सदाबहार रसदार अंगूर

Submitted by निनाद on 2 November, 2015 - 19:27

देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीचा अंगुर हा चित्रपट.
गुलजार यांचे सदाबहार आणि चुरचुरीत संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान.
संवाद आणि घडामोडी यांचे पंचेस इतके सुरेख विणलेला हा चित्रपट आहे.

पण तेव्हढेच नाही तर त्या संवादास पूरक ठरतील अशी अगदी नेटकी बेतलेली पात्रे. त्या पात्रांचे नितांत सुंदर त्या त्या भूमीकेला न्याय देणे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणून देवेन वर्मा यांना फिल्मफेयर मिळाले होते. पण माझ्या मते हे सर्व टीमला मिळाले असते तरी चालले असते इतका छान हा चित्रपट जमून आला होता.

या चित्रपटाच्या पंख्यांना चर्चा करायला, काय आवडले होते अशा आठवणी जागवायला हा धागा.

(हा लेख नाही, त्यामुळे मी सहेतुक जास्त लिखाण केले नाही, ते सर्वांच्या प्रतिसादांतून येईलच अशी आशा आहे.)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यहाँ कोई पुलिस स्टेशन हैं ?
जी छोटा या बडा ?
मुझे खरिदना नही हैं, जहाँ कोई रपट लिखवा सकता हूं !
पहले तो आप बाहर जाईये !

वल्लाह इसे कहते हैं, बिनतुर के मौला मिले
जी आपने उर्दु मे मुझसे कुछ कहा, ठोस उर्दु मुझे आती नही हैं
आपही से कह रहा हूँ,
लगता हैं मानिन्दे मजनू की तरह लहराते फिरे हैं सडकोंपे रात भर

यहाँ कोई पुलिस स्टेशन हैं ?
जी छोटा या बडा ?
मुझे खरिदना नही हैं, जहाँ कोई रपट लिखवा सकता हूं !

>>

Rofl

संजीव कुमार चे विशेष कौतुक ह्यासाठी कि दोन्ही पात्रे एकदम वेगळ्या शैलीत रंगवली आहेत. विशेषतः बोलण्याची ढब नि उच्चार लक्ष देउन ऐका. तेही सहजपणे वेगळे आणले आहेत. जातीवंत कलाकाराचे लक्षण.

माझाही खुप आवडता. या चित्रपटात दोघांच्या दोन रोलमधल्या गेटप मधे काहिही फरक नाही त्यामूळे आपणही चकवा खातो.

माझे आवडते संवाद.. आज मैने जरा धोती कसकर बांधी है ना इसलिये - तो उतार दो - क्या मैने आपको नंगा नही देखा है ...

दीदी हाथ पर हाथ रखनेसे कुछ नही होगा.. त्यावेळी मौसुमीचे हात खरेच तसे असतात.

आणि तो फाशीचा दोर विकत घ्यायचा प्रसंग !

आणि आपल्या पद्मा चव्हाणही होत्या कि यात !

पद्मा चव्हाण यांचा नोकर गणपत पाटील यांच्या भुमिकेसारखा दाखविला आहे.
देवेन : मेमसाहब कहाँ हैं ?
नोकर : नहाने गयी हैं |
देवेन : कहाँ ?
नोकर : बाथरूम में, और कहाँ ? Lol
मग पद्मा विचारतात कोण आले आहे, बहादूर आहे कळाल्यावर म्हणतात पाठव त्याला.
नोकर : जाईये, मेमसाहब ने बुलाया हैं |
देवेन : कहाँ ?
नोकर : (हसत) जाईये, बाथरूम की तरफ जाईये |

Happy

आणि मग बहादूर परत चालू होतो...

साहब पागल हो गये है
सीsग्रेट मे गांजा भर के पी रहे थे!
Happy
Happy

पद्मा चव्हाणांचं मराठी हींदी क्युट वाटतं. "तू वहीं मिले ले हां."
त्यांचा या चित्रपटात नक्की रोल काय(म्हणजे मानलेली बहिण/आधीची मैत्रिण) ते जरा स्पष्ट करत नाहीत.आणि मैत्रिण असेल तर तिला संजीव कुमार दागिने का देईल(एक वो अलका है जिसने जोडवा हार बनाया, झुमके भी बन गये इ.इ. सुरुवातीचे संवाद.)
पण त्या छोट्या भूमिकेत पण छान दिसतात आणि अभिनय करतात.(होत्या.)
आणि ती भगव्या कपड्यात का असते?

और सुन घर जाते रस्सी लेके जाना. उसे केहेन गले मे डाल के झूल जाये!
और केहेना खुदखुशी करले.

ये मै दीदी से कैसे केहे सकता हूं?

क्या कहेगा?

यही के खुशखुदी कर ले!

सुनो ये रस्सी कैसी है?
क्या करना है?
खुदखुशी
रुको, ये देता हूं. सस्ती और मजबूत. जादा करके लोग ये ही वापरते है!
Happy

मिल गये आपके साब?

हा अंदर है..

अच्छा, अंदर कर दिया क्या?

नही वैसे अंदर नही है, बाह्र है पर अंदर है...

