चान्स मारो आजोबा

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 24 January, 2017 - 15:02

आमचे ऑफिस स्टेशनपासून लांब असल्याने बसला पर्याय नाही. त्या परिसरात बरेच ऑफिसेस असल्याने आणि सर्वांच्या वेळा थोड्याफार फरकाने सारख्याच असल्याने बसला बरीच गर्दी असते. अगदी रोजच असते. बस्स तिथेच भेटतात हे. आमचे चान्स मारो आजोबा.

हे ऑफिसला जात नसावेत. पेहरावावरून तरी वाटत नाहीत. बसमधून सकाळी साडेआठ पावणेनऊच्या दरम्यान कुठे प्रभातफेरी मारायला जातात याची कल्पना नाही. पण बसमधील प्रत्येक पोरीबाळींना यांचा आशीर्वाद असतो.

परीसरात दोनचार कॉलेजेसही आहेत. त्यातील विद्यार्थ्यांची बसमध्ये रेलचेल असते. काही छोट्यामोठ्या कंपन्या आहेत जिथे काही फ्रेशर्स म्हणून काही तरुण मुले कामाला आहेत. आम्हाला या कोणाची काहीच भिती वाटत नाही. पण चान्स मारो आजोबांची वाटते. भिती, किळस, की आणखी काही, कल्पना नाही.

हे चान्स मारो आजोबा एकुलते एक नाहीयेतच मुळी. यांची बरीच भावंडे आहेत. हे कधी लग्नसमारंभात आशीर्वाद देताना दिसतात. कधी एखाद्या कार्यक्रमात पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पुढे सरसावतात. तर कधी कुटुंब स्नेहसंमेलनात गालगुच्चे घेण्यापर्यंत यांची माया ओसंडून वाहते.

आजोबांना आज्जींची फार आठवण येत असते. त्यांचे भिरभिरणारे निष्पाप डोळे प्रत्येक मुलीत आज्जींनाच शोधत असतात. पण स्पर्श केल्याशिवाय त्यांचा हा शोध पुर्ण होत नाही. आणि आज्जींना काही मोक्ष मिळत नाही.

पण एक दिवस सांगायचे आहे या आजोबांना. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून. त्यांच्या नजरेत नजर मिळवून. त्यांचा थरथरता हात हातात घेऊन. अगदी खडसावून.... एऽऽऽऽऽ, आता बस्स!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ते तिथल्या कोणाच्या तरी कानावर घालणे राहून गेले, याची बोच वाटत राहते.
>>>>
निनावी फोन करायचा होता संबंधित व्यक्तींना. निदान ज्या कोणाला त्या मुलींची काळजी असेल त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचले तरी असते. मग पुढे यावर विश्वास ठेवा न ठेवा हे त्यांच्यावर सोडा, पण आपल्या मनात खंत राहिली नसती.

अरेरे, गजानन, एक वाईट गोष्ट सारखी होते आहे हे दिसल्यावर काहीतरी करायला हवे होते. पण भावना पोचली.
आशा आहे त्या मुलीलाच लवकर कळले असेल व तिनेच दुर रहायला सुरु केले असेल. कारण ८-९वी पण लहानच वय.

सरळ जाउन त्या आजोबा/ थोराड काकांनाच सांगायचे की असे बरे दिसत नाही. त्यांना बरोबर कळले असते काय ते.

>>> सरळ जाउन त्या आजोबा/ थोराड काकांनाच सांगायचे की असे बरे दिसत नाही. त्यांना बरोबर कळले असते काय ते.>>>> अगदी अगदी....
दुसरे कोण तरी काही तरी करेल हा भरवसा का बाळगावा? मला काय योग्य वाटते ते मीच केले पाहिजे, अस असेल, तर सरळ त्या लंपट व्यक्तिला तुझा लंपटपणा माझ्या नजरेत आलेला आहे, सांभाळून अस असा धमकीवजा इशारा मीच दिला असता. असो. काही खंत मनात कायमस्वरुपी बोच ठेवुन जातात, त्यातलाच हा.

तुम्ही सगळ्यांनी लिहिलेले माझ्याही मनात आले होते, पण ते गृहस्थ त्या ठिकाणी असे काही प्रस्थापित झालेले होते की कोणी कनिष्ठ आणि तुलनेत नवागताने असे घाईघाईत किंवा जाता जाता कोणाकडे उल्लेख करणे म्हणजे निव्वळ धुरळा उठवण्यासारखे होऊन स्वतः तोंडावर पडण्यासारखे होते. त्यामुळे मूळ गोष्ट व्यवस्थित सिद्ध न झाल्याने (ती मुलगी 'तुला असे काही जाणवले का?' असे तिला कोणी विचारले असते तर ती त्या व्यक्तीविरुद्ध काही बोलण्यास अजिबात धजावली नसती, हे माहीत होते,) ते गृहस्थ अजूनच चेकाळले असते. तिथे काहीतरी करणे गरजेचे होते आणि करू शकलो नाही याची खंत वाटते.

