मदर्स डे निमित्त मुलांनी दिलेल्या गिफ्टस

Submitted by रायगड on 12 May, 2014 - 20:16

मातृदिनाचे वेध मुलांना शाळेमुळे आठवडा-दहा दिवस आधीच लागतात आणि "आई, I have a surprise for you, but you will get it only on the mother's day" असा चिवचिवाट तेव्हापासूनच चालू होतो. मग मी ही "हो का, I am so eager to see the surprises you have made for me" - असं म्हणून त्यांचा उत्साह अजून वाढवते!

प्रत्यक्षात त्यांनी बनवलेली मदर्स डे कार्डस् बघून पोरांनी काय वाभाडे काढलेत आपले, अशी अवस्था होते!
दोन-एक वर्षापूर्वी अरिनने (आता ७ वर्षे) बनवलेले About my mother कार्ड वर त्याने लिहिलेले -

My mother's age is : 74 years - (अरे मुला, तुला 70 व्या वर्षी जन्म दिला का रे मी?)
My mother's favorite thing is : eating - (एवढं खरं बोललंच पाहिजे का दर वेळी ?)
My mother's favorite past time activity is : sleeping - (पुलं नी म्हटलच आहे तसं - हो, इतरांपेक्षा माझा डोळा जरा जास्त लागतो खरा, पण आमच्या मुलाने एवढच बघावं का? )

रोहनने (४.५ वर्ष) पण काल याच धर्तीवर काहीतरी लिहीलेलं mother's day write up शाळेतून आणलं...
म्हणे आईला माझ्याबरोबर बास्केट्बॉल खेळायला आवडतो.प्रत्य क्षात मला बास्केटबॉलचा बॉल कुठला सांगता आलं तरी नशिब - ही परिस्थिती...धन्य धन्य जाहले मी अगदी! हसून हसून पुरेवाट! मज्जा मज्जा करतात मुलं!

रोहन ने शाळेत बनवलेली ही गिफ़्टस्.

यावर्षी अरिनने शाळेतून एक कुपन बुक बनवून आणलय - मदर्स् डे निमित्त आई करीता कुपन्स!

अरे, वा! वा! असं म्हणत मी आनंदाने क्लीनींग चं कुपन वापरते - चला, लागा क्लीनींगला - असं म्हणत असतानाच अरिनने पुढचे क्लीअर केले - यातली, क्लीनिंग, doing dishes, laundry ई. कुपन्स आधीच expire झालेली आहेत. म्हणजे मला कुपन बुक मिळण्या आधीच ही सर्व महत्वाची coupons expired म्हणे!

पण कालच्या मदर्स डे चं मला मिळालेलं मोठं गिफ़्ट म्हणजे अरिनने माझ्या करीता आखलेले Tresure hunt! हे त्याचे क्लूज्

1. Somewhere there are good fires - fireplace
2. Somewhere you sleep - under the bed
3. Somewhere you do work - in the sofa where I sit and do the work
4. Somewhere you take a bath - this was the final clue - bathroom

शेवटच्या क्लू नुसार मी बाथरूम मध्ये गेले तर शॉवरमध्ये हे साहेब स्वत: होमवर्क करत बसलेले - "हे काय चालवलयस इथे?" असं विचारल्यावर म्हणे - हेच तुझं गिफ़्ट, आई !
अरिनचा होम वर्क म्हणजे घरात नुस्ती रणधुमाळी असते. मी त्याला नेहेमी म्हणते, तू स्वत:हून होम वर्क करणे हे माझं बेस्ट गिफ़्ट आहे. ते गिफ़्ट मला असं काल मिळालं!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास आहे हे सगळे. गोड आहेत तुझी मुले.

>> सर्व महत्वाची coupons expired
Happy Happy Happy

>>My mother's favorite thing is : eating - (एवढं खरं बोललंच पाहिजे का दर वेळी ?)
>>My mother's favorite past time activity is : sleeping - (
मुले तुला चांगलीच ओळखून आहेत Happy ( दिवे घेशिलच)

Lol
My mother's age is : 74 years >>>> इतकं खरं लिहायचं नसतं कधी Proud Light 1

सहिये ...
मी एकदा लहानपणी माझ्या आईला दसर्‍याचे सोन्याचे (आपट्याचे) पान देताना त्यावर फुलांची छानशी डिजाईन काढून त्या फुलपाखरासारख्या पानाच्या एका बाजूला "म" आणि दुसर्‍या बाजूला "म्मी" असे मम्मी लिहून दिले होते. माझी आई कसली खूश झाली होती. प्रत्येकाला कौतुकाने ते दाखवत होती, दुसर्‍या दिवशी ते पान ऑफिसला नेऊन मैत्रीणींनाही दाखवून आली..
अशी कार्टी मिळणार्‍या आया लकीच असतात.. अभिनंदन Wink

मंजे - ह्या वर्षी आमच्याकडे ‘आईचे आवडते पेय’ - wine असे लिहून आलय आणि ‘आवडते पदार्थ’ - Pizza! मग घरी असा संवाद झाला - “अग, पण मला pizza नाही आवडत, मला पाव भाजी आवडते” कारण दोन दिवसापूर्वी तिने मला विचारले होते कि - आई तुला काय खायला आवडते? त्यावर उत्तर आले - “मी पाव भाजी लिहिले तर माझ्या friends न कळेल न मग कि मी Indian आहे ते, अजून त्यांना माहित नाहीये ते”! आता ल्काय बोलावे ह्याला

रो आणि अ भारी पण, त्यांच्याकडून अशीच उत्तरे अपेक्षित. आता परत भेटलीस कि basketball खेळूया

रायगड इतकी हसले ना मी हा बाफ वाचून. आई, मावशी आणि मुल तीघांनाही जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरची देणगी लाभलीये. Happy
गिफ्ट्स गोड आहेत एकदम.

सायो Lol

सशल खूप गोड.

आमच्या मुलीने स्वतः केलेल्या हायकु टाईप कवितांच पुस्तक दिलय मला या खेपेस.
नंतर टाकते त्यातल्या कविता. Proud

परत एकदा सर्वांना धन्यवाद!

तुझ्या मदर्स डे गिफ्ट्स च्या डिमांड्स वाढत चालल्या आहेत >> Rofl

अल्पना, सशल : तुमच्याही गिफ्टस भारी आहेत.

सीमा : मुलीचे हायकू टाक...वाचायला आवडेल, सही आहे!

सोनुली : हाहाहा! हे धाकटं रत्न का?

तुमचा अभिषेक : तुमची आई, आणि पत्नी आणि आता लेक लकी आहेत! Happy

अदिती : अगं हो, जरा जास्तच ओळ्खून आहेत असं दिसतय, धोकादायक आहे ते! Happy

Pages