माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १
http://www.maayboli.com/node/49174
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - २
http://www.maayboli.com/node/49191
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ३
http://www.maayboli.com/node/49208
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ४
http://www.maayboli.com/node/49218
माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ५
आजचा ५ वा दिवस होता. दुपारच्या थांब्यापर्यंतचं अंतर जास्त होतं. नेहमीप्रमाणे सकाळी १.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वांनी प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. नेहमी प्रमाणे सगळ्यांच्या मागे पडले. पाय दुखु लागले. तरीही चालत होते. रस्त्यावर अंधार असायचा , आजुबाजुचे काही दिसायचे नाही , सुर्य लवकर उगवु नये असं वाटायचं कारण सर्य उगवल्यावर उन खुप लागायचं आणी चालण्याचा वेग खुप कमी व्हायचा. साधारण ६.३० ला सुर्योदय होत
असे. ७.३० वाजेपासुन उन्हाचे चटके लागायला सुरुवात होते. रात्री गारवा असल्याने प्रसन्न वाटायचं भराभर चालल्याने बरेचसे अंतर कापले जायचे. ४थ्या दिवसापासुन लवकर उठुन पुढे ४ वाजताच्या दरम्यान रोडवरच एखादया ठिकाणी
थांबा घेउन ४५ मिनिटे ते १ तास विश्रांती घ्यायचो. ४ थ्या दिवशी मला उशीर झाल्याने १५ मिनिटांची विश्रांती मिळाली होती पण नंतर खुप उशीर होत असल्याने मी विश्रांतीशिवाय चालत होते आणी माझ्यामुळे माझ्याबरोबर चालणार्यांना सुद्धा विश्रांती मिळत नव्हती. रोज बरोबर सकाळी ५ वाजता टेम्पोत सी.डी. प्लेयर वर साईबाबांची काकड आरती लावली जाते. टेम्पोला मागे लाऊडस्पीकर लावल्याने निदान थोड्या दुरवर असुनही आवाज ऐकु यायचा पण नंतर तोही ऐकु येत नसल्याने आपण कीती मागे राहीलोत याचा अंदाज येत नसे. मला आश्चर्य वाटायचे की माझे भाउ जे डीसेंबर मध्ये पदयात्रा करतात आणि ते हि६ व्या दिवशी शिर्डीत दाखल होतात ते कसे जात असतील. उन्हाचा तडाखा इतका जास्त नसला तरीही थंडी भरपुर असते आणी दिवसाला ते ५० कीमी अंतर कापतात, शेवटी आपल्या शरीराचं वजन तर आपल्यालाच उचलायंच असतं. कीती त्रास होत असेल त्यांना.
बर्याच वेळाने रोडवरच्या थांब्यावर पोहोचलो तेव्हा सगळे उठुन निघण्याच्या तयारीत होते. आज आराम मिळाला नाही, ५ वाजता काकड आरती सुरु झाली. पुन्हा मागे पडलो. पाय आणी अंगं अतिशय दुखत होते. साधारण ६ वाजेच्या दरम्यान
त्र्यंबकेश्वर पार केलं , अंजनेय पर्वत असं काहीसं नाव असलेल्या ठीकाणी मारुतिची खुप मोठी मुर्ती बसवली आहे. पुर्वी हे मारुतीचे जन्मस्थळ आहे असे सर्व मानत व तसा बोर्डही लावला होता. आता बोर्ड बदलुन टाकलाय. जाउन दर्शन घेतले. त्यापुढे ५ मिनिटांवर चहा-नाश्त्याचा थांबा होता. तेथे द्राक्षांचा मळा होता, घरे होती आणि अंगणातच गाईं - म्हशींचा गोठा होता. गेल्या वर्षी गोठा व घरे तोडुन बिल्डींग बांधलीये. नाश्ता करुन थोडावेळ आराम केला. प्रवासाला सुरुवात केली. रस्ता अरुंद व सरळ होता. आता कुठे वाहनं दिसायला सुरुवात झाली. ह्यावारीला गेलो तर त्र्यंबकेश्वरपासुन ते नाशिक ह्या
रस्त्याचे एक्स्पांशन होत असल्याने पुर्ण रस्ता खोदल्याने चालायला खुपच त्रास झाला. धुळीच्या लोटांमुळे समोरचे बर्याचदा दिसतही नव्हते. एकेरी रस्ता चालु होता तो पण खडबडीत त्यात वाहनांची ये-जा चालु होती. दुपारचा थांबा मेहरावणी तलावाजवळ नाईक मळ्यात होता. उन चढलं होतं. पायाचे तुकडे पडले होते. अंग दुखत होतं , सुजलं होतं. सगळयात शेवटी १२.३० च्या दरम्यान नाईक मळ्यात जाउन पोहोचलो.
