पर्यावरणाची अवांतरे

Submitted by जिज्ञासा on 8 June, 2021 - 22:40

जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अरे बापरे ९ AQI!
काळजी घ्या उदय. >>

------ धन्यवाद हर्पेन. दारे खिडक्या बंद ठेवायच्या, आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे. तिकडे हिमाचल प्रदेशांत भूस्खलना मुळे शेकडो लोक गेले आहेत.

भरपूर उन्हाळा ( त्यामुळे गवत कोरडे होते) त्यामुळे एखाद्या भागांत प्रमाणापेक्षा जास्त बाष्पीभवन, पाण्यामुळे निर्माण झालेले ढग कुठे तरी कोसळणार, मग ढग फुटी/ फ्लॅश फ्लडिंग जोडीला वीजांचा कडकडांट पुढे जास्त आग आणि वणवे
वाढलेले तापमान/आगी/ पाऊस यामुळे जमिन सैल होत आहे - भूस्खलनाचे प्रकार ( तापमान वाढीमुळे काही भागांत स्नो पडायचा तिथे आता पाऊस पडत आहे असे हिमाचलचे चित्र आहे :अरेरे:)
बदल डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहेत.

बर्‍याच जणांनी केतकी घाटे आणि मानसी करंदीकर यांच्या पर्यावरण विषयक कामांबद्दल इथे मायबोलीवरच वाचले असेल.
त्यांच्याच अधिवास फाऊंडेशन तर्फे पुराण वृक्ष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम भारतासाठी मर्यादित आहे.

त्यांचे निवेदन

'पुराण वृक्ष मोहीम'

पुराण वृक्ष आजी-आजोबांसारखे असतात. एका मोठ्या काळाची माहिती स्वतःच्या आत राखणारे पक्व वृक्ष. असे पुराण वृक्ष आता बहुत करून रस्त्याकडेलाच बघायला मिळतात. यात बाभूळ, काटे सावर, पिपर, आंबा, वावळ असे मूळनिवासी, तर वड, चिंच, नीम अशा लावलेल्या स्थानिक जाती दिसतात. काही ठिकाणी त्यांच्यामुळे झाडांचे बोगदे तयार झालेले दिसतात. बऱ्याच रस्त्यांवर सावलीसाठी अशी झाडं मुद्दाम लावली असल्याच्या जुन्या नोंदी आहेत. काही भागात तत्कालीन राजांनी खास वाटसरूसाठी, नागरिकांसाठी अशा लागवडी केल्या. म्हणजेच बऱ्याच वृक्षांचं वय किमान १५० ते २०० वर्ष आहे.

सावली बरोबरच कधी फळ, फुल, मकरंद ह्याची मेजवानी माणसा सकट इतर प्राण्यांना देखील मिळते. हरियल, गुलाबी मैना, धनेश ह्यासारखे पक्षी या झाडांवर खाण्यासाठी गर्दी करतात.

वडाच्या वृक्षांचा बोगद्याने झाकलेला सोलापूर रस्ता, वाईचा रस्ता, सातारा रस्त्यावर असलेले नांदृक, बाभूळ, दापोली रस्त्यावरचे मोठाले आंबे, कोयनानगर रस्ता फुलांचा सडा पाडून सुंदर करणारे काटे सावर, तोच रस्ता तांबूस पालवीने सजवणारे पिपर, आंबे, चंद्रपूरच्या वाटेवरचे धावडे, साग नि बोंडारे... कितीतरी आठवणी. किमान ५० वर्ष जुनी झाडं. काही तर सहज १५० च्या आसपास.

रस्त्याकडेच्या बरोबरीने इतर ठिकाणीही एखादाच भला थोरला वृक्ष आधार वडासारखा उभा असलेला आढळतो. शेताचे बांध, गावं - खेडी, शिवार, डोंगरउतार अशा ठिकाणची सलग असलेली झाडी या ना त्या कारणाने लोप पावली मात्र असे भव्य वृक्ष मात्र टिकून आहेत.

