फक्त सार्वजनिक संस्थांना भोवते. पैशाची उपलब्धी किंवा अभाव याचा यात काही संबंध नाही.

>>>>> किंबहुना, मायबोली हे उच्च मराठी मध्यमवर्गाचेच प्रतिनिधित्व करते असं मानल्यास इथल्या किती लोकांनी सार्वजनिक इस्पितळात कधीतरी उपचार घेतलेले आहेत?? कितीजणांनी किमान अशा इस्पितळाना भेटी दिल्या आहेत?? हे मला जाणून घ्यायला आवडेल.

नन्दिनी,
सर्वप्रथम, इन्टरनेटवर वावरतात म्हणजे ते सर्रास उच्च मध्यमवर्गिय वा मध्यमवर्गिय आहेत असे समजणे चूक आहे! नोकरीच्या ठिकाणी फुकट वापरायला मिळते म्हणून वावरणारे माझ्यासारखे कनिष्ठ मध्यमवर्गिय (खरे तर गरिबापेक्षा थोडे वर कारण व्हाईट कॉलर्ड) जास्त आहेत, पण ते असो.
माझ्यापुरते सान्गायचे तर, माझ्या रिटायर्ड वडीलान्नी अखेरीच्या दिवसात कवळी बनवुन घेतली ती पुण्यातील ससुन रुग्णालयातुन, लोकलने ये जा करत, तासन्तास लायनीत उभे राहून!
ते गेले, तेव्हा तपासण्याकरता जाताना मी स्वतः त्यान्ना लोकल स्टेशनवर सोडून आलो होतो, ते ससुनला पोचले तेव्हाच लायनीत त्यान्ना अ‍ॅटॅक आलेला होता, यथावकाश त्यान्चा नम्बर (?) आल्यावर त्यान्ना नन्तर मात्र ICU मधेच दाखल करण्यात आले, जिथे ते अखेरपर्यन्त म्हणजे पुढचे दहा दिवस होते. हे सर्व दहा दिवस जवळपास सर्ववेळ (दिवसातील कामावरचा काही वेळ सोडून) रात्रीसहीत मी तिथेच होतो व एकुणच सरकारी इस्पितळातील कारभार फार जवळून बघितला! त्या आधी व नन्तरही अनेकवेळा अनेकान्च्या निमित्ताने सरकारी दवाखान्याच्या पायर्‍या चढायची वेळ आली आहे.
पुढे चारच वर्षाच्या आत पुण्याच्या रुबीचा देखिल जळजळीत अनुभव गाठीशी आला ज्याने मला केवळ कर्जाच्या डोन्गराखालीच पिचवले!
अर्थात इथे "सहानुभुती मिळवणे" वा अन्य हेतूने हे सान्गितले नसून, वर मी जे जे लिहीतो आहे, त्यास पुर्वानुभवाची, प्रत्यक्ष अनुभव वा अनुभूतीची जोड नसावी अशा स्वरुपाची जी शन्का तुझ्या पोस्ट मधून व्यक्त होत आहे, त्या अनुषन्गाने ही माहिती पुरवली आहे! यावरुन जो काय निष्कर्ष तुला काढायचा तो तू काढशीलच Happy
सुरवातीपासून, म्हणजे हा बीबी मी उघडायच्या जवळपास दहाबारा दिवस आधीपासून मी काही मुद्दे वेगवेगळ्या (खास करुन यस्जीरोडवर) मान्डले होते त्यापैकी
१. मिडीया ची बेजबाबदारपणे बातम्या देण्याची पद्धत ज्यामुळे भितीची लहर पसरून, भीक नको पण कुत्रे आवर अशी झालेली गत
२. सरकारी ढीसाळ कारभाराबरोबरच, पब्लिकची दुतोन्डी व तत्कालिक स्वार्थी वृत्ती
३. समुर्ण भारतीय समाजातील बेशिस्त, निरर्गल वृत्ती
हे महत्वाचे मुद्दे अधोरेखित करीत होतो.
माझ्या वरील काही पोस्ट मधे मला वेळेनुसार जसे जमले तसे अन मला भावले तसे त्या त्या मुद्यान्ना स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे.
वर आपण म्हणता त्याप्रमाणे, कनिष्ठ/मध्यम/ की उच्च हा वाद जाऊदे, पण मध्यमवर्गिय आहेत इथे जास्त हे मलाही मान्य! पण हे अन खास करुन मायबोलीवरील मध्यमवर्गिय जास्त करुन "बुद्धिप्रधान" (मी बुद्धिप्रामाण्यवादी म्हणले नाहीये Proud ) आहेत हे कुणालाच अमान्य नसावे, अन अर्थातच येथे प्रदर्शित होणार्‍या प्रत्येकाच्या मताचे मी गाम्भिर्याने चिन्तन करुनच, मगच माझे मत नव्याने बनवतो, वा जे आहे तेच मत अधिक ठामपणे मान्डतो. किम्बहुना हा बीबी उघडण्यामागची प्रोसेस देखिल याच पद्धतीने झालेली आढळून येईल.
मला माझे मत बनविताना, क्षणोक्षणी टीव्ही वर दिसणार्‍या बातम्या, वर्तमानपत्रे याचबरोबर, केवळ ऐकीव नव्हे तर त्या त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिन्चे प्रत्यक्ष अनुभव यान्चे मार्गदर्शन झालेले आहे, मग तो अभिनव मधील एखादा शिक्षक असेल वा एखादा डॉक्टर! अर्थातच मिडीया अन कायद्याच्या भितीपुढे ते नेमके कोण हे सान्गण्याच्या मजवर होऊ शकणार्‍या सक्तीपुढे मी माझ्या बचावाचे सर्व उपलब्ध कायदेशीर मार्ग राखून ठेवतो आहे. ( हे सान्गणे न लगे)
रिदा शेखच्या कुटुम्बियान्चा सध्याच्या स्टॅण्ड काय आहे ते मला माहीत नाही, पण मी वर केलेला उल्लेख हा गेल्या आठ दिवसात घडलेल्या, अजुनही घडत असलेल्या प्रत्यक्ष घटनान्ना अनुसरून आहे, त्यामागे कित्येकान्चे अनुभव आहेत, व जे घडलय, त्या बाबतीत (कोणाचे लक्षात नाही) सरकारी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी/सत्ताधिशाचे विधान आहे की आता यामुळे खाजगी क्षेत्रातील डॉक्टरादी कर्मचारी घाबरतील. हे घडलेले आहे. व तो त्याचाच उल्लेख आहे, आता नन्तर त्यान्ना उपरति झालेली असेल, ती स्वागतार्ह देखिल असेल, पण तीर केव्हाच सूटून गेलाय, म्हणूण त्या सुटलेल्या तीराचा तो उल्लेख होता.
माझ्या मते त्यात वावगे काही नाही.
आज टीव्ही वर दाखवताहेत की वसतीगृहे ओस पडताहेत व हेच विद्यार्थी आपापल्या गावी जाऊन सम्भाव्य लागणीची शक्यता वाढवताहेत.

