किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

Submitted by ढंपस टंपू on 17 July, 2023 - 21:49

विरोधकांचा भ्रष्टाचार उकरून काढणारे अभ्यासू धडाडीचे नेते म्हणून किरीट सोमय्या हे देशाला आणि राज्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक जणांवर आरोप केले. त्यामुळे त्या त्या नेत्यांची ईडी, सीबीआय, एसआयटी, इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे. नंतर त्या नेत्यांवरच्या आरोपांचे काय झाले हे समजत नाही.

पण नबाब मलिक, छगन भुजबळ अशा नेत्यांना तुरूंगवास घडला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना भले भले टरकून असतात.
पण गेल्या काही दिवसात त्यांच्याकडून कुठलाही नवीन आरोप नाही कि जाहीर वक्तव्य नाही कि आधीच्या आरोपांबाबत खुलासे नाहीत. यामुळे त्यांच्याबद्दल काळजी वाटते. त्यांना उदंड आयुष्य लाभो व ही मोहीम अशीच चालू राहो या शुभेच्छा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< नेहरू आंबेडकर प्रभृतींमुळे भारताला स्वातंत्र्यासोबत लोकशाही पॅकेजडील म्हणून मिळाली आहे. देशाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, लोकशाहीसाठी नाही. फ्रान्स पासून सर्व पाश्चिमात्य देशांना राजेशाही उलथवून टाकण्यासाठी क्रांत्या / संघर्ष करावे लागलेत, तेव्हा लोकशाही मिळाली आहे.
यामुळे आपल्याला लोकशाहीची योग्य किम्मत नाही, अन लोकप्रतिनिधी, व सनदी नोकर राजे-जहागिरदारांसारखे वागतात, किम्बहुना त्यांनी तसे वागावे अशी लोकांची अपेक्षा असते.
स्वातंत्र्याचा लढा लढून झालाय.
यावेळी लोकशाहीसाठी लढावे लागणार आहे.
Submitted by अलीबाबा on 19 July, 2023 - 09:46 >>

------- छान विचार मांडलेत, सहमत...

<< अलिबाबा, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. मी जे लिहिलय त्याबाबतीत तुमचा थोडा गैरसमज होतोय.
माझं म्हणणं होतं की जसे हे सोमैय्या आता विडियो प्रकरणात सापडले, किंवा खडसेंसारखं दुसर्‍याच्या नावानी जमीन घेणे वगैरे असं जे धडधडीत भ्रष्टाचार आहे त्यात ते सापडायचे नाहीत.
ह्याचा अर्थ ते पुर्ण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं नाही. संघसंस्कार (मयेकरांकडून साभार Happy ) असल्यामुळे अशा प्रकारात नाही सापडायचे असं म्हणत होतो.
Submitted by वैद्यबुवा on 19 July, 2023 - 10:05. >>

------ कुरुलकर, संजय जोशी , प्रमोद महाजन हे पण संघसंस्कारातूनच पुढे आले आहेत. कुरुलकरांच्या मागच्या चार पिढ्यांनी संघासाठी काम (?) केले होते.

बरोबर आहे उदय. ते संस्कार असून सुद्धा काही हाडाचे भ्रष्टाचारी आणि लूज कॅरॅक्टर आहेत. काही लोकं जागतात काही जागत नाहीत संस्कारांना. मोदी, फडणवीस संस्कार पाळण्याबाबत काटेकोर आहेत.
त्या कुरुलकरांबाबत तर मला फर आश्चर्य वाटलं. थोडक्यात व्यक्ती कितीही हुशार, अनुभवी असली त्यांच्या क्षेत्रात तरी अशा काही गोष्टींना इम्युन नाही हे दिसतं. अगदी सिनेमात दाखवतात तसला प्रकार आहे त्या कुरुलकरांच्या प्रकरणात.

