पाणी रान वाहतो...

Submitted by सुर्या--- on 23 April, 2021 - 00:43

रुसलेल्या क्षणांना मनवणे,
मलाच जमले नाही...
नशिबापुढे आकाश ठेंगणे,
नशीब जागलेच नाही...

वाटलं देव पावेल,
भाग्य खुलतील...
सुख येतील,
आनंद देतील...

संकटाशी तडजोड,
मलाच जमली नाही...
अपयश्याच्या डोंगरात वळलेली,
वाट दिसलीच नाही...

प्रयत्न केले,
कधीतरी विजय होईल...
त्यातच आयुष्य सरले,
आता फक्त शेवट होईल...

दिवस उगवतात, मावळतात
रात्र सरते...
नवी आशा पल्लवित होते,
पुन्हा अश्रू देते...

एक स्वप्न सोडून,
दुसरं स्वप्न पाहतो...
पुन्हा बे चा पाढा होऊन,
पाणी रान वाहतो...
© SURYAKANT_R.J.

Group content visibility: 
Public - accessible to all site users