नमस्कार ...
इथे मी माझा विमानतळावरचा अनुभव सांगु इच्छितो..
मी जुलै महिन्यात दोन आठवड्यांकरिता भारतात आलो होतो. त्या आधी मी कामानिमीत्त बर्याचदा मेक्सीकोला पण जावून आलो होतो. अमेरिकेतुन निघताना न्युयॉर्क विमानतळावर स्वाईन फ्ल्यू ची कोणतिही तपासणी होत नह्वती ( एअर इंडिया ). तसेच भारतात (मुम्बई) पोहोचल्यावर देखिल आम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी देण्यात आला . त्यावर एका पानावर स्वाईन फ्ल्यू ची माहिती होती आणि दुसर्या पानावर आपले नाव, भेट दिलेले देश आणि स्वाईन फ्ल्यू ची काही लक्षणे असतील तर ती माहिती भरावयाची होती. मी पुर्ण माहिती भरुन जेव्हा डॉक्टरच्या काउंटरवर गेलो तर तेथील डॉक्टर मास्क लावुन मोबाईलवर गाणे (???) एकत बसले होते. त्यांनी माझा फॉर्म वाचुन मला फक्त एवढेच विचरले की काही ताप आहे का? मी नाही असे सांगितल्यावर मला कोणतीही तपासणी न करता जावु देण्यात आले.
त्या नंतर मी भारतात दोन आठवड्यांकरिता राहून चार दिवसांपुर्वी अमेरिकेत आणि नंतर मेक्सीकोत परत आलो.
सुदैवाने मला स्वाईन फ्ल्यू नव्हता पण असाच हलगर्जीपणा परदेशातुन भारतात येणार्या स्वाईन फ्ल्यू बाधीत प्रवाश्यांबाबत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

