भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्युझीलंडमधे लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण  प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती 1993 मधे  नेमली  होती.या समितीने  मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे  जैवरासायनिक विश्लेषण ( biochemical analysis ) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे  या सर्व रोगाचे कारण म्हणजे  जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन ,  रेड डॅनिश या काउ चे दुध हे आहे.या संशोधनानंतर या विषयावर परत   97 वेळा  विविध  तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला.सर्वांचा निष्कर्ष सारखाच  आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे  जेव्हा या शास्रज्ञांनी  भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .इतकेच नाही तर  मधुमेह  ह्रदयरोग  कॅन्सर  इ.विविध आजार दूर   करण्याची त्यामधे क्षमता आहे.भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या  रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर  बरा होतो.विचार करा आपल्या  प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते.जे आधुनिक शास्त्रज्ञांना  समजायला इतकी वर्षे लागली  की  देशी गायीचे  दुध  तूप  गोमूत्र  मानवी आरोग्यासाठी वरदान आहे  हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय .ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजून मारायला पुतना नावाची राक्षसीण आली होती  अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे  ओढवुन घेतलेले संकट आहे  असे  कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.

दुधासकट च्या सर्व पेयांबद्दल च्या दुष्परिणामांच्या पोस्ट वाचून आता दारु प्यायला चालू करावी असे वाटू लागले आहे Happy Happy
अजून फलेरो, फ्रुटी,पाव इ.इ. प्रमाणे 'ये देखो दारु मे से अळी/पिन निकली' वाली व्हॉअ‍ॅ पोस्ट आलेली नाही मला.

भरत. | 22 August, 2016 - 15:44

>> हे खरे आहे कि भोंदू फॉर्वर्ड? मला आमच्या घरी येणार्‍या गुरुजींनीसुद्धा हे सांगितले होते मागेच (फेसबुक आणि व्हॉअ‍ॅप नव्हते त्या काळात).

अजून फलेरो, फ्रुटी,पाव इ.इ. प्रमाणे 'ये देखो दारु मे से अळी/पिन निकली' वाली व्हॉअ‍ॅ पोस्ट आलेली नाही मला.

>> मला फलेरो, फ्रुटी आणि पाव तिघांविषयी बरेच फोटो आणि पोस्ट्स आल्या आहेत व्हॉअ‍ॅपवर. इथे टाकू का?

गणपती का बसवतात?

आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परन्तु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिन्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपती ला थकवा येईल, आणि पाणि ही वर्ज्य होते अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नए म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती अकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात शिरवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपती ला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवताे.

गणपती बाप्पा मोरया

Happy
काहीही...
खाऊ शकत होता तर पाणी का नाही पिऊ शकत?
आणि२४*७ सतत कुणी लिहू शकेल का? अगदी गणपती झाला तरी?

टग्या यांनी वर दिलेली पोस्ट मलाही व्हॉट्सॅपवर आली होती त्या उत्तरादाखल आलेली अजुन एक फॉर्वर्ड

गणपती का बसवतात याच्यावरती एक पोस्ट मी पाहिली पण ते विवरण पूर्णपणे चुकीचे आणि शास्त्र विरुद्ध आहे
१) वेदव्यास यांना काहीहि अशक्य नाही ते सर्वोत्तम असल्याने गणपती ची आराधना करण्याची त्यांना काहीही गरज नाही
२) तरीही त्यांनी गणपतीवर अनुग्रह करण्यासाठी त्याला महाभारताच्या लिपिकाराच्या रूपाने अवकाश दिला •
३) गणपतीच्या शरीराचे तापमान वाढण्याइतके तो काही सामान्य माणूस नाही तो जागृत अवस्थेचा प्रतिष्ठित देवता आहे
४) आणि मातीचा गणपती या मागे चातुर्मास्यात शुद्ध मृत्तिकेने प्रकृती संरक्षण या उद्देशाने नागपंचमी , गोकुळाष्टमी , पोळा ( वृषभ पूजा ) हरतालिका आणि गणपती हे मातीने बनवूच पूजा करावी असा शास्त्रनियम आहे म्हणून गणपती ची मूर्ती मातीची असावी
५) शास्त्र नियम न जाणता अश्या प्रकारचे शास्त्रविरुद्ध पोस्ट कुणीही न जाणता करू नयेत आणि गणपती ला यायला कोणत्याही पासपोर्ट किंवा तिकिटांची गरज नाही म्हणून अश्या प्रकारच्या पोस्ट करून आणि देवतांचा हास्यास्पद अपमान करू नये -
श्रीनिवासाचार्य नागरहळ्ळी Happy