> मोदी, फडणवीस संस्कार पाळण्याबाबत काटेकोर आहेत.
हे विधान फक्त फडणवीसांबद्दल केले असते तर निदान समजले असते. बिल्किस बानो च्या बलात्कार्‍यांना लवकर सोडणे चूक आहे असे सांगणारे भाजप मधले बहुदा एकमेव नेते. पण मोदी संस्कार पाळतात असे म्हणायचे तर मुळात मॉलसवर्थ च्या कोशात जाऊन संस्कार या शब्दाचा अर्थ बदलावा लागेल. मी परस्त्रीला स्पर्शही करणार नाही, पण एखद्या स्त्रीवर बलात्कार करून तिच्या लहान मुलीला ठार करणार्‍या जमावाला अभय देइन, सुप्रीम कोर्टाने खटला दुसर्‍या राज्यात नेऊन शिक्षा दिलीच तर ती कमी करेन व मग त्यांचा सत्कार करेन, एखाद्या गँगस्तर च्या बायकोला जिवंत जाळेन, असे असेल तर ते कोणत्या अँगल ने संस्कार ? इतक्या उशीरा मणीपूर बद्दल मोदीनी बाईट दिले खरे , पण मणिपूर च्या आधी छत्तीसगढ व राजस्थान चे नाव घेऊन आपले संस्कार दाखवून दिले.

मोदी, फडणवीस संस्कार पाळण्याबाबत काटेकोर आहेत.
२ + २ = ५
आणि
आय अ‍ॅम महात्मा गांधी.

अरे विकु आता तुम्ही पण सुरु झालात का? अहो बरोबर आहे, मी लिहिलं ना वर की त्यांचे पॉलिटिक्स आपल्या पटत नाहीत पण इतर लोकं डायरेक्ट स्वतः काहीतरी वाकडी तिकडी कामं करताना सापडतात तसे हे सापडायचे नाहीत येवढच म्हणत होतो. बिल्किस बानो काय किंवा आधी गोधरा दंगल काय, त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल, पाळलेल्या मौनात मोठ्या मॉरल चूका आहेतच.

इतर लोकं डायरेक्ट स्वतः काहीतरी वाकडी तिकडी कामं करताना सापडतात तसे हे सापडायचे नाहीत येवढच म्हणत होतो.>>>तसे हे सापडायचे नाहीत येवढच म्हणत होतो. काय सुचवताहात तुम्ही?

फडणवीसांचे योग दिनाचे व्हिडियो व्हायरल होतात त्यानेच ते वैतागले असतील. मोदीने काय लचांड मागे लावलंय म्हणून मनात चरफडत असतील.
त्यांना तोंड दाबून किती प्रकारच्या मुक्क्यांचा मार स हन करावा लागतो, तेच जाणोत.

त्यात हल्ली जो तो (जी ती) त्यांना पुरणपोळ्या खायला लावतो/ते, त्यामुळेही वैतागले आहेत. (खुपते तिथे गुप्ते मधली क्लिप).

<<
बरोबर आहे उदय. ते संस्कार असून सुद्धा काही हाडाचे भ्रष्टाचारी आणि लूज कॅरॅक्टर आहेत. काही लोकं जागतात काही जागत नाहीत संस्कारांना. मोदी, फडणवीस संस्कार पाळण्याबाबत काटेकोर आहेत.
त्या कुरुलकरांबाबत तर मला फर आश्चर्य वाटलं. थोडक्यात व्यक्ती कितीही हुशार, अनुभवी असली त्यांच्या क्षेत्रात तरी अशा काही गोष्टींना इम्युन नाही हे दिसतं. अगदी सिनेमात दाखवतात तसला प्रकार आहे त्या कुरुलकरांच्या प्रकरणात. >>

------- संस्कार आणि काटेकोर यांचा कुठेही मेळ लागत नाही.

गेली सहा महिने, दिल्ली येथे अनेक कुस्तीगीर मुली आंदोलन करित आहेत. पोलीसांनी या मुलींवर लाठीहल्ले केले, अक्षरश: फरफटत नेले पण संबंधित आरोपी खासदार बृजभूषण सिंह मोकळा आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांत मुली पुढे येत नाही, येथे ७ लेखी तक्रारी आहेत. अजून काय हवे आहे? चौकशीसाठी तरी आरोपीला अटक करणार का? आरोपीला अटक करुन आरोपांची चौकशी झाली असती तर खर्‍या अर्थाने बेटी बचाव धोरण प्रत्येक्षात दिसले असते.
मुलींचे सातत्याने लैंगिक शोषण ( ते ही एका कायदे बनवणार्‍या कडून - लोकसभेचे खासदार आहेत) सारख्या घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हा कुठल्या संस्काराचा भाग आहे?

