स्वाईन फ्ल्यू च्या निमित्ताने

Submitted by limbutimbu on 10 August, 2009 - 02:25

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज इट टू लेटर Sad

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे, सरकार काय करेल तेव्हा करेल. आपण स्वतः आपली काळजी घ्यावी आणि अफवा पसरवू नये.

स्वाईन फ्लू साठी भारतीय सरकार पुरस्कृत संकेतस्थळ

इथे आपत्कालीन मदत केंद्रांची माहिती, प्रवासात घ्यायची काळजी, फ्लूची लक्षणे आणि नवीन उपलब्ध होणारी माहिती आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल
उसगावात राहणार्‍यांसाठी उपयुक्त, पण माहिती सर्वसाधारण सर्वांसाठीच चांगली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे स्वाईनफ्लू संदर्भात संकेतस्थळ

मास्क कसा वापरावा यासंदर्भात सूचना

नमस्कार मंडळी,

पुण्यात हे काय सुरु आहे? दोष कोणाचा किंवा आपले राज्यकर्ते कसे वागले ही चर्चा नंतर होईलच.
पण सध्या परिस्थीती कशी आहे? परिस्थीती आटोक्यात येइल असे वाटतय का?
सविस्तर लिहिल का कोणी?

धन्यवाद.

मिडियाबद्दल जे लिहिलय ते अगदी पटलं!>>>>>

माझ्या मम्मीला वाटतय आख्या अमेरीकेत सगळ्यांना रोग झालाय. पेपर वाचुन भलतेच टेंन्शन घेतलंय तीने. मिडीया साठी पण काहीतरी कायदा करायला पाहीजे बुवा.... Happy

पुण्यात पाचवा बळी . Sad
http://beta.esakal.com/2009/08/11033220/home-five-dead-in-pune-by-swin.html

प्रशासनाची अशी कुचकामी धोरणं असतील आणि
असे बेजबाबदार नागरिक (खालिल बातमी वाचा) असतील तर धन्य आहे !:(
http://beta.esakal.com/2009/08/10211948/west-maha-kolhapur-swine-flu-p.html
http://beta.esakal.com/2009/08/11000614/marathwada-latur-swine-flu.html

घाबरण्याचे कारण नाही पण आरोग्य मंत्री म्हणतात भारतात ३३ % लोकांना फ्लू होण्याची शक्यता आहे, कुठल्या आधारावर ३३ % आकडा आला कळत नाही.

आजच वाचलं की पुण्यात अ‍ॅड्मीट असलेल्या डॉ. चा म्रूत्यू झाला. त्याच्या पत्नीची तपासणी केली आणि ती पॉझिटीव्ह नाही म्हणुन तिला घरी सोड्ण्यात आलं....
माझ्या मते ..... जर H1 N1 चा जिवाणु १ ते ८ दिवस सुप्तावस्थेमध्ये असतो आणि त्या स्त्री ची तपासणी जरी पॉझिटीव्ह आली असली तरी तीची तपासणी ह्या १ ते ८ दीवसांमध्ये झाली असेल तर ... ती निर्धास्तपणे आपल्या ला साधा फ्लू आहे आणि स्वाईन फ्लू नाही म्हणून काही काळजी घेणार नसेल तर रोगाचा फैलाव होणारच.
ह्यामध्ये सरकारी यंत्रणेने तिला १० दिवस एकांतात राहण्यास उद्युग्त करावयास पाहीजे आणि नागरीकांनी सुध्दा स्वतःची जबाबदारी ओळखून स्वतः शक्यतो आपल्यापासून ह्या रोगाचा न प्रसार होऊ देणं ही काळजी घेतली पाहीजे असं मला वाटतं
दुसरा मुद्दा असा की पुण्यात शाळा ८ दिवस बंद ठेण्याचे आदेश निघाले. मल्टीफ्लेक्स ३ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले ....
का ? नागरीकांनी स्वतःची जबाबदारी ओळखुन स्वतः तिथे न ऊंडारणे हे होऊ शकत नाही का ?
ह्या लोकांना सुशिक्षित आणि सुजाण म्हणायचं का ?

