पर्यावरणाची अवांतरे

Submitted by जिज्ञासा on 8 June, 2021 - 22:40

जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाकडी टूथब्रशवर पावसाळ्यात बुरशी येते. यावर काही उपाय आहे का? >> सोहा, उदय यांनी सुचवले आहे तसे ब्रश करून झाल्यावर शक्य तितकं पाणी झटकून ब्रश कोरड्या जागी ठेवणे, ब्रशच्या खालच्या लाकडी दांड्याला कडुलिंबाच्या तेलाचं बोट लावणे, आणि अधूनमधून ब्रशवर हेअर ड्रायरने गरम हवेचे झोत मारणे असे उपाय सुचत आहेत. कधीतरी ब्रशचा पीस खराब असू शकतो.
तुमच्या मुलीच्या शाळेने एकूण परिस्थिती बघून सवलत द्यायला हवी होती. असे प्रकल्प आठवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी असावेत. आणि त्या व्हिडिओ आधी बरीच सारी माहिती दिलेली असावी की हे आपण का करतो आहोत? नाहीतर एकात दुसरी वस्तू मिसळणे यापलीकडे काही हाती लागत नाही. मुलांनी घरी एक महिनाभर तरी प्रयोग करून बघितला पाहिजे. खोलीतल्या एका भागावर तुमचे नेहमीचे क्लीनर, दुसऱ्या भागावर नवीन तयार केलेले क्लीनर, आणि तिसऱ्या भागावर नुसते पाणी. शिवाय प्रत्येक क्लीनर मधले घटक पदार्थ, त्यांचे रासायनिक गुणधर्म अशी थिअरी पण अभ्यासली पाहिजे. मग खरा पूर्ण होईल हा धडा. वर्गातल्या प्रत्येकाने वेगवेगळं उत्पादन घ्यायचं असं पण करता येईल.

मला ‘कंपनीवर कोणतीही वस्तु तयार करताना तिची जास्तीतजास्त पद्धतीने पुनर्वापर करुन निसर्गाला कमीतकमी त्रास कसा होईल याची जबाबदारी देणे‘ ही कल्पना फार आवडली. तसा विचार कंपन्या करत नसतीलच असं नाही. पण सरकारने पण त्यांना काहीतरी चांगले बक्षिस द्यावे.
अमितव, रिसायकल कमीच करायला लागावे पण ते होत असेल नक्की. नाहीतर इतके मोठे रिसायकलिंग प्लान्ट टाकले जाणार नाहीत. तिथे नियमितपणे गोष्टी वेगळ्या करून कुठेकुठे पाठवतात. काही वस्तुंवर लिहिलेले असते किती टक्के रिसायकल साहित्य वापरले आहे. वेबसाईटवर व्यवस्थित माहिती असते की काय करता येते, काय करु नका, कसे करा इ. त्यामुळे नक्कीच काहीतरी उपयोग होत असेल. (हे मी रहाते त्या देशाबद्दल आहे)

असेल तर उत्तम आहे.
मी वाचलंय तिकडे सिटी काचा उचलून घेऊन जाते आणि त्या रिसायकल न करता भुकटी करुन लँडफिल कव्हर करायला वापरते. पेपर ही बर्‍याचदा कंपोस्टिंगला वापरतात. माझा फार अभ्यास नाही, पण स्केप्टिक बनायला पुरेशा बातम्या वाचल्या की तेच विचार डोक्यात येतात.

mi_anu यांचा प्रतिसाद पटला.

शिवाय, ज्यांना परवडते त्यांनी पर्यावरणपूरक गोष्टी आत्मसात कराव्या, काही हरकत नाही. प्लॅस्टिक हा गरिबांचा खूप मोठा आधार आहे (कृपया पूर्वी काय वापरत होते ही टेप नको. पूर्वी आणखी बिकट परिस्थिती होती). लाकडी ब्रश, ऑरगॅनिक खाद्यपदार्थ वगैरे जोपर्यंत सर्वसामान्यांना परवडणार नाहीत, तोपर्यन्त त्यांचा उपयोग हा काही 'शाश्वत उपाय' म्हणता येणार नाही. उलट सर्वसामान्य लोक दुधाच्या पिशव्या, इतर प्लास्टिक, कॅलेंडरचे कागद, नवीन कपड्यांच्या आत असणारे पुठ्ठे/जाड कागद, त्यातल्या पिना अश्या अनेक गोष्टींचा पुनर्वापर करण्यात पटाईत आहेत. त्यांना केवळ प्लास्टिक वापरतात म्हणून दोष देण्यापेक्षा त्यांना परवडतील अश्या पर्यावरणास अनुकूल गोष्टी कश्या तयार करता येतील ह्याकडे लक्ष द्यावे. परवडल्या तर का नाही घेणार लोक?

आम्ही आधी पुल देशपांडे उद्यानाच्या जवळ रहायचो. काही कारणाने पुण्यालगतच्या हाय राइज टॉवरच्या एका स्कीम मधे रहायला आलो. त्या वेळी शुद्ध हवा आदी गोष्टींचे आकर्षण होते. हळूहळू आमची स्कीम पूर्ण होऊ लागली तस तसे ऑक्सिजन सप्लाय कमी होऊ लागला. आता सहा इमारती चौकोनी सी शेप मधे आहेत. उरलेल्या ठिकाणीही टॉवर आला कि ऑक्सीजन बंद होईल.

