माझिया जातीचे मज भेटो कोणी

Submitted by सामो on 30 May, 2023 - 17:55

काही विस्कळीत विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पूर्वीच्या एका लेखातील काही भाग उतरवलेला आहे. कृपया सांभाळून घ्यावे.

कसे कळते की एखादी व्यक्ती आपल्या ट्राइबची आहे? एखादं शिंग फुंकून चेहऱ्यावरती, अंगावरती रंगाचे पट्टे माखूनआपल्या ट्राइबची व्यक्ती "हुला हो....हुला हु" क‌र‌त नाचत येते की पाहिल्यांदा सबकॉन्शस लेव्हलवर एका stirring (soul stirring ) जाणवते कि भूकंप होतो की फासे पडत जातात, karma unfolds in some mysterious ways? आपल्याला आपली ट्राईब कशी सापडते? समान शील व्यसनेषु = आपली टोळी, आपला गट, आपले मैत्र.

Unrequited Love - हा शब्द सापडायला बरीच बरीच वर्षे जावी लागली मात्र हा शब्द अनुभवायला कॉलेजची काही वर्षे पुरेसे होते.
Unrequited Love म्हणजे, आपण कोणावर तरी केलेले असे प्रेम, ज्याचा परतावा मिळत नाही. आपण झिडकारले जातो किंवा त्या व्यक्तीला, आपण असून नसल्यासारखे असतो. म्हणजे आपण अदॄष्यच असतो म्हणा ना. झिडकारले जाण्याकरता आधी प्रेमाची कबूली द्यावी लागते. तेवढी हिंमतच माझ्यात कधी नव्हती. कारण 'नाही' ऐकण्याची तयारी नव्हती. पण नाही फक्त शब्दाने बोलले जाते का? कित्येक पद्धती आहेत 'नाही' म्हणण्याच्या, दुसर्‍याला नकार देण्याच्या.
असे हे Unrequited Love पहील्यांदा अनुभवले ते कॉलेजात आणि नंतर वेगवेगळ्या पोशाखात ते भेटत राहीले. उदा - आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये सामिल करुन न घेणे. एखाद्या कम्युनिटीत आपला शिरकाव होणे अशक्य होउन बसणे. व्हरमाँटला माझ्या सहकार्‍यांचा एक ग्रूप होता ज्याच्यात ते सहकारी व त्यांच्या पत्नी असे लोक मिसळत, उत्सव साजरे कर. कधी कोणाचा बेबी शॉवर तर कोणाकडे जेवायला बोलावणे तर कधी पोंगल, संक्रांत अथवा नाताळ. पण हळूहळू माझ्या लक्षात आले की माझ्या कलिग्ज्चे पत्नी मंडळ एकमेकीत जितके मोकळेपणे बोले तितके ते माझ्याशी बोलत नसत. हळूहळू ते लक्षात येणे तीव्रतर होत गेले आणि एकदा मी जायचे बंद केले. इथे कोणी डायरेक्टाली मला येऊ नकोस सांगीतले नाही पण इन्डायरेक्टली मात्र तसे होत गेले. मग अनेक प्रश्न मनात उमटतात. मला झक मारायला कोणी सांगीतली होती? असे काय सोने लागलेले होते की मी प्रयत्न करत राहीले? की एखादी गोष्ट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिची असोशी रहाते, टोकदार होत जाते?
हे असे प्रसंग वारंवार येतात.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतं? आयुष्यात प्रायॉरिटीज देखील बदलत असतात. पहिला नंबर मिळवायचा असतो त्याची जागा नोकरी मिळवायची , जोडीदार मिळवायचायं, घर घ्यायचे, बेंक बॅलन्स फुगवायचा, मुलांना वाढवायचं, नाना प्रायॉरिटीज. पण हे सारे बदल, बदलावं बाह्य जगतात होत असतात, मित्र-मैत्रिणी येत जात असतात. एखादे नाते गहिरे होता असते तर एखादे नाते आयुष्यातून निघून जात असते. पण हे बदल पहाणारा हा जो "मी" आहे त्याच्यात काय बदल घडत असतात? लहानपणी सुद्धा ज्या उत्कटतेने मला सवंगड्यानी मला स्वीकारावे मला सामावून घ्यावे असे वाटतं असते तितक्याच उत्कटतेने आजही तेच वाटते. मी एकटा पडू नये, मला खेळात घ्या, मला सामावून घ्या. लहानपणी ज्या तीव्रतेने मला प्रेमाची आस जाणवे त्याच असोशीने आजही प्रेमाची ओढ जाणवत असते. कदाचित लहानपणी मी आत्मकेंद्री असेन‌ आज नसते? - खरंच असे होते का? का मी त्या स्वभावाविशेषावरती अलगद पांघरूण घालून ते दडवायला शिकते ? असे होते का की प्रत्येक वर्षासरशी आपण आपली खरी ओढ , आस लपवण्यात तरबेज होत जातो? हे अगदी १०० % खरे आहे कि आपण विविध क्षेत्रात