शहरान्च्या बेसुमार, अनियन्त्रित वाढीमुळे दाट लोकसन्ख्येबाबत जे जे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यात साथीच्या रोगान्चा प्रश्न देखिल भयन्कर असतो
शिवाय, दाट लोकसन्ख्येची सामुहीक शक्ती अफाट असते, ती चान्गल्या कामाकरता वापरली जाते तोवर प्रश्न नस्तो, पण भयाच्या लाटेपोटी, वा चक्क भावनिक उन्मादात (ज्यास वृत्तपत्रिय भाषेत "अमक्या तमक्यान्चा सन्ताप" असे सम्बोधले जाते) हीच गर्दी बेकाबू होऊ शकते, व आजवर अनेक प्रसन्गात अनेकवेळा हे सिद्ध झालय!
अशावेळेस, धीर मिळण्यालायक देण्यासारखे मिडीयाकडे काहीच नस्ते का?
एरवी मारे लोकशाहीचे चौथे आधारस्तम्भ (?) म्हणवुन घेणार्‍या मिडीयाची, या बातम्यान्बाबतची अक्कलेची दिवाळखोरी स्पष्ट होते आहे.
होय, पुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ आहे! पण त्यात प्यानिक होण्यासारखे वा घाबरुन जाण्यासारखे काही नाही!
याबाबत मी काही जाणकारान्शी, सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍यान्शी बोललो तेव्हा काही मुद्दे नव्याने लक्षात आले.
एरवीच्या आयुष्यात, अतिसुरक्षित आहारविहार असणारे अशा आजारान्ना चटकन बळी पडतात कारण तुलनेत त्यान्ची स्वयम्भू शारिरीक प्रतिकारशक्ती कोणत्याही आजाराशिवायच, पण केवळ अतिसुरक्षित आहाराविहारामूळे कमी कमी होत गेलेली असते! एकाचे निरीक्षण असे की म्युन्सिपालटीच्या शाळेतील विद्यार्थ्यान्ना सहजासहजी सन्सर्गाचा परिणाम होताना दिसत नाहीये!
जबरदस्त इच्छाशक्ती जागृत करुन, योग-प्राणायामादी क्रियान्द्वारे शरिरान्तर्गत सुरक्षाव्यवस्थेस चालना देण्याचा पुर्वापार पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपाय आम्ही विसरुन गेलो आहोत, परिणामी, भयाच्या तान्डवात शरिराची उरलीसुरली प्रतिकारशक्ती गमावण्याची शक्यताच जास्त!
एकाच्या मते आहारातील ताक व तत्सम पदार्थ नाहीसे होणे, जन्कफूडची सवय असणे, कायम फिल्टर्ड बॉटलबन्द पाणी पिणे, एसी अथवा बन्द सुरक्षित जागेत वावरणे, शरिरास उन्हाचा कधी स्पर्षही न होणे ही व अशी अनेक कारणे शरिराची अन्तर्गत सुरक्षाप्रणाली कमजोर करू लागतात, व अशा साथीच्या रोगान्ना चटकन बळी पडतात
प्रश्ण असाहे की ही साथ आलीये, अजुन काही दिवसात, पावसाळा सम्पेलच, व ही देखिल जाईल, अन सर्व लोकान्चे पुन्हा ये रे माझ्या मागल्या चालू होईल! तर याबाबत ही प्रजा काही धडा घेणार आहे की नाही?

आजच्या पेपरमध्ये आलंय, शाळा, कॉलेजं आणि चित्रपटगृहं बंद करण्यात येत आहेत म्हणून. हे आधीच करायला काय झालं होतं? पण याउप्परही धोका अजून आहे तो म्हणजे सार्वजनिक बस स्थानकं आणि रेल्वे स्टेशन, मॉल्स मध्ये. तिथे काय उपाययोजना असणार आहे? खाजगी बसेस पण सुटलेल्या नाहीत.

