तू....तूच ती!! - २

Submitted by किल्ली on 29 January, 2018 - 10:05

तू....तूच ती १!! लिंक
https://www.maayboli.com/node/65106

("अरे देवा, हे काय. हा कशाला भेटला आता. आदित्यच आहे हा. इतका हँडसम का आहे हा पण ? कोणतीही मुलगी फिदा होईल ह्याच्यावर. बरं, देवाने नुसतंच रूप दिलंय. अकलेचा पत्ता नाही. रिकामटेकडा नुसता.. फुशारकी करत फिरत असतो. थोडा स्मार्ट असता ना मी नक्कीच ह्याला घास टाकली असती.")
तिच्या विचारांचं तिलाच हसू आलं.
("शी.. घास काय..माझं मराठी बिघडत चाललंय हल्ली ")
आदित्य :हाय श्रु!!!
श्रुती: अरे तू थांबला आहेस का अजून. आणि प्लीझ मला श्रु नको म्हणूस रे .. श्रुती नाव आहे माझं..
आदित्य : माहित आहे गं ..पण मी प्रेमाने म्हणतो तसं..
श्रुती: काय , प्रेमाने ???
आदित्य : ही ही .. मग काय ..सुंदर मुलींशी असंच बोलायचं असतं ..
श्रुती:बास आता flirting ..आज दुसरी कुणी भेटली नाही वाटतं ..
आदित्य : कसं गं तुला सगळंच कळतं ..तुझ्यासोबत timepass ही करता येत नाही ...by the way ..एवढा वेळ काय करतेस इथे?
श्रुती: अरे क्लायंट कॉल होता..sprint संपली ना काल .. खूप improvements दिल्यात त्याने माझ्या mudule ला आणि project ला पण . बरेच inputs मिळाले बघ .
आदित्य : तू का एवढी serious होतेस.. बघून घेऊ ..क्लायंट ला कुठे कळतंय technically कसं असतं सगळं ते.. चिल मार तू.. मोठे लोक आहेत टीम मध्ये ते बघून घेतील . त्यांना काळजी नाही आणि तुझं काय
श्रुती: अरे पण ..जाऊ दे.. आपली विचारशैली वेगळी आहे (ह्याला काय कळणार प्रामाणिकपणा, नुसत्या वशिल्याने काम होतात ह्याची, गोडबोल्या नुसता ) , anyways , मी निघते. उशीर झालाय . bye
आदित्य : drop करू का तुला ? आणि मला भूकही लागलीये खाऊ मस्त बाहेर काहीतरी आपण .. नाहीतरी तुला कोण विचारणार असं डिनरसाठी.. scholar मुली असतात ना कॉलेज मध्ये , एकदम टिपिकल तशी आहेस तू ...
श्रुती: नो thanks.. कंपनी ची कॅब असते आपल्या .. जाते मी कॅब ने .. ("आला मोठा मला डिनर ला नेणारा, वरणभात मिळतो का त्यात हॉटेलमध्ये, गरम गरम, त्यावर तुपाची धार आणि चटकदार लोणचं , आहा !!, पटकन घरी जाते आणि वरणभात चापते, ह्याला नाही कळणार त्यातली गम्मत, आईला सांगायला हवं निघाले ते , काळजी करत असेल ती " )
आदित्य: काय ग ..कुठे हरवलीस .. माझ्याबरोबर येण्याच्या विचाराने तुझ्या मनात लड्डू फुटत असतील नाही?
श्रुती: ("काहीही काय... ह्याच मराठी ना , कान धरून सुधारायला हवं , लड्डू म्हणे ").. माझा चॉईस साधारणपणे बरा आहे आणि तो तू नाहीस ..सो chill .. आणि बाय .. ("इथे भेटलास वर भेटू नकोस ")

