k15

Submitted by अँन्ड्रोमेडा on 13 February, 2015 - 05:45

निशाला सायकलच भारी वेड . लहानपणी तिची तीन
चाकांची सायकल घेऊन ती फार दूर पर्यत जात
होती .इकडे मंजूचा जीव मात्र टांगणीला लागत असे व
तिला नेहमी वाटे कि कुठून
दुर्बुद्धी झाली आणि हिला सायकल घेऊन दिली .
थोडी मोठी झाल्यानंतर तिला दोन चाकी सायकल
दिली .त्यानंतर तर तिला सीमाच
उरल्या नव्हत्या .ती लांब लांब सायकल घेऊन जात
असे.आणि हो महत्त्वाच इतकी सायकल चालवूनही तिच
सायकलवरून पडन काही थांबत नव्हतं .सायकल
खाली आणि त्यावर
निशा अशापेक्षा निशा खाली आणि सायकल तिच्या अंगावर
पडलेली किंवा सायकल
आणि निशा दोघीही एकमेकींशेजारी पडलेल्या असच जास्त
व्हायचं .तिला लागायचं फार नाही पण आज जरा जास्तच
झालं होत .
निशा हळुहळु डोळे उघडत होती .तिला थोड धुसर धुसर
दिसत होत .थोडा वेळ झाल्यावर तिला जरा स्पष्ट दिसू
लागलं होत .शेजारी बरीच माणसं
जमली होती आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत
होती .कोण कुणाला काय सांगतय ते समजायला अवघड
जात होत .तिच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर
पडले ...पाणी आणि कोणीतरी एक
पाण्याची बाटली तिच्या तोंडात
कोंबली,चांगला तिला ठसका लागेपर्यंत .मग थोड्या वेळाने
तरतरी वाटल्यावर तिनं पाहिलं लोक आपापसात बोलत
आहेत आणि आपल्याकडे कुणाच लक्ष नाही .हे पाहून तिनं
आपली सायकल उचलली आणि तिच्यावर
बसण्याचा प्रयत्न करु लागली तेव्हा तिला कळलं सायकल
बरीच वाईट स्थितीत आहे व तिला चालवतच
घरी नेण्याशिवाय पर्याय नाही .मागे वळून कुणाच लक्ष
नाही हे पहात ती हळुहळु तिथून
सटकली.घरी जाण्यापूर्वी
वाटेत सुरभिच घर होत तिथं
ती गेली .तिनं सुरभिला बाहेर बोलावून
घेतलं .तिला पाठीमागचा दरवाजा उघडायला सांगितला .मग
पाठीमागच्या दरवाजाने तिच्या घरी जाऊन
निशा थोडी फ्रेश झाली व हळूच तिथून बाहेर
पडली .आता तिने तिचा मोर्चा आपल्या घराकडे वळवला.
आईला काय आणि कस सांगायचं याचा विचार करत करत
शेवटी कशीबशी ती घरी पोहोचली .कसबस तिनं घरात एक
पाऊल ठेवलं तोच आईनं तिला पाहिलं .थोडीफार
सावरली असली तरीही तिला पाहून आईला धक्काच
बसला .आईनं
इतक्या प्रश्नांचा मारा केला की तिला ती उत्तरही देऊ देत
नव्हती .शेवटी आई थांबल्यावर निशान झाला प्रकार
सांगायला सुरुवात केली आणि आपल्याला काही नाही झालं
तर सायकल उभी केली होती तिला गाडीनी धडक दिली अस
सांगितलं .आई फार काही नाही फक्त दोन एक तास बोलून
शांत झाली .
पुढे ती सायकल दुरूस्तीला गेली , ती काही परत आलीच
नाही .
....क्रमशः
भाग ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users