सकाळी फिरायला जाताना सोसायटीच्या बाहेर पडताना एका ठिकाणी इमारत संपते तिथे हवेसाठी झरोका तयार झालेला आहे. असे दोन झरोके आहेत. पश्चिमेकडून येणारं वारं तिथून येतं. आता त्यातला एक झरोका आमच्या सोसायटीच्या मागच्या भागातही इतरांचे टॉवर्स उभे राहू लागल्याने बंद झाला आहे.

आता असं वाटतं की अशा हाय राईज टॉवरची गरज आहे का ?

जि, पर्यावरणर्‍हासाने बाईच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याबद्दल लिहीले तर चालेल का इथे? पुरूषांच्या आरोग्यावर होत नाही का म्हणाल तर उत्तर होतो असेच आहे पण माझा त्याबद्दल अभ्यास नाही म्हणून केवळ स्त्री आरोग्य व पर्यावरणर्‍हास बद्दल लिहू शकते. चालेल?

मला एकदा केप टाऊन मधे कार्पेट ओलं झालं म्हणून पाण्याच्या नासाडीबद्दल जबरी दंड झाला होता. त्यानंतर कैरो इथे पाण्याच्या वापराच्या सूचनांचं तंतोतंत पाळल्या. पाण्याचं दुर्भिक्ष कशाने याच्या खोलात जात नाही. पण संपूर्ण इजिप्त पाण्यासाठी नाईल नदीवर अवलंबून आहे. याच नदीत जर ड्रेनेज सोडून दिले तर खालच्यांचं काय ?

औद्योगिकीकरण हवं पण पर्यावरणाचा -हास आणि त्यावर बोलणे म्हणजे विकासविरोधी हे जुनं झालं. आता इफेक्ट्स जाणवायला लागले आहेत. भारतात तर एकही पाण्याचा सोर्स सुरक्षित नाही. सगळे प्रदूषित आहेत.

एक वेळ अशी येईल की कडक कायदे बनवावे लागतील. त्या वेळी अर्थातच आज कोरोना काळात झाले तसे ऑक्सिजनचे ब्लॅक मार्केटिंग सुरू असेल. आपल्या नातवाच्या वेळची नाही तर आपल्यालाच नजीकच्या भविष्यात पहायला लागणारी ही गोष्ट आहे. पर्यावरणाच्या बाजूने कुणी बोलू लागले की डबल स्टँडर्डस, विकासाचे मारेकरी हा टोन आता बंद व्हायला हवा तरच मानवजात गंभीर आहे असे समजता येईल.

औद्योगीकरण किती हवं ? ज्यांना अ‍ॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे काय समजतं त्यांना या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल. मॅनेजमेंट मधे ज्याप्रमाणे फाईव्ह एम असते , डिजाईन मधे ते अलिकडे विचारात घ्यावे लागते तसेच शहरांचे नियोजन करताना पर्यावरणाचे कायदे कडक करावे लागतील. कॅलिफोर्निया मधे कायदे कडक आहेत तिकडे का लोक बोंबा मारत नसतील ?

आयएसओ ९००१ मधे पर्यावरण संकल्पना आली आहे. पण यापेक्षा कडक गुणवत्ता नियमन संस्था हवी. पाण्याचे सोर्सेस प्रदूषित न करणे, हवा प्रदूषित न करणे याचे कडक मानक डिजाईन मधेच असायला हवेत.

शेवटी माणसाच्या हातात आहे. गॅजेट्सच्या किती आहारी जायचं ? चालणे शक्य असताना वाहन किती वापरावे. आपल्या गरजांवर ताबा मिळवला की फालतूचे उत्पादन सुद्धा कमी होईल. मागणी तसा पुरवठा आहे. यातल्या अनावश्यक वस्तूंना फाट्यावर मारायला हवे.

हल्ली अ‍ॅमेझॉनवरून आपण खरेदी करतो. या कंपन्यांमुळे पर्यावरणाला किती धोका आहे याची कल्पनाच नाही. कारण या कंपन्या पॅकेजिंग करून वस्तू पाठवतात. या पॅकेजिंग मटेरिअलचे काय करायचे ? हा कचरा साठत जातो. त्याहीपेक्षा या मटेरिअलचा वापर बेसुमार वाढला तर त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पर्यावरणाचा र्‍हास सुद्धा बेसुमार होतो. इंडस्ट्रीयल कार्डबोर्ड , प्लॅस्टीक, बबल शीट्स यांचा वापर पुन्हा करण्याला मर्यादा आहेत.

अरे बापरे! ऑक्सिजन बंद व्हायच्या आत हातपाय हलवा बरं! भारतात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आहे पण म्हणजे इतकी भीषण परिस्थिती असेल कल्पना न्हवती.
हरचंद पालव +१ पर्यावरण पूरक टॉप डाऊन करणे हेच sustainable आहे. बॉटम अप अत्यंत अन्फेर आहे. हे गरीब वि. श्रीमंत जनता आणि देश दोन्हीला लागू आहे. गरीब तसेही भरडले जाणारच आहेत. त्यांनी प्रमाणात पर्यावरणाची तमा न बाळगता शिडी चढता आली तर बघावं, एकदा प्रिव्हलेज गटात सामील झाले की आणखी दारे उघडतील.
मानवनिर्मित ( नोटबंदी) किंवा निसर्गनिर्मित (करोना..) संकटे आली की प्रिव्हलेज गट तुलनेने उशिरा आणि कमी भरडला जातो आणि लवकर बाहेर पडतो. पृथ्वीवर समुद्राची पातळी वाढली तर आतल्या भागातील घराच्या किमती वाढतील. पातळी ही वाढणारच आहे, पुढील काही वर्षांत आर्क्टिक वितळणारच आहे. त्याचा फायदा कसा करून घेता येईल हेच प्रिव्हलेज लोकं आधी बघणार.
रिकाम्या पोटी पर्यावरण पचत नाही. परत मानवकेंद्रित शिक्का बसेल, पण ते खरंच आहे.