श्रीमंत होत असतो. लहानपणी फक्त आई-बाबा, आज्जी -आजोबा हे जग असलेले आपण आता कितीतरी नव्या संबोधनांनी , नात्यांनी समृद्ध होत असतो - आपण आई-बाबा, काका,काकू, मामा, मामी अगदी आज्जी, आजोबा हि नाती भूषवू लागतो पण ..... कुठेतरी आपण तेच १८-२५ च्या मधले असतो. आरशात आपण पहातो टक्कल पडलेले असते, पोट सुटलेले असते, क्वचित (ऑर नॉट सो क्वचित) बेढबहि झालेलो असतो पण आपल्या मनात आपण तेच १८-२५ मधील असतो. नात्यात करकचून बांधलेलो आपण मुखवटे लावून वावरण्यात तरबेज तर होता नाही ना? पत्नी, सून, आई, वडील, नवरा, बॉस, सहकारी असे कितीतरी मुखवटे. सासूबाईपुढे अदबीने वागतो, नवर्याला क्रश सांगू धजत नाही, मुलींपुढे तर अगदी जपून आब राखून वागत असतो. अशा वेळी किती प्रकर्षाने वाटते, असे कोणीतरी हवे ज्या व्यक्तीपुढे काय वाट्टेल ते बोलता यावे, मनातले सांगता यावे, अगदी अग्ली, कुरूप होता यावे, आपली सारी ऑब्सेशन्स, कम्पल्शन्स, पूवर्वजन्माच्या संस्कारांचे रेसिड्यूज उघड करता यावे. असे मैत्र जे आपल्या ट्राइबचे असावे. आपल्यासारख्या idiosyncrasies (लकबी, वैशिष्ट्ये) असलेले, आपल्या कुरुपतेला न हसणारे असावे. बरं अशी इन्व्हेस्टड्सही नातीही नको जसा नवरा , मुलगी, आई, नणंद , भावजय व तत्सम अन्य नाती . कारण इन्व्हेस्टेड असल्याने आपल्या दोषाकडे हे लोक सहानुभूतीने पाहू शकत नाहीत. एका कम्फर्टेबल त्रयस्थ दृष्टीचा अभाव त्यांच्यात असतो. ते आपल्या ट्राईबचे नसतात ते आपल्या आयुष्याचा पाया असतात, फाउंडेशन असतात पण आपल्या ट्राईबचे नसतात. ते इंडिफरंट, अगदी त्रयस्थ मैत्र होउ शकत नाहीत. त्यात दोष कोणाचाच नसतो. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. जरा त्या मर्यादा सांभाळून घेतल्या नाहीत तर ते नातंही आपल्याला सांभाळून घेत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा कि असे मनाचे पापुद्रे अन पापुद्रे उसवुन, व्यक्त सर्वांपूढे होता येत नाही. असे नाते प्रत्येकाला सापडतेच असे नाही. इन फॅक्ट प्रत्येकाला कदाचित तशा नात्याची गरजही वाटतं नसेल. पण काहींना तशा मैत्राची, काउन्सिलरची,एका श्रोत्यांची , सर्वाहारी, सर्वसमावेशक perennial मैत्रीची आस असते. परत परत त्याचा प्रश्नापाशी मी अडखळत असे, मला कसे कळेल कि अमुक एक व्यक्ती माझया ट्राइबची आहे? पण जसजसे वय वाढत गेले मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळत गेले. आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होते?- या प्रश्नाचे एक उत्तर हे आहे कि आपली टोळी (ट्राइब) आपल्याला सापडत जाते. आणि नाही सापडली तर मात्र एकटेपणही येत जाते.
अल्झाइमर्स होउ नये याकरता काही पथ्ये आहेत - पैकी एक म्हणजे तुम्ही असे मैत्र जमवा ज्यांच्याशी संवाद साधू शकाल आणि त्यांच्या संपर्कात रहा. बी सोशली अ‍ॅक्टिव्ह. परंतु हे अचानक वॄद्धावस्थेत थोडी ना मिळेल? आपल्यालाच नाती जपत, तडजोडी करत तर खूपदा अनेक क्षण हे आनंदाने साजरे करत आपले मैत्र जोडायचे असते. त्याची तरतूद आधीपासून करायची असते. या वयात मला माझी मामी, काकू, आत्या, मावशी खूप आवडतात. पूर्वी मला त्यांच्यात व माझ्यात फार अंतर आहे असे वाटे. आता अजिबात वाटत नाही. जसजसे वय वाढते तसतसे मनातील , प्रगल्भतेतील अंतर कमी होत जाते. मी तर आता प्रत्येक नात्याकडे थेराप्युटिक दॄष्टीकोनातून पाहू लागले आहे. सोशल मिडीयाने एक नक्की केले - फक्त हवी असलेली नाती जपण्याची एक मस्त मुभा दिली. मला, हे असे आंबटगोड नातेसंबंध विलक्षण ओढाळ वाटतात. समटाइम्स यु क्लिक समटाइम्स नॉट. पण या रस्सीखेच खेळातच खूप मजा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान व्यक्त झालीयस.

