सदाबहार रसदार अंगूर

Submitted by निनाद on 2 November, 2015 - 19:27

देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीचा अंगुर हा चित्रपट.
गुलजार यांचे सदाबहार आणि चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान.
संवाद आणि घडामोडी यांचे पंचेस इतके सुरेख विणलेला हा चित्रपट आहे.

पण तेव्हढेच नाही तर त्या संवादास पूरक ठरतील अशी अगदी नेटकी बेतलेली पात्रे. त्या पात्रांचे नितांत सुंदर त्या त्या भूमीकेला न्याय देणे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणून देवेन वर्मा यांना फिल्मफेयर मिळाले होते. पण माझ्या मते हे सर्व टीमला मिळाले असते तरी चालले असते इतका छान हा चित्रपट जमून आला होता.

या चित्रपटाच्या पंख्यांना चर्चा करायला, काय आवडले होते अशा आठवणी जागवायला हा धागा.

(हा लेख नाही, त्यामुळे मी सहेतुक जास्त लिखाण केले नाही, ते सर्वांच्या प्रतिसादांतून येईलच अशी आशा आहे.)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"रस्सी चाहिये"
"कपडे सुखाने के लिये क्या?"
"नही खुदखुशी करनी है"
"ठिक है फिर ये ले जाओ, जादातर लोग यही वापरते है"

>>संजीव उद्गारतो, "तुम्हारे ? फ़िर तुम्हारे दिदी के पैर कहां है ?" दोघांचा संवाद ऐकणारी मौशुमी मात्र पत्त्यात मश्गुल.

सं : तुम्हारे ? फ़िर दिदी के पैर कहां है ?
दि. : बिबी कहिये, दिदि वो मेरी हैं

तसेच एकदा खरा घरातला बहादूर येतो घरात, त्याला मौसमी विचारते, जिजाजी कहाँ हैं ?
तो गोंधळून विचारतो, किसके जिजाजी ? कारण जिजाजी फक्त दिप्ती म्हणत असते.
मग मौसमीला पण लक्षात येते आणि ती म्हणते "साहब कहाँ हैं ?"
त्या वेळचे दोघांचे एक्स्प्रेशन्स अगदी सहज आहेत.

मजा आली हा धागा परत वर काढून वाचून.आता अंगूर परत बघायला हवा.प्राईम वर आहे.
बाळं पाहिल्यावर उत्पल दत्त किती वेळा उफ करतो हे मोजून सांगा.
"एक बात बता, आदमी मरते टाईम आठ आने बचाके क्या कर लेगा?"
"जब जान ही चली गयी तो आठ आने का क्या?"
"ये ले, ले जा रस्सी."
"अरे, खाली पिली मुझे मरवाने पर तुला है.ले, ये चने खा."

"खुदखुशी के लिये चाहीये?ये लेकर जावो.जादा करके लोग यही वापरते है"

प्राईम वर बघायची गरज नाही .. माझ्या मते पाच वेळा
बडा अत्याचार हो रहा है ..उफ्फ
क्या हो गया है इन्सानियत को .. उफ्फ
उफ्फ..उफ्फ..उफ्फ
Lol

मोजायलाच पाहिजे.
"बीबी तो बरस मे बासी हो जाती है, कोई साली वाली नही है क्या?"
"क्या ये टकला..."

"हम जब कल रात को वहां गये तो कुत्ते भौक रहे थे"
"अब कुत्ते कहां से आये"
"आये कहां से पता नही मगर भौक रहे थे"

सुरुवातीला उत्पल दत्त आणि त्यांच्या पत्नीचा संवाद आहे त्यात ती विचारते की तुम्हाला जहाजाने जायला का नाही आवडत? ते म्हणतात, मला पोहता येत नाही म्हणून. त्यावर ती म्हणते, मला विमानाने जायला आवडत नाही कारण मला उडता येत नाही Lol

हा धागा वर आला की मजा येते.
चुचा कोणे
मला संजीव कुमार च्या जागी बघवणार नाही कोणी, पण कदाचित चांगला बनेलही.

धमाल धागा. प्राईम वर बघणार Happy

रीमेक आलाच तर सं. कु च्या जागी कोण बरं?
कॉमीक टाईम बरं असलेला परेश रावल/बोमन इराणी/अक्षय पण हे सर्व म्हातारे झालेत..
नवाजुद्दीन ने मोतिचूर मधे मजा आणली होती..

Pages