स्फुट ४१ - शेगांवचे महाराज

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2017 - 09:08

महाराज,

काल तुमचे मुखदर्शन करताना
जिवंत होत्या
माझ्यातील वासना, अपेक्षा, स्वार्थ

महाराज,

तुमच्या मुखदर्शनाला रांग
प्रत्यक्ष दर्शनाला झुंबड
आतमध्ये कुठेतरी तुम्ही
गुदमरलेले
भीतीने थिजलेले

महाराज,
त्या अद्ययावत सुविधा
कंप्यूटराईझ्ड पावत्या
सीसी टीव्ही
गणवेषातील कर्मचारी
ती शिस्त, भक्तीतून आलेली
सगळेच गजब

महाराज,
तो विठ्ठलनामाचा गजर
ते पारायण करणारे
२१ अध्याय पाठ असणारे
घोडा, गाय, ऊस, विहीर, मधमाश्या
सगळी प्रतीके मुखोद्गत असणारे

महाराज,
ते सेल्फि काढणारे
ते तोकड्या कपड्यात आलेले
ते हजारोंच्या पावत्या फाडणारे
कार्ड स्वाईप करणारे
'जुन्या नोटा चालणार नाहीत' ह्या पाट्या वाचणारे

महाराज,
ते मठाबाहेरचे भिकारी
तुमचे फोटो विकणारे
रस्त्यात पहुडलेली कुत्री
शेगावच्या कचोर्‍यांची असंख्य अस्वच्छ दुकाने

महाराज,
ती खोळंबलेली वाहतुक
हॉर्न्सचा कलकलाट
मठाबाहेरचे त्या अत्यवस्थ यंत्रणा

महाराज,
ती गलिच्छ गटारे
त्यात लोळणारी डुकरे
तिथेच असलेली उपाहारगृहे

महाराज,
तुम्हाला आता
कोणीही बाहेर काढू शकत नाही
आता तुम्ही झालात बद्ध
एक कमोडिटी झालात तुम्ही आता
साधी चिलीम मिळेना तुम्हाला
मोठ्या उष्ट्या पत्रावळी खाऊन भक्त जमवलेत
घ्या!
घ्या हे भक्त!
गण गण गणात बोते म्हणणारे

महाराज,
हे आहेत तुम्हाला अटक करणारे
हेच आहेत
जे तुम्हाला स्थानबद्ध करून
तुमचाच गौरव करत
तुमच्याच माहात्म्यावर पैसे मिळवणारे
किंवा मिळवू पाहणारे

महाराज,
लखलाभ तुम्हाला तुमचे शेगांव!
मी आत्ता बिडी मारत
कीव करत आहे तुमच्या अवस्थेची
आणि हसत आहे
तुम्हाला असलेली स्पर्धा बघून
साईबाबा, समर्थ ह्या सगळ्यांशी

महाराज,
मला रडू येते आहे
माझ्या आई आणि मावशीने
जन्मभर तुम्हाला भजले ह्यामुळे

महाराज,
दृष्टांत, प्रचीती, काही नको
फक्त
तिथून बाहेर पडून दाखवा!
===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ठरलं मग?
बेफिकीर उठसूट पुण्याबाहेर जाऊन,
जनतेशी भेटून, फर्स्ट हॅन्ड का काय ते लिहितात ते पण हे असंच चष्म्यातून बघितलेलं असतं का?

http://www.gajananmaharaj.org/final%20marathi%20site/notice.htm
गजानन महाराज संस्थान स्वतः लोकांना असल्या प्रकारांबद्दल सतर्क राहण्यांस सांगत आहे:
सूचना :-

भक्तांना नम्र निवेदन

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव कडून श्रीं च्या नांवाने असलेली मंदिरे, संस्था, मंडळ व भक्तांना नम्र सूचित करण्यात येते की, संस्थानचे ध्येय उद्देश सामान्य जनते समोर विदित करीत आहोत
संस्थान पैसा व प्रसिद्धीकरिता आटापीटा करीत नाही. आपआपल्या धर्माप्रती व श्रीं वर असलेल्या श्रद्धेला, भावनेला तडा जाऊ नये व मानवतेची सेवा घडावी हाच उद्देश.

श्रद्धा, भक्ती व विश्वास ठेवण्यास पैसा लागत नाही. सुविधा व व्यवहाराकरिता पैसा लागतो, तो ही आवश्यक तितका. या उद्देशानुसार सर्व ठिकाणी सेवाभावनेतून सेवा सर्वांकडून घडून येत आहे. याच भक्तिभाव तत्त्वानुसार पुढेही सेवाकार्य घडावे हाच उद्देश ठेवून सर्वांनी सेवा देत रहावी. निदान श्रींच्या नावाने स्वार्थरहित सेवा होत असेल तेथे योगदान, सहयोग देत रहावा. इतरत्र मात्र सतर्क राहावे.