मुळाक्षरे आणि आरोग्य थोडक्यात वर्ड व्हायब्रेशन थेरपी

आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो. आणि आपले आरोग्य सुधारते.

षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं, शं,षं सं  / बं, भं, मं, यं, रं, लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली. आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.

लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.

मी सातारला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या आणि  दुखणे थांबले. त्यांनी माझ्या मुलीला (मुलगी सातारला असते) फोन करून हा अनुभव सांगितला.

एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता.डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’

डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो 'कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो 'तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा!' मी सोमवारी औषधे पाठवली. ती गुरुवारी पत्ता सापडत नाही म्हणून परत आली. गुरुवारी रात्री डोम्बिवालीहून फोन आला. ‘औषधे मिळाली नाहीत पण अक्षरे म्हणून फायदा झाला.'

सातारच्या एका आजींनी (वय ७२) त्यांचे बरेच त्रास सांगितले. त्यांना बीपी, बद्धकोष्टता,  अशक्तपणा, मधेच अस्वस्थ होणे वगैरे अनेक त्रास होते. बरेच डॉक्टर झालेहोते. मी म्हटले तुम्ही पुण्याला आल्यावर मला भेटा म्हणजे मी काही औषधे देऊ शकेन फोन वरून कसे काय काही देता येणार? त्यावर त्या म्हणाल्या, 'अहो मी घरातून रिक्षापर्यंत नाही जाऊ शकत तर पुण्याला कसली येते?' मी त्यांना शिवांबू घेण्यास सुचविले. परंतु त्यांची तयारी नव्हती. मग मी त्यांना मराठीतील अक्षरे अनुस्वार देऊन कशी म्हणायची हे फोनवरच सांगितले. त्यांनी दररोज १०० वेळा ही अक्षरे म्हणायला सुरवात केली. एक महिन्यांनी दररोज दोन वेळा पुढील महिन्यात रोज तीन वेळा म्हणायला लागल्यानंतर त्यांचे फोन येणे बंद झाले.
सहा महिन्यानंतर माझ्या ऑफिसवर एक आजी मला भेटायला आल्या. म्हणाल्या, 'माझे नाव दाते. मी सातारहून आले आहे.' मला आश्चर्य वाटले. पुढे म्हणाल्या, 'मला फोन वरून सल्ला देऊन बरे करणारी व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी व तुम्हाला भेटण्यासाठी मुद्दाम आले आहे. आता माझी तब्येत ठीक आहे. मी दररोज अक्षरे म्हणते.' त्या मला भेटण्यासाठी एसटी ने पुण्याला आल्या होत्या.

माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास होता. माझेकडे राहिला आल्यावर दोन दिवसात मेदूवडे केले होते. तेलकट म्हणून वड्याचा वरचा भाग काढून दोन लहान वडे खाल्ले. थोडा त्रास वाटला. मी तिला सर्व अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. ती दररोज म्हणायला लागली अठवड्याभरानी परत मेदूवडे केले होते, तेव्हा तिने जसेच्या तसे ५-६ वडे सांबर घेऊन खाल्ले. आणि तिला बाधले नाहीत.

पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!

आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.

मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बरेचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्
रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते. आपल्याला जरूर फायदा होईल. आपले अनुभव मला जरूर कळवावेत.

मूलाधार चक्राची अक्षरे -

वं, शं, षं, सं

स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे -

बं, भं, मं, यं ,रं, लं

मणिपूर चक्राची अक्षरे -

डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं

अनाहत चक्राची अक्षरे-

कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं

विशुद्ध चक्राची अक्षरे-

अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः

अज्ञ चक्राची अक्षरे-

हं, क्षं

अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे जून २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले 'षट्चक्रे आणि आरोग्य' हे पुस्तक अभ्यासावे.