दुसऱ्या दिवशी श्रुती नेहमीप्रमाणे ऑफिस ला आली. आदित्य एका सहकाऱ्याला चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर घेऊन गेला होता आणि नेमकी त्यावर dependancy असल्यामुळे श्रुतीचं काम अडलं होतं. ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला . श्रुती चिडली. आदित्य आल्यावर तिने दोघांनाही जोरदार झापलं.
चांगलीच वादावादी झाली दोघांची .. खूप जणांना वाटलं श्रुती ने एवढा overreact व्हायला नको होता कारण आदित्य तास सगळ्याशी मिळून मिसळून वागायचा. श्रुती तेव्हढ्यास तेवढं वागणारी होती त्यामुळे तिच्या वागण्यामागे काय कारणं आहेत ते समजून घेण्याच्या भानगडीत कुणी पडलं नाही. एक मात्र झालं , सगळे श्रुतीशी फटकून वागू लागले. तिनेही कामापुरतेच बोलायचं असाच पवित्र आधीपासून घेतला असल्यामुळे विशेष फरक पडू दिला नाही . मात्र कधी कधी तिला फार एकटं वाटल्या लागलं . आदित्य ने एकदोन वेळा तिच्याशी बोलण्याचा , तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला . पण ती बधली नाही. आदित्यलाहि वाटायचं, आपण जास्त काम न करताही आपला मस्त चालू आहे आणि ही बया एवढा काम करते, कंपनी ला प्रॉफिट मिळवून देते तरी एकटी पडलीये. कधी कधी हा अभिमान त्याच्या बोलण्यातून डोकवायचा त्यामुळे आधीच अबोल असणारी श्रुती जास्त कोणाशी बोलेनाशी झाली.मुळात ती आदित्य चा द्वेष करायला लागली आणि तो तिच्यात डोक्यात गेल्यामुळे त्याच्याशी बोलणाऱ्या सगळ्यांनाच ती टाळू लागली. हे चुकीचा आहे हे समजून सुद्धा तीच हेच चालू होतं. आदित्यचा राग असण्याचं मूळ कारण म्हणजे त्याचा कामचोरपणा असा तिला वाटायचं आणि तिच्याही नकळत ती त्याच निरीक्षण करत असते आणि त्याच्याबद्दल मनात असणाऱ्या समजावर शिक्कामोर्तब करत असे. हे सगळं तीच routine झालं होतं . तिच्या कामाची आणि हुशारीची आता सिनिअर्स नी दखल घेतली होती .. आता ती अधिक जबाबदारीने काम करायला लागली होती. पण perosnal front वर तिला आता ऑफिस बोअर व्हायला लागलं होतं.

एके दिवशी सकाळी सकाळी श्रुती walk ला घराजवळ च्या गार्डन मध्ये होती. आणि तिचा फोन वाजला. बघते तर आदित्य.
आदित्य : श्रुती लवकरात लवकर ऑफिस ला ये आज. काहीही प्रश्न विचारू नको. पटकन आवर आणि ये. हवं तर मी पिक करतो.
श्रुती : नको मी येईन , bye
आणि तिने कॉल कट केला. ह्यावर विश्वास ठेवावा का असा विचार करतच ती घरी आली, अभावीतपणे तिने आवरलं आणि scooty घेऊन निघाली ऑफिस ला.
आदित्य चं आपण का ऐकलं असावं ह्यावर तिचंच मन तिला valid reason देत नव्हतं ....

श्रुती ऑफिस ला पोचली. पार्किंग मध्ये तुरळक गाड्या होत्या. कुणीच आलं नसणार. ही थट्टा असू शकते असा विचार करत ती लिफ्ट मध्ये शिरली. ऍक्सेस कार्ड पंच करून तिच्या odc मध्ये शिरताच तिला आश्चर्याचा धक्का बसला!!!! .................
क्रमश:

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------तळटीपा :
ही कथा IT कंपनीत घडते. त्याला अनुसरून भाषेची मांडणी केली आहे. इंग्लिश शब्दांचा वापर आणि काही technical टर्म्स वापरल्या आहेत
"IT-सॉफ्टवेअर " क्षेत्रातील वापरल्या जाणाऱ्या "terms" विषयी:
(अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक्स वर टिचकी मारा).

ऍक्सेस कार्ड : हे कार्ड पंच करून ODC मध्ये प्रवेश मिळवता येतो , odc त काम करणाऱ्या authorized employees ना आत जात येतं. ही मंडळी ODC मध्ये बसून काम करतात.

sprint : Agile software development methodology चा एक महत्वाचा कालावधी
https://en.wikipedia.org/wiki/Scrum_(software_development)

ODC : Offshore Development Center
https://en.wikipedia.org/wiki/Offshore_custom_software_development

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग देखिल छान जमलाय

लिखाण सुंदर आणि कटेकोरपणे लिहीलंय पुढच्या भागासाठी शुभेच्छा