>>अशा वेळी किती प्रकर्षाने वाटते, असे कोणीतरी हवे ज्या व्यक्तीपुढे काय वाट्टेल ते बोलता यावे, मनातले सांगता यावे, अगदी अग्ली, कुरूप होता यावे, आपली सारी ऑब्सेशन्स, कम्पल्शन्स, पूवर्वजन्माच्या संस्कारांचे रेसिड्यूज उघड करता यावे. असे मैत्र जे आपल्या ट्राइबचे असावे. आपल्यासारख्या idiosyncrasies (लकबी, वैशिष्ट्ये) असलेले, आपल्या कुरुपतेला न हसणारे असावे.

खरंय. आयुष्यात पालक, भावंडे, अपत्ये आणि इतर नातेवाईक यांच्याइतकीच मैत्रीची गरज वाटते मला तरी आणि ती ट्राईब मिळाली आहे की नाही हे आपोआपच कळतं. आवडीनिवडी, मतांतरे इ. च्या पलिकडे जाऊन wavelength जुळलीय असं वाटत असेल तर की ट्राईब मिळाली असं म्हणता येईल कदाचित.

खूप छान चिंतन.
असं मलाही वाटतं नेहमी..पण व्यक्त होता येत नाही.. विशेषतः...आपण आत कुठेतरी अजूनही १८ ते २४ वयातलेच असतो..हे तर अगदी पटले....
असं हे मैत्र..मिळणं आधी दुरापास्त..आणि मिळालेच तर accept होणे अवघड !
पण असेही वाटते..की एकच तर आयुष्य आहे...जीवनाची सगळी अंगे का उपभोगू नयेत? का आपल्या छोट्या इच्छा अपेक्षा मारत जगावे....?

अतिशय सुंदर लेख. खूप खूप पटला. आपल्याला एखाद्या ग्रुप मध्ये सामावून नं घेणे.. हा अनुभव तर प्रत्येकाला केव्हा ना केव्हा येतच असतो. खूप एकटं वाटतं अशावेळी.. वय कितीही असू देत मग..

माझिया जातीचे मज भेटो कोणी, समानशीले व्यसनेषु सख्यम् >> यासाठीच तर आपण माबोवर येतो. इथे व्यक्त होता येणं हीच खूप सुंदर गोष्ट आहे! छान विचार मांडले आहेत.