वरील संस्थेचा उद्देश लक्षात न घेता श्रींच्या नावाने मंदिरे, मंडळ, संस्था स्थापिल्या जातात. घरोघरी मंदिरे झाल्यास चालतील परंतु कर्तव्य व हेतू हा शुद्ध असावयास पाहिजे. याचकरिता भक्तांनी सखोल चौकशी करून आपल्या श्रद्धा, विश्वासाला तडा न जाता मदत करण्याचा योग्य तो निर्णय घ्यावा. बोर्ड, बॅनर, प्रसिद्धी पत्रकात भावनिक बोलून प्रसिद्धी करणे अशा बाह्य प्रलोभनावर अजिबात विश्वास ठेऊ नये. डोळसपणे अवलोकन करावे व नंतरच काय ते ठरवावे. अशी आपण दक्षता न घेतल्यास वा वरील उद्देशापैकी चालकांनी काही विपरीत केल्यास भावनेला धक्का बसेल व दोष शेगांव संस्थेवरही येण्याची शक्यता आहे. तो येऊ नये म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी. असा विषवृक्ष फैलू नये म्हणून अशा सर्व बाबीं पासून सर्वांनीच सावध असावे.

बाह्य सर्व परिस्थिती ही आपली संस्कृती, धर्मभावना यावर आघात करणारी दिसते आहे. धर्म, श्रध्दा, कर्तव्य न जोपासता पैसा व प्रसिध्दीकरीता बुध्दीचे चातुर्य, विधायक दृष्टिकोन न ठेवता चतुराई करून स्वस्वार्थाकरिता, फसवेगिरी करतानाच दिसत आहे, असे दिसते आहे. दृढ भावना स्थिर व बुद्धी अस्थिर आहे म्हणून सद्बुध्दी सतत जागृत राहावी. त्याकरिता संतांनी दिलेल्या ग्रंथरूपी मार्गदर्शनावरच आपले जीवन व्यापक करावे हीच आज भारताची व आपली आवश्यकता झाली आहे. धर्म हा भारताचा प्राण आहे. या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्याच्या पाठिशी एकमताने रहावे.

भक्तांकरीता वेळोवेळी संस्थानकडून फसगत होऊ नये म्हणून सूचित केले जाते. कोठे गैर कांही आढळल्या संस्थेशी संपर्क साधावा.

http://www.gajananmaharaj.org/final%20marathi%20site/seva.htm

हे तर नक्कीच वाचा :

सेवाधारी विभाग

श्री गजानन महाराज संस्थानव्दारे विविध ४२ प्रकारचे सेवाकार्य सुचारू रूपाने राबविण्यात येतात. या सेवाकार्यामध्ये कार्यरत असणारा सेवक वर्ग हा सेवेला आपला जीवनधर्म मानूनच कार्य करतो. या सर्व कार्याचा प्राण म्हणजे सेवावृत्तीने कार्यरत असलेले हजारो हात. केवळ भक्तिभावाने काम करणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता कार्यरत असणारे हजारो सेवेकरी इथे कार्यरत असतात. यात महिलांचाही समावेश असतो. संस्थानच्या सर्व विभागातील लहान-मोठी सर्व कामे हा सेवेकरी वर्गच पार पाडतो. यासाठी एक सक्षम व्यवस्था उभी केलेली आहे. वेगवेगळ्या गावांतून हे सेवकरी येतात. त्यांचे गट केलेले असतात व सेवा ठरलेली असते . मंदिर परिसरात आढळणाऱ्या कमालीच्या स्वच्छतेचे सर्व श्रेय सेवेकऱ्यांनाच द्यावे लागते.

मोबदला मिळतोय म्हणून सेवा करण्याची कुणाचीही भावना नाही. या सेवेकऱ्यांचे वर्णन संतांच्या वाणीत करता येईल. ‘‘भूक भाकरीची, छाया झोपडीची, निवाऱ्यास द्यावी ऊब गोधडीची, मायामोह सारे उगाळून प्यालो, मागणे न काही मागण्यास आलो......‘‘

‘‘पैशाबरोबर अधिकार येतो, कर्तव्याचा मात्र विसर, सेवेत कर्तव्याचे पालन होवून उत्कर्ष होतो, याचा अर्थ या सेवेकऱ्यांकडून उमजतो.‘‘

http://www.gajananmaharaj.org/final%20marathi%20site/donation.htm

थोडी अजून माहिति:

२४ तास कार्यरत असणाऱ्या याा विभागात भक्तांमार्फत स्वेच्छेने दिली जाणारी देणगी स्विकारली जाते. देणगीदारांना संस्थानतर्फे देणगीचा एक दशांश भाग प्रसादरूपाने परत दिला जातो. ह्या प्रसादात लाडू, शाल, उपरणे किंवा/ व ब्लाऊज पीस, साडी, कपडे यांचा समावेश असतो. दानपेटीमध्ये प्राप्त झालेल्या सोने, चांदी वस्तुच्या पादुका तयार करून भक्तांना प्रसादरूपाने दिल्या जातात. संस्थेस येणारी देणगी आयकर अधिनियम १९६१ कलम ८० जी अन्वेय कर सवलतीस पात्र आहे . चेक, ड्राफ्ट व स्वाईप द्वारे देणगी स्विकारल्या जाते. विदेशी चलनामध्ये सुध्दा देणगी स्विकारण्याची व्यवस्था आहे, देणगी म्हणून आलेल्या वस्त्रांची व कोणत्याही वस्तुची विक्री किंवा लिलाव केला जात नाही.

