पाउस गाणी २०२२

Submitted by अश्विनीमामी on 19 June, 2022 - 09:49

तर मंडळी, उशीरा का होईना पावसाचे आगमन झाले आहे, यथावकाश भिडे पूल पाण्या खाली जाईल, मुंबईची तुंबई होईल( च) एखादी छत्री कुठेतरी विसरेल, चहा - कांदा भज्यांचा प्रोग्राम होईल. सोबत उत्तम संगीत पाहिजे बरं त्याशिवाय पावसाळा साजरा होत नाही. तर सादर आहे
पाउस गाणी २०२२

सर्व गाणी युट्युब वर आहेत. पण प्राधान्याने ऐकायची आहेत कारण अस्सल भारतीय पावसात भिजला की अगदी रोमँटिक होउन जातो. अंग अंग
मोहरते, मैत्रीणी बरोबर बाहेर फिरायला गेल्यास मध्येच पाउस आला , गाडी बंद पडली अश्या सबबी चालून जातात व काही भिजलेले रोमांचक क्षण जीवन भराची ठेव होउन जातात. उकाड्यात घाम पुसताना दाबलेली स्वप्ने नव्या पावसात रुजुन फुलुन परत मनात डोलु लागतात अश्या वेळी ऐकायची गाणी. खरंतर कोणाच्यातरी हातात हात घेउन लांब ड्राइव्ह ला जाताना नाही च तर कोणाच्या तरी आठवणीत.

========================================================================================

कोणत्याही यादीच्या वर पिन्ड गाणे म्हणजे रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन भिगे आज इस मौसममें लगी कैसे ये अगन
क्युटी पाय मौशुमी, अमित आणि मुंबईचा बेभान पाउस व टाउन!! स्टफ ऑफ लव्ह. ह्या गाण्याला पर्यायच नाही. ह्याचे एक घरी बसुन गायलेले सभ्य किशोर कुमार व्हर्जन पण आहे ते घरच्या ज्येनांसाठी उगीचच लावुन गाडीच्या किल्ल्या घेउन बाहेर सटकावे.

https://www.youtube.com/watch?v=Mcdly1sb3lM

यादीची सुरुवात रामाच्या नावाने. घाबरू नका. गाण्यातच राम आहे व हेमामालिनी.

१) रामा रामा गजब होई गया रे हाल हमरा अजब हुई गवा रे:

ह्यात एक धरम व हेमा हे पाउस आला म्हणून कामाला निघालेले जोडपे. तिच्या मनात प्रेम आहे पण अजून व्यक्त झालेले नाही.
एका ठि काणी एक आदिवासी ड्रेसातली मुलगी पावसात बिनधास्त भिजत नाचत आहे अशी सिचुएशन आहे. लगेच हेमीच्या मनातले प्रेमाचे लाडू फुटतात व ती त्या ट्रायबल- हाफ सारी ड्रेस मध्ये नाचू लागते. व धरमच्या भोवती पिंगा घालत आपल्या भावना व्यक्त करते. धरम गोड हसत व दिसत उभा आहे फक्त. पण काय किलर दिसतो. अभय देओलचा काका शोभतो अगदी. हेमा अगदी छान नाचलेली आहे. ड्रेसवाल्याने तिची स्किन दिसू नये म्हणुन स्किन कलरचा ब्लाउजही दिलेला आहे पण भिजलेला ब्लाउ ज अधिकच मादक दिसतो.

लताजींनी हे अगदी रत्न नसले तरी चांदीच्या घुंगरु सारखे लखलकते गाणे दिलेले आहे.

आई रुत ये सुहानी बरसा पहले भी पानी.

https://www.youtube.com/watch?v=5KQEMArXm3E

२) अब के सावन में जी डरे:

जैसे को तैसा मिला चित्रपटातले हे गाणे आहे. जितू व रिना रॉय हे जोडपे. साधारण सीता और गीताची मेल व्हर्जन आहे. ह्यातही रीनाचा तो आदिवासी ड्रेस( हाफ सॅरी) च आहे. दोघे अगदी मनमुराद पावसात भिजलेले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=GASi_HbNOys
हे गाणी खरे तर आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर कार मध्ये ऐकायला परफेक्ट आहे. आरडीने संगीत अगदी कुटलेले आहे. व चाल एकदम लै भारी जोडलेली आहे. सुरुवात संतूरच्या तालावर पाउस सुरू होतो त्याने आहे. ऐसा मौसम पहले कभी आया नही हे लताच्या आवाजात ऐकले की भर उन्हाळ्यातही शिर शिरी येइल पाठीच्या कण्यातून. आपल्याला आतुन हलवून टाकणारी गाणी असतात प्रत्येकाची त्यातले माझे एक हे आहे.