अरविंद जोशी BSc
९४२१९४८८९४

वरिल लेखाला ग्रंथाधार शास्त्राधार आहे की नाही मला माहीत नाही. ज्या अभ्यासूंना ग्रंथाधाराची गरज वाटते त्यांनी ग्रंथ शोधावेत मला विचारू नये. माझे काम अनुभव घेणे व फायदा झाला तर इतरांना सांगणे हे आहे.

सातचक्रे कुणाला दिसली तर फोटु टाकावा ,हायला इतके स्पाईन सर्जन्स आहेत जगात त्यांना काब्रे ही चक्रे दिसली नसावीत.

सिंजी तुम्ही डिस्क्लेमर वाचलं नाही का?

ज्या अभ्यासूंना ग्रंथाधाराची गरज वाटते त्यांनी ग्रंथ शोधावेत मला विचारू नये. माझे काम अनुभव घेणे व फायदा झाला तर इतरांना सांगणे हे आहे.

टग्या द्या टाळी,
माझे पुरणपोळीचा डाएट वाले हेच अरविंद जोशी (त्या fwd मध्ये यांची डिग्री वैद्य होती, इकडे bsc झाली आहे )
या जोशी बुवांनी आमच्या बिल्डिंग च्या व्हाट्सअँप गृप वर धूम माजवली आहे, i think he is seriously into whts app mkting.

स, य , न, स किंवा व, ज्ञ, न ही अक्षरं जास्त वापर्ली किंवा त्यापासून बनणार्‍या शब्दांवर (उदा. सायन्स, विज्ञान) जास्त विश्वास ठेवला की अनेक विविध रोग होतात. त्यासाठी पाश्चात्य औषधं घ्यावी लागतात. डॉ लोकांना उगाच पैसे द्यावे लागतात. त्यामुळे ही अक्षरं चुकूनही उच्चारु नये.
आपल्या महान भारतभू मध्ये अनेक, जगात भारी उपट्सुंभ वैद्य आहेत, फक्त त्यांनाच पैसे द्यावे.
मी पण आता वैद्यगिरी सुरु करणारे. लोकांनी उपचारासाठी माझ्याकडेच यावे. माझी डिग्री, शिक्षण वगैरे विचारु नये. मी स्वतः घरी बसून आत्मज्ञानाने सगळं शिकली आहे आणि खुप वरची आध्यात्मिक पातळी गाठली आहे. एवढे पुरेसे आहे ना मला पैसे द्यायला? Wink

उडप्याच्या हाटेलात आधी अक्षरे म्हणुन घ्यायची सोय करायची. अक्षरे म्हटली की पित्त गायब अन् मेदुवडे हाणायला गिर्‍हाइक मोकळे. पुढल्या वेळी वैशाली/वाडेश्वर वगैरेला गटग केले तर मोठ्याने सर्वांनी अक्षर-उच्चारव करा (सकाळी फिरायला जाणारे ॐ म्हणतात तसे). त्या मालकाला पण ही आयड्या द्या.

बाकिच्या अनुस्वारांकित अक्शरांची कल्पना नाहि, परंतु स्वत:च्या मुलांना झोपण्यापुर्वि "शूऽऽऽ" म्हणत हमखास शू करायला लावण्याचा अनुभव आहे... Proud

झेंडूची फुले
माझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे.  या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव खाली देत आहे. 

झेंडू (नारिंगी किंवा पिवळा ):

झेंडूच्या फुलाच्या पाण्याने खोकला जातो. मला याचा खूप फायदा झाला व होत आहे.