सी, जरूर लिही! इथे माणूस आणि निसर्ग यांच्याशी संबंधित सर्व विषय मांडले जावेत. यात आरोग्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
अमितव, दोन्ही top down आणि bottom up approach गरजेचे आहेत. कारण on paper भारतातील कायदे one of the best in the world आहेत. पण कायदे आणि नियमांची अंमलबजावणी मात्र one of the worst in the world असेल. जोपर्यंत सामान्यातल्या सामान्य माणसाचं प्रबोधन केले जात नाही तोपर्यंत कितीही उत्तम ध्येयधोरणे आखली तरी ती पूर्ण होणार नाहीत.
"प्रमाणात" काहीच करत कोणी! हाच तर प्रॉब्लेम आहे. ना गरीब ना श्रीमंत. Do we ever say I have enough?

>>Do we ever say I have enough? >> नाही.
ते हार्ड वायर्ड आहे. मला आतून समजतं आहे माझं पर्यावरण प्रेम भंपक आहे. दुसऱ्याला सांगताना चार थिटी बोटे आत वळलेली दिसतात. त्यात सुधारणा केली तरी ती भरल्या पोटीची सुधारणा आहे हे ही दिसतं. आहे हे असं आहे. असो. Have a good weekend.

राभु, धन्यवाद.
अरेच्चा प्रिव्हिलेज्ड क्लासला कशाला हातपाय हलवायचेत ? निवांत रहा. ऑक्सीजन इतरांसाठी संपेल. प्रिव्हिलेज्ड क्लासला ऑक्सिजन मिळत राहील. बिनधास्त चिमण्या प्रदूषण करू द्यात. काही फरक पडत नाही.
पर्यावरण स्नेही उत्पादने म्हणजे गरीबी वाढणार तर गेल्या २५ वर्षात गरीबी का वाढली ? संपत्तीचे एकवटीकरण का वाढले ? रोजगार का कमी झाले ? औद्योगीकरणाला ही वाढत्या गरीबीने खीळ बसली आहे. क्रयशक्तीच रोडावली तर हळूहळू हे होतच राहणार.
उलट औद्योगिकीकरणाला केंद्रस्थानी ठेवून कायदे केल्याने शोषण सुरू आहे आणि ते वाढत चालले आहे. यामुळे गरीबी वाढते असा टाहो का फोडत नाहीत कुणी ?

पर्यावरणाचा विचार म्हणजे विज्ञानबंदी, औद्योगिकीकरणाला खीळ, विकासाचे मारेकरी असा टोन असेल तर आपला पास.

अ‍ॅप्रोप्रिएट म्हणजे काय ते सोप्या उदाहरणा द्वारे बघू.

आपल्याकडे दूध घालायला गवळी येतो. जसजशी दूधाची मागणी वाढेल तसतसं त्याला दूधाचा पुरवठा जास्त करावा लागेल. मग तो पशुधनाला हार्मोसची इंजेक्शन्स टोचतो. इथे औद्योगीकरण झाले. कमी गुंतवणूक, जास्त उत्पादन म्हणून जास्त नफा.
हे हार्मोन्स दूधात उतरतात. ते नष्ट होत नाहीत. त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. मुली लवकर वयात येणे, मुलांमधे सुद्धा या हार्मोन्सचे दुष्परिणाम दिसतात. अलिकडे डॉक्टर दूध न घेण्याचे सल्ले देताना दिसतात. काही वर्षांपूर्वी दूध आवर्जून प्यायला सांगितले जायचे.
पोल्ट्रीच्या कोंबड्यांच्या अंड्यांचे असेच आहे. पोल्ट्रीचा व्यवसाय वाढला. पण यांत्रिकीकरणामुळे कामगार नाहीत वाढत.
म्हणजे म्हशी वाढल्या नाहीत पण उत्पादन वाढले. हेच सूत्र वाढत्या औद्योगीकरणाला लागू होते. याचे दुष्परिणाम आपण भोगतो.
यात समतोल साधला जाणे आवश्यक आहे.

उद्योग लावणारा गरीबी हटवण्यासाठी उद्योग लावणे हा विचार फक्त हास्यास्पद नाही. औद्योगीकरणामुळे जंगलात राहणा-यांची संपत्तीही त्यांच्यापासून हिरावून घेतली जातेय. आता कायदे बदलल्याने जास्तीत जास्त ऑटोमायझेशन करून जास्त नफा मिळवण्याला काहीच बंदी नाही. नफा कमवू नये असेही नाही. पण त्यामुळेच तर गरीबी कशी हटणार हा प्रश्न आहे.
लिज्जत पापडमुळे जेव्हढ्या लोकांना रोजगार मिळतो त्यापेक्षा हजारो पट गुंतवणूक होगानाज इंडीयाची आहे. पण संपूर्ण कारखान्यात फक्त ५० कामगार आहेत.
काहीच्या काही मुद्दा आहे औद्योगीकरणाने गरीबी हटते याचा.

प्राणीजगात प्रायमेट्स (माकड इ.) मादी मध्ये विशिष्ट हंगामात स्त्रीबीज तयार होते व ते फलित होऊन अपत्य जन्मते. जर स्त्रीबीज उशीरा तयार झाले, हंगाम सरला तरच तिला 'पाळी' येते म्हणजे पाळीसदृश्य स्त्राव होतो. एकूणात फार कमी वेळा पाळी येते.