बायका आधीच तळ्यावर गेल्या होत्या. जेवणाची तयारी चालु होती. पुरुषांनी पेरुच्या झाडांखाली आरामासाठी जागा पकडल्या होत्या. २-३ बायका मळ्याच्या राखणदाराच्या घराच्या ओसरीवर बसल्या होत्या. तिथेच बाहेर उन्हात चटई टाकली होती. मी ईतकी थकले होते की सुर्य डोक्यावर होता खुप कडक असुन सुद्धा त्या चटईवर झोपुन गेले. १ तास झोप काढल्यावर उठले, थोडंसं बरं वाटलं . आंघोळीचा स्पॉट लांब होता आणी तितकं चालण्याची माझ्यात ताकद नव्हती मी आजही आंघोळीला सुट्टी द्यायचे ठरवले पण बाजुला बसलेल्या बायकांनी सांगितले की राखणदाराच्या घराच्या मागे छोटं बाथरुम आहे त्याठीकाणी आंघोळ करुयात. घराच्या पाठीमागे कमरेपर्यंत उंचीचे बाथरुम होते वाडीत जरा लांब बाकीचे
पुरुष पदयात्री पहुडले होते. मग बसुनच आंघोळ केली तो पर्यंत बायकांनी बाहेर लक्ष ठेवले. एकेकीने अशीच आंघोळ केली तोपर्यंत आम्ही बाहेर लक्ष ठेवले. आता प्रत्येक दिवसाच्या आंघोळीसाठी मी एक एक घर शोधुन ठेवले आहे पण ह्याच
थांब्याला कुणी नाही म्हणुन दरवर्षी याच थांब्याला मी आंघोळीला सुट्टी देते कारण जो तलाव आहे तो खुप लांब ही आहे
आणी काठावर मिलीटरी कॅम्प असतात, प्रायव्हसी नसते.
थोड्या वेळाने बायका तळ्यावरुन आंघोळ करुन आणी कपडे धुवुन येउ लागल्या. आल्यावर सावलीची जागा पकडण्यासाठी भांडाभांड झाली. सगळे बसल्यावर मी सुद्धा एक जागा पकडुन बसले. अंग दुखत होतं पाय कसेबसे टेकवत टेकवत चालत होते. जेवण झाल्यावर कॉम्बिफ्लेम घेउन पुन्हा झोपले. ३ वाजता निघालो, साधारण १० की.मी. चालल्यावर नाशिक मधे प्रवेश करणार होतो. नेहमी प्रमाणे ६.३० - ७ च्या दरम्यान कसे बसे नाशिकच्या सातपुर फायर ब्रिग्रेड स्टेशन वर पोहोचले.
आजचा थांबा तिथेच होता. हातपाय धुवुन थोडा आराम केला. आरती सुरु झाली , आज साईबाबांच्या फोटोत २ महीन्यांपुर्वी वारलेल्या आजीचा चेहरा दिसत होता. मी तिची लाडकी होते. आठवुन आठवुन डोळ्यात पाणी येत होते. जेवणाची तयारी झाली. ५ व्या दिवशीचे जेवण दरवर्षी फायर ब्रिग्रेड वाले देतात. छान भजीचा बेत असतो. १०.३० ला झोपले.
