निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, "तिळा, तिळा दार उघड". म्हणतच फोटो बघीतले. दिसले दिसले. छान फोटो. रंगित राजमा सुंदर!
गौरी, मस्त फोटो.
रविवारी निसर्ग भेटीला जात असशील तर, मला ही हाक मारत जा. मी पण येईन. Happy

मला सांगा, :
आमच्या मोगर्‍याचा बहर संपला. आता एखाद दुसरी कळी दिसते. जर त्याच्या फांद्या, आता तोडून दुसरीकडे लावल्या तर जगतील का? की हे काम पावसाळ्यातच करायला हवं?

राजमा मस्तच वर्षू..

गौरी Sad

शोभा१, आत्ता जराशी कटींग केली तर आणखी एक बहार येईल..
फांद्या मात्र पावसातच रुजतील Happy

रेणू, माझा लेटेस्ट क्रश आहे पेट्रिया Wink
सगळेच फोटो मस्त..

अर्रे व्वा.. सगळ्यांना दिसला राजमा. गौरी, इकडले पांढरे राजमा चवीला अप्रतिम आहेत..आता तर लाल नकोसे वाटतात आम्हाला कारण ते थोडे ड्राईश लागतात.
रेणु अप्रतिम बहार आहे

हे हिमाचल प्रदेश चे स्टेट फ्लॉवर. लोकल भाषेत ब्रास नाव आहे. ११,१२००० फूट उंचावर असलेल्या जंगलात आढळून येतात. उंचावर राहणारे स्थानिक जंगलांतून फिरत, कठीण उतार, अवघड चढाव चढत ही फुले गोळा करतात.मग ती उन्हात सुकवून त्यापासून जूस बनवणार्‍या निर्मात्यांना विकतात. येथील एक्स्ट्रीम वेदर कंडीशन्स मुळे जास्त काही उगत नाही. पोटापुरते धान्य ,गहू, बटाटे , मटर इ. घरच्या शेतीत पिकवतात. तांदूळ मात्र त्यांना बाहेरून विकत घ्यावा लागतो.
हे फोटो चेत गावाचे आहेत. परवाच इथे भेट दिली. अवघ्या पंचवीस घरं असलेलं हे इटुकलं खेडं आहे.

https://goo.gl/photos/9tYu8HuBKVU9jP1n9

मस्तच गं वर्षू..
ते फुल मला पण गुलाब कम कार्नेशन सारखं वाटलं..

राजमाच्या व्हरायटी एकदम इंटरेस्टिंग दिसतायत.

पेट्रिया काय भरभरुन फुललाय : जेलस बाहुली:

टीना गोव्याला जाउन , तेही समुद्र किनारी , पक्ष्यांचे फोटो! मासे, कालवं, चिंबोरी, सुके मासे, शिंपले काहीच सापडलं नाही का Happy

टीना गोव्याला जाउन , तेही समुद्र किनारी , पक्ष्यांचे फोटो! मासे, कालवं, चिंबोरी, सुके मासे, शिंपले काहीच सापडलं नाही का >> नाही ना गं...
खुप सारे झाड, पक्षी, बारके खेकडे वगैरे पाहिले मात्र..
मला कुणीतरी घाबरवून दिलेलं कि तिथं चहा भेटला नाही त्यांना.. मी जाम टेन्शन मधे होती पण मी जिथे राहायला होती त्या जवळील एका हाटीलात असला चुम्मा चहा मिळाला मला. हॉटेल गुडलक (तेच ते फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच) मधल्या चहाच्या आसपास जाणारी चव होती.. त्यापेक्षा जरा चांगलीच होती म्हणा हव तर.. चहा आहे म्हटल्या म्हटल्या असल गहिवरुन आलेलं मला.. डोळ्यातून आसु ओघळायचे उरलेले फक्त..

Proud

काही दिवसांपूर्वी माझ्या कुंडीतल हे फुलझाड कॅमेरात कॅप्चर केल.. ऑऊट ऑफ फोकस असलेल चुकुन फोकस झालं Lol
हे बघा.. याच नाव नाही माहिती मला..

माझं पेट्रिया बहोतच हळू दिसतय यार.. बघा ना महिने होऊन गेले अजुनही आम्ही जैसे थे चार पानात आणि दोन धुमार्‍यातच आहे Sad
.

मागचं काही न्याहाळून बघाताना हा चाफा दिसला... हेच ते झाड ज्याची काडी आम्ही आणुन लावली पण त्याची फुलं मात्र देवचाफ्याची पांढरी अन आत पिवळी छटा असलेली येतात..
.

पिटुकली पांढरी शुभ्र फुलं छान दिसतायत. Happy
चाफा ही हल्ली फार बहरलाय सगळीकडे पांढरी, लाल, मस्त रंग . दोन्ही झाडे जवळ जवळ असतील, तर अजूनच सुंदर दिसतात. Happy

बाकी सगळे काय फिरायला गेले का? Uhoh

Pages