ऐसा बादल अंबर पे सजना छाया नही.
हो ये सुहाना समा. प्रेमकी खोजमे मौजमें हो हो.
बादल प्रेमी बनके फिरे.....
आ तुझको आंखो मे छुपा दु इस रात में
कजरा गजरा बह जाई इस रातमें

मग ती म्हणते: होश से काम लो राम का नाम लो. जाने बैरन रुत क्या करे. ( क्या जमाना था लोग भगवान का न नाम बगैर डरके लेते थे)
अगदी सातवी- नववी कालखंडात जिमखान्या वरच्या डेक्कन चित्रपट गृहात सिनेमा बघितला तेव्हा रोमान्स काय ते कळायचे ही वय नव्हते पण
गाणे सुरू झाल्यावर अगदी मनातच घुसले व आजतागायत तिथे सरताज गीत बनून राज्य करते. दुसरे एक सोला बरस की बाली उमर को सलाम लेकिन वो किस्सा फिर कभी.

३) पानी रे पानी तेरा रंग कैसा:
https://www.youtube.com/results?search_query=paani+re+paani+tera+rang+kaisa

भारत कुमार मनोज कुमारच्या शोर ह्या १९७२ मधील चित्रपटातले हे गाणे आहे. उत्तम कोरस व चाल. त्याही पेक्षा कामगार व मुंबईत गरीब वस्तीत राहणा र्‍या लोकांचे हे गाणे आहे. पोटाची चिंता सतावत आहे. काम नाही हातात तरीही वरुन पाउस पडायला लागल्या वर त्यात मनमुराद भिजावे नाचावे वाटते. गाणे ऐकताना आपसुक ठेका धरला जाईल. तुमच्या लोकल मंडळात गृप डान्स करायला छान गाणे आहे.
अस्सल भारतीय बाजाचे. मोठ्या स्पीकरवर किंवा हेडफोन लावुन ऐकताना तालवाद्ये व कोरस एकदम पकडुन ठेवतात. जया भादुरी व भारत कुमार ह्यांच्यात एक केमिस्ट्री आहे ती ही गाण्यात नकळत व्यक्त होते. प्रत्येकासाठी पाउस वेगळा .. एक एक ओळ ऐकण्यासारखी आहे. सध्या जाल वादळात हा अस्सल भारत दिसेनासा झाला आहे. त्याची नव्याने ओळख करून घ्या.

४) मेघा रे मेघा रे.

https://www.youtube.com/results?search_query=megha+re+megha+re+full+song

हे ही मजबूत तीन साडेतीन कडव्यांचे गाणे आहे पण परफेक्ट. आजकाल अशी गाणी कंपोज होत नाहीत व लिहीली जात नाहीत.
इथे ही मौशुमी व जितु भाई. हा उगीचच आहे. कोण तरी बाप्या हवा म्हणून. मौसमी स्क्रीन वर आली की नजर हलत नाही तिच्यावरौन.
लताजी व सुरेश वाडकर ह्यांचे गाणे; त्यामुळे शास्रीय बाजाचे आहे. तालवाद्ये ही एकदम दणक्यात आहेत. गाणे दोन तृतियांश झाले की पाउस येतो व लाल साडी नेसलेली, प्रभातच्या चिन्हासारखी लांबलचक वेणी घातलेली मौशुमी एकदम जबरदस्त दिसते ती हिरो कडे पळत येते तो शॉट तर हाय तौबा. इतना भी सुंदर न दिखो रानी, पानी भी जल जाएगा. पूर्ण गाण्यात तिच्या हेअर्स्टाइल सारख्या बदलत आहेत. हे आपले अवांतर. सर्व गाण्यात भारतीय वाद्ये सुरेख चपखल वापरली आहेत सतार बासरी, संतूर. मेजवानीच आहे.

५) आज रपट जाये तो हमें ना उठैयो.

https://www.youtube.com/watch?v=FUOYEzYlmLU

आता येत आहेत अमित- स्मिता. साध्या साडीतही काय कमाल दिसते. व नाजुक कंबरेवर घातलेली ती चेन. हाय हाय. उपर से बारिश.
कोई करे तो क्या करे. थोडा दंगा मस्ती असलेले टिपिकल अमिताभ बच्चन गिरी साँग आहे. मुंबईतल्या पावसात एकदा तरी ही वेळ येतेच येते.
एंजॉय करायचे गाणे . भाषा व जनरल बाज अगदी बंबईया आहे.