बिल्कीसबानू बलात्कार आणि १५+ खून प्रकरणांत शिक्षा भोगत असणार्‍या गुन्हेगारांना सरकारने अमृत महोत्सवाचे निमीत्त साधून तुरुंगात मुक्त केले. तुरुंगातून गुन्हेगारांना सोडण्याबद्दल माझा विरोध नाही आहे. मोठ्या संख्येच्या उपस्थितीमधे गुन्हेगारांचे हार, मिठाई, आरती असे सार्वजनिक स्वागत झाले. असे कुठले अभिमानास्पद कृत्य या गुन्हेगारांनी केले होते म्हणून ते सत्कारांस पात्र ठरले होते. अशा जंगी " स्वागताबद्दल " मौन पाळणे कुठल्या संस्काराचा भाग आहे?

वरिल दोन घटना तसेच हाथरस, उनाव, कथुआ.... आणि काल प्रकाशात आलेली मणिपूर येथील घटना कुठल्याही सरकारच्या काळात घडल्या असत्या तरी त्या निंदनीयच आहेत. घटना घडल्यावर सरकारने पिडितांच्या पाठिशी खंबिरपणे उभे रहायला हवे होते. मौन रहाणे हा पर्याय नाही आहे.

संघ संस्कार म्हणजे फक्त भ्रष्टयाचार ना करणे ह्यापुरते सीमित आहेत का? जेव्हा कोणावर, विशेषतः स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा मौन राहणे हा देखील संघ संस्कार का? असू शकेलही, कारण अजून तरी संघाकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

<< अरे विकु आता तुम्ही पण सुरु झालात का? अहो बरोबर आहे, मी लिहिलं ना वर की त्यांचे पॉलिटिक्स आपल्या पटत नाहीत पण इतर लोकं डायरेक्ट स्वतः काहीतरी वाकडी तिकडी कामं करताना सापडतात तसे हे सापडायचे नाहीत येवढच म्हणत होतो. बिल्किस बानो काय किंवा आधी गोधरा दंगल काय, त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल, पाळलेल्या मौनात मोठ्या मॉरल चूका आहेतच.
Submitted by वैद्यबुवा on 20 July, 2023 - 10:19 >>

------- खेळाडूंना पदके मिळाल्यावर फोटोसेशनसाठी त्यांचा वापर करणारा त्यांच्या वर अन्याय झाल्यावर पाठ फिरवत आहे.
काही तर कृतीतून तुमचा निर्धार स्पष्ट दिसू द्या. आरोपी खासदार बृजभूषण सिंह धमक्या देत मोकाट फिरत आहे.

ते स्वत: वाकडी तिकडी कामे करतांना " अजून तरी" सापडले नाहीत. पण त्यांची निवडच वाकडी तिकडी कामे करणारांना धाक वाटावा यासाठी झालेली आहे , जबाबदारी आणि कर्त्यव्य दोन्ही अर्थाने. अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्माची आठवण करुन दिली होती. तेव्हाही राजधर्म दाखविला नाही, आणि आजही दाखवत नाही.

मॉरल चूका आहेत हे मान्य करण्यातला मोठे दाखविल्याबद्दल आभार. असे फार कमी वेळा घडलेले दिसते.

तो हेडर मधला फोटो छोटा होऊ शकतो का खूपच हसरं व्यक्तिमत्व आहे, धागा उघडताच अंगावर आल्यासारखे वाटते .

<< तो हेडर मधला फोटो छोटा होऊ शकतो का खूपच हसरं व्यक्तिमत्व आहे, धागा उघडताच अंगावर आल्यासारखे वाटते . >>

----- जाम हसलो या कमेंटला... हेडर मधला फोटो पुन्हा बघितला, माझा पूर्ण स्क्रिन व्यापला गेला, फोटो छान दिलखुलास हसरा निवडला आहे.
फोटो निवडीबद्दल ढं टं ला दोन बोनस मार्क. Happy

आजकाल तिलित तोमय्या म्हटले की त्यांचे भलतेच फोटो डोळ्यासमोर येतात.
<<

काल एका ट्वीटमधे 'खिरीत शेवय्या' असे नामकरण वाचून बराच वेळ खो खो हसू येत राहिले.

