कोकणात आमच्याकडे पावसाळ्यात भातशेती करतात आणि जमीनीचा पोत कायम राखणयासाठी हिवाळ्यात कुळथाचे पीक घेतले जाते. घरचेच असल्यामुळे सहाजिकच आमच्या आहारात भात आणि कुळीथ यांचा समावेश जास्त असतो. साधारण नोव्हेंबरच्या सुरवातीला कुळथाची पेरणी होते. याचे वेल असतात. कुळथाच्या वेलाचं हिरवगार शेत फार सुंदर दिसत. फेब्रुवारी मार्च मध्ये याच्या लांबट, शिडशिडीत शेंगेत दाणा तयार होतो. मग तोडणी, झोडपणी , पाखडणी वगैरे संस्कार होऊन चपटा , गोल, लालसर काळ्या रंगाचा दाणा मोकळा होतो खरा पण हाय, पुढे वर्षभर खाण्यासाठी आमच्या कोठी खोलीत बंदिस्तच केला जातो.
कुळथाचं शेत
From mayboli
आणि हे जवळुन
From mayboli
या कुळथाची इतर कडधान्याची करतात तशी मोड आणुन उसळ आणि कळण ही करतात. मोड आलेले लाल पांढरे कच्चे कुळीथ ही खूप सुंदर दिसतात. या उसळीत आम्ही इतर कोणता मसाला न घालता वेस्वार नावाचा फक्त आमच्याच भागात केला जाणारा मसाला घालतो. कुणी पाव्हणे मंडळी आली की खास म्हणुन एखाददा होतेच ही उसळ.
कुळथाचं पीठ करण्यासाठी त्याची डाळ करावी लागते. त्या साठी कुळीथ मडक्यात भाजुन नंतर ते जात्यावर भरडले जातात. मग पाखडुन सालं आणि डाळ वेगळी केली जाते. सालं काढलेली डाळ पिवळट दिसते. ही दळुन आणली की कुळीथ पीठ तयार. या डाळीच वरण अप्रतिम होत. डाळ शिजली की फार घोटायची नाही आणि जास्त पाणी ही घालायचं नाही. त्यात हळद , हिंग , मीठ आणि लाल मिरच्या, जीरं, सुकं खोबरं याच वाटण घालायचं. या वरणावर तूप न घालता नारळाचा घट्ट रस घालायचा . हे वरण, गरम भात आणि जोडीला पापड कुरडयांच तळण. आमच्याकडचा सॅालिड हिट बेत आहे हा.
नमनाला घडाभर कुळीथ खर्ची पडलेत आता पिठल्याकडे वळु या . अहो , उसळ,कळण काय किंवा वरण काय , हे पाहुणे कलाकार. कधीतरी होणारे. देशावर करतात त्या शेंगोळ्या तर आमच्याकडे कधी होतच नाहीत . खरं हुकमाच पान म्हणजे कुळथाचं पिठलं जे पानात वाढलं की पान खरोखर भरुन जातं. पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. आमच्याकडे कुळथाच पिठलं सगळ्यांना आवडतं . पिठलं म्हटलं की कुळथाचच, कधी चण्याचं केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही . ह्या पिठलं प्रेमावरुनच माझ्या एका सासुबाईनी " पिठलं... आणि तोंड मिटलं अशी मुळी म्हणच तयार केली आहे. घरात काही महाभाग आहेत पानात पिठल्याचा थेंब ही पाडुन न घेणारे . पण ते किती ? अपवादाने नियम सिद्थ होतो म्हणण्या इतपतच.
जनरली कोकणात न्याहारीला पात्तळ पेज असते पण आमच्याकडे न्याहारीला असतो पिठलं भात. करायला अगदी सोप पण चवीला भन्नाट. थोड्या तेलात कांदा परतायचा , नंतर त्यात पाणी घालायच. मीठ, तिखट आणि चवीला एखाद सोलं टाकायच आणि अंदाजाने पीठ घालुन ढवळत रहायच, गुठळी होऊ द्यायची नाही. पाच सात मिनीटं उकळवायचं , पिढल्याचा घमघमाट दरवळला की गॅस बंद . पिठल तयार. हिरवी मिरची, कोथिंबीर असे पिठल्याचे लाड क्वचितच होतात कोकणात. गरम भात, तूप , पिठलं आणि दही भात त्यात चवीला पिठलं . तोंडी लावायला आंब्याच लोणचं . न्याहरीचा न्याराच बेत. ओरपा हव तेवढ. अशी भरभक्कम न्याहारी झाली की माणूस आहारला नाही तरच नवल.