अशाच पद्धतीचे प्रजनन शहरीकरणापासून दूर आफ्रिकेतील मनुष्य जमातीत (टोळ्या/ट्राईबस) मध्ये संशोधकांना आढळले. एकूण सरासरी २४ वर्षे प्रजननक्षम काळात या महिला सरासरी ४ वर्षे गर्भधारणेत घालवतात व एकूण सरासरी १५ वर्षे काळ स्तनदा माता असतात. पाळी फक्त सरासरी ४ वर्षे येते. या उलट शहरातील महिला सुमारे ३५ वर्ष प्रजननक्षम असतात व दरमहा पाळी येते.

ह्यात एकूण आयुष्यमान वाढले हे मान्य केले तरी शहरीकरणामुळे पाळीच्या चक्रात मोठे बदल घडले हे अमान्य करता येत नाही.

इतर परिणाम वेगळ्या पोस्टीत जरा वेळाने लिहीते.

चांगली चर्चा आहे.

सीमंतिनी, तुमची पोस्ट इंटरेस्टिंग आहे. शक्य असल्यास स्वतंत्र लेख लिहिता येईल का यावर?

शहरातील स्त्रियांनीही १५ वर्षे स्तनपान करविले तर त्यांना १५ वर्षे पाळी येणार नाही ना? अर्थात हे खूपच सामान्यीकरण झाले. प्रत्येकाची हार्मोन लेव्हल इ. प्रमाणे लवकर येऊ शकते. सांगण्याचा उद्देश एव्होल्यूषण बदल आपल्यातही आहे असं वाटलं. चुकतंय का?

रिसायकलकरता भुकटी करुन लँडफिल कव्हर करायला वापरते. >> अमितव, मलापण सविस्तर माहिती काढायची आहे एकदा. रिसायकल प्लांटवरच जाऊन पहायचे, बोलायचे आहे व खरीखोटी जी उत्तरे मिळतील ती ऐकायची आहेत. कितीही पुनर्वापर करायचा म्हटले तरी मर्यादा येतात. पण डायरेक्ट कचर्‍यात टाकण्यापेक्षा रिसायकलमधे किमान काही टक्केतरी पुनर्वापर करतील या आशेने रिसायकल करतो आम्ही.
इथले ‘बेस्ट बाय’ जे एलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे ते सगळ्या वस्तु रिसायकलला घेतात. त्यात वायर, रिमोट, फोन, टेव्ही, पीसी, आणि भरपुर काही घेतात. मी नेऊन देते थोडेथोडे. एकदम खूप वस्तु घेत नाहीत ते. तिथेही हाच विचार असतो माझा. उदा. फोनची युएसबी केबल चिरली तर चिकटपट्टी लाऊन वापरुन ते ही शेवटी चालत नाही तेव्हा सरळ कचर्‍यात टाकण्यापेक्षा बेस्टबायमधे द्यायची, तिथे ते काहीतरी करायला वापरतील. अगदी काहीच करता आल्याने टाकुन देतील पण त्यांचे प्रयत्न माझ्यापेक्षा व्यावसायिक, अनुभवी असतील म्हणून त्यांना देते.
दुसरे उदा. मी दही विकत आणत नाही, घरी बनवतो. तेवढेच प्लास्टिक कमी येते घरात व घरचे दही म्हणजे जास्त चांगले. बाकी मी स्वयंपाकात फार कुशल नाही म्हणुन आठवड्यातुन एकदा बाहेरचे आणतो. टेकआऊट करताना स्वतःचे डबे घेऊन जाणे ही कल्पना आवडली होती वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे पण इथे ते हॉटेलवाले मान्य करणार नाहीत.

वर आत्मा व इतरांनी लिहिलेले दुष्ट्चक्र खरंच भितिदायक आहे.
अजुन एक गोष्ट हल्ली करतो ती म्हणजे केवळ किंमत आहे म्हणून एखादी वस्तु घ्यायची नाही. ती गेली मोडुन लवकर तर पैसे ही गेले, कचराही वाढला त्यामुळे शक्यतो जास्त किंमत देऊन भक्कमच वस्तु घ्यायची. जर ती परवडत नसेल तर थांबायचे व पैसे जमवता आले तरच घ्यायची. मुख्य म्हणजे रिव्ह्यु वाचायचे. आता तर मला ‘खोटा चांगला‘ व ‘खोटा वाईट‘ रिव्ह्युपण बहुतेक ओळखता येतो. Proud

काहीवर्षांपुर्वी बहुतेक मोन्टानामधे एक शास्त्रावरील म्युझिअम पहाताना, लँडफीलमधे कचरा टाकल्यावर जे प्रचंड प्रमाणावर वायु निघतात ते पकडण्यासाठी एक मोठा प्लांट उभारला होता व तो वायु पाईप मधून जमीनीवर आणून त्याचा वापरपण करण्यात आलेला होता. सविस्तर माहिती आता आठवत नाही, पण त्या प्रकल्पाचे मॉडेल त्या म्युझिअममधे होते. छान वाटले पहायला ते.