६) भीगी भीगी रातों मे.
https://www.youtube.com/watch?v=5zB1rMNwOQk

आदिवासी ड्रेस घाल णारी नायिका आता घरातल्या रेशमी नाइट ड्रेस मध्ये आहे. दोघे बहुतेक घराच्या गच्चीत असुन मनमुराद रोमान्स चालू आहे. गाणे स्टार्ट टु फिनि श एकदम गुणगुणण्यासारखे आहे.

अंबर खेले होई उइ मां भीगे मेरी चोली म्हणणार्‍या नायिका कुठे हरवल्या बरं ..

ह्यातच एक बोनस आयटम घ्या गोरे रंग पे न इतना गुमान कर.

https://www.youtube.com/watch?v=QA2MOxhMXtU

राजोश खन्नाच आहे त्याच्या सर्व अदांसहित. व नायिका नटखट मुमताज. ही पावसात भिजल्यावर गडद निळ्या ड्रेसात इतकी म्हणून गोरी दिसते. तो चक्क तिला पॉट होल मधला चिखल लावतो तेव्हा तर जास्तच गुलाबी गोरी दिसते. व अगदी कमनीय बांधा. गाणे सामान्य आहे व राजेश च्या अदा जरा पीळ होतात पण मुमू साठी बघा. एक खट्याळ खोडकर गाणे. कोर्टिन्ग पीरीअ ड मध्ये बेस्ट. गोरा मित्र/ मैत्रीण/ तो/ती /ते/त्या /+असले तर परफेक्ट आइस ब्रेकर.

७) हाय हाय ये मजबूरी

https://www.youtube.com/watch?v=BxR7eBbLBfk

रोटी कपडा और मकान मधील एव्हर ग्रीन नटखट गाणे. झीनी बेबी ने अजरामर केले आहे. हे मी नटराज चित्रपट गृहात फुल स्क्रीन बघितले आहे.
स्टार पॉवर म्हणजे काय ते कळते. त्यातली खोडकर बासरीची सुरुवात. वैतागलेली प्रेमिका. रिम झिम पाउस व तेव्हा नवीनच आलेल्या सिंथेटिक साड्यातली एक. बागेतल्या हिरवळीवर पावसात बागडणारी बिन्धास्त यौवना. काजळाची आग लावी रेषा व हे कमी की काय म्हणून चमकी ती ही लाल खड्याची. झीनी वॉज समथिन्ग एल्स अगेन. आपल्या प्रियकरा समोर टँट्रम ठोकायची पण एक गंमत अस्ते नाही का. ती परत एकदा अनुभवा.

८) ये रात भीगी भीगी

https://www.youtube.com/watch?v=f1DZxkiMjRo

राज नर्गिस, चोरी चोरी चित्रपट. लता बाईंबरोबर मन्ना दा साहेब. ओल्ड क्लासिक. शब्द नाहीत.

९) कहांसे आये बदरा:

https://www.youtube.com/watch?v=4XfEmN4xN7c

नायिका गाणे शिकत आहे . घरी मास्तर आले आहेत पण हिच्यात व नायकात प्रेमाचे भांडण व किंचित दुरावा आहे.
एक वेगळा फ्लेवर येसु दास आणी हेमलता. नायिका दीप्ति नवल. अगदी निर्मळ सौ दर्य व किती सहज अभिनय.
आमच्या घरी गायन क्लास असल्याने हे अगदी परिच यातले रोजचे दृष्य होते. अगदी बरोबर घेतले आहे. शास्त्रीय बाजाचेच आहे.
हे रात्री च्या शांत प्रहरी पाउस पड त असताना ऐकावे. अगदी एकरुप होउन जातो पावसाशी आपण.

१०) एं डिंग विथ ऑल टाइम फेवरिट क्लासिक

प्यार हुवा इकरार हुवा.

https://www.youtube.com/watch?v=oXLzfldeDcM

राज नर्गिस एकच छत्री कोसळणारा पाउस व एकाच कपातुन प्यायलेला गरमा गरम चहा. वाफाळलेला.

लता व मन्नाडे गाण्याचे सोने केले आहे.

रेन कोट घातलेले बच्चाजी कपूर. फिरभी रहेगी निशानिया. अब वो भी मिटने लगी है.