एवढ जरी असल तरी दुपारच्या जेवणात पिठलं कधीच नसत. कारण दुपारच्या जेवणातल्या पीठल्याचा संबंध अशुभाशी लावला गेला आहे. हां पण पानातली भाजी अगदीच कोणाच्या नावडतीची असेल तर सकाळच्या उरलेल्या पिठल्याचा वाडगा त्याच्या समोर ठेवला जातो.मग त्याच जेवण बिनबोभाट होतं. शिळं पिठलं ही काही जणांना जास्त आवडत पण मला स्वत:ला नाही आवडत ते.
सणासुदीच्या दिवशी दुपारच गोडाधोडाचं जेवण, ते ही थोड्या उशीराच झालेलं. रात्री जेवणार नाही फक्त ताक घेऊ असं सांगुन पुरुष मंडळी ओटीवर गप्पा मारत बसलेली असतात. घरातल्या इतर माणसांसाठी आणि मुलांसाठी रात्री भात पिठलं केलच जातं. पिठल्याचा घमघमणारा दरवळ ओटीवरच्या पुरषांना स्वयंपाकघरात खेचुन आणतो. " घासभर पिठल भात खाईन म्हणतो" असं म्हणत एकेकाची विकेट पडायला लागते . आम्हाला याचा अंदाज असतोच. पिठल भात जास्तच केलेला असतो. पण मंडळी कधी कधी असा काही हाणतात पिठल भात की आम्हाला दोन्ही पुन्हा करावं लागतं . (स्मित )
पिठलं फक्त कोकणातल्या आमच्या हेड आॅफिस मध्येच केलं जात असं नाही तर मुंबई पुण्याच्या शाखांमध्ये ही ते तेवढ्याच आवडीने केलं जातं. पिठाचा स्टॅाक कायम लागतो घरात. अगदाी परदेशी रहाणारी मंडळी ही बॅगेतुन कुळथाच्या पिठाची पुडी आवर्जुन नेतात. ह्या पिठाचा वास बॅगेतल्या इतर वस्तुना चटकन् लागतो व तो लवकर जात ही नाही म्हणून जाड पॅकिंग करुन नेतात पण नेल्याशिवाय रहात नाहीत. इथे मात्र पीठ कधी संपलं तर चार दिवस आमटी, सार असं करुन काढले जातात, पण नंतर गावाला फोन केलाच जातो पीठ कुरिअर करा असा. वास्तविक हल्ली सगळीकडे कु. पी विकत मिळतं तरी ही कुरिअरने पीठ मागवणे हे खरं तर कोब्राना शोभत नाही. पण काय करणार? विकतच्या पीठाला आमच्याकडे बिग नो . पीठ घरचचं हवं. त्या साठी मग कुरिअरचा खर्च ही सोसायची ह्या कोब्रांची तयारी.
जाऊबाई सर्दी पडशाने बेजार झाल्या की जेवताना म्हणतात ,“ पिठलं वाढ ग थोडं, तोंडाला रुची येईल जरा " नवीन सुना घरात रुळायच्या ही आधी पिठलं आवडीने खायला लागतात. शिक्षणासाठी बाहेर रहाणारी मुलं घरी आली की "काकू, पिठलं पोळी वाढ, किती दिवस झाले खाल्लं नाहीये " असं म्हणतात. दोन वर्षाचं घरातलं छोटं बाळ वरणभाताला तोंड फिरवत आणि भात पिठलं मिटक्या मारत खात .
या सगळयामुळे पिठलं प्रेमाची आमच्या घरची ही परंपरा या पुढे ही अशीच कायम राहील याची खात्री पटते आणि मन आश्वस्त होते...
कुळथाचं पिठलं विशेष आवडत
कुळथाचं पिठलं विशेष आवडत नाही,पिठी आत्ताशी आवडायला लागली.
