स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा, जास्त वापरत नाही म्हणत भरपूर लिहिले Proud

बरं मला कुणीतरी एक सांगा. कन्व्हेक्शन मोडमधे ओटीजीची केकची भांडी वापरता येतात का? की खास मायक्रिवेव्हची प्लास्टिक अथवा ग्लासाची भांडी वापरावी लागतात?

पूनम, तुला एल जीचा कितीला पडला??? Happy आणि सोबत काय काय मिळाले??

नंदिनी, कन्वेंशन मोड मध्ये मेटलची भांडी वापरता येतात.
मी मायक्रो मोड मध्ये शक्यतो काचेची भांडी वापरते.

माझ्या मायक्रोव्हेवबरोबर गीता नारंगचे कुकबुक मिळालय. त्यात कोणत्या मोडमध्ये कोणती भांडी वापरता येतात दिलय.
त्यानुसार
ग्लास सिरॅमिक - मायक्रो (जर मेटल रिम नसेल तर), ग्रील, कॉम्बो, कन्व्हेंशन
फॅन्सी सिरॅमिक जसे की पॉटरी, पोर्सेलिन वै) - फक्त कन्व्हेंशन (ते सुद्धा जर त्या भांड्यावर लिहिले असेल तर)
मेलॅमाइन सारखे प्लास्टिक - कोणत्याही मोड मध्ये वापरू नये
स्पे. मायक्रो प्लास्टिक - फक्त मायक्रो मोड (जर भांड्यावर तशा सुचना असतिल तरच)
मेटल डिशेस - फक्त कन्व्हेंशन मोड
बटर पेपर - फक्त मायक्रो मोड
रिसायकल केलेले पेपर प्रॉडक्ट - कोणत्याही मोडमध्ये नाही
लाकडी भांडे -फक्त मायक्रो मोड मध्ये थोडावेळा करिता गरम करण्यासाठी
अल्युमिनियम फॉइल - माय्क्रो मोडमध्ये शिल्डींगसाठी (मी अजुन वापरली नाही. माझ्यामते तरी अशी वापरल्यास स्पार्किंग होवु शकते) ग्रील मोड मध्ये शिल्डींगसाठी (वापरुन बघितलिये), कॉम्बी अन कन्व्हेंशन मध्ये वापरता येते.
अ‍ॅल्युमिनियम फॉइलची भांडी (कंटेनर) - ग्रील मोडमध्ये शिल्डिंगसाठी व कॉम्बी अन कन्व्हेंशन मोडमध्ये वापरता येतात.
क्लिंग फिल्म - फक्त मायक्रो मोड (पण मायक्रो मोड मध्ये सुद्धा ती गरम होवून भांड्याला चिकटते बर्‍याचदा असा अनुभव आहे)
क्रिस्टल ग्लास वैगरे कोणत्याही मोडमध्ये वापरू नयेत.

आईच्या केनस्टार च्या माय्क्रो बरोबर संजिव कपुरचे पुस्तक मिळालय. ते आईनी मलाच दिलय पण अजुन त्यात बघुन काही केलं नाही.

नंदिनी, मी अजुन त्यात भाज्या, भात, ईडली, ढोकळा असले पदार्थ कधी बनवले नाहिएत.
फक्त हा असा सटर फटर वापरच जास्त होतो, आपलाच वेळ वाचतो ना.
आणि त्यावरुन मी घरात बोलणीही ऐकते, की हे धुड आणुन ओट्यावरची जागा मात्र कमी केली म्हणुन. Happy

मला एक एलजीचेच पुस्तक मिळाले आहे, ते अत्ताच माझ्या सासर्‍यांच्या हाती लागले, आता ते सांगतायत की त्यात बघुन नानकटाई बनव. Sad

इथे वाचून मला कुकींग क्लासची कुपन्स असतात असं कळलं. मग पुस्तक उघडून बघितलं तर निघाली कुपन्स आतून. आता काय उपयोग. वॉरंटी संपायला ७ दिवस राह्यले. असो जाउदे.
मी काही जास्तीच्या गोष्टी न घालता गोड किंवा नमकीन बिस्कीटं टाइप प्रकरण करून बघतेय. पहिला प्रयोग अर्धवट यशस्वी. परत प्रयोग करेन तेव्हा बरोबर जमलं तर यो जा कृ टाकेन.

माझी पण वाया गेली ग कुपन्स.
मी त्या एल जी च्या पुस्तकात बघुन अन इथे मायबोलीवर वाचून नानकटाई बनवून बघितली होती.पण तो प्रयोग अर्धवटच जमला. नानकटाई म्हणून नाही पण बिस्किट म्हणून खपून गेला तो बिघडलेला प्रकार. Happy

<<कविता, मनिषा, इतर- तुम्ही 'मायक्रोवेव्हमधले पदार्थ' असा धागा सुरू करून त्यात तुम्हाला जमलेल्या रेसिप्या लिहिणार का?>>

पूनम ला अनुमोदन.. नविन धागा सुरु करा कोणीतरी.... Happy

मी ही मा वे चा वापर मोस्ट्ली अन्न गरम करणे, पापड/दाणे भाजणे, मावा बर्फी बनवणे, डिफ्रॉस्ट करणे या पलिकडे करत नाही. पुर्वी भात बनवत असे पण हल्ली त्यासाठी राईस कुकरच बरा वाटतो. पण नवीन मा वे रेसिपीज मिळाल्या तर ट्राय करायला आवडेल.

रच्याकने.. भारतात मा वे + कनव्हेक्षन मोड वाले मा वे मिळतात का? इथे नुसते मा वे जास्त खपतात कारण मोस्टली सगळ्यांकडे कनव्हेक्षन ओव्हन कुकटॉप बरोबर असतो.

वा अल्पना, मस्त माहिती.

हो, इथे फ़क्त मायक्रो मोड, मायक्रो + ग्रिल, मायक्रो + ग्रिल + कन्व्हेक्शन असे तीन प्रकारचे मिळतात. माझा तिसरा प्रकार आहे. एलजीचे ३ कूपन्स आहेत, करेन आता तिकडे फोन आणि जाईन क्लासला.

मला वाटतं मदत समितीच्या सहाय्याने ’मायक्रोवेव्ह’ असा स्वतंत्र धागा उघडून हे सर्व मेसेजेस तिकडे हलवले पाहिजेत.

पूनम अस नविन धागा उघडुन इथल मा.वे. संबंधीच लिखाण हलवता आल तर बरच होईल. मग तिथेच टिप्स, सेटिंगची माहिती, फसलेले नंतर जमलेले प्रयोग, टाळता येण्या सारख्या चुका, सल्ले घेता देता येतील.
मा.वे. मधे करताना बेसिक रेसिपी तर आपण गॅसवर/इतर माध्यम वापरुन करतो तशाच असतात फक्त सेटिंग, पदार्थाचा कमी अधीक घट्ट्/पातळ पणा व. गोष्टी वेगळ्या असतात.

मा.वे. साठीचा राईस कुकर हा प्लॅस्टिकचाच असतो का? (मी शक्यतो प्लास्टिक वापरतच नाही म्हणुन विचारतेय)

बरं थांबा आता, मीच इकडे नवीन लेखनाचा धागा सुरू करते, पण त्यातली पोस्टं माझ्या नावाने असतील बरंका Proud (खाली लिहिन तुमचं नाव, घाबरू नका) तर आता इथे मावे संबंधी काही लिहू नका, थोडा धीर धरा

हुश्श. केलाय नवीन धागा चालू. आता मायक्रोवेव्हसंबंधी कृपया सर्वांनी तिकडे लिहा. आता पाककृती येऊदे Happy

मदत समिती, इथले सर्व मेसेजेस उडवू शकता.

पुण्यात स्लो कुकर कुठे मिळेल्.राईस कुकर नको.मला दोन्हीमध्ये काय फरक असतो.दोन्हीपैकी कोणता घ्यावा प्लीज सुचवा.