परंतु गेल्या काही वर्षात रस्ता रुंदीकरणात असे विशाल वृक्ष आणि त्यामुळे निर्माण झालेले अधिवास नष्ट होत आहेत. त्यांना लक्षात घेऊन प्लॅनिंग झालेलं कुठेही दिसत नाही. ह्या वृक्षांना सामावून घेऊन आराखडा करणं शक्य आहे परंतु ह्या कल्पनेचा समाजात मोठाच अभाव आहे. तो अभाव कमी करावा याचसाठी ही मोहीम !

आपल्या आसपास असे विशाल वृक्ष असल्यास त्याचे नाव, घेर, ठिकाण इत्यादी माहिती ह्या लिंकमधील फॉर्ममध्ये भरावी.. ही सर्व माहिती सर्वांना बघण्यासाठी खुली असेल. ह्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी जरूर संपर्क करा. या बरोबरीने आपापल्या भागात रस्ता रुंदीकरण झाल्यावर नवीन वृक्षारोपण करण्यासाठी स्थानिक झाडे सुचवूया.

या मोहिमेसाठी पुराणवृक्ष म्हणजे काय ?

वय ५० पेक्षा अधिक वर्षे
खोडाचा परीघ/घेर २ मी (२०० सेमी) व त्यापेक्षा अधिक
शक्यतो स्थानिक जाती

महत्त्वाच्या सूचना :
नोंद करायच्या आधी नकाशा बघून वृक्ष नोंद आधी झालेली नसल्याची खात्री करून घ्यावी.
https://www.adhiwas.org/old-trees-map

जिथे वृक्षांची वाढ हळू होते, उदा. राजस्थान, हिमालय, अशा ठिकाणी घेर १ मी पेक्षा अधिक असलेली झाडे नोंदयला हरकत नाही.
काही लावलेली अ-स्थानिक वृक्ष जसे रेनट्री. मोहोगनी, भरभर वाढून भव्य होतात. पण त्यांचे वय कमी असते, त्यामुळे अशा वृक्षांच्या नोंदी शक्यतो करू नयेत. परंतु त्यावर घरटी किंवा इतर जीव जाती किंवा त्याचे इतर काही महत्त्व आढळल्यास त्यांची नोंदवायला हरकत नाही.

एकाहून अधिक वृक्ष नोंदण्याकरता दर वेळी नवीन फॉर्म भरावा.
ही मोहीम एकट्या राहिलेल्या, धोकाग्रस्त किंवा एखाद्या ओळीत असणाऱ्या विशाल वृक्षांसाठी आहे. मोठ्या जंगलाचा भाग असलेल्या वृक्षांसाठी नाही.
https://www.adhiwas.org/old-trees-data

वेताळ टेकडी चे पुन्हा एकदा वाटोळे करायचा नवा डाव पुमनपा ने आखला आहे
लोक तळतळीने विरोध करतायत त्याची काही किंमतच ऊरलेली नाही. नदीची यथेच्छ वाट लाऊन झाली आहे आता टेकडी
दिवसेंदिवस पुणं बकाल करण्यात राजकारणी लोकांचा भला मोठा वाटा आहे

नागपूरांत पावसाच्या पाण्याने कहर केल्याच्या बातम्या आहेत.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/heavy-rain-floods-nagpur...

climate change कितीही नाकारले तरी रोज या नाही त्या प्रकारे आठवण करुन देते.
-------

smoke in Saskatoon (SK)- माझ्या गावातली धुराची परिस्थिती आता बरिच सुधरली आहे. जवळपांस ३.५ महिने खेळ सुरु होता. मागच्या लाँग विकेंडला सलग तिन दिवस घरांत कोंडावे लागले होते. आधीच सुटीचे दिवस कमी, आणि घरांत, दारे - खिडक्या बंद करुन बसणे म्हणजे शिक्षाच होती. Sad

सलग तिन दिवस स्मोक लेवल Air Quality Index AQI १०+ होती.