छान लिहिलय. कधी कुळथाच पीठल
छान लिहिलय. कधी कुळथाच पीठल खाल्ल नाहीये. जर डाळीच पीठ संपल असेल तर इमर्जन्सीला आमच्याकडे हिरवी मिरची घालून ज्वारीच पीठ वापरून पीठल करतात. भारी लागत ते एकदम.
आमच्याकडे हिरवी मिरची घालून
आमच्याकडे हिरवी मिरची घालून ज्वारीच पीठ वापरून पीठल करतात. भारी लागत ते एकदम. >>> रेस्पी योजाटा. कोपच्यात दिलीत तरी चालेल. मग मी त्यास विपूतल्या पाकृथ्रू वर आणीन
सुरेख लेखन .. अगो +१
सुरेख लेखन ..
अगो +१ ..
मामीचा फोटोही सुंदर .. पण पिठलं थोडं जास्त घट्ट दिसत आहे आमच्याकडे असतं त्यापेक्षा ..
हा फोटो माझ्याकडून (कमी डार्क, पातळ .. ;))
किती सुरेख लिहिलय!
किती सुरेख लिहिलय!
स्निग्धा, नरेश माने, रश्मी,
स्निग्धा, नरेश माने, रश्मी, ममो, दिनेशदा, अन्जू, सशल .... धन्यवाद.
दिनेशदा, भाकरी मी केलेली नाही. माझ्या बाईनं केलीये. ती मस्त करते भाकर्या. लसणाची चटणीही मी केलेली नाही. ती कुबलांनी केलीये. मी कुळथाचं पिठलं केलंय आणि कांदा कापलाय.
सशल मस्त दिसतंय हे पिठलं.
सशल मस्त दिसतंय हे पिठलं.
<<मी कुळथाचं पिठलं केलंय आणि
<<मी कुळथाचं पिठलं केलंय आणि कांदा कापलाय.>>
आई गं!
फक्त चटणी कुबलांऐवजी 'तिरूमला' वाल्यांनी केलेली असते.)
कित्ती ते कष्टं!
(आमच्याकडे पण डिट्टो हीच कथा असते पण .
मामी, मग ती खायला यावे लागेल
मामी, मग ती खायला यावे लागेल !
कुळथाचे तयार, म्हणजे मीठ मसाला घातलेले पिठ आता मिळते बाजारात, तरी खुप लोकांना माहीत नसते ते. गुरगुट्या भात, पिठी, तूप, पोह्याचा पापड आणि सांडगी मिरची, हा माझा बेत असतो.
मस्तं लिहिलंय. आवडलं.
मस्तं लिहिलंय. आवडलं.
कसलं भारी लिहिलंय. कुळथाचं
कसलं भारी लिहिलंय. कुळथाचं पिठलं मला प्रचंड आवडत.भरपूर लसूण पाहिजे फोडणीत
ममो मीही तुझ्या फॅन क्लबात
ममो मीही तुझ्या फॅन क्लबात ..... आणि आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या घराच्या प्रेमात .....
हेमाताई आज केलं. कांदा न
हेमाताई आज केलं. कांदा न घालता. नवऱ्याला कांदा घालून आवडतं, लेकाला नाही. त्यामुळे कांदा घालून क्वचित होतं.
माहेरी कोकणात पातळ करतात. सासरी सासूबाई घट्ट करतात. मी मध्यम करते. माहेरचं नुसतं प्यायला, माझं भाताबरोबर आणि सासूबाई करतात ते पोळी किंवा भाकरी बरोबर आवडतं. त्यामुळे मी करताना मध्यम किंवा कधी थोडं घट्ट करते.
मामी आणि सशलचं पिठलं
मामी आणि सशलचं पिठलं माझ्यापेक्षा मस्त दिसतंय.
पीसी बरेच दिवस चालु नसल्याने
पीसी बरेच दिवस चालु नसल्याने शेताचे फोटॉ नाही टाकु शकले. ते आता टाकत आहे.
