नाळ

Submitted by zaad on 23 July, 2009 - 05:53

नाळ तुटली गेली
तू जन्माला आलास तेव्हाच
तुला त्याचं स्मरण कसं असणार?
खरं तर मीही विसरून गेलेले
पण आता
तिळातिळाने तुला तुटलेले पाहताना
तसे बरेच वाटते;
अजून तुटते आहे म्हणजे
अजून कुठेतरी जुळलेले आहे......

गुलमोहर: 

उद्गेग आहे, संताप आहे, सूड आहे, बदला आहे........
बदला घेतल्यांतरचे सुख आहे........
असेच काही आहे, नाही?
सुरेख!!!

बापरे. अंगावर आली..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>>>>>बापरे. अंगावर आली..
नी, ते ववि वृत्तांतात लिहिलयस की.. पुन्हा इकडे का लिहीलस? Proud

मस्त ! Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

व्वा... झाडा, झेपली की!

मस्त.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy