आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रिपल ए, एका न्यूज च्या आधारे एकदम निष्कर्ष मी तरी काढणार नाही. असं काही सिद्ध झालं तर पुढचा प्रश्न आहे. ईतकं सगळं फिक्स करणं ईतकं सोपं नसावं. जुन्या टाईमस्टँप चे ट्वीट्स तयार करणं (खळबळ माजवण्यासाठी) कितपत शक्य आहे?

जुन्या टाईमस्टँप चे ट्वीट्स तयार करणं (खळबळ माजवण्यासाठी) कितपत शक्य आहे? >>> ट्विटरवर शक्य नाही असे वाटते. बाकी स्क्रिन्शॉट काधून त्यात टाईम बदल करुन टाकले जाऊ शकते

Pages