हाय कांचन,

http://www.maayboli.com/node/2624 इथे पहा. इथे स्लो कुकर वर चर्चा आणि पाककृती आहेत.
पुण्यात स्लो कुकर कुठे मिळेल हे मात्र पुणेकर सांगतिल....

माझा राईस कुकर बाद झाला....... आणून पहिलाच महिना झाला होता...... पूर्वीही एक आणला होता तो पहिल्याच दिवशी बाद झाला होता. त्यामुळे तो बदलून मिळाला होता... ............. Sad घेणार असाल तर फिलिप्सचा घ्या........... राईस कुकर स्लो कुकर मधल्या फरकासाठी २-३ धागे मागे जाऊन पहा... तिथे आहे चर्चा....

मी बजाजचा ग्रील्ड सँडवीच मेकर घेतलाय. त्या सोबत फक्त तो कसा चालवावा याची माहिती आहे. जिथुन विकत घेतला त्या दुकानातील मुलीने आम्हाला सांगितले की त्यात फक्त सँडवीच नाही तर इतरही खाद्यपदार्थ ग्रील करू शकतो उदा. आलू टिक्की (तिनेच दिलेले उदाहरण आहे हे)

कुतुहला पोटी आम्ही त्यात एकदा पनीरचे तुकडे ग्रील केले... ते व्यवस्थित झाले. सँडवीच तर चांगले बनतेच.

तुमच्या पैकी कोणी हे उपकरण वापरते का? त्याचे काय काय उपयोग होऊ शकतात?

हो रेशमी कबाब वगैरे पण छान होतात. अ‍ॅल्यु फॉईल वर कबाब ठेउन ग्रील करुन पहा. Happy
चिकन चे पिसेस पण तंदूर करायला सोप्पा आणि फास्ट पर्याय आहे मावे किंवा ओव्हन नसेल तर.

धन्यवाद संपदा.

अ‍ॅल्यु फॉईल मध्ये गुंडाळून नाही ठेवायचं ना? फक्त फॉइलचा तुकडा ठेवून त्यावर कबाब ग्रिल करायला ठेवायचे ना?

हो ..:) ग्रील प्लेट्स्च्या आकाराच्या फॉईल वर ठेवायचं. म्हणजे नंतर त्या ग्रील प्लेट्स साफ करायलाही त्रास पडत नाही.
गुंडाळून नाही ठेवायचं.

अमेरिकेत इथे इलेक्ट्रिक फ्रायर मिळतो , त्याबद्द्ल कोणी सान्गेल का ? , म्हणजे कोणत्या कम्पनीचा चान्गला आहे , कुठ्ले मॉडेल चान्गले ?

>>तंदूर करायला सोप्पा आणि फास्ट पर्याय आहे मावे किंवा ओव्हन नसेल >><<
संपदा, त्या मुलीने आम्हाला सांगितले की यात मावे किंवा ओव्हन यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ग्रील होते... म्हणजे जास्त क्रिस्पी. त्यामुळे बरेच जण मावे किंवा ओव्हन घरात असूनही हे उपकरण घेतात. मी मावे किंवा ओव्हन वापरला नसल्याने मला तीचे म्हणणे पडताळून पाहता आले नाही.

माझ्याकडे एक छोटा( १ ड्बा) आणि एक मोठा कुकर (३ डबा) आहे. गेली २-१/२ वर्ष मी छोटाच कुकर वापरत होते (अजुन छोट्च कुटुंब आहे ना....आम्ही दोघ आणि आता एक बाळ), काहीच म्हण्जे काहीच त्रास नव्हता त्याचा, पण गेली २ महीन्यापासुन खुपच कटकट करतोय., शिट्ट्याच होत नाहीत, झाकणातुन वाफ जाते, ४-५ रबर रिंग बदलल्या, शीट्टीच्या बाजुचा वॉल (वॉलच म्हणतात ना) बदलला, संपुर्ण कुकर तपासुन आणला, दुकानदार सगळं ठीक आहे म्हणुन सांगतो... पण काहीच कळत नाही, medium गॅसवर ठेवला तर फार तर एक शीटी होते आणि मग वाफ जायला लागते. मग शीटी होतच नाही. पाणी पण जास्त ठेवुन पाहील पण काहीच फरक नाही तर काय करु? हा जुना झाला का? नाविलाजास्तव तो मोठा कुकर वापरावा लागतो, थोडस काही करायच असल तरि तो एवढा मोठा काढा, वापरा, धुवा, कंटाळा येतो. नविन कुकर घेउ की हाच दुरुस्त होईल? होईल तर कसा होईल? खुप लाड्का झाला होता तो त्यामुळे टाकुन द्याय्च म्हट्ल तरी जिवाला लागेल ?तरि नविन घेतला तर कोणत्या कंपनीचा चांगला?