कसले भारी संवाद होते याचे.. मी मोबाऊईलवर सेव करुन ठेवल्लाय.. कुठुनही बघितला तरी धमाल आहे...

देखिये आप जानते नही हैं, ये जो रिश्ता मेरे साथ बनाने की कोशिश कर रही हैं
जी मैं सब समझ रहा हूँ, अगर साली अपने जिजासे रिश्ता बनाना चाहे तो - - -
आप चूप रहिये कुछ जानते तो हैं नही !
चूप रहिये ? ये आपकी गँगमे नही हैं इसलिये ?

अंगूर - क्लासिक आणि एव्हरग्रीन; कितीवेळा पाहिला तरी नवाच वाटतो, मस्तं धागा

माझ्या आठवणी प्रमाणे अंगूर जेव्हा आला होता तेव्हा तो फारसा चालला नव्हता. त्यातील इंटेलेक्च्युअल कॉमेडी पचनी पडण्याइतकी प्रेक्षकांच्झी समजही प्रगल्भ झाली नव्ह्ती . तेव्हा फक्त गाणी आणि हाणामारी किंवा अंगविक्षेप युक्त कॉमेडीची चल्ती होती. तीच तर्हा चुप के चुप के ची !

माझ्या आठवणी प्रमाणे अंगूर जेव्हा आला होता तेव्हा तो फारसा चालला नव्हता. त्यातील इंटेलेक्च्युअल कॉमेडी पचनी पडण्याइतकी प्रेक्षकांच्झी समजही प्रगल्भ झाली नव्ह्ती .
>>>>
शक्य आहे, मी सुद्धा काही मित्रांना आवडीने हा दाखवला, सुचवला. सर्वांनाच नाही आवडला वा फार भारी वाटला.
माझ्या मात्र आवडीचा, प्रतिसादातील सारे संवाद आवडीने वाचले. खूप वर्षे झाली हा शेवटचे बघून. पुन्हा जमवायला हवा.

अवांतर - रोहीत शेट्टी शाहरूख खानला घेऊन अंगूरचा रिमेक बनवणार होता. पण आधी चेन्नई एक्स्प्रेसमुळे आणि आता दिलवाले मुळे लांबलाय. बनवायला हवा मात्र लवकरच, जमला तर मजा येईल. अर्थात त्यात आताच्या पब्लिकची आवड बघून तसा तडका असेल हे गृहीत धरायला हवे.

>>रोहीत शेट्टी शाहरूख खानला घेऊन अंगूरचा रिमेक बनवणार होता. पण आधी चेन्नई एक्स्प्रेसमुळे आणि आता दिलवाले मुळे लांबलाय. बनवायला हवा मात्र लवकरच, जमला तर मजा येईल. अर्थात त्यात आताच्या पब्लिकची आवड बघून तसा तडका असेल हे गृहीत धरायला हवे.

Sad Angry

रोहित शेट्टी ह्या क्लासिकचा खून करेल. शाहरूख म्ह णजे संजीव कुमार नव्हे. देवेनच्या जागी तुषार कप्पोर वाट्ते.

जे काही आहे दोस्त हो खबर पक्की आहे, आणि मी मात्र कधीपासून वाट बघतोय या चित्रपटाची.
कारण, जरी तो बेक्कारच्या बेक्कार फसला तरी त्याने मूळ अंगूरच्या रसग्रहणावर फरक पडणार नाही.
तसेच जमला तर अंगूरशी तुलना न करता एक वेगळा चित्रपट म्हणून बघायला आवडेल.

शाहरूख म्हणजे संजीव कुमार नव्हे. >> नक्कीच!
संजीवकुमार हा अभिनयाच्या बाबतीत त्याच्या काळातील स्टार सुपर्रस्टारपेक्षाही का़कणभर सरस होता.
मात्र त्याच्याशी तुलना न करता शाहरूखकडे देखील विनोदाची जाण आणि टायमिंग आहे हे नाकारता येणार नाही.

खरोखर क्लायमॅक्स वाटावा असा सीन सर्वात शेवटचा आहे. अरे ये तो काशीबाई है, मां तो अन्दर है ! त्यावेळी नमस्कार करणार्‍या संजीव कुमारचा चेहरा पहावा, अफलातून !
प्रतीसाद दिलेले सर्वच धन्यवादास पात्र आहेत. प्रतिसाद वाचता वाचता खळखळून हसलो.

नीलम शहजादीची कादंबरी वाचताना संजीव कुमार पुस्तकात दरवाजा उघडल्यावर स्वतः चूं..... करुन दरवाजा उघडण्याची अ‍ॅक्शन करतो आणि 'नीलम शहजादीके चेहरे पर अजीब उदासी छायी थी' वाचल्या स्वत:चा चेहरा पाडतो ते आठवलं का?
आणि नंतर बाथरुम मधल्या 'गुंडा'ला पोलीस बनून धमकावताना नंतर संजीव कुमार खोटी खोटी काडी पेटवून देवेन वर्माच्या हातात देतो आणि देवेन वर्मा त्याने हात भाजल्यासारखे करुन ती बाजूला टाकतो ते पण भन्नाट आहे.
हा चित्रपट एक क्लासिक आहे, प्रत्येक सीन मधून काहीतरी नवे बघण्यासारखे..

Pages