आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंगलोर ला वॉटसन ला खेळवायची ईतकी नितांत गरज आहे का?
>>>>
हेच मी आज एका ग्रूपवर म्हटले. पुढच्यावेळी सर्वच टीम नव्या बनणार आहेत ना. तेव्हा ही सारी पिकलेली पाने गळून पडणार आहेत.

nothing seems to be working for RCB lately >> +१, आपल्यापैकी कोणालाही IPL सुरू व्हायच्या आधी RCB team निवडायची असती तरी आपण बर्‍यापैकी हीच निवडली असती हे खरय. मागच्या वर्षी त्यांची बॉलिंग कमी पडत होती नि कीपर बॅत्समन हवा म्हणून ह्य वेळि त्या दोन्ही वर नीट लक्ष दिलेले. योग असावा लागतो बहुधा. जवळजवळ मागच्या वर्षीचीच टीम घेऊनही मुंबई कुठे आहे बघा.

Lol टेस्ट मॅच च्या ५ व्या दिवशीची बॉलिंग चालू आहे. मजा येतेय बघायला. सॅमसन आणि पंतचे ह्यांनी प्रत्येकी ५० करून आउट झाले असते तर आवडले असते. पहिल्या दोन तीन विकेट फेकल्या असे वाटते.

स्वरूप, प्रतिक्रिया जबरदस्त! Happy

त्यातल्या मतितार्थासाठी Sad पूर्ण रिलेट झालं. आज तर माझ्याकडे संपूर्ण पानिपत पहाण्याचं पण धाडस नव्हतं.

आरसीबीने आज जर्सीचा रंग सुध्दा बदलून पाहिला. परंतू निकाल काही बदलता आला नाही.
आज जर्सीचा रंग सुध्दा असा होता की मैदानात पाकिस्तानी खेळाडू वाटत होते. बहुदा त्यामुळे नारायणला जास्त चेव चढला असेल.
पहिल्या ६ ओव्हर मधे नारायण - क्रिस जोडीने आरसीबी बॉलर्सचा खेळखंडोबा केला. १० ओव्हर पर्यंत थांबायला हवे होते मग तर मॅच संपवलीच
पहिल्या मॅच मधे केकेआरच्या बॉलर्सनी पाणी पाजले तर दुसर्‍या मॅच मधे बॅट्समन यांनी.

तीन जागा अजून फिक्स नाही.
पुणे आपले सर्व सामने हरले. तसेच पंजाब हैदराबाद सर्व जिंकले तर पुणे बाहेर जाऊ शकते.

अमला ने दोन वेळा शतक मारले दोन्ही वेळेस पंजाब हारली.
दोन्ही वेळेस अमला ने ६० चेंडू वर १०४ धावा काढल्या आहे त्यात प्रत्येकी ८ चौकार आहे. हा वेगळा योगायोग आहे.
षटकार पहिल्या मॅच मधे ५ आहे तर कालच्या मॅच मधे ६ आहे.

आमलाच्या शतकानंतरही sub-200 स्कोअर होणं अपेक्षित नव्हतं काल.

हैद्राबाद - मुंबई चांगली चाललीये. मला लो-स्कोअरिंग मॅचेस आवडतात. बॉलर्स चा कस लागतो.

पंजाब चारात येणे चमत्कार ठरेल खर तर.

कालची मॅच फारच रटाळ झाली. काल टॉस जिंकण्याला अवास्तव मह्त्व मिळालेले. फायनल इथेच आहे. त्या वेळी तरी टॉस वर अवलंबून असलेली मॅच होउ नये.

पंजाब ने जबरदस्त डिफेंड केले. फक्त १६७ चं टारगेट, कोलकत्याविरुद्ध डिफेंड करणं कौतुकास्पद आहे. गंभीर-उथप्पा आणी नंतर पांडे, लिन, आणी पठाण अशा एकदम क्लस्टर मधे गेलेल्या विकेट्स केकेआर ला महागात पडल्या.

आज डेड रबर! दिल्ली वि. गुजराथ. मागच्या आठवड्यात झालेल्या ह्याच दोन टीम्स च्या मॅच नंतर दिल्ली विषयी खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. 'जो खो गया, मै उसको भुलाता चला गया' झालं असेल डीडी चं.

अगदी अगदी फेफ!

गम और ख़ुशी में फरक ना महसुस हो जहाँ
मैं दिल दिल्ली को उस मुक़ाम में लाता चला गया

"गम और ख़ुशी में फरक ना महसुस हो जहाँ
मैं दिल दिल्ली को उस मुक़ाम में लाता चला गया" - सहमत.

मी तर दिल्ली विषयी फिलॉसॉफिकल बनलोय. ते कसे ईतरांना त्यांचे गोल्स अचिव्ह करायला मदत करताहेत वगैरे. एकदा ही भुमिका घेतली की त्रास कमी होतो (असं दाखवता तरी येतं). Happy

मी तुम्हाला IPL सुरू होण्याअगोदरच सांगितले होते दिल्ली बद्दल. माझी theory अशी आहे कि द्रविड over analyze करतो, त्यात Upton ची जोड आहे. झहिर पण त्यात चपखल बसतो. RR बरोबर पण हेच झाले होते हे आठवा.

Pages