लवकरच त्यांची ही कृती माझ्याप्रमाणे आणखी कोणाच्या तरी लक्षात आली असेल आणि त्यांना योग्य ती समज मिळाली असेल अशी आशा.

जीडी, कधी कधी गोष्टी आपल्यापासुन सुरवात होणे हे चांगलं असतं... तु थोडी जरी अ‍ॅक्शन घेतली असतीस तर ति एक ठिणगी सुध्दा होवु शकली असती.. लोकांच्या मनात त्यांच्या वागण्याबद्दल संशय तर आला असताच.. बाकीची बरीच जण नंतरची त्यांच्या या वागण्याला बळी पडली नसती.. त्या मुलीसारखी..

>>> बाकीची बरीच जण नंतरची त्यांच्या या वागण्याला बळी पडली नसती.. त्या मुलीसारखी.. <<< अगदी अगदी... थोडा तरी चाप बसतो.
गजाभाऊ, तुमची अडचण समजु शकते, पण याच अडचणीवर मात करणे आवश्यक होऊन बसते. असो.

गजानन भाऊ, कळली तुमची situation. माझा फुकटचा सल्ला, सीधी उंगलीसे घी निघत नव्हतं ना, मग वात्रटपणा करायचा. निनावी पत्र, फोन कॉल करून त्या डेस्पो माणसाला घाबरवायचं, की तुझी कांडं मला माहिती आहेत, मला तुझ्याकडून पैसे पाहिजेत असंही ठोकून द्यायचं . वाकड्यांशी सरळपणाने वागूच नये.
आमच्यावर एकदा असंच मोठं संकट येत होतं, एक वकील धमक्या देत होता. आम्ही अगदी हतबुद्ध झालो होतो. साधे उपाय सुद्ध सुचत नव्हते आम्हाला. पण मग आमच्या एका वात्रट मित्राने निनावी फोन करून त्या vakilaaची जी वाट लावली, everything got sorted!

आजकाल असले "आजोबा" सोशल मिडीयावर सुध्दा दिसतात. नको तिथे "चोंबडेपणा" करणे हे त्यांच्या रक्तात भिनले आहे. १० वेळा हकलून लावले तरी पुन्हा पुन्हा तिथे जाऊन चोंबडेपणा/ लाळघोटेपणा करण्यात त्यांचा संपुर्ण दिवस जातो. वयाचा मान ठेवून जरी कोणी आदर दिला तर त्याचा फाजिल गैरवापर करतात.
आजुबाजूला बघितल्यावर बरेच जण दिसतात.

अर्चनाजी,
खूप छान केलेत तुम्हि.
जागच्याजागी हिशोब पुर्ण करायची सुरूवात झाली (टाळ्या), सर्वानीच असे वागले पाहिजे .

BTW दिसले का ते आजोबा ?

निलुदा, धन्यवाद.
एकदाच दिसले या आठवड्यात. ते देखील दूरच. माझ्या दिशेने बघायलाच तयार नाहीत. जाणीवपूर्वक माझ्या दिशेला मान वळणार नाही याची काळजी घेतल्यागत उभे होते. Happy

गजानन तुम्ही खरेच काहीतरी करायला हवे होते आणि नाही केलेत काही हे वाचून अर्रर च्च असे माझेही झाले. नकळत्या वयातल्या मुलामुलींचा फायदा उचलणारे षंढ आणखी डोक्यात जातात.

एखादे युग असे ही यावे जिथे पुरुष बायकांच्या नजरेत
मटेरियल,माल असावे.>>>>>जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत हे शक्य नाही.पुरुषांचा सेक्स ड्राईव natural आहे,स्त्रीयांचा instrumental असतो.त्यामुळे हे शक्य नाही.

>>>

बरं झालं हे कबूल केलेत.
कारण जेव्हा स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल धागा निघतो तेव्हा काही स्त्रियांकडून पुरुषांचेही लैंगिक शोषण होत असल्याची एक पोस्ट तरी हमखास पडतेच.
ईथेही एक चान्स मारो आंटी धागा निघाला आहे, तिथेही हा विचार नक्की मांडाल Happy

सिम्बा आपला मुद्दा समजला पण जराही पटला नाही.
अश्यांची पब्लिक फोरम वर लाज काढणे आपल्याला ईतके चुकीचे का वाटत आहे? बरं ओल्याबरोबर सुके जळू नये हा मुद्दा पटला पण पुढच्या पोस्टमध्ये तुम्ही सुक्यांचाच नाही तर ओल्यांचाही उल्लेख करून त्यांच्याशीही असे करू नये म्हटलेय. असे का? याला सहानुभुती नाही तर काय म्हणावे? कुठून येतो हा कमालीचा मानवतावादी दृष्टीकोण..