खूप छान लिहिलं आहे. मला सुद्धा असा FOMO म्हणजे फियर ऑफ मिसिंग आऊट आहे. अडीच वर्षांपू्वी माझे कॅन्सरचे ऑपरेशन झाले आणि ही भीती मला जाणवू लागली. ज्या गोष्टी म्हणजे माझ्या अगदी हक्काच्या होत्या त्या साठी मला आता विशेष प्रयत्न करायला लागतात असे जाणवते आहे.

हर्पा खूप आभार. होय सोशल मिडिआमुळे, व्यक्त होता येणे, सामाउन घेतले जाणे - हे सारे किती सहजसाध्य झालेले आहे
>>>> ज्या गोष्टी म्हणजे माझ्या अगदी हक्काच्या होत्या त्या साठी मला आता विशेष प्रयत्न करायला लागतात असे जाणवते आहे.
@शरदजी - फार वाईट वाटले. पण प्रयत्न कराच.

जे लोक आधी जवळीक ठेवतात व नंतर दूर जातात ते खूप व्यवहारी असतात . आपल्या हे लक्षात येत नाही. आपण गाफील असतो. ते फक्त व्यवहार साधतात. हे कसलं मैत्र किंवा नातं...गरज सरो.... थोडक्यात ही भावनिक फसवणूक...आपण पुरते गंडलेले असतो. परिणामी आपणही व्यवहार शिकतो...फिटमफाट...असं माझं वै. म.
त्यामुळे आपण ठरवू लागतो कुठं भावनिक गुंतवणूक करायची कुठं नाही करायची...म्हणजे आला का आयुष्यभर चेक मेटचा खेळ...नवी माणसं जोडणे जोवर आपलं प्रतिबिंब त्यात दिसतय तो वर ठिक. एकदा अपेक्षा भंग झाला की बिनसलं. कधी असं बिनसलं तरी परीस्थिती पुन्हा जवळीक साधते पण एकदा तुटलेला एकसंधपणा वेल्डिंगने जोडलाय असं वाटत राहतं.
निखळ मैत्र तेच जे निरपेक्ष असतं.

दसा तुम्ही अगदी बरोबर बोललात. माझ्या बाबतीतही असे क्वचित घडते परंतु मी सातत्याने बेनेफिट ऑफ डाउट देत बसते. शिवाय इट्स अ फिफ्टी-फिफ्टी. त्यांना जितकी गरज असते तितकीच आपल्यालाही. त्यामुळे हा बेनेफिट ऑफ डाऊट बरेचदा गरजेतूनच आलेला असतो त्यात आपले मोठेपण काहीही नसते.
अजुन एक निरपेक्ष असे काही असते यावर माझा विश्वास नाही. आपण परस्पर पूरक असू तरच नाते टिकते.
मात्र नातेसंबंधांत मला बॅलन्सिंग अ‍ॅक्ट निट जमत नाही असे वाटते. आय गेट कॅरिड अवे. मी वहावत जाते. बाउंड्रीजचा इश्यु होतो. एक ना दोन. पण हे सर्व मला मनापासून आवडते.

परिच्छेद पाड बरं.

छान लिहिले आहे, खूप आवडले. Happy
पहिल्या परिच्छेदात जे लिहिले आहे ते प्रेम नव्हते फक्त आपलेपणा होता. प्रत्येक गोष्ट/अपेक्षा प्रेम समजली तर आयुष्य खूप कठीण होईल. प्रेम फार इंटर्नल असतं. फक्त सहवासामुळे टिकत असेल तर ते प्रेम नाही. हवं तिथं पॉज करून हवं तिथं प्ले करता येणाऱ्या नात्यात प्रेम असतं. बाकी मैत्र, ओळख, सख्य , आपलेपणा, कंफर्ट, जवळीक, परस्पर स्वार्थ, बरेचदा तर सोय, तात्पुरतं सुख, peer pressure, एकटेपणात घेतलेला चुकीचा निर्णय वगैरे म्हणता येईल.

खूप वेगवेगळे कंगोरे असतात भावनांना. तुम्हाला वेगवेगळे कंगोरे दिसले तर स्वीकार सोपा होता. One size doesn't fit all. प्रत्येकाला उत्कटता व आरस्पानी स्वभाव झेपत नाही हा अनुभव आहे मग वरवर जगणं भाग होतं.