सध्या सगळीकडे लोक मास्कस लावून फिरताना दिसतायंत. दुर्दैवाने त्याचाही बाजार झाला आहे. सर्जिकल मास्क ज्याची खरी किंमत १० रुपये आहे तो २० ते ७० रुपयांपर्यंत विकला जातोय. सरकारने खरं तर असे मास्क्स कंपल्सरी करायला हवेत शिवाय त्यांची उपलब्धता आणि सर्वांना परवडेल अशी किंमत ठेवायला हवी. जे लोक याचा गैरवापर करून बाजार करतील त्यांना शिक्षा ठोकायला हवी.

एकूणच सर्दी,ताप, खोकल्याची साथ असल्याने लोक घाबरून स्वाईन फ्ल्यू ची टेस्ट करायला रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. आणि मग असे पेशन्ट्स स्वाईन फ्ल्यू झालेल्यांच्या संपर्कात येतात आणि संसर्ग वाढतोय. रूग्णालयात जाताना जास्तीत जास्ती काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषत: लहान मुलांची. पॅनिक होऊ नये.

>>नागरीकांनी स्वतःची जबाबदारी ओळखुन स्वतः तिथे न ऊंडारणे हे होऊ शकत नाही का ? >> बिपिन कायतरीच काय हो? तुम्ही फारंच अपेक्षा करताय असं नाही का वाट्त तुम्हाला? शुक्रवारी संध्याकाळी सिनेमा नाही पाहीला तर लोकांना वीकेन्ड नाही वाटत.

असं होय .. मग त्यांचा स्वतःचा एन्ड झाला तर ...? हेही कळू नाही त्यांना (सुशिक्षित आणि सुजाण नागरीकांना) ...
तस्या माझ्या अपेक्षा जास्तच आहेत हे मलाही मान्य आहे म्हणा....

मग त्यांचा स्वतःचा एन्ड झाला तर ...?
---- 'एक दिन हर किसी को उपर जानेका ही है' असे म्हणत ट्रक/ गाडी/ वाहने बेदरकारपणे हाकणारे आपण बघतो. मी अनेक वेळा बघितले आहेत. त्यांना स्वत:ची तसेच इतरांची काळजी नसते.

