मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2015 - 16:35

पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!

तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.

बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्‍या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर सस्मित. फक्त बाजुचा बोर्ड पिवळ्या अक्षरामधला त्यात बदल केले होते हिंदीतले नाव काढून गुजराती मधे लिहिलेले. ते अवघे काही दिवसच होते परंतु काहींनी २० वर्षांपासून दिसत आहे.

(आम्ही रोज प्रवास करतो हां जन्माने मुंबईकर नसुन देखील)

धन्यवाद

http://www.mumbaimirror.com/columns/columnists/manoj-r-nair/Building-a-G...

But the issue that was worrying the 150-odd attendees at the meeting was the declining Gujarati culture in the city. Till the fifties, when Mumbai was the capital of a bi-lingual state, Gujarati was the city’s second language. Shopfronts carried signs in Gujarati (many still do) and the names of suburban railway stations, especially those on the Western Railway route, were written both in Marathi and Gujarati, apart from Hindi and English. Mumbai was perhaps the largest Gujarati-speaking city anywhere.

मी फक्त २० वर्ष म्हणतोय. १९५० पासुनच आहे म्हणे हे.

स्टेशनचं नाव गुजरातीत लिहिल्याने जर मुंबईकर प्रवाशांना चांगले दिवस येणार असतील तर का नको?

लिहू द्या गुजरातीत.

ता. क. ' हुतात्मा चौक ' अशी पाटी गुजरातीत लिहिलेली बस बघायला आवडेल.

रुंन्मेस भाई - तासाला ३०० रुपये ओटी देणारी नोकरी असताना तू का कुढत बसलायस? तुझ्या सारख्या माणसानी कीती आनंदात रहायला हवे कायम.

उल्हासनगरातील रस्त्यावर असलेला दिशादर्शक फलक. छायाचित्र ऑक्टोबर २०१४ मध्ये काढले आहे.

usb.jpg

तशीही गाडी पावसावरुन राजकारणावर नंतर रेल्वेवर वळलीच. आता रस्त्यावर वळली तर काय फरक पडेल. Happy

मुंबई पुर्वी गुजरात स्टेट मधे होती. सर्व स्टेशनच्या पाट्या रोमन, देवनागरी आणि गुजराथी लिपीत होत्या. देवनागरी अक्षरे खरे तर हिंदीत होती पण त्यालाच मराठी लोक मराठी समजत असत. माझ्या लहानपणी मला गुजराथी अक्षरांची ओळख या पाट्यांमूळेच झाली. या पाट्या साधारण १९७० पर्यंत तरी नक्कीच होत्या.