सोशल मीडियाची intimacy खूप ट्रीकी आहे. They are available but not really available. Happy आनंद मिळतो पण खूप बाऊंड्रीज असतात आणि असाव्याही लागतात. 'Don't lower your vibe to find your tribe' या मंत्राचे पालन केल्याने माझ्या ट्राईबमधे मी एकटीच राहिले आहे. Proud

>>>>>>>>प्रत्येकाला उत्कटता व आरस्पानी स्वभाव झेपत नाही हा अनुभव आहे मग वरवर जगणं भाग होतं.
क्या बात है!!!
>>>>>>सोशल मीडियाची intimacy खूप ट्रीकी आहे. They are available but not really available. Happy आनंद मिळतो पण खूप बाऊंड्रीज असतात आणि असाव्याही लागतात.
यु नेलड इट!!! हे लक्षात आले नव्हते. यादॄष्टीने विचार करेन. मुलीला आवर्जून हा मुद्दा सांगेन.

फार सुंदर लिहीलयस. तू खरं तर खूप भरभरुन लिहायला पाहीजेस. सांगण्यासारखं किती आहे तुझ्याकडे.

अस्मिता ना प्रतिसादात आयडीयाज वाया घालवते Happy हाहाहा अगं बाई लेखणी घे हातात. त्यानी होतं काय की परत परत लेख वाचता येतात. प्रतिसादात ते हरवुन जातं गं.
-
मामी आभार गं.

धन्यवाद सामो, धन्यवाद दसा Happy

मी लेख काल ओझरता वाचला पण वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे म्हणून आज निवांत प्रतिसाद दिला. हो. आयडिया वाया घालवते मी पण हातचं राखून ठेवता येत नाही, आणि
हज़ारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

असं असल्यामुळे काही तरी सतत डोक्यात येत रहातंच. Happy

लेख अगदी पटेलसा लिहिलाय सामो.आपल्या पूर्ण 100% जातीचे कोणी मिळेल असे वाटत नाही.त्यातल्या त्यात 60%-70% मिळाले तरी भरपूर.
आता हे 60% 70% मिळवायला खूप आवर्जून प्रयत्न करायचे नाहीत, मिळायचे असतील तर आपोआपच मिळतात इतकं तरी शिकले आहे Happy

होय अनु. बरोबर. आणि अगदी आपल्यासारखं कोणी आलं ना तर त्याचे दुर्गुण डोक्यातच जातात. एक पुष्य आणि 'मिथुन' लग्न जातक माझ्या ओळखीचा होता. तो बराचसा माझ्याचसारखा होता. मला भयंकर राग यायचा Happy कदाचित ते मानसिक विश्लेषण की 'आपलेच दुर्गुण आपल्याला इतरांत दिसले की डोक्यात जातात' हे खरे असावे.

100% जातीचे कोणी मिळेल असे वाटत नाही.त्यातल्या त्यात 60%-70% मिळाले तरी भरपूर. >> नुकत्याच आलेल्या इंडियन मॅचमेकिंग सीझनमध्ये त्या सीमा बाईंनी अगदी हीच टक्केवारी सांगितली आहे Wink
ह घ्या

खुप विचार आले मनात..

स्वीकार, नकार, भोवतालच्या माणसांचं बरं-वाईट वर्तन आपल्यात बदल घडवतात. मग कधी आपण सगळ्यांना अनुकूल होऊ पाहतो तर कधी अलिप्त राहतो. दोन्हीही वाईटच. आपण जसे आहोत तसेच राहायला हवे. असे होत नाही तेव्हा अस्वस्थता येते आणि आपल्यासारख्याचा शोध सुरू होतो..

यात आपल्या वास्तव जीवनातील आधारांचा मेन रोल असतो. म्हणजे ते असायला हवेत असे वाटतं तसे नसतील तर? भक्कम आहेत कि कमकुवत? हे महत्त्वाचे ठरतं. तरीही..