कारण जेव्हा स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल धागा निघतो तेव्हा काही स्त्रियांकडून पुरुषांचेही लैंगिक शोषण होत असल्याची एक पोस्ट तरी हमखास पडतेच. ईथेही एक चान्स मारो आंटी धागा निघाला आहे >>>

मी काही जशास तसे ह्या बुद्धीने धागा काढलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडछाड हि चिंताजनकच गोष्ट आहे. मी जो अनुभव सांगितला आहे त्यात त्या स्त्रीमुळे मला त्रास असा झाला नाही जितका तुम्हा स्त्रियांना पुरुशांमुळे होतो. त्यामुळे तुलना होऊ शकत नाही. फक्त दुसरी बाजू सुद्धा लक्षात यावी म्हणून मी तो धागा सुरु केला. त्याला फार प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणजे "तसे" अनुभव फारसे कुणाला येत नाहीत. हे खूप बोलके आहे.

म्हणजे "तसे" अनुभव फारसे कुणाला येत नाहीत. हे खूप बोलके आहे. >> सहमत आहे आणि अगदीच हेच म्हणायचे होते. तुमच्या हेतूवर संशय घ्यायचा नव्हता पण जेव्हा एखाद्या समस्येवर चर्चा चालू असते तेव्हा त्या विरुद्ध पण प्रमाण कमी असलेल्या वा अपवादानेच घडत असलेल्या गोष्टीला नेमके तेव्हाच चर्चेत आणू नये असे मला वाटते. जर खरेच ती समस्या असती तर तुम्ही माझ्या आधीच धागा काढला असता, तुम्हाला सहज सुचावे आठवावे तसे आठवले नसते.

त्या विरुद्ध पण प्रमाण कमी असलेल्या वा अपवादानेच घडत असलेल्या गोष्टीला नेमके तेव्हाच चर्चेत आणू नये असे मला वाटते. >>>

असहमत. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत (दुसरी कमी प्रमाणात घडत असली तरी). त्यामुळे तुमच्या अनुभवावरून माझा अनुभव मला आठवला व मी तो मांडला बस्स.

या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत (दुसरी कमी प्रमाणात घडत असली तरी).
>>
जेव्हा समसमान प्रमाणात दोन्ही गोष्टी असतात तेव्हाच एकाच नाण्याच्या दोन बाजू असे म्हणतात Happy
असो, आता आपण हा मुद्दा सोडूया ईथेच

>>>>>>>>> बरं ओल्याबरोबर सुके जळू नये हा मुद्दा पटला पण पुढच्या पोस्टमध्ये तुम्ही सुक्यांचाच नाही तर ओल्यांचाही उल्लेख करून त्यांच्याशीही असे करू नये म्हटलेय. असे का? याला सहानुभुती नाही तर काय म्हणावे? कुठून येतो हा कमालीचा मानवतावादी दृष्टीकोण..>>>>>>>>

मी या BB वर लिहिणार नव्हतो, पण माझ्या पोस्ट चा 180 अंशात उलट अर्थ काढल्या मुळे फक्त जुने प्रतिसाद कॉपी पेस्ट करत आहे
1) उत्साहाच्या भरात सुक्या बरोबर ओले जळू नये इतकीच इच्छा>>>
(या ओरिजिनल म्हणी प्रमाणे "ओले " म्हणजे त्या त्या प्रकरणी निर्दोष असणारे लोक)
2) ओले कसे जळते हे त्या आधी 2 उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे,
दोन्ही गोष्टीत मुले निर्दोष होती,
3) आणि या ओल्या मध्ये तुमचा भाऊ, मुलगा, नवरा कोणीही असु शकतो,
सो मी थ्रू आउट "ओले" उर्फ गैरसमजातून/ मुद्दामहून शिकार झालेल्या पुरुषांबद्दल बोलत आहे हे स्पष्ट व्हावे. अधिक स्पष्ट प्रतिसाद ऋन्मेष च्या विपु मध्ये दिला आहे, त्याने काढून टाकला नसेल तर असेल तिकडे अजून.
धन्यवाद,

चांगलाच धडा शिकवला कि हो तुम्ही. या अपडेटबद्दल धन्यवाद. आजोबा पुरते नामोहरम झालेले दिसताहेत. तेच म्हटलं हल्ली धागे का येत नाहीत रोजच्यासारखे !
त्यांना म्हणजे अगदी असं झालं असेल .... " आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी "

चला आता भेंड्या खेळू.. काय?
मी करतो सुरुवात
काल रातिला सपान पडलं
सपनात आला हरिमाणे न मी गडबडले !

