लागणारे जिन्नसः
मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.
कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग व्यवस्थित हलवून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण पातळ वाटू शकते. घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.
स्वतंत्रपणे रंगीत उकड छानपैकी मळून घ्यायची.
HH चा 'उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)' धागा उघडून त्यातल्या सर्व सुचनांचे पालन करत मोदक वळण्याचा सराव करावा.
हे केलेले मोदक खाण्याचा मोह आवरावा.
केलेल्या मोदकांचा फोटो काढावा आणि आपल्या घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांना बोलावून केलेले मोदक आणि रंगीत उकड त्यांच्या हवाली (सुपुर्त) करावी.
काढलेले फोटो त्वरीत मायबोलीवर डकवावे तोवर तुम्ही केलेले मोदक आणि उकड दोन्ही सत्कार्णी लागणार ह्याची खात्री बाळगावी.
अशाप्रकारे घरच्या घरी हव्या त्या रंगाचा स्वस्तात मस्त आणि रसायन, पॉलिमर मुक्त प्ले डो १५ मिनिटात तयार.
अधिक टिपा:
खेळून झाले की हा क्ले प्लास्टीक पिशवीत गुंडाळून ठेवल्यास पुनर्वापर वापरता येतो.
भन्नाट कल्पना. एक्दम आवडेश!
भन्नाट कल्पना. एक्दम आवडेश!
काल विचारायचे राहीले हा क्ले
काल विचारायचे राहीले हा क्ले किती दिवस टिकतो?
रूनी, हा क्ले वापरून झाल्यावर
रूनी, हा क्ले वापरून झाल्यावर प्लास्टीक पेपर मध्ये गुंडाळून ठेवल्यास बराच दिवस टिकतो. ह्यापासून बनवलेल्या कलाकृती सुकल्यावर उलत नाहीत. तसेच त्याही खराब होत नाही.
हा क्ले बनवताना सायट्रीक
हा क्ले बनवताना सायट्रीक अॅसिड का वापरायचे हा प्रश्न पुर्वीच्या धाग्यावर विचारला गेला होता. तर क्ले बनवताना क्रीम ऑफ टार्टर (Potassium bitartrate) पण वापरले जाते. व त्यालाच पर्याय म्हणून सायट्रीक अॅसिड वापरतात. तर हे सायट्रीक अॅसिड घातल्याने बनणारा क्ले हाताला चिकटणारा (स्टीकी) होत नाही व वारायला सोपा पडतो.
धन्यवाद नलिनी.
धन्यवाद नलिनी.
नलिनी, मनापासून लाखो
नलिनी, मनापासून लाखो धन्यवाद!!
काल खूपच उपयोग झाला या कृतीचा. कुठल्याही प्राण्याच्या घराचं मॉडेल बनवायचं होतं. ही अशी चिकणमाती बनवून त्याचे छोटे दगड करून वाघाची गुहा बनवली.
खूप सोपी आहे पद्धत आणि हाताळणी. फार पसार्याचं प्रकरण होत नाही.
शांडील्य... स्माईलीज छानच
शांडील्य... स्माईलीज छानच आहेत !
धन्यवाद! मंजूडी, फोटो काढले
धन्यवाद!
मंजूडी, फोटो काढले असल्यास आम्हाला पण नक्की दाखवा.
दिनेशदादा, तू त्याचे म्हणने लगेच मान्य केलेस.
कुकूच म्हण.
मंजुडी बरं झालं सांगितलंस
मंजुडी बरं झालं सांगितलंस
नलिनी ताई थँक्स
हो ना, नाव जरा कठीणच आहे..
हो ना, नाव जरा कठीणच आहे.. त्याचाकडून उच्चार शिकून घ्यावा लागेल.
किती रमलाय शांदिल्य. मस्तच
किती रमलाय शांदिल्य. मस्तच
मस्तं आयडिया आहे. सुट्टीतले
मस्तं आयडिया आहे.
सुट्टीतले उद्योग म्हणून मुलांसाठी बनवलंय हे.
मज्जाच मज्जा चालू आहे.
हे डो. आमच्या गावात हेच तीन रंग होते.

ही मुलांची कलाकारी

एवढी गंमत बघून बाबाही खूश झाले. ही बाबांची कलाकारी-

धन्यवाद गं !