निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मोगरा जुन्या माठात लावला आहे. पण लावताना तो खुप वरवर लावला गेल्यामुळे त्यांची मुळे मातीच्या वर दिसतात. पण यावर्षी या मोगऱ्याला खूप फुलं आली आणि आता बहर ओसरला आहे. तर हे झाड परत वेगळ्या कुंडीत लावता येईल का? कारण आहे त्या माठात आता वरून माती टाकायला पण जागा नाही. आणि तो वेळ आहे. त्यामुळे फांदया खूप वेड्यावाकड्या वाढल्या आहेत. आश्चर्य म्हणजे याला खूप फुलं येत असताना पानं मात्र खूप गळाली.
एक वर्षांपूर्वी मी कुंद पण लावला आहे त्याला ना फुलं येतात ना झाड वाढते. माझ्याकडच्या डबल jaswandala पण वर्षातून एक दोनच फुलं येतात. मला सांगाल का हे कश्यामुळे होते आणि भरपूर फुलं येण्यासाठी काय करू?

सारेग भरपूर फुले येण्यासाठी आधी त्या झाडाची व्यवस्थित वाढ झाली पाहीजे. त्यासाठी त्याला योग्य उन, खत, पाणी मिळायला हवे.
मोगरा परत काढून लावता येईल. जगतो तो लगेच.

सारेग - तुम्ही मोगरा दुसर्‍या कुंडीत लावायला काहीच हरकत नाही.

तुमच्या जवळपास शेणखत किंवा गांडूळखत मिळत असेल तर ते घाला.
घरातील फळांची साले, निवडून टाकलेल्या भाज्यांचा कचरा तुम्ही थोडी कुंडीतील माती उकरून त्यात घालून त्यावर पुन्हा माती टाकू शकता.
मासे खात असाल तर धुतलेल्या माश्यांचे पाणी घाला. भिजत घातलेल्या कडधान्याचे पाणीही घालू शकता.

होला

सध्या चायनात आहे. हे छोट्टुसं फळ इथेच भेटले कालपरवा. किंचित मेलन सारख्या सुवासाचे ,माईल्डली स्वीट्,लहानशा ,पोकळ बिया..मऊ गर. सालासकट खाता येते. खूप चविष्ट..

https://goo.gl/photos/NpcN6tnHrGTxpcMH6

आपल्याकडे खूप पूर्वी खरबुजाची ग्रीन वरायटी मिळे..आता मात्र अजिबात दिसत नाही मला ती.

जागू, मस्त फोटो. Happy
लहानपणी शाळेत हार करून न्यावे लागत. तेव्हा आम्ही चाफ्याची फुलं आणून हार करायचो. ती आठवण झाली. Happy

रेणू मायबोलीवरून डायरेक्टही देता येतात साइझ कमी करुन पण ते बहुतेक कालांतराने गायब होतात. पिकासा आणि फ्लिकर वरून देता येतात.

सुप्रभात.
मागील महीन्यात माझ्याकडे फुललेला अडेनिअम

सगळेच प्रचि मास्त..
जागू, कृती दिली ते बरच केलं..
मी आज १०० रुपयाची आवभर जांभळ घेतली... देवा.. किती महागं.. रानमेवा महागतोय आता.. आठवणीने बिया जमवून ठेवल्या.. आता रुजवून तेवढालीच जांभळ लगडतात का नाही ते पाहायच आहे मला...

आता रुजवून तेवढालीच जांभळ लगडतात का नाही ते पाहायच आहे मला...+++ टीना, एक बीजी फळा ला कलम करावी लागते.. तसच्या तस फळ नाही मिळत..
आंबा, जांभुळ वगैरे.. बहुबीजी जस की सीताफळ याला कलम न करता ही तशीच फळे येतात.

शोभा पिवळी अबोली नाही का दिसली ?>>>>>>>>.अग, अबोली आहे का ती? मला वेगळीच वाटली. Happy
त्या २ नंबरच्या फ़ोटोत काय नारळ मोजणी चालू आहे का? Happy

माझ्या पेट्रियाला फुटलेले धुमारे कुणीतरी तोडले... अक्षरशः चार पाने दांडीसकट तोडली..
त्या मेल्या मुडद्या मांजरींच्च काम असणार.. पागलासारख्या भांडतात त्या रात्रीला आणि नेमक्या माझ्या कॉरिडॉरमधे.. इतर कुणि असं करणार नाही याची खात्री आहे मला.. खुप च्च च्च होतयं.. परत पाने कधी येतील आणि कुठून? शेंडाच तोडला ना त्याचा Sad