अजुन एक गंमत. कोवीडच्या आधी ऑफीस चालू असताना एचआरनी सर्वे घेतला तुम्ही पर्यावरणासाठी कंपनीचे भले होईल असे काय करता? आता आपण काय करणार? मी लिहिले ‘स्वतःचे चमचे डबा खायला आणते व पाण्याची बाटली आणते‘. मी विसरले लिहिलेले पण दोन आठवड्यांनी कंपनीचे ईमेल आले सर्वांना ‘पुढील महिन्यापासुन पँट्रीत चमचे, फोर्क्स ठेवले जाणार नाहीत व पाण्याला छोटे ग्लासच ठेवले जातील‘. Proud

बाईबाई, विकेंडला किती ते लिहायचं?

मेघना, चांगले सुचवलेत. वर्षाखेरीच्या आत लेख टाकते. Happy सध्या दुसर्‍या लेखावर काम करते आहे.
अमितव, हो, एव्होल्यूशन असेलच पण शहरात फार मोठ्या प्रमाणावर रसायने असतात. कुमार१सरांनी त्यावर लेखही लिहीलेला आहे. अशा एंडोक्राईन disrupters मुळे, नोकरी इ धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शहरातील बहुतेक स्त्रिया दोन वर्षावर स्तनदा स्थितीत नसतात.

छान धागा आहे. वाचतोय.

यावरून एक आठवले. इथे अमेरिकेत बहुसंख्य ठिकाणी टाउन चे लोक दोन बिन्स देतात - एक गार्बेज व एक रिसायकल करता (कॅलिफोर्नियात सार्वजनिक ठिकाणी आजकाल तीन असतात - एक नॅचरल कचर्‍याकरता, फळे वगैरेचे टाकले जाणारे भाग). भारतातही आजकाल ओला व कोरडा कचरा वेगळा करतात हे पाहिले आहे. तर इथे आम्ही व इतर बरेच लोक आपल्या घरातील बिन्सना ज्या प्लॅस्टिक च्या पिशव्या लावलेल्या असतात त्या तशाच गाठ मारून या बिन्स मधे टाकायचो दर आठवड्याच्या पिक अप च्या दिवशी. मग टाउन मधे काम करणार्‍या एकाने माहिती दिली की जर रिसायकल बिन मधे मटेरियल पिशवीत भरून टाकले तर ते रिसायकल होणारे असेल तरी सरळ लॅण्डफिल मधे जाते. तेव्हा ती खोकी, कागद, पॅकिंग मटेरियल त्यात सुटे टाकणे आवश्यक आहे.

रानभुली, तेच तर होतंय. Planning करणाऱ्यांनी थोडा जरी नैसर्गिक वायुविजन, प्रकाश यांचा विचार करून घरं बांधली जेणेकरून दिवसा उजेडी दिवे आणि पंखे कमीत कमी लावावे लागतील तर किती चांगले होईल. पण आपला फोकस फक्त पैसे मिळवणे/वाचवणे यावरच राहिला आहे.
अमितव, भरलेलं पोट असणं आवश्यक आहे. पण कोणाचं पोट भरलेलं आहे असं मानायचं? कारण enough ही शेवटी व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. जर तू आणि मी म्हणालो की हो, आजच्या घडीला माझ्याकडे सगळं enough आहे तर मग बिल गेट्स काय म्हणेल? पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ उपाय योजनांनी कायमचा सुटणार नाही. आपल्याला एक वेगळा mindset लागेल हे प्रश्न सोडवायला. सध्याचे UN चे sustainable development goals बरेच बरे आहेत. जरी त्यात निसर्गाला अगदी ढाक नंबर मिळाला असला तरी.
पा. आ., चांगल्या पोस्ट्स!
सी, हे फारच इंटरेस्टिंग आहे. तू वेगळा धागा काढून लिही किंवा इथे लिही! मला खूप प्रश्न पडले आहेत! तुझे लिहून झालं की विचारते!
फा, याची माहिती एका फ्लायर वर बिन शेजारी लावली पाहिजे! नाहीतर recycling facility असून काय उपयोग!

वापरा आणि फेकून द्या (link: https://www.maayboli.com/node/79236)
पर्यावरणप्रेमींची मला नेहमी गंमत वाटते. आपली सुंदर पृथ्वी वाचवा, तिचा ऱ्हास वाचवा, पर्यावरण वाचवा असा विचार नेहमी पुढे येत असतो. यात चुकीचे काही नाही, पण महत्वाची बाब म्हणजे यात निसर्गाबद्दलचे प्रेम खरं तर दुय्यम असते, खरी चिंता असते की पुढच्या पिढीचं काय होईल, मानव जातीचं काय होईल, आपण नष्ट तर होणार नाही ना? स्पष्ट सांगायचे तर निसर्ग सुप्रीम आहे आणि आपण मानव समाज त्याला ओरबाडत आहोत. We are children of the nature, but pests on this planet. योग्य वेळ आली निसर्ग ताकद दाखवेलच, आपण नष्ट होऊ, पण ही पृथ्वी तशीच आनंदात राहील. @जिज्ञासा, तूर्तास हा व्हिडीओ बघा. जर जमले तर पर्यावरणाच्या धाग्यावर लिहीन. इथे राईट-टू-रिपेर बद्दल चर्चा झाली तर बरे.
>> उपाशी बोका, खरी गम्मत तर ही आहे की आपल्याला अजूनही पर्यावरण वाचवा किंवा माणूस वाचवा असा either or choice आहे असं वाटतं. तुम्ही निसर्ग वाचवा माणूस आपोआप वाचेल. निसर्ग supreme नाही. निसर्ग vulnerable आहे. आणि माणूस निसर्गाचाच भाग असल्याने तोही vulnerable आहे. Life on earth exists because of many chance events. आपण जर एका फटक्यात नष्ट होणार असू आणि त्याने बाकीच्या जीवसृष्टीला काही धोका नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपण आधी सगळं नष्ट करणार - जे जीवन उत्क्रांत व्हायला किमान साडेसहा कोटी वर्षं लागली ते काही दशकांत नष्ट करणार आणि मग (एकदाचे) मरणार - या डील मध्ये काय ग्रेट आहे? तुम्हाला माणूस जात वाचावी असं वाटतंय तर मग निसर्ग वाचवा पण जर माणूस जात वाचू नये असं वाटत असेल तर मग हा मार्ग घेऊ नका - आपल्याकडे तंत्रज्ञान आहे - पुढची पिढी जन्माला येणार नाही अशी सोय होऊच शकते. त्यासाठी इतकं collateral damage करण्याची गरज नाही. I will tell you what I want - I want the humans to live in harmony with nature for as long as it is possible!
तुम्ही शेअर केलेला व्हिडीओ किती डेटेड आहे याची तुम्हाला कल्पना असेलच - Jammin in New York: April 24th, 1992 - जवळपास ३० वर्षांपूर्वी केलेली विधाने तुम्ही अजूनही सिरिअसली घेत आहात हे काही फार convincing नाही. गेल्या ३० वर्षांत आपण विज्ञानात बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे या सो कोल्ड कॉमेडीमधले जोक्स आणि फॅक्टस दोन्ही outdated झाले आहेत. त्यावर बोलून आपण वेळ वाया नको घालवायला. We both have so many better things to do!