Screenshot 2023-09-18 at 5.14.20 PM.png

इतर वेळी पर्यावरणाबद्दल बोटतिडकीने लिहिणारे, गणपती उत्सवावेळी होणाऱ्या आवाज प्रदूषणाबद्दल मोदक गिळून गप्प असतात. ह्या वर्षी तर मुख्यमंत्र्यांच्या कृपेने DJचा अक्षरशः हैदोस चालला आहे. DJ ला रात्री १२ पर्यंत परवानगी तर दिली आहेच पण आवाजाच्या पातळीवरची मर्यादा पण काढून टाकली आहे की काय असे वाटते.
वृत्तपत्रांमध्ये मिरवणुकी दरम्यान होणाऱ्या आवाजामुळे मृत्यूंच्या बातम्या वाढल्या आहेत. देवाच्या नावाने चाललेला हा हैदोस पर्यावरणालाच नाही तर समाजाला पण घातक आहे.

https://india.postsen.com/trends/1119325.html

https://www.esakal.com/paschim-maharashtra/death-of-young-man-during-ganpati-visarjan-miravnuk-at-kavatheekand-sound-system-police-bam92

जवळपांस ३.५ महिने खेळ सुरु होता. मागच्या लाँग विकेंडला सलग तिन दिवस घरांत कोंडावे लागले होते. आधीच सुटीचे दिवस कमी, आणि घरांत, दारे - खिडक्या बंद करुन बसणे म्हणजे शिक्षाच होती.

बाप रे, काळजी घ्या उदय

अरे वा! झदा- स्वागत आहे ह्या धाग्यावर.

कोणत्याही कारणाने का होईना तुम्हाला पर्यावरणाची काळजी वाटू लागली आहे हे स्वागतार्हच आहे.
तुम्ही हे ध्वनी प्रदुषण कमी व्हावे म्हणून काय प्रयत्न केलेत / करू पाहता आहात ते जाणून घ्यायला आवडेल.

तुम्ही हे ध्वनी प्रदुषण कमी व्हावे म्हणून काय प्रयत्न केलेत / करू पाहता आहात ते जाणून घ्यायला आवडेल.>>
पेंडश्या नक्कीच गणपती मिरवणुकीत ढोल वाजवत असणार. कोणताही मुद्दा उपस्थित केला तर त्यामध्ये वैयक्तीक योगदान आधी सांगणे का लागावे? आहे माझे योगदान पण आज मला ह्या प्रश्नावर चर्चा करायची आहे.

प्रकर्षाने जाणवणारे आणि नोंद घ्यावी असे दोन मोठे बदल....

(अ) डिसेंबर चे तापमान सरासरी पेक्षा २० सें ने जास्त आहे. आतापर्यंत -२५ / -३० सें पर्यंत तापमान जायला हवे होते. एल निनो (El Nino) चा परिणाम आहे का ? हे माहित नाही.

(ब) अजून पर्यंत म्हणावा तसा स्नो पडलेला नाही. अनेक वर्षांनी brown (instead of white) Christmas साजरा करावा लागला. येथे साधारणत: सप्टेबर - ऑक्टोबर मधे स्नो पडायला सुरवात होते. जमिनीत आर्द्रता / ओलावा नसेल तर शेती व्यावसायाचे मोठे नुकसान आहे.

PM2.5 ची वार्षिक सरासरी हा निकष असेल तर प्रदूषणाच्या बाबतीत (अ) भारताचा जगात ३ रा क्रमांक, (ब) पहिल्या ५० सर्वाधिक प्रदूषित शहरांमधे ४२ शहरे भारतात आहेत. Sad
https://www.iqair.com/ca/world-most-polluted-cities

https://indianexpress.com/article/india/india-3rd-most-polluted-country-...

Pages