रात्री १२.३० ला सर्व उठलो. आजचा ६ वा दिवस , आज खुप जास्त चालायचं होतं, नाशिक पार करायलाच जवळपास ५-६ तास लागतात. दिवसभराचं अंतर खुप नेहमी खुप जास्त होतं. नेहमी प्रमाणे सुरुवात केली. अगदी १५ मिनिटातच नवीन जोडप्यातील मुलगी जी माझ्यागी मागे चालत होती ती गाडीत बसली. मलाही विचारले गाडीत बसण्यासाठी विचारण्यात आले. मी नकार दिला आणी चालु लागले. चालुन चालुन पाय फूटायची वेळ आली होती. अंग पण ठणकत होतं औषध घेतल्यावर जितका वेळ आराम केला तितका वेळ थोडंसं बरं वाटायचं पण जसं चालायला सुरुवात करायचे तसं दुखणंही चालु. पुर्ण नाशिक झोपलेलं असल्याने रस्ता मोकळा होता,, स्ट्रीटलाईटस असल्याने उजेड होता. खुप चालल्यावर साधारण ४.००-४.१५ ला फुटपाथवर आराम करायला मिळाला. मंडळी आधीच पोहोचली होती. मला ३० मिनिटांचा आराम मिळाला पण दुखण्यामुळे गाढ झोप नव्हती. पुन्हा उठुन चालायला लागलो. नाशिकचा शेवटचा फ्लायओवर पार केला, खाली रेल्वे स्टेशन होतं आणी सर्वांना नाशिक पार केल्याचा आनंद झाला. आजचा रस्ता सपाट असल्याने आणी गमछाचा सपोर्ट असल्याने आज मी नेहमीपेक्षा थोडं लवकर चालत होते , तरीही सगळ्यांच्या मागे होते, जवळपास अर्धा तास मागे होते. पुढे चहा नाश्त्याच्या थांब्यावर ७.३० वाजता पोहोचले. नाश्ता केला आणी झोपुन गेले, तेवढ्यात पदयात्री पुरुषांमधे भांडण जुंपले तेही एका अति क्षुल्लक कारणावरुन. थोड्यावेळाने निघालो. दुपारचा थांबा सिन्नर घाटाखाली होता. तो पर्यंत खुप (जवळपास १८ की.मी.) चालायचे होते. सुरुवात केली. खुप उन होतं, खुप वाईट अवस्था झाली. जवळपास बाकी मंडळींपासुन १.३० ते २.०० तास मागे पडले. सरळ रोड होता. रस्ता खुपच अरुंद होता. दोन्ही बाजुंनी वाहनांची खुप वर्दळ होती. वोल्वो बसेस, साध्या बसेस , कार व दुसरी पदयात्री मंडळे सगळे एकत्र आल्याने चालणे कठीण वाटत होते. उन्हाचाही खुप त्रास व्हायला लागला. शेवटी १२.३० ला सिन्नर घाटाजवळ पोहोचलो. आधीची लोकं १०.३०-११.०० लाच पोहोचली होती.
मी पोहोचल्या पोहोचल्या झोपुन गेले. बर्याच वेळाने उठुन आंघोळीला गेले. आंघोळीचा स्पॉट इथुन अजुन अर्धा की.मी. लांब होता. आंघोळ करुन परतले. तो शिर्डी संस्थानची अॅम्ब्युलन्स आली, डॉक्टर्स होते. सर्वांना मोफत गोळ्या, ऑईंटमेंट, ईलेक्ट्रालच्या पाउडरचे सॅशे मिळाले, स्प्रे मारला. थोड्यावेळाने जेवण सुरु झाले. उन खुप होते पण संध्याकाळ्चे अंतरही जास्त असल्याने ३ वाजता निघण्याचे ठरले. उन खुप असल्याने मी टोपी पाण्यात भिजवुन घातली आणी चालु लागलो. लगेचच सिन्नरचा घाट लागला, सर्वांच्या मागे होते पण मंडळी दिसत होती. सिन्नरचा घाट लागल्यावर थोडं पुढे जाउन थांबलो इथे कुणीतरी पदयात्रींना नाश्ता देत होते. बसलो, बरे वाटले. नाश्ता झाल्यानंतर चालु लागलो. बर्याच वेळाने सिन्नर बसस्टॉप जवळ आलो. इथंनं मार्केटमधुन शॉटकर्ट मारला तेवढंच अर्धा कीमी अंतर कमी झाले सिन्नर सोडुन लगेचच एका मंदीराचे बांधकाम चालु होते तिथे चहा - नाश्त्याचा थांबा आला. थांबलो , थोडा पायाला आराम मिळाला, थोड्या वेळाने निघालो. मंदीराचे बांधकाम आजही पुर्ण झालेले नाही.