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शहरातील बहुतेक स्त्रिया दोन वर्षावर स्तनदा स्थितीत नसतात. >> In india there is a social pressure to stop feeding after 1 year including many other type of doctors (non pedi ).

watch sherni - loved the movie.

मग खरा पूर्ण होईल हा धडा. वर्गातल्या प्रत्येकाने वेगवेगळं उत्पादन घ्यायचं असं पण करता येईल. >> चांगली suggestions आहेत. पण भारतातल्या बहुतेक शाळा आणि पालक घोकंपट्टीचे अभ्यासाचे मॉडेल सोडून , थोड्याफार Hands-on-activities असणारे मॉडेल आत्ता कुठे स्वीकारू लागले आहेत. पालकांना Hands-on-activities , अनुभव केंद्रित शिक्षण या सगळ्याचे महत्व पटतयं. पण परीक्षा आणि त्यात मिळणारे मार्क हे सुद्धा तितकेच महत्वाचे वाटताहेत. आणि मार्क मिळवण्यासाठी, textbooks, syllabus , घोकंपट्टी ही मळलेली वाट सोडावीशी वाटत नाहीये. अश्या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या पालकांना आणि शाळांना "मग खरा पूर्ण होईल हा धडा" हे सत्य पचवणे थोडेसे कठिण जाईल. Happy

उपाशी बोका , यांच्या प्रतिसादाला धरून (त्यांचा प्रतिसाद माझ्या अन्यत्र आलेल्या एका प्रतिसादाशी मिळताजुळता आहे म्हणूनही)

पर्यावरणात बदल होण्याची अनेक कारणे असतात. उल्कापात / ज्वालामुखींमुळे डायनॉसॉर नष्ट झाले असे मानले जाते. त्यानंतरही जीवसृष्टी तगली, वाढली, उत्क्रांत झाली.
मानवजातीची कृत्ये हे पर्यावरणात बदल होण्याचे तसेच एक कारण ठरू शकेल.

<< आपल्याला अजूनही पर्यावरण वाचवा किंवा माणूस वाचवा असा either or choice आहे असं वाटतं. तुम्ही निसर्ग वाचवा माणूस आपोआप वाचेल. >>

खरं सांगतो, या पर्यावरणनाझींमुळे रोज माझ्या छातीत धडधडते. का माहीत आहे का? रोज संडासला गेलो की मी विचारात पडतो "टॉयलेट पेपर वापरू की पाणी वापरू?" दोन्हीपैकी काहीही वापरले तरी लगेच ते माझ्या मागे लागायचे की तुम्ही पर्यावरणाचा विनाश करताय म्हणून.

कागद बनवायला सारखी झाडे तोडून टाकताय, जंगलांचा संहार करताय असे सारखे म्हणत असतात हे पर्यावरणप्रेमी. इतक्या पेपर कंपन्या जगात आहेत, त्या काय मूर्ख आहेत का जगातली सगळी जंगले तोडून टाकायला? जंगले संपली तर पेपर कसा बनवणार? पण गंमत म्हणजे पर्यावरणप्रेमींना हे माहीत नसते की पेपर बनवण्यासाठी प्रत्यक्षात झाडांची लागवड केली जाते, अगदी शेती केल्यासारखी.(1) दुसरी गंमत म्हणजे गेल्या काही वर्षात (१९८२ च्या तुलनेत) जगातील झाडांची संख्या कमी न होता, उलट खरंतर वाढत आहे.(2) अर्थात फक्त झाडांची संख्या वाढत आहे, इतकेच आपण बघता कामा नये. ती का वाढत आहेत, त्याने बायो-डायव्हर्सिटीवर (फले, फुले, पक्षी, प्राणी वगैरे) काय परिणाम होत आहेत, हे पण बघितले पाहिजे.