RAHULDB232, यांच्याशी सहमत आहे..
नवरा मे मधे भारतात जाऊन आला तेव्हाही हीच परिस्थिती... त्याने तेव्हाच काळजी व्यक्त केली होती.. की अशानी कसं होणार! स्वाईन फ्लू आलाच.. जगात बाकी ठिकआणी किती खबरदार्‍या घेतल्या याची माहीती असेलच ना? आधीपासून तयारी पाहीजे होती.. जसं लोकांचे चुकते तसेच यंत्रणेचीही चूक आहेच! पण लोकांचे पॅनिक होणे मला जास्त संयुक्तिक वाटते डॉ.चे किंवा हेल्पलाईनवाल्यांच्या वैतागापेक्षा.. Sad जे काही असेल ते.. लवक्र चांगली उपाययोजन होऊन हे लवकर संपले पाहीजे बाबा..

Current status of novel H1N1 in Australia
27,663 confirmed cases and 95 deaths.
441 people currently in hospital >>>
मला वाटते चंपकचे वरच पोष्ट अतिशय बोलके आहे. किती हाईप केला आहे भारतात आपण याची जाणीव होते.

रैना, सरकारी इस्पितळातील दिरंगाई, वागण्याची पद्धत व एकुणच स्चच्छता वगैरेला अनुमोदन. पुण्यातील नायडुमधे २०० च्या वर रुग्ण गेले पण एकही दगावला नाही. ससुन मात्र मौतका कुआँ आहे.

सध्या एवढी बेक्कार परीस्थिती असुन सुध्दा लष्करी अस्पताल सेवेचा वापर किती होतोय काय माहीत.

27,663 confirmed cases and 95 deaths.>>>

या ९५ मृत्यू पावलेल्या लोकांपैकी बर्‍याच जणांना गंभीर स्वरुपाचे आजार आधीच होते असं पण इथे वाचण्यात येतंय.

१. स्वाईन फ्लू ने झालेल्या १७ मृत्यूमधे १३ महाराष्ट्रात. लागण झालेल्याची संख्या १,१९३.
२. मुंबईमधे १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट शाळा कॉलेज मल्टिप्लेक्स बंद. मॉल्सना गर्दीवर कंट्रोल करण्याचे आणि वीकेंडचे सेल रद्द करण्याचे आदेश.
३. वडोदरामधल्या आर्याला टॅमिफ्लू देऊन देखील तिचा मृत्यू. विषाणु आपले स्वरूप बदल्त असल्याचे मेडिकल तज्ज्ञाचे मत.
४. तीन खाजगी लॅब्जची तपासाणी व टेस्टिंग करायची मागणी. केंद्र सरकाय या तीन लॅब्जची पाहणी करून निर्णय घेइल.
५. मलेरियामुळे गेल्या बारा दिवसांत १६ मृत्यू. डॉक्टराच्या मते, मलेरिया जास्त धोकादायक.
६. दही हंडी, गणेशोत्सव व रमझान च्या वेळेला गर्दी करू नये, विविध पक्षातर्फे जनतेला विनंती.
७. शिवसेना, मनसे तर्फे दही हंडी रद्द.

Pages