Submitted by कौतुक शिरोडकर on 15 June, 2009 - 13:34
फुले अक्षरांची
शब्दांचे गजरे
वेढी गंधगोफ
काव्यही हसरे
लयताल धरिती
बोट तयाचे
अधरात विलसे
गाणे मनाचे
नकळत न्यास
पदी गुंतताना
नुरे देहभान
झुला झुलताना
रंध्रात गात्रात
लहरे निमंत्रण
जाणून वेड्या
घेई आमंत्रण
अतासा दुरावा
कशाला सहावा
ये बाहूपाशी
चिंब विसावा
तू नखशिखांत
कुरवाळ भेटी
आवेगी स्पर्शावी
पाऊसमिठी..... पाऊसमिठी....... पाऊसमिठी
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
सुंदर
सुंदर
चिंब
चिंब चिंब.......
***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)
COOL !!!! ( i mean HOT)
COOL !!!! ( i mean HOT)
पाऊसमिठी शब्द भन्नाट आहे (आणि शीर्षकातच तो शब्द वाचकाच्या हातात न देण्याच्या निर्णयाबद्दल अभिनंदन)
शेवटच
शेवटच भन्नाट आहे!!!
पण मला वाचताना शब्दाबरोबर थोडी चढाओढ झाल्यासारखं वाटलं
आयला, पावसावरच्या इतक्या कविता येतात् पण हा पाऊस अजून येत नाही.
--------------
नंदिनी
--------------
सुरेख! बापू
सुरेख!
बापू करंदीकर
आयला नंदे ,
आयला नंदे ,
अलीकडे बरंच लक्ष ठेवून वाचते आहेस की कविता
पण तुझं म्हणणं काही ठिकाणी बरोबर आहे बर्का.
जिथे जिथे सहाच्या ऐवजी पाच फुलं आली आहेत तिथे गजरा जSSSSSरा विस्कटल्यागत दिसतोय.
कौतुक ,, छंद सांभाळता आला तर बघ ना जरा..
कौतुक, तुझं
कौतुक,
तुझं किती कौतुक करू?
कविता फारच आवडली...
>>COOL !!!! ( i mean HOT) >>
>>COOL !!!! ( i mean HOT) >> वैभव

मला ही असंच काहीतरी म्हणायचं होतं, पण आवरतं घेतलं.
छान आहे.
छान आहे. शेवट भन्नाट
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
वा छान आहे
वा छान आहे कविता.
>>COOL !!!! ( i mean HOT) >>
>>COOL !!!! ( i mean HOT) >> वैभव >>

खरच मलाही असच वाटल होत..
कौतुक दा, पाऊसमिठी मस्त आहे एकदम !!
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
आयला नंदे ,
आयला नंदे ,
अलीकडे बरंच लक्ष ठेवून वाचते आहेस की कविता
>>> कविता लिहायला नाही जमल्या तरी वाचायला तरी जमताहेत ना??
--------------
नंदिनी
--------------
कौतुक
कौतुक छंदाच्या फार जवळ होती कविता, छंदाचा मोह टाळला आहेस? की न कळत टळला आहे?
कविता फार सुंदर उतरली आहे..!!! बंगळुरात मस्त पाउस आहे... पावसाच्या कविता सार्थ ठरता आहेत.
छानच आहे
छानच आहे
छान टीपलंस
छान टीपलंस मित्रा
अहा! 'पाऊसम
अहा!
'पाऊसमिठी' मस्तच रे!
मिठी - खुप
मिठी - खुप सुंदर...
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
अहाहा चिंब
अहाहा चिंब चिंब ! कौतुके खल्लास रे....एकदम खल्लास !!
COOL !!!! ( i mean HOT) >>>> वैभवजी
खूपच नजाकत
खूपच नजाकत सांभाळली आहे शब्दांची! सुंदर!
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना.
वैभवजी, सत्या आणि नंदिनी, जसं आलं तसं लिहीत गेलो. त्यामुळे छंद टाळला असा खोटेपणा नकोच. मात्राची फुटपट्टी लावण्याचा त्रासही घेतला नाही.
काल वीज नव्हती. त्यामुळे अधीरता इतकी वाढली की शेवटी हाती एक कविता आली. पाऊसमिठी हा शब्द मात्र शीर्षकात टाळला. का ते सांगणे न लगे !!!
......................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
पाऊसमिठी.....
पाऊसमिठी.....
अप्रतिम!!
छान...
छान... पाऊसमिठी
सुरेख !!!!
सुरेख !!!! मलाही खुप आवडला "पाऊसमिठी" हा शब्द
*******************
सुमेधा पुनकर
*******************
जबरदस्त. इक
जबरदस्त.
इकडच्या स्वारींचा पाऊस नसतानासुद्धा केवढा हा रोमँटीकपणा म्हणावा बाई!
सुंदर!!
सुरेख ,
सुरेख , लयबध्द कविता. इथे मायबोलीवरच पाऊसपान्हा हा शब्द वाचला होता.
आता पाऊसमिठी !मिठी ह्या शब्दातच किती गोडवा आहे.
मस्तच.
धनु.
(No subject)
पाऊसमिठी.....
पाऊसमिठी......अहा क्या बात है !! कविता आवडेश
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
(No subject)
वा ! आवडली !
वा ! आवडली ! पाऊसमिठी - आवडला शब्दप्रयोग !
Pages