मायबोली गणेशोत्सव २०१४ "बाप्पा माझ्या मनातला"- विनार्च (अनन्या)

Submitted by संयोजक on 23 August, 2014 - 07:43
हाय! मी आहे अनन्या!
ananya_clay_doll.jpg
यावर्षी मायबोलीच्या गणेशोत्सवात मला गणपती तयार करायचे आहेत, हे आईने मला सांगितल्यावर जो आनंद झालाय ! मी तर नाचायलाच लागले. त्या नादात माझ्या पायाला पण खरचटलं...पण फिकर नॉट! मी आईला विचारलं "जास्तीत जास्त किती बनवू शकते?" ती म्हणाली, "बनव पाच- सहा". मग मी आठ बाप्पा तयार केले. शेवटचा बाप्पा तयार करत असताना आई म्हणाली ,"एक बनवायला पण शिकव ना...किती भाव खाशील?" म्हणून मग एक टिटोरियल पण केलं आहे हं! आईने थांबवल म्हणून हे आठच बाप्पा आहेत. नाही तर डोक्यात इतक्या आयडिया होत्या की काय सांगू ! तर बघा कसे झाले आहेत माझे गणपती बाप्पा-

१) गादीवर आरामात झोपून,मागे लोड ठेवून विचार करण्याची पोझ म्हणजे माझी आवडती :-) मी अशी कित्तीही तास बसू शकते, म्हणून हा बाप्पा -
ananya ganesh_1.jpg

२) मी एक Secret सांगू? मला ना बाबाच्या गोष्टी वापरायला खूप मजा येते. जसं की त्याचा टी-शर्ट,पँट,बेल्ट,घड्याळ... हा बाप्पा पण तसाच आहे. शंकर बाप्पाचा म्हणजे त्याच्या बाबाचा साप पोटावर बांधलाय त्याने बेल्टसारखा :फिदी:

ananya ganesh_2.jpg

३) माझा फेव्हरेट बाप्पा माझ्यासारखा असणारच ना! मग मी कशी "यो" आहे तसा हा बाप्पा पण "यो"
ananya ganesh_3.jpg

४)हा बाप्पा पहा कसा पुस्तक वाचत मस्त पहुडलाय चटईवर.....आणि आई फोटो काढतेय म्हणून तिच्याकडे बघतोय
ananya ganesh_4.jpg
ananya ganesh_5.jpg

५) बाबा माझा फेव्हरेट आहे ना आणि त्याचं फेव्हरेट क्रिकेट, म्हणून हा बाप्पा....बाबासाठी खास!
ananya ganesh_6.jpg

६) हा माझा सिनियर बाप्पा...माझ्या आवडत्या 'हॅमर किक'ची प्रॅक्टीस करताना...
ananya ganesh_10.jpg

(मला पण आता लवकरच ब्लॅक बेल्ट मिळणार आहे :-) )


७) हॅरी पॉटरच्या शाळेत छोट्या-शिशूमध्ये दाखल झालेला बाप्पा.....उडायचे प्रयत्न चालले आहेत त्याचे!
ananya ganesh_9.jpg

८) आणि हा शेवटचा एकदम साधा सोप्पा बाप्पा! हा कसा बनवायचा हे खालच्या व्हीडिओत दाखवलंय मी-
ananya ganesh_8.jpg


कसे वाटले माझे सगळे बाप्पा? नक्की सांगा हं! :-)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

WOW
तुझ्या बोटांमध्ये खरच जादू आहे. उत्तरोत्तर तुझी कला बहरत राहू दे ही शुभेच्छा!
हॅरी पॉटर बाप्पा माझा फेवरिट Happy

वॉव अनन्या किती सुंदर मुर्त्या अगदी सहज बनवल्या आहेस! एखादी मुर्ती/चित्र घेउन त्यानुसार मुर्ती तयार करण समजु शकते पण वेग वेगळ्या कल्पना वापरुन ते इतक्या सुंदर मुर्त्या बनवल्या आहेस. सिंपली अमेझिंग! मी तुझी फॅन झाली आहे Happy

किती भरभरून कौतुक केलं आहे सगळ्यांनी....तुम्हा सगळ्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. तुमच्या प्रोत्साहनामुळेच अनन्या इथवर आली आहे...या पुढेही असंच प्रेम देत रहा माझ्या लेकीला Happy
इतकी सुंदर संधी दिल्याबद्दल संयोजकांचे तसेच माबो प्रशासनाचे आभार ___/\___ Happy
मिर्ची लेकाने केलेला बाप्पा नक्की टाक इथे.

ग्रेट, ग्रेट आणि ग्रेट .....

अनन्या, सिंपली रॉकिंग ....

कीप इट अप ...

(अवांतर - ते व्हिडिओ शूटिंग जरा जास्त प्रकाशात परत घेणार का ?? - खूपच सुरेख घेतले आहे पण प्रकाश खूप अपुरा वाटतोय ... Happy )

अनन्या, खूप खूप शाबासकी. किती टॅलेंटेड आहेस तू!! तुला आम्ही गेल्या ३-४ वर्षांपासून तुझे वेगवेगळे कलागुण दाखवताना पाहतोय. अशीच प्रगती करत रहा! Happy
व्हिडीओही आवडला.

फारच छान आहेत सगळेच बाप्पा!
अनन्या, अशीच नवनवीन कला तुझ्याकडून निर्माण होऊ दे.
कीप इट अप !!

कसले भारी झालेत एकेक गणपती..... !!
अनन्या.....कमाल आहेस तू...जादू आहे तुझ्या बोटात !
किती सहज केलं आहेस सगळं ..... कीप इट अप Happy
बाप्पा तुझ्या सगळ्या कलांना शिखरापर्यंत पोचवो Happy

खूप सुंदर, रसरशीत वेगळेपण आहे कलेत. लोळणारा, पुस्तक वाचणारा, हॅमर किक, बाबाचा साप, हॉगवार्ट्स विद्यार्थी......एकसे एक कल्पना आणि कलाकृती. प्रसन्न वाटलं!

अनन्या गोडुली, अगं कित्ती छान छान बाप्पा केलेयस. खरंच असं वाटतंय कि बाप्पाला तुझ्याच हातुन वेगवेगळ्या रुपात दर्शन द्यायचं होतं... कित्ती ती वरायटी. खुप खुप कौतुक तुझं. शाळा, अभ्यासाबरोबर या ही कला तितक्याच आवडीने जोपासतेयस. आणि तुझ्या या कलागुणांना प्रोत्साहन, प्रेरणा, पाठिंबा देणार्या तुझ्या पालकांचेही तितकेच वा कणभर जास्तच कौतुक आणि शुभेच्छा.... Happy

ओहो, मस्त... शाब्बास अनन्या!!
बाप्पा तर छानच, आणि ती छोटी अनन्या पण खूप आवडली

अनन्या, अफलातून सुंदर कल्पना आणि तितकीच देखणी कृती! बाप्पाचं प्रत्येक रूप आवडलं.

ग्रेट कलाकार आहेस!

ब्लॅकबेल्टसाठी शुभेच्छा!

Pages