* मुंबई च्या  सौ ठाकूर ह्यांनी मला बुधवारी संध्याकाळी फोने करून सांगितले की त्यांचे मुलाचे (वय ६) लघवी तुंबण्याचे ऑपरेशन करायचे आहे. पण गेले महिनाभर त्याचा खोकला थांबत नाही. डॉक्टरांची औषध चालू आहेत उपयोग नाही व खोकला आला की त्रास होतो. डॉक्टर खोकला थाबमल्याशिवाय ऑपरेशन करायला तयार नाहीत. काहीतरी औषध सांगा. मी त्यांना विचारले मुंबईत तुम्हाला झेंडू चे फुल मिळेल का? त्या हो म्हणाल्या. मी त्यांना सांगितले, आज एक फुल आणून त्याच्या पाकळ्या एक भांडेभर पाण्यात भिजत घाला, उद्या सकाळी पाकळ्या बाजूला करून ४-४ चमचे पाणी ४-५ वेळा दया. व हे पाणी चालू ठेवा शुक्रवारी संध्याकाळी ४:३० ला फोने आला की मुलाचा खोकला थांबला , मुलाचे ऑपरेशन ठरविले आहे. (लहान मुलांना हे पाणी देतांना त्यात चवीसाठी थोडी साखर घातली तरी चालते.  

* माझे मित्र श्री संजय विश्वास हे मुंबई ची तीन दिवसांची ट्रीप करून आले. मी त्यांना फोन केला तेव्हा ते  खूपच खोकत होते, म्हणून त्यांना झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले, ते त्यांनी घेतले.  परत दुसरे दिवशी फोनवर बोलण्याचा योग्य आला त्यावेळी खोकला नव्हता.

* 'मी निर्माल्य औषध' म्हणून लेख प्रसिद्ध केला. तो वाचून एक ७२ वर्षाच्या गृहस्थानी फोन  करून सांगितले की मला गेली २५ वर्षे खोकला होता, तुमच्या लेखा  प्रमाणे  झेंडूचे पाणी घेतले व माझा खोकला  आता थांबला आहे.

* झेंडूच्या पाण्यानी डोळे धुतले असता डोळ्यातील पाणी, कफ घट्ट होतो व बाहेर पडतो व दिसण्यात सुधारणा होते.

* मला स्वयंपाक करताना फोडणीचे गरम तेलाचे थेंब हातावर पडून भाजले. आग खूप होत होती. त्यावर मी झेंडूचे फुलाचे पाणी थोडेसे चोळले. १५ मिनिटात आग थांबली. २ तासांनी मी भाजले आहे हे विसरलोसुद्धा. दुसरे दिवशी फोड आले नाहीत.
 
*माझा मित्र अरविंद जोग याला कफाचा त्रास होता. म्हणून मी त्याला झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले, त्याला खूप फायदा झाला. त्याचे मित्र कॅप्टन विनायक जोशी यांना कफ व खोकल्याचा त्रास झाला, एक्सरे काढल्यावर डॉक्टरांनी सांगितले पूर्ण छाती कफाने भरली आहे. जास्त कफ वाढल्याने ब्रॉन्कायटिस होई, जोग ने त्यांना झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले. जोगवर विश्वास ठेऊन त्यांनी पाणी चालू केले. चार दिवसात कफ कमी झाला. ह्या दिवसात त्यांचे सिगरेट ओढणे चालूच होते. एक महिन्याने जोग च्या सांगण्यावरून पुन्हा एक्स रे काढला, तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले ब्रॉन्कायटिस. अहो छाती तर एकदमच क्लीअर आहे. जोशींनी त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलचा आधीचा एक्स रे दाखवला. डॉ 'ह्याप्रमाणे बरोबर आहे. तुम्ही काय केलेत,' 'एक घरगुती औषध' (जोशींनी झेंडूच्या पाण्याबद्दल सांगितले नाही).  
वैद्य अरविंद जोशी
+९१९४२१९४८८९४

बापरे काहीही मेसेजेस लोक विचार न करता कसे पुढे ढकलतात ?

ते A2 दूध खरचं चांगलं आहे का ? डोंबिवलीत मिळत, माझी आई घेते आहे एका गवळ्याकडून.

लकवा (पँरालिसीस):

मिरज पासुन ७० कि.मी चिक्कोडी पासुन १० किमी.
"नागरमुनोळ्ळी ता.चिक्कोडी जि.बेळगाव."