१९३५ सालापर्यंत मुंबई इलाका (बॉम्बे प्रॉविन्स किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी) हा ब्रिटिश इन्डियाच्या तीन प्रमुख प्रांतांपैकी एक होता. त्यामध्ये सध्याचा पूर्व गुजरात, सध्याचा पश्चिम महाराष्ट्र (पुणे, नाशिक, खान्देश इ.) कोंकण, कर्नाटकाचे तेव्हाचे चार जिल्हे,(बेळगाव, कारवार, धारवाड, विजापुर) पाकिस्तानातला सिंध प्रांत आणि एडन बंदर आणि लगतचा भाग एव्हढा मोठा टापू समाविष्ट होता. १९३५ मध्ये सिंध प्रांत मुम्बई इलाक्यातून वेगळा करण्यात आला आणि १९३९ मध्ये एडन. गुजरातचा मोठा भाग (कच्छ-सौराष्ट्रामध्ये वेगवेगळी संस्थाने होती, ती आणि बडोदा वगैरे ब्रिटिश इन्डियामध्ये येत नसत.) मुंबई ह्या बहुभाषिक इलाक्यामध्ये असल्याने आणि तेव्हाची बीबीसीआय रेल्वे ही मुख्यतः बॉम्बे, बरोडा अ‍ॅण्ड सेन्ट्रल इंडिया या प्रदेशासाठी असल्याने या म्हणजे आताच्या पश्चिम रेल वे वर गुजरातीतून पाट्या असत. पुढे स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेच्या लोकाग्रहानुसार भारतात सर्वत्र एकभाषी प्रादेशिक पुनर्रचना झाली तरी मुंबई इलाक्याच्या काही भागात द्वैभाषिक राज्य बनवले गेले. त्यामुळे गुजराती पाट्या कायम राहिल्या त्या १९६० सालापर्यंत म्हणजे मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य होईपर्यंत. तोपर्यंत खाजगी रेल मार्गांचीही पुनर्रचना होऊन पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य असे विभाग पाडले गेले होते आणि ते मध्यवर्ती सरकारच्या आधिपत्याखाली आले होते. त्यानंतर म्हणजे १९६० सालानंतर पश्चिम रेल्वेच्या महाराष्ट्रातील स्थानकांची नावे मराठीतून लिहिण्यास हळू हळू सुरुवात झाली. त्या नंतर काही काळाने तोपावेतो सरकारी पातळीवर शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्रही स्वीकारले गेले . तीन भाषा म्हणजे हिंदी, प्रादेशिक भाषा आणि इंग्लिश. त्यामुळे सीमावर्ती प्रदेश सोडून इतरत्र या तीन भाषांतच पाट्या लिहिल्या जाऊ लागल्या.
सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेची सूत्रे मराठी लोकांच्या हातात नाहीत. पश्चिम रेल् वेवर गुजराती भाषकांचा आणि मध्य रेल् वेवर हिंदी भाषकांचा प्रभाव आहे. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल वेचे मुख्य कार्यालय अहमदाबादेत नेण्याचे घाटत होते. ते जनमताच्या रेट्यामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे बारगळले. पण ती मोहीम पुन्हा सुरू होणार नाही असे नाही.
पुष्कळश्या स्थलनामांचे देवनागरी लेखन हे ब्रिटिश काळातल्या रोमन लेखनावरून करण्यात आले आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या परीने योग्यात योग्य उच्चार होईल अशी स्पेलिंगे बनवली, पण आपण त्याचा उच्चार मात्र आपल्या इंग्लिश उच्चारणानुसार करतो. त्यातही प्रमाण मराठी आणि स्थानिक उच्चारण वेगळे असू शकते. भायन्दर च्या बाबतीत जुन्या स्थानिक आगरी कोळी उच्चारांनुसार भाय्न्दर असा उच्चार आहे, जो आपण भाईंदर असा लिहितो. समान उच्चार म्हणून भायखळा शब्द दाखवता येईल. लिखाणात जरी 'य' पूर्ण असला तरी उच्चार भाय्खळा असाच होतो. उद्या भायखळे सुद्धा भाइखळे असे लिहिले जाऊ शकेल.
दिवे-पनवेल मार्ग नव्याने बनताना त्या वरच्या स्थानकांच्या नावांचे लेखन देवनागरी मराठीत असावे यासाठी काही पत्रव्यवहार केला होता. पण पाट्या रंगवणार्‍या रंगार्‍यांना बहुधा इंग्लिश स्पेलिंग देऊन 'ही ही नावे मराठीत लिहा' असे आदेश दिले जात असावेत. त्यामुळे काही नावांची दुर्दशा झाली आहे. या बाबतीत अधिक माहिती घेता त्यावेळी असे समजले होते की रेल वेची नवी स्थानके किंवा सरकारी उपक्रमांच्या नवीन शाखा उघडताना तिथला पत्ता दिल्लीला पाठवला जातो,(अर्थात बहुधा इंग्लिशमध्ये) आणि नंतर तो त्याच्या देवनागरी हिंदी रूपांतरानिशी राजपत्रात प्रसिद्ध होतो. मराठीसाठी वेगळे श्रम घेतले जात नाहीत. मराठी उच्चार (किंबहुना कोणतेही अन्य भाषिक उच्चार) वेगळे तपासून घेतले जात नाहीत. दक्षिण भारतीय भाषांचा मात्र अपवाद, कारण ते लेखन इतके क्लिष्ट असते की त्या त्या भाषकांकडून तपासून घ्यावेच लागते, शिवाय ती राज्येही या बाबतीत तत्पर असतात. आता एकदा राजपत्रात प्रसिद्धी झाली की तेच त्या स्थानाचे अधिकृत नाव बनते आणि ते सहजासहजी बदलता येत नाही. यामुळे खूपशी मराठी स्थाननामे वेगळ्या तर्‍हेने लिहिली गेली आहेत. इतकेच काय, मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरही कामशेट वगैरे नावे दिसतात. या मार्गावरच्या चिह्नपाट्याही अजब आहेत. इंग्लिशचे शब्दशः भाषांतर आहे. उदा. टनेल अहेड साठी 'पुढे बोगदा आहे' ऐवजी 'बोगदा पुढे आहे' वगैरे.
असो. विषयांतराबद्दल आणि प्रदीर्घ प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