आपल्याला आपला चेहरा सापडला कि असं होत असावं. किंवा याला (sensitivity) संवेदनशीलता हे कारण असावं. ती सगळीकडे सारखी सापडत नाही. कुठे माफक असते किंवा मग अनुभवाने बोथट झालेली असते. आपण 'अती' असू तरमग कुठेच फिट होत नाही. त्या धडपडीत आपण नेमकं कुठे असायला हवं ते समजत नाही आणि एकटे पडतो. आपल्या ट्राइबचा शोध संपत नाही..

हे खरं आहे की कुठेतरी जसे आहोत तसे व्यक्त होता येणं गरजेचं असतं. तसे आपण (काही प्रमाणात) सोशल मीडियावर व्यक्त होतो. तात्पुरतं काहीतरी सापडल्यासारखं वाटतं. पण हे आभासी जग आहे.. इथे प्रत्येक व्यक्तिमत्व चेहरा नसलेलं. म्हणून मग मुखवटाही जरुरी नसावा. पण अनुभव विचारतात..
जो जसा दिसतो तसाच आहे का?

म्हणून प्रत्यक्षात न पाहिलेल्या माणसाशी मैत्री हे भासात जगण्यासारखं आहे असं वाटतं..
शिवाय 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!' हे जमायला हवं..

या शोधाला वयाची मर्यादाही कारण असावी..
वय पुढे सरकतं तसं काय सोडावं आणि कुठे शोधावं हे समजत असावं किंवा सापडणारच नाही हे मनात पक्कं होत असावं.

पण हा शोध जीवनभर चालूच राहतो असं मला वाटतं..

तुमचा शोध खरंच संपला?
संपला असेल तर हे छानच झालं. अभिनंदन!

सामो, हा लेख मस्त, एकदम raw पण मुळांकडे घेऊन जाणारा आहे, कॉमेंट्स पण छान आहेत.

आपला स्वभाव आधी आपल्याला माहिती पाहिजे मग आपण आपल्या ट्राइबची लोकं ओळखू शकतो.

वरती लेखात म्हंटल्याप्रमाणे, आपण ठरविक माणसात, नातेवाईकां जवळ किंवा ठराविक भागात बरेच वर्ष राहिलो तर खरं तर एव्हढ्या मुळाशी जाऊन विचारच करत नाही किंवा बहुदा करावा लागत नाही. कारण आपल्यासाठी आपले आधारगट न मागता तयार असतात.

पण अचानक दूर देशात जातो, जिथे आपलयाला शून्यापासून सुरुवात करायचीये, तेव्हा मला वाटतं आपणच आपल्याला जास्त समजत जातो. काही जणांना सोशल interaction ही भावनिक गरज वाटते.
पण काही लोकं स्वतः स्वतःच मजेत जगू शकतात.

काही लोकांशी एखादंच इंटरॅक्टिव होतं पण ते तुम्हाला भावात किंवा कनेक्ट करतं. पण काही जणांशी प्रयत्नकरूनही संवाद नाही साधता येत.

वर उल्लेख केल्यासारखी बळजबरीचा राम राम असलेली नाती किंवा संबंध उगाच अस्वस्थता वाढवतात त्यापरीस नसलेले बरे.

टॉक्सिक लोकांना ओळखून जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचे.
ज्यांच्याबरोबर कुठलाही आव न आणता बोलू शकतो ती माणसे आपली,अगदी मोजकी असली तर कुठे बिघडतं? आपल्याला / त्यांना ऐकायला कान , मदतीला हात आणि एखादा धीराचा शब्द एव्हढं असलं कि झालं.

थोडक्यात ट्राइब न शोधता ही मस्त मजेत राहता येत.

अल्झाइमर्स होउ नये याकरता काही पथ्ये आहे>>>> त्यासाठी नवीन गोष्टी, कला, भाषा, वाद्य शिकणे, बागकाम करणे, पझ्झल्स सोडविणे ह्यासारखे इतरही बरेच उपाय आहेत.
सहज कोणी कनेक्ट झालं, आपली वेव्हलेंग्थ जुळली तर मग ते जोपासणं, हा भाग वेगळा. पण फील गुड साठी, सोयीसाठी माणस जोडणं म्हणजे ती बऱ्याचदा सहजपणे दुरावतातही.

माय two cents,
या निमित्ताने सखोल विचार करून मांडता आला, त्यासाठी थँक यू.