{{{ पन्नाशी पुढचे सगळेच काका व आजोबा बुबुक्षीत असतात,एक वेळ तरुण मुले नजर खाली घालतील पण हे थेरडे वयाचा फायदा उठवून चान्स मारतात.
एक साठीचे आजोबा मला लायब्ररीत भेटायचे.आम्हा तरुणांच्या ग्रुपमध्ये येऊन बसायचे,आधी इकड तिकडच्या गप्पा मारयचे.एकदा आम्हाला प्रश्न विचारला त्यांनी,तुम्ही सेक्स केला आहे का? फारच मजा वगैरे असते त्यामध्ये (तेव्हा आम्ही २०,२२ वर्षाचे होतो).नंतर म्हणाले तरुण मुली बघितल्या की आम्हालाही "घ्याव्या" वाटतात.बायको म्हातारी झाल्यावर तिच्यात मजा नसते वगैरे.
या म्हातर्याच्या रोजच्या गप्पा ऐकुण हे कीति तुंबलेलं गटार आहे हे लक्षात आल्यावर आम्हीच मग कट्टा बदलला.
@ अर्चना ,असले म्हातारे अंगचटीला आल्यास फाडकण्ण् कानाखाली ठेऊन द्या ,सांगुण ऐकणार्यातले नसतात हे sex maniac.
Submitted by सिंथेटिक जिनियस on 25 January, 2017 - 20:12 }}}

किती ते हुच्च विचार! बोल्ड केलेल्या विधानातील सरसकटीकरणाबद्दल तीव्र निषेध. तरीही या विधानाबद्दल सिंथेटिक जिनियस ठाम असल्यास आशा आहे की, त्यांना पन्नाशी ओलांडलेले पुरुष नातेवाईक - भाऊ, वडील, काका, आजोबा इत्यादी नसतील किंवा ती गाठण्याआधीच हे जग सोड़ून गेलेले असतील किंवा निदान जावेत तरी. स्वतः सिंथेटिक जिनियस यांनीही पन्नाशी आधीच जग सोडून जावे अन्यथा स्वतःच स्वतःला लावलेले लांच्छनास्पद विशेषण मिरवित जगणे जास्तच नामुष्कीचे असेल, नाही का?

अवांतरः- स्वतःच्या http://www.maayboli.com/node/61630 या धाग्यात ते परस्त्रीविषयी कसले भलतेसलते विचार मनाशी बाळगून आहेत तेही केवळ तिशीत असताना तर पन्नाशी गाठेस्तोवर ते समाजाकरिता किती धोकादायक बनतील याची कल्पनाही करवत नाही.

अशा सगळ्या प्रकारांमुळेच मला बाहेर पडल्यावर स्त्रियांची फार वाटते. चुकून धक्का लागला आणि आपल्यावर बालंट आले तर काय करा ? म्हणून शक्यतो मी स्त्रियांपासून लांब चार हात लांब राहतो. शक्य असेल तेव्हा समोरुन स्त्री आली की अंग चोरुन घेतो आणि नजर खाली घेतो. शेअर ऑटोमधे पण मागे स्त्रिया बसल्या असतील तर शक्यतो ती ऑटो सोडून देतो किंवा ड्रायव्हरच्या बाजूला बसून प्रवास करतो. स्त्रियांना सिक्स्थ सेन्स असतो असे म्हणतात पण एखादीचा सेन्सर खराब झाला असेल तर कशाल उगाच रिस्क घ्या.

राजधर्म, अगदी अगदी... रिक्षात मुलींच्या बाजूला वा मध्ये बसणे टेंशनच असते.
मागे हा अनुभव ईथे लिहिलेला. जरूर वाचा. फार रिलेट होईल

काल एका मुलीने माझा फोटो काढला.
https://www.maayboli.com/node/69985

* पन्नाशी पुढचे सगळेच काका व आजोबा बुबुक्षीत असतात,एक वेळ तरुण मुले नजर खाली घालतील पण हे थेरडे वयाचा फायदा उठवून चान्स मारतात.* - या विधानावर कुणीही आक्षेप किंवा मतभेद नोंदवला नाहीं, हेंही मला भयावह वाटतं ! मीं , माझे अनेक समवयस्क मित्र व नातेवाईक ( तसेच इथल्याही बर्याच जणांचे पन्नाशीच्या पुढचे नातेवाईक ) ह्या निंदनीय वर्गात मोडत नाहित , हे नक्की.

त्यात भयावह काय आहे? कोणी हे विधान केलेले आहे ते पहायचे व आपली उर्जा वाचवायची. प्रत्येकाच्या तोंडी लागत बसलो तर इथे रिकामटेकडे, ड्यु आयडीज खूप आहेत.

Pages