खुप वेळ चालत होतो. बाकीची पदयात्री मंडळे ही बरोबर होती. माझी अवस्था खुप वाईट होती. तरीही चालत होते. खुप वेळाने मुसळगाव इथे रात्रीच्या थांब्यावर पोहोचलो. सर्व आधीच पोहोचुन फ्रेश झाले होते. मी पोहोचले थोडा आराम केला. मग फ्रेश झाले. रात्रीचे जेवण ज्यांच्या अंगणात थांबतो त्यांच्या तर्फे होते. जेवुन झोपले. ६ दिवस पार पाडल्याचा आनंद होता. आता फक्त ७ व्या दिवशी सकाळी भरपुर चालायचे होते. आणी ८ व्या दिवशी फक्त १४ कीमी चालुन सकाळी ९.३० ते १०.०० वाजेपर्यंत शिर्डीत पोहोचणार होतो. पण सगळे सांगत होते कि हा ७ वा दिवसच खुप कठीण आहे.
बापरे, वाचुनच दमायला होतय आणि
बापरे, वाचुनच दमायला होतय आणि तुमच्या जिद्दिच कौतुक पण वाटतयं
लिखाण पण एकदम छान आहे.
मस्त ओघवतं लिखाण ! आवडलंच
मस्त ओघवतं लिखाण ! आवडलंच
खरेच तुम्ही जिद्दी.. तूम्हाला
खरेच तुम्ही जिद्दी.. तूम्हाला अजिबातच चालायची सवय नव्हती तरी हि यात्रा करायला घेतलीत. आणि पारही पाडलीत. याचे मला खुप अप्रूप वाटतेय.
जिद्द वेग्रे ठीके , पण असाच
जिद्द वेग्रे ठीके , पण असाच सुद्धा चालायला जायला हरकत नाही , शिर्दीलाह्क जायला हवे असे काही नाही..
भांडाभांड काय होते, जागा काय जाऊन आधी अडवायच्या, सर्वात आधी पोचायची काय ती अहमिका..
अरे भक्तीभाव राहिला बाजूला.. आणि बाकीचीच नाटके दिसतायेत
असो
तुमच्या जिद्दीला सलाम ..
तुमच्या जिद्दीला सलाम .. दुसरेही ट्रेक सुरु करा माझ्यामते
बन्या बापू पटले तर घ्या
बन्या बापू पटले तर घ्या नाहीतर सोडा. विचारला नसताना सल्ला देउ नका उगीच .. कोणी काय करायचे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ..
बन्या जी पब्लीकबद्द्ल माहीती
बन्या जी
पब्लीकबद्द्ल माहीती मी पहिल्याच भागात दिली आहे, पण मला तर ह्या लोकांनी खुप मदत केली.
मला आता नर्मदा परीक्रमा करायची आहे पायी. पाहुयात कसं जमतंय, बाकी पदयात्रेला मी आता दरवर्षी जाते. बाकी ठीकाणी जायला हरकत नाही पण सुट्ट्यांचा प्रोब्लेम येतो ना.
अभी बापू , तुम्हाला मी काही
अभी बापू , तुम्हाला मी काही बोललेलो नाहीये न.. कशाला नाक खुपसताय मध्ये
मला आता नर्मदा परीक्रमा
मला आता नर्मदा परीक्रमा करायची आहे पायी
कविता ताई, नक्की जमेल तुम्हाला
शुभेच्छा
खरच वाचून दमायला झाले..
खरच वाचून दमायला झाले.. उन्हात चाल्णे तर किती कठीण होत असणार.. चांगले चाललेय लेखन.
सुरेख लिखाण तुम्हाला झालेला
सुरेख लिखाण
तुम्हाला झालेला त्रास वाचतानाच जाणवते कि यात्रा सोपी नाहिय. पण तुमच्या जिद्दीला मानलेच पाहिजे.
हो पण आता त्रास जास्तं होत
हो पण आता त्रास जास्तं होत नाही , वजनही कमी केलंय आणी सवय ही झालीय त्यामुळे असेल कदाचित. गेल्याच महिन्यात ३१ मार्च ते ७ एप्रिल अशी मी ६ वी वारी पुर्ण केली. ह्यावेळेस अगदी मजेत होते. घाटावर नाचत गेले. फक्त थंडीचा त्रास जाणवला.
मला आता नर्मदा परीक्रमा
मला आता नर्मदा परीक्रमा करायची आहे पायी._______________/\___________________
आपल्या जिद्दीला परत एकदा
आपल्या जिद्दीला परत एकदा सलाम.
लिखाणाची शैली ही ओघवती आहे.