गोड गुलाबी रोमान्स , मनाचे संयमाचे बंध तोडून टाकणारा भारतीय मान्सूनचा पाउस. बाहेर कोसळतो व मनात भावनांचे काहुर उठते.
===================================================================================================

तुम्ही स्पॉटी फाय वर असाल तर मी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. नाव बरखा. हॅपी लिसनिन्ग

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिस्ट बनवलीय. आता पावसात फक्त बायकोबरोबर फिरायचे दिवस आहेत.
बरसा रानी जरा जम के बरसो .. हे मुकेशच्या आवाजातले गाणे आहे.
यात शत्रुघ्न सिन्हासोबत त्याची रिअल लाईफ पार्टनर आहे, जी रील लाईफ पार्टनर पेक्षा कितीतरी सुंदर आहे.

मस्त लिस्ट आणि वर्णन.
अमिताभ मौशमीचं ते सुप्रसिद्ध गाणं नाही का?
कहाँ से आए बदरा - गायिका -हेमंती शुक्ला .

अब के सावन में जी डरे चे बोल फार सुंदर आहेत.

माझं आवडतं - उमड घुमड कर आयी रे घटा - दो आँखे बारह हाथ

छान धागा

घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम
ओ सावन राजा... कहा से आये तुम

https://www.youtube.com/watch?v=u6bk53x2Kno

हे आमच्या घरातले आबालवृद्धांचे हिट गाणे Happy

ऐकायलाही छान वाटते, आणि गायलाही छान वाटते.
युट्यूबवर बघणार असाल तर विडिओही तितकाच देखणा कोरी-ओ-ग्राफ केलाय.
माधुरी आणि शाहरूख एकत्र असताना पावसातला रोमान्स न फुलतो तर नवलच Happy

1.रिमझिम के गीत सावन गाए हाए भीगी भीगी रातोंमे ( अंजाना-राजेंद्र कुमार, बबीता)

२.हाय रे हाय नींद नही आए (हमजोली)

न जाने कहां से आयी है...
देखो जरा देखो बरखा की झडी...
बरसो रे मेघा मेघा
ताल से ताल मिला
बहता है मन कही
छम छम छम (श्रद्धा कपूर)
रेन इज फॉलिंग छमाछम
सावन बरसे तरसे दिल
सावन मे लग गई आग
तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है....

पाऊस आला की मला हे गाणं आठवतच

https://youtu.be/DJEI-YT5m1U

स्वामी सिनेमा आवडला होता. सुंदर साधी कथा. उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि अभिनय. गाणीही मस्त होती. आणि आवडल्या त्या शबाना आझमीच्या कलकत्ता साड्या.

अधीर मन झाले - हिरोईन पावसात गात हिरो ची वाट बघत असते ( जो सर्वांचा आवडता आशु आहे अरुंधती चा)
ऐकायला फार गोड वाटतं.... एकदा नक्की ऐका

बोले रे पपिहरा (गुड्डी)
पिया तोरा कैसा अभिमान (रेनकोट)
रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम (1942 A love story)
ओ घटा सांवरी थोडी थोडी बावरी (अभिनेत्री)
एक लडकी भिगीभागी सी (चलती का नाम गाडी)
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
आज रपट जाये तो हमें ना
रहेना है थिम
https://youtu.be/Yerqv6AAZbE
देखो ना (फना)

‘रिमझिम गिरे सावन’ अप्रतिम. एकदा टाऊनमधे असं फिरायचं आहे.
‘ये रात भीगी भीगी’ शीअर रोमान्स.

मला आवडणारी काही

दहकमधलं ‘सावन बरसे तरसे दिल’ मुंबईचा पाऊस, खड्डे, बंद पडलेल्या रिक्षा एकदम रिलेटेबल आणि रोमॅंटीक ( अक्षय खन्ना हा बोनस)
https://youtu.be/8O4vu9BxoKM

१९४२ अ लव्ह स्टोरीमधलं ‘रिम झिम रिम झिम’. आर. डी. बर्मन यांचं स्वान सॉंग म्हणता येईल असा चित्रपट. गुलज़ार यांचे शब्द आणि लेस लावलेल्या पिवळ्या साडीतील मनिषा कोईराला.
https://youtu.be/EfulJZG60eU

‘आईशप्पथ’ चित्रपटातील संजीव चिम्मलगीच्या आवाजातील ‘जागत तोरे कारण’. लिरीक्सचा पावसाशी काही संबंध नाही पण चित्रीकरण पावसातले आहे. गाणे आणि पाऊस एका लयीत वाढत जातात.
https://youtu.be/LC0d8B6EfN8

असाच एक दाटून आलेला पाऊस, कुंद वातावरण, उसळत्या समुद्राच्या पार्श्वभुमीवर वाढत असलेली नायकाच्या मनातली तगमग. अख्ख गाणंभर पाऊस नाहीच पडत पण प्रत्येक फ्रेममधे वाटतं तो आहे जवळपास. हरीहरनच्या धीरगंभीर स्वरातील ‘तू ही रे’
https://youtu.be/BFnQbgazL3g

आणि वर मीरा यांनी लिहीले आहे ते ‘पल भर मे ये क्या हो गया’

का कोण जाणे मला ‘प्यार हुआ इकरार हुआ’ नाही आवडत.