In my humble opinion, one should not go to temples or any places of worship just for darshan or to ask/prey/beg of worldly pleasures from the almighty as you rightly said most of them have become a commodity. But still Gajanan Maharaj Sansthan is a league apart from others.

Gajanan Maharaj and other contemporaries (like Sai Baba) were human beings who reached the highest state of awareness known as Superconsciousness.

<अवांतर मोड ऑन> - Superconsciousness is that level of awareness that we experience when our mind is in a calm and uplifted state. It is the hidden mechanism at work behind intuition, spiritual and physical healing, and successful problem solving. <अवांतर मोड ऑफ>

परत मुद्द्यावरः
Every human being has the capacity to achieve the above mentioned highest state of awareness by actively practicing meditation. And the purpose of visiting places like Shegaon should be to accelerate your journey towards self realization in the presence of their mortal remains.

फक्त समाधी चे दर्शन घ्यायला जाण्यापेक्षा घरी एक फोटो आणून ठेवावा. मन चंगा तो कठौते में गंगा ...
ओम ऽ ऽ ऽ

माझे दोन शब्द....
वरची कविता असली तर नाही पटली. अनुभव असेल तर तो थोडा चुकिचा वटतो असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
"..गुदमरलेले...भीतीने थिजलेले...' हा आपला अनुभव असु शकतो....माझा तरी नाही.
"...ती शिस्त, भक्तीतून आलेली.." माझ्या मते शिस्त वेगळी व भक्ती वेगळी. शिस्त ही भक्तांन्ना दर्शनसुख लाभावे ह्यासाठी आहे, आणी किमान शेगांवची शिस्त खरच उत्तम आहे असे मला वाटते.
"...शेगावच्या कचोर्‍यांची असंख्य अस्वच्छ दुकाने..." हे थोडे वास्तव आहे पण हे बाह्य स्वरूपबाबत आहे. शेवटी शेगांव अजूनही गांव आहे.
"..मठाबाहेरचे त्या अत्यवस्थ यंत्रणा.." हो...ईश्वर ह्यांन्ना सत् बुद्धी देवो!
"... तुम्हाला अटक करणारे.." हे खटकले.

इथे येणारे बव्हंशी भाविक हे खेड्यापड्यातून येणारे आहेत; इतर ठिकाणी येणार्‍या पंचतारांकित भक्तांसारखे नाहीत. त्यामुळे संस्थान साधेपणाने पण शिस्तित कारभार पाह्ते व इतरही बरीच चांगली सामाजीक कार्ये करते.

"... विक्रम पंडीत यांनी ७० कोटी रुपयाची देणगी दीली आहे खेड्यापाड्यात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी. इतके पैसे त्यांनी देवस्थान काम कसे करते त्याचा अभास करुनच दिले असणार...." असा उल्लेख टोचाजींच्या प्रतिसादात आहे त्याबद्दल...माझ्या माहितीप्रमाणे श्री. विक्रम पंडीत यांनी ह्यपेक्षा कितितरी ज्यास्त रक्कम देउ केली होती पण संस्थानाने त्यांच्या आराखड्याप्रमाणे ७० कोटी रुपयाची देणगी स्विकारली व उर्वरीत रकमेस नम्र नकार दिला.

संस्थानाने शासनाला मंदिराच्या आजुबाजूच्या परिसरच्या विकासाबद्दल भरिव सहकर्य केले. हा विकास शासन अखत्यारित असल्याने तिथेशासनाकडून नेहेमिप्रमाणे 'श्रेय' मिळेल त्या प्रमणात व त्या गतिने (मंद का होइना) विकास चालू आहे.

आलेले प्रतिसाद वाचून

'बेफिकीर,
गजला, स्फुटे काही नको,
फक्त
प्रतिसादांमधून बाहेर पडून दाखवा'

असे त्यांच्याच चालीवर म्हणावेसे वाटले. Happy

शेगांव संस्थानबाबत वरील स्फुट म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार वाटला. कृपया आधी अनुभव घ्यावा मग बोलावे, आपण चुकीची माहिती प्रसारित तर करत नाही ना हे बघावे.संपुर्ण भारतात तुम्हाला एवढं पारदर्शी व्यवहार असलेलं संस्थान सापडणार नाही.

शेगांव संस्थाना वर ठपका मग बाकीचे काही बोलणे नकोच ... संपुर्ण भारतात एवढं पारदर्शी व्यवहार असलेलं संस्थान सापडणार नाही.

Pages