आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९१७.
मराठी सोप्पे एकदम!
द द त क ह श द
ल न द म म व

९१७.
मराठी सोप्पे एकदम! -- उत्तर
देवा दया तुझी ही की शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला

क्ल्यू -- बायका न बोलून शहाण्या असतात.
नायक -- याच नावाच्या नायकाची बातमी आता तुमच्या शहरात चर्चेत आहे, कृष्णा
गायक -- गायक, नायक मूळचे एकाच राज्यातले

इतना तो केह दो हमसे
तुमसे ही प्यार है
मेरी खामोशी सजना
मेरा इकरार है

९१९ हिंदी (८०-९०)
त ख म ब ख म ज क
प म ड ह ख म ज क
त ह क ल ख म ज क
त ख अ म ग म ब अ ह
अ ब ह प म ल अ ह

क्लु लागणार नाहीत इतक सोप आहे. त्यामुळे आता मी निघते. अगदीच अडकल तर कुणीतरी पुढच कोड द्या आणि पुढे चला.

अरेच्चा, इकडे कुणी फिरकलसुध्दा नाही >>

किल्ली कुठे कुलुपाला क्ल्युची? Happy

कृष्णाजी, मी आधी म्ह्टल तस क्लु लागणार नाहीत इतक सोप आहे. तरी पण

१. सगळ्या गेय ओळी आहेत, कोणतही वाद्य सोबत वाजत नाही
२. अर्थपूर्ण ओळी, उगीच ट ला ट नाही
३. गायक संगीतकार रोजच्या ऐकण्यातला तरी वेगळा, वैशिष्ट्यपुर्ण

मग नक्की अर्थ चित्रपटातले!

तेरे खुश्बु में बसे खत मैं जलाता कैसे
प्यार में डुबे हुये ख़त मैं जलाता कैसे

ह्यातले ते 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो' हे जास्त ऐकलेले बर्‍याचदा!

करेक्ट Happy
तेरी खुशबु में बसे खत मै जलाता कैसे
प्यार में डुबे हुए खत मै जलाता कैसे
तेरे हातो के लिखे खत मै जलाता कैसे
तेरे खत आज मै गंगा मे बहा आया हूं
आग बहते हुए पानी में लगा आया हूं

९२०.

हिंदी
सोप्पे

ज ह ज क ज
ह त ह अ त ल ह
त भ म म भ प
ब म स ब ज ह

६०-७० सालातले!

द्वंद्व गीत..
हा देखिल आवडता गायक!
आणि गायिका देखिल अष्टपैलू..

९२०
जोडी हमारी जमेगा कैसे जानी
हम तो हैं अंग्रेजी तुम लडकी हिंदुस्तानी
तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी
बात मानो सैंय्या बन जाओ हिंदुस्तानी

मना डे - आशा भोसले
मेहमूद - अरुणा ईराणी

९२१
हिंदी (८० - ९०)

र प र ह य प ब क ह
ख र अ व ह ह त स क ह

क्ल्यू
ह्या चित्रपटाचे संगीतकार + दिग्दर्शक = संपूरण सिंह कालरा !

Pages