पण निसर्ग खरोखर कमालीचा आहे. रेडिएशन मुळे अजून कित्येक वर्षे माणूस राहू शकणार नाही, अश्या चेर्नोबिलमध्ये आता अनेक वन्य प्राणी परतले आहेत, वनस्पती वाढत आहेत.(3) इतकंच कशाला, निसर्ग पण बदलला आणि ओझोन लेअर भरून निघाला.(4) आता त्या ओझोन लेअर बद्दल पण वादावादी आहे की CFC बंदी घातल्याने ओझोन लेअर चांगला झाला की उत्तर ध्रुवावरील हवा बदलामुळे.

पण कुणी काही शंका घेतली तर मात्र ते चालत नाही पर्यावरणप्रेमींना. काही फिजिसिस्टच्या मते "ग्लोबल वॉर्मिंग" हे pseudoscience(5) आहे.(6)(7) पण ग्लोबल वॉर्मिंगला आता कल्टचे रूप आले आहे, तो एक धर्म झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर शंका कशी घेता, असे बर्‍याच जणांचे मत असते.

विज्ञान म्हटले की शंका या घेतल्या जाणारच. त्यातून एखादी थियरी ताऊन सुलाखून निघाली, थियरीने काढलेले निष्कर्श आणि मॉडेलने मांडलेले अंदाज प्रत्यक्षात पडताळून आले, इतरांना देखील तसेच रिझल्ट मिळाले की तेव्हाच ते pseudoscience न समजले जाता, खरेखुरे विज्ञान समजले जाईल.(8) "ग्लोबल वॉर्मिंग" नक्की खरे असू शकेल आणि त्याच्यासाठी मानव जबाबदार असेल किंवा नसेल, पण त्यामुळे फक्त ५०-१०० वर्षांचा पर्यावरणाचा अभ्यास करून "ग्लोबल वॉर्मिंग"चा निश्कर्ष माझ्या मते तरी घाईघाईत काढलेला वाटतो.

I can live with doubt and uncertainty and not knowing. I think it's much more interesting to live not knowing than to have answers which might be wrong. I have approximate answers and possible beliefs and different degrees of certainty about different things but I'm not absolutely sure of anything and there are many things I don't know anything about..." - Richard Feynman(9)

या विषयावरील हा माझा शेवटचा प्रतिसाद. कृपया पुढील संदर्भ नक्की बघा, विशेषतः 6 आणि 7 चे व्हिडीओ.

संदर्भः
(0) George Carlin on The Environment https://www.youtube.com/watch?v=EjmtSkl53h4
(1) https://www.tgwint.com/dispelling-myths-three-common-misconceptions-pape...
(2) https://reason.com/2018/09/04/global-tree-cover-has-expanded-more-than/
(3) Wildlife Takeover: How Animals Reclaimed Chernobyl https://youtu.be/XaUNhqnpiOE
(4) https://www.indiatimes.com/technology/science-and-future/earth-finally-f...
(5) Richard Feynman on Pseudoscience https://youtu.be/tWr39Q9vBgo
(6) Physics Nobel Laureate; "Man Made" Global Warming is Pseudoscience https://youtu.be/7mGSVsl-ing
(7) Global Warming: Fact or Fiction? Featuring Physicists Willie Soon and Elliott D. Bloom https://youtu.be/1zrejG-WI3U
(8) Feynman on the Scientific Method https://youtu.be/j9p8p29P_UU
(9) Feynman - Living with Doubt https://youtu.be/czcv4b6rKgk

उपाशी बोका, मी seaspiracy आणि cowspiracy या दोन डॉक्युमेंटरीज बघितल्या नुकत्याच. त्यापैकी cowspiracy ची सुरुवात तुम्ही लिहिलंय तशीच काहीशी आहे. माणूस एरवी मारे थेंब थेंब पाणी वाचवतो, पण एक हँबर्गर खाऊन त्या सगळ्या बचतीवर पाणी ओततो अशी आकडेवारी ते दाखवतात.

उपाशी बोका, अतिशयोक्ती अलंकार छान वापरता! श्वास घेताना पण धडधडत असेलच! Light 1
पर्यावरणवादी म्हणजे कोणीतरी व्हिलन माणसे आहेत जी आपल्याला सुखाने जगू देत नाहीत असा गैरसमज तुम्ही स्वतःच करून घेतला आहे. तो गैरसमज प्रथम दूर केलात तर फार छान होईल! If you become ecologically aware your life will become 100% better and not worse, that is something I can assure you! कारण टॉयलेट पेपर वापरू की पाणी असे प्रश्न नाही पडणार मग! तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या चॉइसेसचे परिणाम थोडे तरी कळू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या जगाशी - भवतालच्या निसर्गाशी नव्याने ओळख होईल. तुम्ही निसर्गाचा आदर करायला शिकाल आणि (बहुतेक) निसर्गावर प्रेमही करायला शिकाल! आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अलाहिदा, निसर्गाचा आणि त्याच्या मर्यादांचा आदर करत जगण्याचे माणसालाच अनंत फायदे आहेत.
Yes, there are quacks in every field. पण जागतिक तपमानवाढ pseudoscience नाही. शिवाय तपमानवाढ हा एकमेव प्रश्न नाहीये ना किंबहुना तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न देखील नाहीये. आणि केवळ ५०-१०० वर्षांचा विदा पाहून हे निष्कर्ष काढलेत असे चुकीचे विधान का करता? शास्त्रज्ञांनी ध्रुवांवरच्या बर्फात अडकलेल्या हवेच्या बुडबुड्यांचा अभ्यास करून गेल्या ८००,०० वर्षांपूर्वीपासूनचा तपमानाचा विदा गोळा केला आहे. ही नासाच्या संकेतस्थळावरची माहिती आहे त्यामुळे त्यात pseudoscience नाही हे तुम्हाला मान्य होईल. या साऱ्याची मनोरंजक भाषेत (आणि ब्रिटिश अक्सेंट मध्ये!) माहिती देणारा एक मस्त व्हिडीओ आहे तो नक्की बघा असं सुचवेन. लिंक: https://youtu.be/uqwvf6R1_QY (Climate Change Is An Absolute Nightmare - This Is Why)