अरे कोस्ताय काय त्यांना ? लाजा बाळगा लेको !
अजूनही त्यांच्यात ५२ हत्तींचं बळ आहे, शिका शिका काहीतरी..

तो हेडर मधला फोटो छोटा होऊ शकतो का खूपच हसरं व्यक्तिमत्व आहे, धागा उघडताच अंगावर आल्यासारखे वाटते .>>> असूदेत हो...वस्त्रे परिधान केली आहेत त्यांनी, अंगावर आले तरी कही करणार नाहीत ते... Lol

तो फोटो एखाद्या मागे इडी लावल्या नंतरचा असावा. फोटोतलं ते गालफाडे हास्य पुन्हा पहायला मिळेल का ?

अमित शाह 'वाहियात ' नाहीत!
म्हणजे ते चारित्र्यसंपन्न आहेत का? त्यांची मुले चारित्र्यसंपन्न आहेत का? मुलावर कोणते संस्कार केले गेले आहेत? कुठले पैसे कसे वळवावेत, ' हे संस्कार किंवा हे ज्ञान लेकराला कुठून मिळाले? लेकराला ' मायेची घोंगडी ' कोण पांघरते आहे? लेकराला ' बाप संस्कार ' मिळाला आहे की नाही?

चारित्र्यसंपन्न आहेत का? मुलावर कोणते संस्कार केले गेले आहेत? कुठले पैसे कसे वळवावेत, ' हे संस्कार किंवा हे ज्ञान लेकराला कुठून मिळाले? लेकराला ' मायेची घोंगडी ' कोण पांघरते आहे? लेकराला ' बाप संस्कार ' मिळाला आहे की नाही? >>>>>>>>>
९९ टक्के राजकारणी स्वतःचा फायदा प्रथम बघतात .
अमित शहाला सोनिया कडून मार्गदर्शन मिळाले असेल.

नॅशनल हेरॉल्ड ची २००० कोटींची संपत्ती गडपण्याचे बाळकडू तिने राहुल शिकवण्याचा अनुभव तिच्या पाठीशी आहे ना !

सरकार बदलले की मोदी सरकार चे कारनामे बाहेर येतील.
देशातील सर्वात भ्रष्ट सरकार हे बिरूद नक्कीच ह्या सरकार ला मिळणार आहे.
ह्यांच्या पक्षातच असे लोक आहेत जे व्यापारी वर्गातील आहेत.
बँका ची कर्ज घेवून बुडवणे हा ह्यांचं आवडीचा व्यवसाय आहे.
अशा बँकांच्या बुडालेल्या लाखो करोड मध्ये bjp चा नक्की मोठा हिस्सा आहे.

कार्यकर्त्याने उगाच सरकार ची लाल करू नये.
त्या भ्रष्ट व्यवहार मधून चार पाच लाख मिळत असतील तर जरूर सरकार ची तळी उचलावी.

सरकार कोणते ही असू सरकार विरुद्ध च सामान्य लोकांनी असणे गरजेचे असते..तेव्हाच सरकार वर अंकुश राहतो.
नाहीतर सत्तेवर बसलेले तुमचे घरदार पण विकून तुम्हाला रस्त्यावर आणतील.

पुरोगामी.
सरकार ची लाल केली त्यांचे सर्व पाप दुर्लक्षित करून फक्त सरकार ची वाह वा केली को किती पैसे मिळतात.
आम्हाला पण सांगा.
जोड व्यवसाय म्हणून चांगला मार्ग आहे तो.
काही तरी फायदा नक्कीच होत असेल.
उगाच सर्व कामधंदा सोडून सरकार चे गुणगान कोण गात बसेल.
आणि दुसरा प्रश्न.
विरोधी पक्षाची नीच शब्दात बदनामी केली की जास्त पैसे मिळतात.
की सरकार ची लाल केली की जास्त पैसे मिळतात

Pages