(माबोवर) इथे व्यक्त होता येणं हीच खूप सुंदर गोष्ट आहे! छान विचार मांडले आहेत. >>> खर आहे .
पण ते बऱ्याचदा "DARE " वाल चॅलेंज पण वाटत, कधी कोण कुठून फणा उगारेल सांगता येत नाही. Lol Lol Lol

असो त्यातही वेगळं थ्रिल !

छान लिहिलय. मुख्य शब्दात नीट पकडलय.
कोणत्याही नात्यात, मैत्रीत महत्वाचा असतो तो विश्वास. भले विचार, मतं, दृष्टिकोन पटो न पटो, पण एकमेकांच्या या सर्व बाबींवर विश्वास हवा. अगदी माझ्या विरुद्ध मत मांडणाराही सच्या दिलानं लिहितोय अन त्याचं हे मत खरंखुरं आहे हे पटलं तर त्याला स्विकारणं सोपं होतं. त्यासाठी माणूस आतून बाहेरून कळायला लागतो, अरसपरस. अन त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, थोडा पेशन्स लागतो, थोडं द्यावं घ्यावं लागतं, सततचा संपर्क, संवाद व्हावा लागतो. अन तरीही प्रत्येकाशी नाळ जुळेलच असंही नाही. सो काही आपले कष्ट, काही समोरच्याचे, काही परिस्थितीचे अन पुष्कळसे नशीबाचे Happy
माझं नशीब याबाबत खूप चांगलं आहे. किमान तीन चार टोळ्यांमधे माझ्यातलं 70-80% सापडलय. अन बाकी आपली आपली म्हणून एक स्वतंत्र टोळी असतेच की. त्यात आपली आवडती पुस्तकं, आवडती गाणी, आवडती जागा, आवडतं खाणं पिणं, हे अन असं सगळं टोळकं असतच सतत बरोबर Happy

छन्दिफन्दि...
तुम्ही सगळं इतकं छान सोप्पं करून सांगितलंत...
ट्राइब न शोधता ही मस्त मजेत राहता येतं.>> मस्त!

Mi manasi, thank you.

गेल्या आठ वर्षांत आयुष्य उल्ट्याच पालट झालंय बहुदा त्यातून हे सुचले असावे. Lol

आपल्या ट्राइबची व्यक्ति मिळणं आणि बोलायला दोघांना वेळ असणं हे खरं तर खूप भाग्याचं.
नेहमी कसं मनातलं लिहितेस सामो.
मला माझ्या नणंद मधे अशी सखी गवसते, आणि अजून १ मैत्रिण आहे जिच्याशी अगदी जज न होता मनमोकळं बोलता येतं.

@मानसी सुरेख लिहीले आहेस. माझा शोध संपला म्हणण्यापेक्षा, मेनापॉजने एक मोठ्ठा निश्वास टाकायची संधी मला बहाल केली. हार्मोन्स्च्या टायरनीला (सुलतानीला) फार आणि पार विटले होते मी. मला स्वतःत परिपूर्ण वाटण्यात आताच्या वयाचा फार मोठा वाटा आहे. प्रचंड एन्जॉयेबल आहे ही फेझ
@छन्दीफन्दी - >>>>>टॉक्सिक लोकांना ओळखून जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचे. थोडक्यात ट्राइब न शोधता ही मस्त मजेत राहता येत.
हे बरोबर वाटते आहे.
@अवल
>>>>>सो काही आपले कष्ट, काही समोरच्याचे, काही परिस्थितीचे अन पुष्कळसे नशीबाचे Happy
बरोब्बर पकडले आहे.
अरसपरस शब्दही खूप आवडला.
@आशू खूप आभार.

माझ्या आईबाबांना अमाप मित्र मैत्रिणी होत्या. दोघांचे लव्हमॅरेज. एस पी कॉलेजातील मित्रमंडळ कॉमन. त्यामुळे घरात सतत मस्त मस्त मैफिली होत. त्यांची स्ट्राँग ट्राइब होती. दोघेही धनु लग्नाचे म्हणजे मित्रपरिवार मोठा, हॅपी गो लकी. त्यामुळे कोणत्याही गप्पांच्या फडात गेले की त्यांची व बालपणीचीच आठवण येते.

Pages