तरी आपण करीत असलेल्या सर्व उद्योगांच्या दीर्घकालीन परिणामांची आपल्याला फारच कमी माहिती आहे ही जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे. पण जी काही थोडी बहुत confirmed शास्त्रीय माहिती आहे त्यावरून येत्या २०३० पर्यंत आपण आपल्या वाढीव गरजा (excess consumption) कमी करू शकलो आणि आपल्या प्रगतीच्या मॉडेलला planetary boundaries शी जोडू शकलो तर आपण चांगल्या प्रकारे damage control करू शकू असा सध्याच्या तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. दुर्दैवाने आजच्या काळात गरजा कमी करण्याविषयी बोलणारे लोक फार थोडे आहेत. बहुतेक जण केवळ अधिक पर्यावरणस्नेही पर्याय शोधण्यावरच अडकले आहेत which are necessary but unfortunately not sufficient.
त्या एका गोष्टीत जसे “पोपट मेला आहे” हे राजाला सांगणे त्याच्या मंत्र्यांना अवघड जात होते तसे आपल्या भौतिक वाढीचा वेग कमी केल्याशिवाय पर्याय नाही हे अवघड सत्य मान्य करणे आणि बोलून दाखवणे ही गोष्ट फार कमी जण करत आहेत. त्याला अनुसरून कृती करणे ही पुढची गोष्ट झाली.

बाकी पेपर कसा तयार करतात, चेर्नोबिलमध्ये काय घडतंय या सगळ्या माहित्यांचा उपयोग मर्यादित आहे. कारण कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात म्हणून केवळ झाडं/वृक्ष किती वाढली हे मोजून उपयोग नाही. कोणत्याही परिसंस्थेत हजारो जैविक आणि अजैविक घटक असतात जे झाडांइतकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे इकॉलॉजीच्या दृष्टीने बघायचं झालं तर मग फार जास्त अभ्यास करावा लागेल. कारण चेर्नोबिलमध्ये जे घडतंय तसंच कोकणात घडणार नाही.
तुम्ही या धाग्यावर जरूर लिहीत रहा असं म्हणेन. कोणीच सर्वकाळ बरोबर असत नाही. Whatever our actions may be, we are all in the same boat as far as consequences are concerned!

संदर्भ:
How is Today’s Warming Different from the Past? https://earthobservatory.nasa.gov/features/GlobalWarming/page3.php

Citizen scientist projects म्हणजे सामान्य जनतेने मिळून केलेले वैज्ञानिक प्रकल्प हे जगात मोठ्या प्रमाणावर चालतात. अशाच भारतात चालू असलेल्या एका प्रकल्पाची माहिती इथे देते आहे. SeasonWatch ह्या प्रकल्पाद्वारे भारतातील फुलणाऱ्या देशी वृक्षांची नोंद नागरिक ठेवू शकतात. यांचे एक वापरायला सोपे असे अँड्रॉइड ऍप आहे. तुम्ही ऍपवर रजिस्टर केले की तुमच्या परिसरातील वृक्षांचे फोटो दर आठवड्याला अपलोड करायचे. दर वेळेस झाडाच्या स्थितीची एक बेसिक माहिती देखील द्यायची - पाने आहेत/नाहीत, फुले किंवा मोहोर आहे/नाही, फळे आहेत/नाहीत इत्यादी. हे सारं ऍप वर सिलेक्ट करणं सोपं आहे एकदम. सध्या सुमारे १३०+ देशी वृक्ष यात ट्रॅक केले जातात. या अशाप्रकारे जमा झालेला विदा विविध प्रकारच्या संशोधनासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, काश्मीर ते कन्याकुमारी यंदा आंब्याला मोहोर कधी आला? साधारण दहा वर्षे असा विदा मिळाला की मग काही ट्रेंड दिसतो का? Correlation analysis इत्यादी करता येते. सध्याच्या काळात आपल्याला हवामान बदलामुळे होणाऱ्या संभाव्य बदलांचा रिअल टाइम वेध अशा प्रकारे घेता येऊ शकतो. शाळेतली मुले यात नक्कीच सहभागी होऊ शकतात.
SeasonWatch ची वेबसाईट: https://www.seasonwatch.in/

भवताल या मासिकाच्या या महिन्याच्या अंकामध्ये त्यांनी सुरु केलेल्या एका छान उपक्रमाविषयी माहिती आली आहे. उपक्रमाचं नाव आहे “गाव करील ते राव काय करील”! १६ जून २०२१ पासून महाराष्ट्राच्या विविध भागांतील सुमारे १०० जण पाऊस मोजत आहेत! पर्जन्य मापक तयार कसा करायचा ते पाऊस कसा मोजायचा याचं सर्व प्रशिक्षण ऑनलाईन झालं आहे. हाही एक Citizen scientist project च आहे. या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर bhavatal@gmail.com वर संपर्क साधता येईल.

मी या दोन्ही उपक्रमांशी (अजूनतरी) संलग्न नाही पण चांगल्या कामाला मदत मिळावी या हेतूने ही माहिती द्यावीशी वाटली!

Pages