हाय निगकर्स
कसे आहात? फोटो देणं खरंच अवघड झाल्याने इथे कमी येणं होतंय.
संपूर्ण उन्हाळाभर गच्चीच्या कठड्यावर मातीच्या दोन पसरट तोंडाच्या कुंड्या पाण्याने भरून ठेवत होते. अजूनही ठेवते. पण आता २/३ पाऊस छान झाले इथे. तरीही.
अंगण्यातल्या कडुलिंबावर तसेही खूप पक्षी रहातात, ये जा करत असतात. आता हे गच्चीत ठेवलेलं पाणी प्यायला खूप पक्षी येतात. कावळे (चिमण्या एकंदरीतच कमी दिसतात परिसरात), साळुंख्या, कबुतरं, ब्राम्हणी मैना आणि कित्येक.
एक गोष्ट म्हणजे याच गच्चीच्या कठड्यावरून अंगणातल्या पुरातन कडुलिंबाच्या फांद्या गच्चीत अलगद उतरल्या आहेत. अगदी आपल्या सुगंधित मोहरासकट, हिरव्या पिवळ्या लिंबोळ्यांच्या लकटत्या झुंबरांसकट!
मी रोज सकाळी या दोन्ही कुंड्यात भर टाकायला गच्चीत जाते. छान वाटायचं इतके पक्षी पाणी पितात ते बघून.....अर्थातच ते खालूनच बघायचं. नंतर कधी तरी बुलबुलांचा कलकलाट ऐकू यायला लागला. वर बघितलं तर अगदी रागावलेले बुलबुल काही तरी बडबडत वर खूप जोरजोरात पण एका ठराविक परिघात इकडे तिकडे उडत होते. सगळ्यांचा रोख दिसत होता.......खाली गच्चीच्या फरशीवर.
त्यानंतर एकदा कावळे सुद्धा असेच रागावून कलकलाट करत घिरट्या घालत होते............हे सर्व त्या गच्चीतल्या पाण्याच्या कुंड्यांच्या आसपास. म्हणून एकदा बुलबुलांचा कोलाहल ऐकू आला म्हणून भराभर गच्चीत गेले तर .......
तर एक सौंदर्यवती गोरी भुरकी(आपली मनी हो.....!) कठड्यावर ठेवलेल्या पाण्याच्या कुंडीच्या खालीच फरशीवर दबा धरून बसलेली. पाळीव नसूनही मी गेल्यावर आज्जिबात घाबरली नाही. माझ्याकडे बेरक्यासारखी नजर लावून बघत राहिली.
आपण या कडक उन्हाळ्यात त्या बिचार्‍या चिमण्या पाखरांना पाणी ठेवून त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करतो आणि ही मांजर..................... आधी इतका राग आला म्हणून सांगू तिचा, पण नंतर वाटलं .................जीवो जीवस्य जीवनम! Survival of the fittest! पहा ती मांजर बरोब्बर कशी आपल्या खाद्याजवळ दबा धरून बसलेली!
ते काहीही असो पण आता ती बया (खरं म्हणजे मला मांजरं प्रचंड आवडतात बरं!) रोज सकाळी तिथेच पाण्याच्या कुंडीच्या जवळ खाली फरशीवर मुक्काम ठोकून असते आणि पक्षीही आपोआपच कमी झालेत यायचे.

खरं म्हणजे मला मांजरं प्रचंड आवडतात बरं!>> मी आवडून घेते.. साधना आणि शांकलीच्या गप्पांमुळे त्या मला आवडायला लागल्या पण आपले आकु सगळ्यात वर.. मांजरी कधीच माझ्या भूभू प्रेमाला कमी करु शकणार नाही..

छान काम करतेयस मानुषी... मी या उन्हाळ्यात इकडून तिकडे उड्याच मारत राहिली म्हणुन कुठलेच बेत माझे पूर्णत्वास गेले नाही.. बाकी वरच्या मी लिहिलेल्या किस्स्यावरून मला अजुनच राग यायला लागला मांजरीचा.. माझ पेट्रिआ Sad भ्याSSSSSSSSSS

मला सगळेच प्राणी आवडतात गं! पेट्रिया हा तुझा भुभु का? (होता?)>>> ए अगं ए... वाच तर मी तुझ्या प्रतिसादाआधी दिलेला प्रतिसाद Lol Proud
पेट्रिआ वोल्युबिलीस ची वेल माझी गो..

आत्ता वाचली गं !
हाहाहाहाहाहा(!!!!) असेल असेल...........एवढं अवघड नाव पहिल्यांदाच वेलीचं ऐकतेय!
सकाळी गडबडीत पोस्ट टाकली आणि पळाले!

Pages