Bandit bandish - घनन घनन आज मेघ.

मेघा रे मेघा - श्री देवी - लम्हे
कत्रा कत्रा मिलती है
छोटी सी कहानी से - इजाजत

घनन घनन घिरे आये बदरा - पाऊस नसलेले पाऊसाचे गाणे Sad

टीप टीप बरसा पानी - मोहरा बऱ्याच लोकांना वयात आल्याची जाणीव करून देणारे गाणे Wink

टीप टीप टीप टीप बारिश - आमिर khan- नीलम अफसाना प्यार का

मस्त धागा.

वृष्टी पडे टापुर टिपूर, टापुर टिपुर.

नको नको रे पावसा (हे म्हणायची ही वेळ नाहीये, अति पाऊस झाला की म्हणायचं)

राया मला पावसात नेऊ नका.

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा.

माझिया प्रियाला प्रीत कळेना ह्या शोभा गुरटूच्या गाण्यात एक ओळ आहे ती आवडते मला, पावसात भिजतो श्रावण सुखाचा महिना.

काली घटा छाये, प्रेम ऋतु आये
आयी आयी तेरी याद आयी.

दिवाना हुआ बादल

ही गाणीही आठवली.

एक अतिशय आवडतं गाणं जे पावसाशी संबंधित नाहीये पण आठवतं ते म्हणजे

नैनोमे बदरा छाये,
बिजलीसी चमके हाये,
ऐसेमे बलम मोहे गरवा लगाले.

ताल मधले 'नही सामने' पण पावसात सुरु होते. पाउस, गेटवे, टाऊनसाईड आणि हिरानंदानी, पवई - बेसिकली जिथे खड्डे, चिखल वगैरे नसतो आणि पाऊस ही टाळण्याची गोष्ट नसून एन्जॉय करण्याची गोष्ट आहे असा फील देणार्‍या जागा, रहमानचे दमदार म्युझिक, हरीहरनचा आवाज
( प्लस अक्षय खन्ना Blush )
https://youtu.be/OzJ6m0tpVIo

रुदालीमधलं 'झुठी मुठी मितवा आवन बोले'. गुलज़ार, भुपेन हजारिका, लता मंगेशकर कॉंबिनेशन. राजस्थानी खेड्यातला पाऊस
https://youtu.be/4UbPLUIt_0k

दर्द चित्रपटातील 'न जाने क्या हुआ' हे गाणंही पावसाने सुरू होते. एका कडव्यानंतर बर्फ आणि शेवटच्या कडव्यात तळे की नदी.
दिग्दर्शकाला वॉटर लाईफसायकल दाखवा असं सांगितलं होतं का काय कोण जाणे. पण खय्याम यांचे संगित व लताबाईंचा आवाज त्यामुळे गाणे आवडते.
https://youtu.be/A0Flj0dcgLA

आत्तापर्यंत 'अब के सावन मे जी डरे' च्या वाट्याला गेले नव्हते कारण जितेन्द्र आणि रिना रॉय सेपरेटलीही आवडत नाहीत, एकत्र कोण बघायला जाईल? पण अमा तुमच्यामुळे हे गाणे पाहिले आणि आवडले. रिना रॉय हॉट दिसते, जितेन्द्र मात्र बावळट वाटतो.

रिम झिम के तराने ले के आई बरसात।
हाय हाय ये मजबूरी ये मौसम और ये दूरी
पुष्कळ आहेत. अनेकांनी इथे लिहिली आहेत, शिवाय दुसऱ्या भागात आणखी येणारच आहेत.
वाचत राहू या.

स्वामी मधले पलभर में ये क्या हो गया, वो मैं गयी वो मन चला.

अरे! पहिल्याच पानावर मीरानी हे गाणे सुचवले आहे.
पाऊस पडल्यावर वातावरणातील मऊपणा, तरलता येते तशीच या गाण्यातही येते.

Pages