भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सकाळी सकाळी, सर (SIR) म्हणजे Slave I remain, अशी फोड करून दाखवणारं, ब्रिटीशांनी भारतावर लादलेलं गुलामगिरीचं प्रतिक वगैरे फॉरवर्ड वाचलं आणी धन्य झालो. असले मनाचे श्लोक रचण्याची प्रतिभा आणी क्षमता तर समर्थांकडे सुद्धा नव्हती.

असले मनाचे श्लोक रचण्याची प्रतिभा आणी क्षमता तर समर्थांकडे सुद्धा नव्हती. >> Happy
हे व्हातस्प वरचे प्रकार फार वैतागवाणे झालेत.

फेरफटका, असंच एक INDIA ची फोड करून दाखवणारे फावडे होते
Indipendent Nation Declared In August.
परत तेच इंग्रज, गुलामगिरी , आपलं खरं नाव हिंदुस्थान आहे, etc etc

फॉरवर्ड करणाऱ्या बाब्याला एकच विचारलं, भारतात येण्या पूर्वी इस्ट india कंपनी स्थापन करताना इंग्रजांना माहित होतं का? कि या देशाला ऑगस्ट मध्ये स्वातंत्र्य देणार आहोत.
त्याचे उत्तर "इट्स a व्हाट्स अँप फॉरवर्ड डोन्ट टेक इट सिरिसली"

आरे मग पाठवता कशाला? आपल्या मोबाईल वर आलेली प्रयेक गोष्ट ग्रुपवर नेऊन ओतली पहिजे का?

सिम्बा, तुमचा आयडी मस्त आहे. आवडला.

हो, ते ईंडिया चं पण वाचलं होतं. असे देशभक्ती चे खोटे उमाळे तर बरेच फिरत असतात ईंटरनेट वर. त्यातला फोलपणा दाखवता येतो, पण त्याने काही फरक पडत नाही.

ऋग्वेदातल्या रेसिपी ने विमान बनवलं आणी मग, ईंग्रजांनी ते भारतातून चोरलं आणी त्या चोरीतून राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला वगैरे आशयाचं पण एक फॉरवर्ड होतं. ह्यात ईतिहास, भूगोल आणी कालगणना कुठेतरी गंडली आहे ह्याचा विचार सुद्धा फॉरवर्डकर्त्याला शिवला नव्हता.

आकाशवाणी दिल्लीवर एक इंग्रजी न्यूज रीडर आहे. लालेमा अनेजा ड्यांग. त्या या भाकडकथा भक्तिभावाने ओततात.
दिनविशेषांत राइट बंधूंच्या उड्डाणाविषयी सांगितल्यावर, पण ते पहिले नव्हते. भारतितल्या दोघा भावांनी त्याआधी विमान उडवलेलं पण ब्रिटिशांनी त्यांना.तुरुंगात टाकलं म्हणे.
गाईच्या शेणाच्या गोवर्यांवर गाईचं तूप टाकून जाळल्या तर हवा शुद्ध होते.
भारतीय वंशाच्या गाईंचं दूधच चांगलं. त्या जर्सी गाईंचं वाईट.
सप्टेंबर, अऑक्टोबर, नोव्हेंबर , डिसेंबर हे सप्तम अष्टम नवम् दशम् वरून घेतलंय

आकाशवाणी दिल्लीवर एक इंग्रजी न्यूज रीडर आहे. लालेमा अनेजा ड्यांग. त्या या भाकडकथा भक्तिभावाने ओततात.
दिनविशेषांत राइट बंधूंच्या उड्डाणाविषयी सांगितल्यावर, पण ते पहिले नव्हते. भारतितल्या दोघा भावांनी त्याआधी विमान उडवलेलं पण ब्रिटिशांनी त्यांना.तुरुंगात टाकलं म्हणे.
गाईच्या शेणाच्या गोवर्यांवर गाईचं तूप टाकून जाळल्या तर हवा शुद्ध होते.
भारतीय वंशाच्या गाईंचं दूधच चांगलं. त्या जर्सी गाईंचं वाईट.
सप्टेंबर, अऑक्टोबर, नोव्हेंबर , डिसेंबर हे सप्तम अष्टम नवम् दशम् वरून घेतलंय

कुणा तळपदे नावाच्या व्यक्तीने वेदांतून ज्ञान घेऊन विमान बनवले व उडवले होते व ते ही राईट बंधुंच्याआधी व त्या विमानात लोकमान्य टिळक बसले होते असा प्रचार गेली कित्येक वर्ष चालू आहे.व्हॉट्साप् फेबुच्या जन्माच्या कीतीतरी वर्ष आधीपासुन हा फेकाडा प्रचार चालू आहे.

