Submitted by कौतुक शिरोडकर on 15 June, 2009 - 13:34
फुले अक्षरांची
शब्दांचे गजरे
वेढी गंधगोफ
काव्यही हसरे
लयताल धरिती
बोट तयाचे
अधरात विलसे
गाणे मनाचे
नकळत न्यास
पदी गुंतताना
नुरे देहभान
झुला झुलताना
रंध्रात गात्रात
लहरे निमंत्रण
जाणून वेड्या
घेई आमंत्रण
अतासा दुरावा
कशाला सहावा
ये बाहूपाशी
चिंब विसावा
तू नखशिखांत
कुरवाळ भेटी
आवेगी स्पर्शावी
पाऊसमिठी..... पाऊसमिठी....... पाऊसमिठी
गुलमोहर:
शेअर करा
फारच छान.
फारच छान.
पाऊस
पाऊस मिठी...खूपच झक्कास... मस्तं...एकदम आवडेश...
वरच्या
वरच्या सर्व अभिप्रायांशी सहमत !!!
www.bhagyashree.co.cc
पाऊसंमिठी..
पाऊसंमिठी... खरच भन्नाट शब्दं... इथे (सिडनी) आज दिवसभर झिम्माड कोसळतोय. दोन दोन इंद्रधनुष्यांची गगनाला पडलेली मिठी अगदी बसलेय तिथून बघितली... आणि मग तुझी कविता! आजवर का थांबले होते वाचायची, आत्ता कळलं.
सुंदर कविता रे!
कौतुका
कौतुका क्लास रे एकदम ..........!!!!!!!!!!!!!!!!!
पाऊसमिठी...
खरोखरच
खरोखरच मिठीत घ्यावी अशी हि कविता......
एकदम फुल टु फटाक .... आवडली......
भाऊ
भाऊ अभिनंदन !!!!!!!

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
वाचलीच नव्हती ही कविता. आज
वाचलीच नव्हती ही कविता. आज कवितेच्या दालनात गेले आणि हाताला लागली.
कौतुक खूप छान आहे कविता.. सुचतं कसं रे तुम्हाला इतकं सुंदर लिहायला?
दक्षिणा, वाचलीयेस की ग. ,
दक्षिणा, वाचलीयेस की ग.
, आणि प्रतिसाद पण दिलास. विसरलीस का? तुझा आयडि २ दा दिसतोय आधिच्या पानावर.
म्हण्जे परत वाचायला हरकत नाही. ( मी पण वाचली .) छानच आहे कविता.
धनु.
तू नखशिखांत कुरवाळ भेटी आवेगी
तू नखशिखांत
कुरवाळ भेटी
आवेगी स्पर्शावी
पाऊसमिठी..... पाऊसमिठी....... पाऊसमिठी
मस्त.....
अप्रतिम. कीती सहज पण असाध्य
अप्रतिम. कीती सहज पण असाध्य शब्दकोश
कुरवाळ भेटी.. चिंब विसावा..
कुरवाळ भेटी.. चिंब विसावा.. नखशिखात सुंदर पाउसमिठी!
धनु, वय झालं
धनु, वय झालं
Pages