चिक्कोडी पासून १० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे, त्या गावा मध्ये श्री डाँ .पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाँक्टर आहेत, ते फक्त लकव्या/ पँरालिसीस वरच औषध देतात, लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, ते १००% बरा होनारच. पेशंटचे केस पेपर्सचे फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईंजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता परीयेंत ३०-३५ पेशंट पाठवल जे गेले अँब्युलन्स मध्ये पन आले चालत... ते सर्व आता चालतात फिरतात... नाँरमल आहेत. जर कोणाला माहिती हवी असेल तर ते मला कधीही फोन करू शकतात. आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.

कसे जानार?
मार्ग-: १
मिरज- चिक्कोडी- नागरमुन्नोळी

कोल्हापुर -कागल- चिक्कोडी नागरमुन्नोळी

टीप:- चिक्कोडी वरून गोकाक जानारी बस पकडणे

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल

VPS Kolhapur
Mob:-9021237236, 8421755550

पियू, या डॉक्टरांविषयी बरेच ऐकून आहे. त्याबाबत शहरातल्या डॉ. ना विचारल्यावर ते म्हणाले की ते इंजेक्शनातून काय देतात ते शिक्रेट त्यांनाच ठाऊक. बाकी त्यासोबत जी औषधे लिहून देतात (त्यांच्या शब्दात - मालमसाला) ती जनरल सप्लिमेंटरी औषधे असतात, जी आम्ही डॉक्टरपण देतो आणि मेडिकल दुकानांमध्ये मिळतात. आमच्या गावातच त्या (आयुर्वेदीक) डॉक्टरांकडून बरे झालेले काही रुग्ण आहेत. त्या रुग्णांच्या मते ते आधी अंथरुणाला खिळलेले होते आणि सध्या हिंडून फिरून आहेत.

लकव्याच्या बाबतीत कुठेतरी असे ऐकले होते की काही/बहुतांश प्रकारचे लकवे हे बरे होणारे असतात.

*ॐ के 11 शारीरिक लाभ:*

*ॐ* : _ओउम् तीन अक्षरों से बना है.._
*_अ उ म् ।_*

*"अ"* _का अर्थ है उत्पन्न होना,_
*"उ"* _का तात्पर्य है उठना, उड़ना अर्थात् विकास,_
*"म"* _का मतलब है मौन हो जाना अर्थात् "ब्रह्मलीन" हो जाना।_

*ॐ* सम्पूर्ण ब्रह्माण्ड की उत्पत्ति और पूरी सृष्टि का द्योतक है।
*ॐ* का उच्चारण शारीरिक लाभ प्रदान करता है।

जानीए
*ॐ* कैसे है स्वास्थ्यवर्द्धक और अपनाएं आरोग्य के लिए *ॐ* के उच्चारण का मार्ग...

01. *ॐ* और थायराॅयडः-
*ॐ* का उच्‍चारण करने से गले में कंपन पैदा होती है जो थायरायड ग्रंथि पर सकारात्मक प्रभाव डालता है।

02. *ॐ* और घबराहटः-
अगर आपको घबराहट या अधीरता होती है तो ॐ के उच्चारण से उत्तम कुछ भी नहीं।

03. *ॐ* और तनावः-
यह शरीर के विषैले तत्त्वों को दूर करता है, अर्थात तनाव के कारण पैदा होने वाले द्रव्यों पर नियंत्रण करता है।

04. *ॐ* और खून का प्रवाहः-
यह हृदय और ख़ून के प्रवाह को संतुलित रखता है।

05. *ॐ* और पाचनः-
ॐ के उच्चारण से पाचन शक्ति तेज़ होती है।

06. *ॐ* लाए स्फूर्तिः-
इससे शरीर में फिर से युवावस्था वाली स्फूर्ति का संचार होता है।

07. *ॐ* और थकान:-
थकान से बचाने के लिए इससे उत्तम उपाय कुछ और नहीं।

08. *ॐ* और नींदः-
नींद न आने की समस्या इससे कुछ ही समय में दूर हो जाती है। रात को सोते समय नींद आने तक मन में इसको करने से निश्चिंत नींद आएगी।

09. *ॐ* और फेफड़े:-
कुछ विशेष प्राणायाम के साथ इसे करने से फेफड़ों में मज़बूती आती है।

