मराठी भाषा गौरव दिन २०२३-खेळ पुस्तकांचा- शीर्षक ओळखा

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 11:34

Screenshot_20230228_110105.jpg
मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!

पहिला संच
books1.pngपहिल्या संचाची उत्तरं
ans1.png
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले

दुसरा संच
books2.pngदुसऱ्या संचाची उत्तरं
ans2.png
दुसऱ्या संचाची उत्तरं
१.माणसे अरभाट आणि चिल्लर
२.शिवार
३.बखर बिम्मची
४. अमृतफळे
५.ओंजळधारा
६.निळांसावळा
७. गाव
८.पैलपाखरे
९.पारवा
१०.मुग्धाची रंगीत गोष्ट

books3.pngans3.png
१. खरं सांगायचं म्हणजे
२. काजवा
३. वर्षा
४. गंधर्वयुग
५. लिलीचे फूल
६. एका मुंगीचे महाभारत
७. उन्ह आणि पाऊस
८. आठवण
९. गुणाकार
१०. अश्रूंचे झाले हिरे

books4.pngसंच पाचवा -
पुढील अक्षरसंचात नऊ पुस्तकांची नावे विखुरली आहेत. बघा बरं, तुम्हांला मिळतात का? आधीच्या चौकटींसारखी यात अन्य अक्षरे नाहीत. सगळी अक्षरे वापरली जायला हवीत. ही सगळी पुस्तके वेग वेगळ्या लेखकांची आहेत, पण त्यांत एक साम्य आहे. पुस्तकासोबत लेखकाचं नावही लिहाल तर उत्तम!
उ णीं ळ क्क ल्या आ नी
तं व रा अ च चं ल
प चे अं र जि य
ब आ क्षी रा शी आ न
रा प त मा णं दा
लु ठ त ळ उ मु कॉ

पाचव्या संचाची उत्तरं
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
जिणं आमुचं - बेबी कांबळे
आयदान - उर्मिला पवार
कॉलनी - सिद्धार्थ पारधे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला संच
books1.png

डोह

धन्यवाद मेधा.
चांगले खेळत आहात सगळेच.

सर्व पुस्तकं ओळखून झाल्यावर तुम्हाला लेखकाचे नाव आपोआपच कळेल.
चुका ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

डोह जी.एं.चं पण आहे का? श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं माहिती आहे.
ओके ते डोहकाळिमा आहे Happy

एकुण दहा + एक आहेत या संचात.
'नाच गं घुमा' नाचत नाचत जीएंच्या यादीत चुकून शिरले आहे. चूभूदेघे.

ओके ते डोहकाळिमा आहे +१
नाच ग घुमा मला अगदीच सगळी पानं टरकावून इतस्ततः विखुरलेलं दिसलेलं. ते ही बाद समजू. Proud

रान

पहिल्या संचाची उत्तरं

१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले

ans1.png

माणसे अरभाट आणि चिल्लर
मुग्धाची रंगीत गोष्ट
शिवार
बखर बिम्मची
पैलपाखरे
निळासावळा
अमृतफळे

Pages