मराठीत एक म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे!
दुर्दैवाने, पण हे देखिल खरे आहे की सर्वसामान्य माणूस, रोजच्या जगण्यात इतकेवेळा मरणे अनुभवत असतो की विचारता सोय नाही. तो रस्त्यावरुन पायी जावो वा टूव्हीलरने, तो सुरक्षीत नस्तोच, तो लोकलमधे लटकून जावो वा बसमधून, तिथेही तो सुरक्षित नसतो. रोजच्या जगण्यात लोकलमधून पडून मेल्याची, टूव्हीलर धडकल्याने वा टूव्हीलरवाला कशाला धडकल्याने डोके फुटून मरणारे असन्ख्य तो बघत असतो, वा त्याबद्दल वाचत असतो, प्रवासात अति भरधाव वेगात गेल्याने झालेल्या अ‍ॅक्सिडेण्टच्या बातम्यान्ना आता तिसर्‍या चौथ्या पानावरच जागा असते, अन ते वाचून जीवन किती क्षणभन्गुर वगैरे विचार मनात करुन, पण मी नाही त्याची फिकीर करीत असे उसने अवसान आणून हा सामान्य माणूस जगत रहातो. बर, तो दोन घास सुखाने तरि खाईल? तसेही नाही, सब्से तेज वगैरे म्हणणार्‍या वाहिन्या, देशभरात होत असलेली दुध्/तुप्/मिठाई/मसाले/धान्ये इत्यादीतली भेसळ अशाप्रकारे दाखवतात की जणूकाही यास वाटावे की प्रत्येक घासच भेसळीचा आहे! स्टिन्ग ऑपरेशनच्या नादात अन बातमी मूल्य वाढविण्याच्या नादात जगण्यास आवश्यक असलेल्या "जन्तेच्या मनातील विश्वासावरच आपण कुठाराघात करतोय" हे या वाहिन्यान्च्या गावीही नसते, बर भेसळ वा तत्सम गोष्टिन्चा केवळ बातमीकरता पाठपुरावा करणार्‍या अन प्राईमटाईममधे त्या घोळवुन घोळवुन दाखविणार्या वाहिन्या, यापुढील कारवाईचा पाठपुरावा तर करत नाहीतच, पण होत असलेल्या पॉझिटीव कारवाईस देखिल प्रसिद्धी देत नाहीत!
तर अशा सर्व असुरक्षीत वातावरणात "मी त्याची फिकीर करत नाही" या उन्मादात वा खर तर "भूलेत" जगणार्‍या सर्वसामान्य माणसास कधीकधी मात्र "भयाची लहर" ही देखिल एक मानसिक गरज वाटत असेल तर नवल नाही!
एके काळी वस्तुन्चा व्यापार व्हायचा, अगदी गुलाम म्हणून मानवान्चा देखिल व्यापार व्हायचा, पण हल्ली त्याहूनही भयानकरित्या "माणसान्च्या भावनान्चा व्यापार" सुरू झाल्याचे दिसते, अन ते समाजरचनेस सर्वात घातक ठरते आहे!
या सर्वाचा स्वाईन फ्ल्यूशी काय सम्बन्ध? तर असा कि, या साथीस सामोरे जाताना समाजमन जेवढे खम्बीर दिसायला हवे, विचारात अन कृतीत, तसे ते दिसत नाही, अन तसे ते व्हावे याकरता सरकार वा मिडीया पुढे होऊन काही ठोस्/भरीव करताना दिसत नाहीत!

पानी उकलुन प्यावे.
---- हा पाण्याद्वारे होतो?

http://www.cdc.gov/h1n1flu/qa.htm

How does novel H1N1 virus spread?
Spread of novel H1N1 virus is thought to occur in the same way that seasonal flu spreads. Flu viruses are spread mainly from person to person through coughing or sneezing by people with influenza. Sometimes people may become infected by touching something – such as a surface or object – with flu viruses on it and then touching their mouth or nose.

अरे वाह!!! दुसर्‍यावर दोष ढकलायची इथे स्पर्धाच चाललेली दिसतेय. सरकार, राजकारणी, मिडिया, "इतर" लोक यावर बोलून झालं की मग "हे असंच चालू राहणार?" हे बोलायला मोकळे!!!

साथीचा रोग हा "जाहीर" करावा लागतो. त्यासाठी विशिष्ट संख्या ओलांडावी लागते. आरोग्य यंत्रणेला बेजबाबदारपणे पावले उचलता येत नाहीत, सरकार कितीही नालायकासारखे वागले तरी WHO वगैरे संस्था आहेत अजून पण.

शाळा बंद केल्या आहेत, कारण लहान मुलांना जंतु संसर्ग फार लवकर होतो. तसेच, स्वच्छातेचे बेसिक नियम ते पाळतीलच याची खात्री नसते . उदा. शिंकताना रूमाल वापरणे.