नवा ३ लिटरचा, तुझ्याच शब्दांत सांगायचं तर २ डबेवाला कुकर घे. सध्याचा छोटा (१.५ लिटरचा असावा असे वाटते)दुरुस्त झाला तर बाळाची खिचडी बनवायला, कधीतरी भाजी बनवायला , नुसते बटाटे उकडायला उपयोग होईल. बाळ मोठे होईल तसा ३ लिटरचाच लागेल.

वॉलच म्हणतात ना>>>> व्हॉल्व असतो तो.

माझाही १.५ लिटरचा कुकर अश्याच तक्रारींमुळे पडून आहे. तुझा दुरुस्त झाला तर मलापण सांग. Happy

माझा पण मोठा कूकर असाच बिघडला आहे. शिट्टी बदलुन बघितले का ? माझे तेच करायचे बाकी आहे. फारसा वापरला पण नाहीये त्यामुळे टाकुन द्यायचे जमत नाही.

व्हॉल्व म्हणतात त्याला.

मला कोणी हार्ड अनॉडाइज्ड कुकवेअर बद्दल माहीती सन्गू शकेल का? टेफ्लोन च्या कोटिन्ग चे तोटे खूप ऐकलेत.
मात्र असे ऐकलेय की हार्ड अनॉडाइज्ड भान्डी जास्त तपवून किवा त्यावर इतर धतून्चे चमचे वापरून चालतात.आणी ती म्हणे सर्व बाजून्नी सारखीच गरम होतात.
कोणी अधिक माहीती सन्गु शकेल का?

मला कोणी हार्ड अनॉडाइज्ड कुकवेअर बद्दल माहीती सन्गू शकेल का?>>>
माझ्याकडे 'फुच्युरा 'चे हार्ड अनॉडाइज्ड तवा आणी खोलगट झाकण असलेले भांडे आहे.. दोन्हि झकास आहेत, कोरड्या भाज्या असतिल तर झाकणात पाणी घालुन ठेवायचे.

शिल्पा८५, प्रेस्टीज ची कायम एक्ष्चेंज ऑफर चालू असते. चौकशी कर म्हणजे जुना कुकर देउन नवाघेताना
पैसे वाचतील.

सिंडे. शिट्टी बदलूनही काही उपयोग होत नाही. माझा तो प्रयोगपण करून झालाय. आयामचा कुकर सध्या अडगळीत पडुन आहे.

हॉकिन्स चे लहान कुकर खुप उपयोगी आहेत. माझ्याकडे दोन आहेत. मी रोज त्यातच स्वयंपाक करते. त्यात अन्न व्यवस्थित शिजते ... उदा. मंद गॅसवर एका शिट्टीमध्ये कोणतीही भाजी व्यवस्थित consistency मध्ये शिजते (१०-१५ मिनिटात). लहान कुकर घ्यायचा असेल तर हॉकिन्स घ्या. जेव्हा मी पहिला कुकर घेतला तेव्हा दुकानदाराने मला 'लहान कुकर घ्यायचा असेल तर बाहेरच्या झाकणाच्या कुकरपेक्षा आतल्या झाकणाचा कुकर घ्या' असे सांगितले. त्याने असेही सांगितले की लहान कुकर कायम मंद गॅसवरच वापरावेत. म्हणजे जास्त चालतात. त्याच्या सल्ल्याप्रमाणे मी मंद गॅसवर ते कुकर वापरते.

Pages