समजून घ्या

Submitted by वैवकु on 28 January, 2015 - 01:34

मी किती समजावतो आहे चला समजून घ्या
शब्द वेडे वाटले तर मामला समजून घ्या

या इथे कोणी न माझे गाव हे माझे कुठे
मी जरी परकाच आहे आपला समजून घ्या

देवभोळ्या भाविकांची ही कुणी दिंडी नव्हे
चालला आहे गझलचा काफला समजून घ्या

मी स्वतःचा रंग आहे विठ्ठलाला लावला
विठ्ठलाचा रंग नाही चोरला समजून घ्या

वाटते आहे मलाही की... नको थांबायला
ओघ माझ्या वेदनांचा थांबला समजून घ्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वतःचा रंग आहे विठ्ठलाला लावला
विठ्ठलाचा रंग नाही चोरला समजून घ्या<<< Happy

वाटते आहे मलाही की... नको थांबायला
ओघ माझ्या वेदनांचा थांबला समजून घ्या<<< वा वा

बहुधा वैभव जोशींचीही 'समजून घ्या' अशी रदीफ असलेली एक गझल असावी असे वाटत आहे. (बहुधा वृत्तही हेच असावे). सहज लिहिले. कृ गै न

छान.

मी जरी परकाच आहे आपला समजून घ्या ..मस्त.

मी स्वतःचा रंग आहे विठ्ठलाला लावला
विठ्ठलाचा रंग नाही चोरला समजून घ्या
व्वाह !

वाटते आहे मलाही की... नको थांबायला
ओघ माझ्या वेदनांचा थांबला समजून घ्या......>>..
शेवट मस्तंच !
देवभोळ्या भाविकांची ही कुणी दिंडी नव्हे
चालला आहे गझलचा काफला समजून घ्या ....>>..
या शेरातील 'कुणी' हा शब्द खटकतो आहे. तो भविकासाठी असेल तर कुण्या असा हवा. दिंडीसाठी असेल तर तो तिथे लागू होतो याविषयी मी साशंक आहे.जरा बघाल.

मी स्वतःचा रंग आहे विठ्ठलाला लावला
विठ्ठलाचा रंग नाही चोरला समजून घ्या

==(_________)==

^^^^ ही एक गच्च मिठी पाठवतो आहे. समजून घे !