त्याच्यावर शिनुमा आला. हवाईजादे.
सायन्स कॉंग्रेसमध्ये यावर पेपरही होता.
तळपदेंचं विमान माहीत होतं. पण या बाईंनी त्यांना भाऊ पण आणला आणि दोघांना तुरुंगातही टाकलं. हे माझ्यासाठी तरी नवीन होतं.

आरोग्य रिलेटेड फॉर्वर्ड्स शेअर करून लोकांना सावध करणं नक्कीच गरजेचं आहे. पण हे असले
>>णा तळपदे नावाच्या व्यक्तीने वेदांतून ज्ञान घेऊन विमान बनवले व उडवले होते व ते ही राईट बंधुंच्याआधी व त्या विमानात लोकमान्य टिळक बसले होते असा प्रचार गेली कित्येक वर्ष चालू आहे.व्हॉट्साप् फेबुच्या जन्माच्या कीतीतरी वर्ष आधीपासुन हा फेकाडा प्रचार चालू आहे.>> फॉर्वर्ड्स वाचून ते इकडे चिकटवून तडतड करणं जरा विनोदीच आहे.

फॉर्वर्ड्स वाचून ते इकडे चिकटवून तडतड करणं जरा विनोदीच
आहे.>>>>>>>तळपदे आणि टिळक ही आडनावं वाचून तुमची झालेली तडतड समजू शकतो

नाही हो, गैरसमज झाला तुमचा. ही दोन आणि अशी अनेक नावं वाचून मला काहीही फरक पडत नाही. ह्या अशा फॉर्वर्ड्सअना किती महत्व द्यायचं हे मला माहित आहे हे त्या मागचं कारण.

इथल्या लोकांनाही ते माहीत आहेच ना. आकशवाणीच्या म्हणजे सरकारी - राष्ट्रीय वार्तापत्रांंत हे सगळं सांगितलं गेलं, अगदी स्वतःच्या मनाने सांगितलं तरी,त्यावर अधिक्रुत असल्याचा शिक्का बसल्यासारखंच आहे.

बाप रे! न्युज चॅनल हे दाखवतायत! Uhoh

आता पुढे काय सांगणार? ऑक्सिजन कमी पडलं एखाद्याला तर शेणाची धुरी द्या? Lol

आता पुढे काय सांगणार? ऑक्सिजन कमी पडलं एखाद्याला तर
शेणाची धुरी द्या?>>>>>>> नै नै,गोठ्यात आयसीयु बांधायचा ,शेतकर्याला जोडधंदा.पुन्हा गिर्यारोहक ,डाइव्हर्स यांच्या टाकित शेण भरायचे ,बसा म्हणायचे ओढत.

भरत, हवेत 20% ऑक्सिजन असतो, एका श्वासात आत घेतलेल्या हवेतील सगळा ऑक्सिजन वापरला जात नाही, उरलेला ऑक्सिजन परत बाहेर सोडला जातो,
सो टेक्निकली आपण सुद्धा ऑक्सिजन ग्रहण करके ऑक्सिजन बाहर छोडते है

गोठ्यात आयसीयु बांधायचा
<<

कशाला?

डायरेक्ट पेशंटच गोठ्यात बांधा की Rofl
आय्सीयू बांधायचा खर्च वाचेल.

पल्सॉक्सीमीटर : ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन इज फेलिंग.
डॉक्टर : शिफ्ट पेशंट टू गाईज गोठा इम्मेजिएटली..

डायरेक्ट पेशंटच गोठ्यात बांधा की
पल्सॉक्सीमीटर : ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन इज फेलिंग.
डॉक्टर : शिफ्ट पेशंट टू गाईज गोठा इम्मेजिएटली..>>>> मी फुटलेच वाचुन Rofl काय हे..