चित्रपट गृहं बंद केली आहेत कारण तिथे एकावेळेला हजार पेक्षा जास्त लोक असतात, तसेच, ती काही जीवनावश्यक वस्तू नाही.
गरज पडली तर मॉल्स, बसेस आणि ऑफिसेस देखील बंद केली जातील. पण यामधे नुकसान कुणाचे होइल? तर ज्याची रोजी रोटी दिवसाच्या पगारावर अवलंबून आहे त्याना. अशा लोकांचा पण विचार केला गेलाच पाहिजे.
इथे सुजाण आणि सुशिक्षित लोक उंडारणं बंद करू शकतात पण जे अशिक्षित आहेत त्याचं काय?? आणि आपण सुशिक्षित आहोत्, याचा अर्थ असा नाही की दुसर्‍याला पण आपल्या इतकीच अक्कल हुशारी असावी. भारतात बहुसंख्य लोक निरक्षर आहेत, वैयक्तिक आणि सर्वजनिक स्वचछतेबद्दल अनभिज्ञ आहेत त्याचं काय??

रोग फैलावतोय म्हणून सध्या जो तो ओरडतोय. पण कधी स्वतःहून गल्लीमधला कचरा उचललाय का? किंवा तसा कचरा उचलला जावा म्हणून प्रयत्न केला आहे का??

दुसर्‍याला दोष देणं फार सोपे आहे, स्वतः कृती करणं फार कठीण!!

>>>> की मग "हे असंच चालू राहणार?" हे बोलायला मोकळे!!!
नाही, त्या वाक्यावर झक्कीन्च पेटण्ट हे! ("भारतात" हा शब्द मागे लावून) Proud

इन्फ्लूएन्झा व्हायरस काय आहे ?
हा विषाणूमुळे होणारा आजार आहे .
याचा संसर्ग एका माणसापासून दुसर्‍या माणसाला होतो .

हे करा...
हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत .
पौष्टिक आहार घ्यावा .
लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी -व्हिटॉमिन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा.
खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा .
भरपूर पाणी प्यावे .
पुरेशी झोप घ्यावी .

लक्षणे :
ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे .
अतिसार, उलट्या होणे .
श्वास घेण्यास त्रास होणे .

हे टाळा :
हस्तांदोलन अथवा आलिंगन .
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे .
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे .
धुम्रपान करणे .
गर्दीमध्ये जाणे.
स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात दूर राहावे .
ज्यांना लागण झाली आहे ते, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनीच `एन-९५ मास्क` वापरावेत इतरांनी साधे मास्क किंवा हातरूमाल वापरावेत.

@ नंदिनी : शाळा आणि मल्टीप्लेक्स बंद करण्याला माझा आक्षेप नाही .. वाचा
<<<दुसरा मुद्दा असा की पुण्यात शाळा ८ दिवस बंद ठेण्याचे आदेश निघाले. मल्टीफ्लेक्स ३ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले ....
का ? नागरीकांनी स्वतःची जबाबदारी ओळखुन स्वतः तिथे न ऊंडारणे हे होऊ शकत नाही का ?>>>

तर लोकांनी सरकारी यंत्रणेला हातभार लावला पाहीजे अस माझं मत आहे. आणि शिक्षणाच म्हणाल तर मला माहीत आहे की भारतात बहूसंख्य म्हणजे तर आजमितीला ६८% लोक निरीक्षर आहेत पण याचा अर्थ त्यांना त्यांची जबाबदारी कळत नाही असा घ्यायचा का ...
त्यांना समजेल अशा तर्‍हेने आजाराबदद्ल जागरुकता कोण निर्माण करणार ? हे काम सरकार ने केले पाहीजे तसंच सुशिक्षित आणि सुजाण नागरीकांनी त्यांच्या गटांनी करायला काय हरकत आहे ? असं कीती गट आज काम करीत आहेत ?
माझ्या पुरतं सांगायच झाल तर मी ह्या विषयी आजुबाजुच्या निरीक्षर लोकांना हे सांगण्याचा उपक्रम गेले चार दिवस करीत आहे त्यात ४० कि मी. वरील काही असे पाडे (त्र्यंबकेश्वर च्या फेरी मार्गावरचे)होते की जिथे पाड्यावरचे आणि संधीसाधू भाविक (काही खरे भाविक असतातच त्यांना वगळून बोलतो आहे) जे की साधारण अडीच लाखांच्या घरात आलेले होते त्यांच्यापैकी जितक्यांपर्यंत पोहचण शक्य होतं तितक्यांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि तुम्ही म्हणता तसं कचर्‍याबद्दल तर गेली ५ वर्ष मी काम करतो आहे.
नाशिकचे पिकनिक स्पॉट्स जसे सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर वगैरे आम्ही लोक ठराविक मध्यंतराने सफाई करीत असतो.
तुम्ही येणार का आमच्या उपक्रमात सहभागी व्हायला ?