हीरा, १९७२ पर्यंत मी मालाडला होतो. तोपर्यंत पाट्या गुजराथीत होत्या. शिवसेना त्यावेळी प्रभावी होती पण त्यांचा भर लुंगी हटाव वर होतो. गुजराथीचे त्यांना वावडे नव्हते. मालड मधे गुजराथीही अगदी सहज बोलली जात असे. मला हिंदीच्या आधी गुजराथी बोलता आली. रेशनची बिले, वाण्याची बिले पण गुजराथीतच असत.

<< चेतन साहेब केंद्र सरकारचे रेल्वे खाते आणि स्थानिक महापालिका यात काही फरक असतो नाही का ? >>
स्थानिक महापालिका असो की रेल्वे खाते सर्वांनाच भाषा त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागतो. चौथी भाषा कुठून आली?

<< लोकल ट्रेन बद्दल बोलणे चालू असताना रस्त्यांवरचे फलक कुठुन आणले देवालाच ठाऊक >>
मुंबईत तीन भाषांव्यतिरिक्त (इंग्रजी + हिंदी + मराठी) चौथी भाषा वापरली जाते की नाही हा देखील एका प्रतिसादातला मुद्दा होता.

स्थानिक महापालिका असो की रेल्वे खाते सर्वांनाच भाषा त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागतो. चौथी भाषा कुठून आली?>>
सिण्धी भाषिक तिथे बहुसंख्य आहेत. महानगर पालिकेने त्यांची भाषा वापरली तर काय बिघडले?

https://en.wikipedia.org/wiki/Sindhi_language

ते सिंधी उर्दूसारखं दिसतंय.
सिंधी लिहायला उर्दू स्क्रिप्ट वापरतात का?
आमच्या इथल्या सिंधी देवळावर काही वेगळेच स्क्रीप्ट आहे.

(डाऊट सॉल्व झाला. सिंधी भाषा उर्दू, गुरुमुखी, देवनागरी, लंदि अश्या अनेक स्क्रीप्टमध्ये लिहितात.)

>>मुंबई पुर्वी गुजरात स्टेट मधे होती.<<

मुंबई कधिच गुजरात मध्ये नव्हती. याउलट वर हीरा यांनी लिहिल्याप्रमाणे आजच्या गुजरातचा काहि भाग पुर्विच्या बाँबे स्टेट (प्रेसिडेंसी) मध्ये होता...

माहीतीपूर्ण प्रतिसाद, हीरा.

मुंबई प्रेसिडेन्सी हे बेसिकली फारुकी डायनॅस्टीपासून पुढे चाललेलं प्रकरण आहे, असं दिसतंय एकंदरीत.