10. *ॐ* और रीढ़ की हड्डी:-
ॐ के पहले शब्‍द का उच्‍चारण करने से कंपन पैदा होती है। इन कंपन से रीढ़ की हड्डी प्रभावित होती है और इसकी क्षमता बढ़ जाती है।

11. *ॐ* दूर करे तनावः-
ॐ का उच्चारण करने से पूरा शरीर तनाव-रहित हो जाता है।

आशा है आप इसे उन लोगों तक भी जरूर पहुंचायेगे जिनसे आप प्यार करते हैं और जिनकी आपको फिक्र है ।

गुडघे बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी.....

ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे....
गुडघे कधीही बदलू नका. प्राकृतिक चिकीत्सा केंद्र..

साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी कर्ज काढून तयार होतात.
परीणाम.... अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.
यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे. जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....

शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली बाभूळ या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता. असो, या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत. आहे की नाही गंमत....
आपणास पोस्ट आवडल्यास पुढे पाठवा, खरे पुण्य पदरी पाडून घ्या !!!

डाॅ.पवन कुमार(नॅचरोपॅथी) ग्रेटर नाॅयडा हे मूळ लेखक - 07838037030

बेळगाव च्या जवळ एका डॉक्टरांकडून/वैद्यांकडून मित्राच्या ८०+ वय असलेल्या वडिलांच्या बाबतीत खूप सुधारणा झाल्याचा थेट अनुभव त्याच्याकडूनच ऐकला आहे. ते हेच डॉ की माहीत नाही.

@पियू, त्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे बाभळीचा उपयोग गुढगेदुखीवर होत नाही याचा तुम्हाला अनुभव आहे का? नाही तर तुमचीच पोस्ट भोंदू ठरेल Wink

अनेकदा वरवर अशक्य वाटणार्‍या गोष्टीत तथ्य असू शकते. स्पाँडीलायटीसच्या असह्य वेदनांमुळे मणक्याचे ऑपरेशन ठरलेले असताना, केवळ झाडपाल्याचा लेप लाऊन ते दुखणे बरे झाल्याचे उदाहरण माझ्याच घरात आहे. मग आमच्या सांगण्यावरून आणखी १०-१२ जणांनी तो उपाय करून बघितला तर त्यातल्या अनेकांनाही गुण आला. गुण येण्याचे प्रमाण ९०% नक्कीच असेल.

त्यामुळे प्रत्येक झाडपाल्याची पोस्ट भोंदूच असते ही अंधश्रद्धा पसरवू नका - स्वतः किंवा स्वतःसमोर इतर कोणी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय.

<<<चिक्कोडी पासून १० कि.मी.नागरमुन्नोळी म्हणून गाव आहे, त्या गावा मध्ये श्री डाँ .पांडुरंग कुंभार म्हणून आयर्वेदिक डाँक्टर आहेत, ते फक्त लकव्या/ पँरालिसीस वरच औषध देतात, लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, ते १००% बरा होनारच. पेशंटचे केस पेपर्सचे फक्त ५०/- रुपये घेतले जातात व ईंजेक्शनचे २०० रूपये. महिन्यात फक्त ५ वेळा विझीट द्यावी लागते पन पेशंट १००% कव्हरच होतो मित्राच्या वडिलांचा अनुभव आहे मित्राने आत्ता परीयेंत ३०-३५ पेशंट पाठवल जे गेले अँब्युलन्स मध्ये पन आले चालत... ते सर्व आता चालतात फिरतात... नाँरमल आहेत. जर कोणाला माहिती हवी असेल तर ते मला कधीही फोन करू शकतात. आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.<<<

या डॉक्टरबद्दल ऐकलय. आमच्या प्युनची आई अगदी ठणठणीत बरी झालीये. अग्दी झोपुन होती. आधी १० दिवस चांगल्या दवाखान्यात एडमिट केल. ६०,०००/- खर्च केला तरी उपयोग झाला नाही ,
मग त्याने या डॉक्टरकडे नेले. पायाच्या घोट्यात आणि कंबरेत इंजेक्शन देतो तो डॉक्टर असं ऐकले आहे.

Pages