काही महिन्यांपुर्वी असले फॉर्वर्ड करणार्‍यांचे अच्छे दिन चालु झाले होते
आजकाल त्या फॉरवर्डंना "राष्ट्रभक्ती देशभक्तीचे" लेबल लावले जाते.
Wink
शेवटी फोटोशॉपचे दिवस चालू आहे. कळल ना Biggrin

हे फॉरवर्ड नाही, पेपर मधली न्युज आहे, पण अ आणि अ वाटली,
स्पेशिअली 1 मिनिटाच्या आत दूध प्यायले जाणे वगैरे भाग.

##########

पन्नास रुपये चमचा दूध घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी
दुधाचा दर पन्नास रुपये चमचा असे जर सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही.
वार्ताहर, सांगली | August 19, 2016 1:36 AM
पन्नास रुपये चमचा दूध घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी

दुधाचा दर पन्नास रुपये चमचा असे जर सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र सांगलीच्या गल्लीबोळात गेले चार दिवस एक व्यक्ती एका दुभत्या प्राण्यासह फिरून पन्नास रुपये चमचा दराने दूध विक्री करीत आहे आणि हे दूध मिळविण्यासाठी महिलावर्गही अधिर असल्याचे दिसत आहे.
डेअरीत दुधाचे दर ४५ रुपये लिटर असले तरी एका चमचात मावणाऱ्या १० मिली दुधासाठी चक्क ५० रुपये मोजले जात आहेत. मात्र हे दूध गाढविणीचे आहे. एक वर्षांच्या आतील बालकाला हे दूध ताजे असताना दिले तर श्वसनविकारावर जालीम औषध समजले जाते. यामुळे या दुधाची मात्रा देण्यासाठी माता-भगिनींची गर्दी होत आहे. लहान मुलांना बदलत्या वातावरणात सर्वात अगोदर सर्दीचा त्रास सुरू होतो. या सर्दीच्या आजारात लहान मुलांची छाती भरल्याने श्वसनास त्रास होतो. हा त्रास गाढविणीचे दूध दिल्यानंतर तत्काळ कमी होत असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय लहानपणी जर मुलाला गाढविणीचे दूध पाजले तर, दमा विकार कधीही होत नसल्याचा समज आहे. याशिवाय या दुधाचा टॉनिक म्हणूनही उपयोग होत असल्याचे महिलांनी सांगितले.मात्र गाढविणीचे दूध हे ताजे असतानाच म्हणजे काढल्यानंतर अवघ्या एक मिनिटाच्या आत मुलाच्या पोटात जाणे आवश्यक असते. कारण हवेशी संपर्क आला की, या दुधाला तत्काळ जंतुसंसर्ग होत असल्याने या दुधाचे कदाचित विषात रूपांतर होण्याचा धोका असतो. यामुळे काही लोक सध्या सांगली-मिरजेतील गल्ली-बोळातून सोबत गाढविणीला घेऊन फिरत असल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून दिसत आहे. मागणी येताच तत्काळ दूध काढून देण्याची तयारी असते. विशेषत: सकाळी अनुषा पोटी हे दूध दिले जात असल्याने सकाळी ८ वाजेपर्यंतच हा व्यवसाय करण्यात येत आहे.

##############

गाढविणीच्या दुधात खरच औषधी गुणधर्म आहेत का यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

गाढवीचे दूध औषधी समजले जाते. व ते मुलांना पाजतातही. नक्की त्यात काय असते कल्पना नाही. उपयोग होतो का तेही ठाऊक नाही. हवेत ठेवून विष बिष काही होत नाही. लहानपणी वडारणीकडून पेल्यात घेऊन नीट गायी-म्हशीच्या दुधासारखं तापवून ठेवलेलं पाहिलं आहे.

५० रुपये चमचा वाला हुषार आहे. ब्रेन मॅपिंगसारखं मार्केटिंग आपोआप होतं. शेजारणीने मुलाला पाजलं की मी पाजणारच, असं.

अमृत बिंदू प्राशन(नीट आठवत नाही, काहीतरी सोन्याचा अंश वगैरे होतं) मध्ये कितपत सत्य आहे?
आम्ही केलं नाही.पण बरेच लोक करा म्हणून आग्रह करत होते

मातेच्या दूधानंतर दुसरे दूध जे बालकांना त्या खालोखाल पोषण देते, ते म्हणजे गाढवीचे दूध असे वाचनात आले होते.

Pages