@ इब्लिस,
अगदी फारुक़्इ घराण्यापासून असे नव्हे. स्वातंत्र्यपूर्व काळातला हिंदुस्तान दोन प्रकारच्या शासनांखाली होता. एक म्हणजे ब्रिटिश इंडिया, जिथे ब्रिटिशांची सर्वंकष सत्ता होती आणि दुसरे म्हणजे रियासती किंवा संस्थाने. ज्या रियासती ब्रिटिशांनी जंग जंग पछाडूनही खालसा होऊ शकल्या नाहीत तिथे पुढे ब्रिटिशांनी कवायती फौजा तैनात करवून आपले रेसिडेंट ऑफिसर आणि/ किंवा पोलिटिकल एजंट नेमले आणि संरक्षण, युद्धे, वगैरे महत्त्वाच्या बाबींवर आपले नियंत्रण ठेवून् बाकीची सटरफटर सत्ता संस्थानिकांच्या हाती ठेवली. मराठवाडा हा सगळा निज़ामी प्रदेश होता. त्याला मोगलाई म्हणत. मोगलाईत वेगळा शासन कारभार आणि मुंबई, सी.पी अँड बेरार (सेन्ट्रल प्रॉविन्सेस आणि बेरार ऊर्फ वर्‍हाड ऊर्फ विदर्भ.)मध्ये वेगळा. चलन वेगळे, नियम वेगळे, रेल रस्ते वेगळे.
तर खान्देश, पुणे, संपूर्ण कोंकण, बडोदा वगळता बराचसा पूर्व गुजरात, उत्तर कर्नाटक येथे संस्थाने नव्हती. तिथे इंग्लंड्च्या राजाची सत्ता चाले. म्हणून हा सगळा टापू ब्रिटिश इंडिया बनला. सुरत वगैरे प्रांतावर ब्रिटिशांनी मुंबईत स्थापित होण्याआधीच आपले वर्चस्व निर्माण केले होते. पश्चिम गुजरातेत जूनागढ, जामनगरसारखी संस्थाने होती तो प्रदेश ब्रिटिश इंडियात नव्हता. कराची ब्रिटिश इंडियात होते आणि तेथे गुजराती ही एक प्रमुख भाषा होती.
बाकी, मोगलाईविषयी आपल्याला माहिती आहेच.

हिराजी, छान माहिती.
धागा थोडा ईकडेतिकडे ट्रॅक सोडून पळाला तरी अश्या माहितीपुर्ण पोस्टमुळे ऊपयुक्तता टिकून राहते.

याऊपर मुंबई गुजरातमध्ये असो वा गुजरात मुंबईमध्ये असो, जोपर्यंत हे दोन्ही भारतात आहे तोपर्यंत मला या वादात रस नाही.
एखादा मराठी फलक डावलून गुजराती फलक येत असेल तर त्यावर माझा आक्षेप असेल, पण मराठी फलकाच्या जोडीने झळकत असेल तर स्वागत असेल.
ईंग्रजी हि परकीय, आपल्याला गुलाम करणार्‍यांची भाषा चालते आणि आपल्याच देशातील शेजारच्या राज्यातील भाषा खटकते हे अनाकलनीय आहे. किंबहुना हे खटकणे उपजत नसून खटकावे म्हणून सोयीस्कर आपल्या भावना भडकावून राजकारण खेळले जाते. अर्थात हे राजकारण गुजरात्यांचा पुळका असणारे राजकारणीही खेळतातच. म्हणून बुलेट ट्रेनचा फायदा मुंबईला आणि आम्हा सामान्य मुंबईकरांना शून्य होणार असेल तर त्यालाही माझा विरोधच राहील.

ऋन्मेष तुझी गफ्रे कोणत्या रूटवर राहते रे
>>>>>
मी वैयक्तिक प्रश्नांना हल्ली एंटर्रटेन करणे सोडलेय कारण त्यामुळे धागा भरकटतो आणि बिल माझ्यावरच फाडले जाते.
पण ग’फ्रेंड हा माझा वीक प्वाईंट असल्याने देतो.
ती हार्बर लाईनवरच राहते म्हणून माझे त्या लाईनीवर वरचेवर जाणे होत असते. (मी मासिक पासही काढून ठेवला आहे) Happy

Mala mahit aahe tumachi gf mabovar aahe........ Shodha :haha: cid jindabad.............. chaludyaa

एखादा मराठी फलक डावलून गुजराती फलक येत असेल तर त्यावर माझा आक्षेप असेल, पण मराठी फलकाच्या जोडीने झळकत असेल तर स्वागत असेल...

...

सहमत.

Pages