दिनेश यांनी दिलेली वेस्वारची रेसिपी अगदी परफेकट आहे. मसाला आणि मेतकुट दोन्ही सारखा हा वापरता येतो. फणसाची, पडवळाची, दुधीची अशा भाज्या, उसळी यात मसाला म्हणून घालतो आम्ही वेस्वार. तसेच फोडणीचा भात केला तर त्यातही आवर्जुन घालतो. गरम भात तूप आणि त्यावर मेतकुटासारखा , दही भातात चवीसाठी ही छान लागतो. मेतकुटासारखा दह्यात कालवुन तोंडीलावण ही होत याच. तेलं घालुन कलावलं तर मद्रासी चटणीपुडी सारखा लागतो.
ज्यांच्या घरी कुळथाचं पीठ तयार करतात त्यांनी कुळथाचं वरण नक्की करुन बघाव , ते अतिशय सुंदर लागत.
सणासुदीचे दिवस संपलेत आता एकदा पिठल भाताचा बेत कराच.
मी वेसवार सांबार मसालाऐवजी
मी वेसवार सांबार मसालाऐवजी वापरते आमटीत. सांबार मसाला आणत नाही :).
हा आमचा सोलापूरी बेत. झुणका,
हा आमचा सोलापूरी बेत. झुणका, ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा, दही आणि दाण्याची चटणी

अंजली कसला सॉलिड बेत, भूक
अंजली कसला सॉलिड बेत, भूक लागलीना परत.
काही काळ वेळ आहे की नाही. ...
काही काळ वेळ आहे की नाही. ... जळवणारा फोटो टाकायला? णिषेढ!!!
पण फोटो छान आहे.
सांगायला अतिशय आनंद होतोय की
सांगायला अतिशय आनंद होतोय की माझ्या दोन्ही मुलींनी डालीच्या पीठाच पिठल पोळी खुप आवडीन खाल्लं!
अंजली, तोंपासु फोटो!
अंजली, फोटो क्काय आलाय.
अंजली, फोटो क्काय आलाय. तोंपासु. मी सोलापूर ला गेले होते तेव्हा एक ही दिवस पोळी खाल्ली नव्हती. रोज भाकरीच खात होते. हॉटेलात ही छान मिळायची. . सोलापूरच्या भाकर्या लई भारी>
वत्सला, बातमी वाचुन बहोत संतोष जाहला.
अंजू, सांबार मध्ये वेसवार ट्राय करीन. नक्कीच चांगल लागेल.
अंजली, तोंपासु फोटो
अंजली, तोंपासु फोटो
Kulithacha varan kasa
Kulithacha varan kasa karatat... konitari rcp taka na pls.....
आजच वाचल.. मस्त झालाय लेख..
आजच वाचल.. मस्त झालाय लेख.. कूपी कोकणवासियांसाठी नेहमीच फेवरीट
रोचिन, हेमाताईंनी वर लेखात
रोचिन, हेमाताईंनी वर लेखात लिहिलंय बघा, कुळीथ डाळीचं वरण.
सोलापूरच्या भाकर्या लई
सोलापूरच्या भाकर्या लई भारी>>> होय होय. सोबत दान्याची चटणी असेल तर स्वर्गातच डायरेक्ट!!!!
वत्सला, आमच्याकडेही कन्यकेला "पिटल" हा पदार्थ फार आवडतो.
छान आहे लेख . कुळीथ पिठल
छान आहे लेख . कुळीथ पिठल विशेष आवडीच् . गरमागरम भात , कुपि आणि ताकातल्या मिरच्या ! अहाहा !!!!
सर्वाचे फोटोही तोपासू
पिटल >>>
पिटल >>>
गेल्या आठवड्यात धागा वर
गेल्या आठवड्यात धागा वर आल्यावर आठवणीने कुळीथ पीठ घेऊन आले होते. कुळथाची उसळ होते पण पिठलं बर्याच वर्षांत केलं नव्हतं.
आज गरमगरम पिठलं-भात, तूप, पापड आणि ताक. नवरा सर्दी, तोंडाला चव नसणे, भूक नसणे ह्यांनी बेजार असल्यामुळे बेत जरा जास्तच छान जमून आलाय
Ho...vachala parat atta...
Ho...vachala parat atta... thanx Anju.
Pages