तर लोकांनी सरकारी यंत्रणेला हातभार लावला पाहीजे अस माझं मत आहे.
>> हे मी पण म्हणतेय बिपिन. सरकार आणी मीडियाच्या नावाने खडे फोडणं हाच वरेल चर्चेचा सूर दिसतोय. मला नाशिकला काम करणे जमणार नाही, मी मुंबईत करतेच आहे आणि जमलंच तर रत्नागिरीत पण. तुम्ही इतरांना सवध करताय हे बघून बरं वाटलं. Happy पण मी वैयक्तिक रीत्या तुम्हाला काहीही बोलले नव्हते हे लक्षात घ्या.

आजमितीला ६८% लोक निरीक्षर आहेत पण याचा अर्थ त्यांना त्यांची जबाबदारी कळत नाही असा घ्यायचा का ...
>> हो, कारण हा आजार नवीन आहे. आणि भारतात अजूनही बायाबापड्याना दुख्णं अंगावर काढायची सवय असते. जर का समाजाच्या या भागात हा रोग पसरला तर तो आटोक्यात आणणे किती कठीण असेल याचापण विचार करायला हवा. तसेच आरोग्यतज्ज्ञाच्या मते हा व्हायरस अजूनही बदलू शकतो आणि जर तो तसा बदलला तर अजून धोकादायक ठरू शकतो.

तसंच सुशिक्षित आणि सुजाण नागरीकांनी त्यांच्या गटांनी करायला काय हरकत आहे ? असं कीती गट आज काम करीत आहेत ?
>> छे छे!! हे तथाकथित सुजाण सुशिक्षित गट तर सुट्टी मिळताच गावाला पळतायत. आपल्याकडे आपण आपल्या समाजासाठी देशासाठी काही काम करावं असं कुणालाच वाटत नाही ना.. मरतायत ना दुसरे तवर मला काय? माझ्या घरात मढं पडलं तरीपण मी "माझ्यापुरतंच" बघून घेइन. इतराचं बघायची गरज काय... असले कोडगे विचार असणारी लोक आहेतच. कोल्हापूरामचे आयसोलेशन वार्डमधे पळून जाणारे ते दोघं पण तसलेच.. सरकारला कायदा वापरून रोगावर उपचार करावे लागतात यातच सर्व काही आलं.

ए मित्रांनो,
www.pudhari.com या साईटवर जा. तेथे एडिटोरियल पेजवर डॉ. नटराज द्रविड यांचा लेख आहे. तो वाचा. अत्यंत सुंदर आहे.
मिडियावर टीका करायला खूप वेळ आहे आपल्याकडे. आजच जगाचा नाश होत नाहीय. पण दरम्यान मिडियामध्ये जेथे चांगलं आणि वाचण्याजोगे आहे त्याकडे बघायला काय हरकत आहे? Happy

"I have been suggesting Homeopathic medicine Ars.Alb-200 one dose a week as a good preventive for swine flue. Can be given to all, including children and the aged."

"In 4 litres of water add 60 leaves of tulsi, 30 leaves of bilva patra and 10 balls of black pepper. Boil this for half hour without a cover. About 400 ml of water would evaporate. Filter the rest and use for drinking and even making tea/coffee. According to the doctor, this is a sure preventive against all kinds of virus, including the swine flue."

- Dr. Sinha

Pages