आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

Submitted by नरेंद्र गोळे on 6 May, 2014 - 01:18

आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!

- नरेंद्र गोळे २०१४०५०६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातून प्रेरणा घेऊन सदाशिव पेठमधून घरटी एक माणूस सैन्यात जाईल आणि वेळ पडल्यास शहीदही होईल, हीच अपेक्षा. पाकिस्तानशी लढताना कितीतरी बिच्चारे काश्मिरी मुसलमान भारतासाठी लढून शहीद होतात. त्यांचं थोडं तरी ओझं सदाशिव पेठ उचलेल ही अपेक्षा. सावरकर आज असते, तर तेही हेच बोल्ले असते. असो. शुभेच्छा.

ल गो,

तुम्ही बुधवार पेठवाल्यांनी, सदाशिव पेठ वाल्यांना सल्ला देऊ नये.

ईतक वाटत असेल तर स्वता: घ्या शस्त्र आणि जा सरहद्दीवर.

limbutimbu,

>> लगो, पोटात दुखले तर रेचक घ्यावे, वमन करू नये! फिदीफिदी

अगदी चोख सल्ला! इंग्रजी सैन्यात ब्राह्मणांना बंदी होती. कारण की ते म्हणे योध्या जमातीतील नव्हते. सावरकरांनी सैन्यभरतीसाठी ब्राह्मण युवक गोळा करून दाखवले, तरीपण इंग्रज सरकारने मानले नाही. आजही इंग्रज सरकारचे चमचे राज्य चालवताहेत. १६ मे नंतर फरक पडेल अशी आशा आहे.

आ.न.,
-गा.पै.

<<इंग्रजी सैन्यात ब्राह्मणांना बंदी होती. कारण की ते म्हणे योध्या जमातीतील नव्हते. सावरकरांनी सैन्यभरतीसाठी ब्राह्मण युवक गोळा करून दाखवले, तरीपण इंग्रज सरकारने मानले नाही. आजही इंग्रज सरकारचे चमचे राज्य चालवताहेत. १६ मे नंतर फरक पडेल अशी आशा आहे.>>

मी कित्येक वर्षे सैन्यात होतो. माझ्या माहितीप्रमाणे 'सैन्य' ही एकच संस्था अशी आहे जिथे जातीभेद अजिबात नसतो. 'अजिबात नसतो' याचा अर्थ असा की 'जात' ही गोष्ट मनातच येत नाही. फक्त आपले ट्रेनिंग आणि आपले काम याकडेच प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकार्‍याचे लक्ष असते. Happy

मी कुठल्याही जातीबद्दल लिहिलेले नाही. तरीही त्यात ' जात' कुठून आणली, मला माहीत नाही.

सदाशिव पेठेत सभा आहे, म्हणजे त्यातून तिथे रहाणार्‍यांनी प्रेरणा घ्यावी, इतकंच तर म्या लिवलं , मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.

लिंबुभाऊ , असे लेक्चर हे रेचकासारखेच असते. ज्यांना शौर्याचा मलावरोध झाला आहे, अशांच्यासाठी अशा भाषणाने काम करावे, अशा उद्देशानेच तर असे भाषण अरेंज केलेले असते. अब्दालीने १७६१ साली बूच मारल्याने शौर्याचा मलावरोध झाला असेल तर तो या रेचकाने दूर होवो हीच सदिच्छा.
गामा, महार रेजिमेन्ट सुरु करायला बाबासाहेबानाही मेहेनत घ्यावी लागली होती.

बुधवार पेठेतील माताना नमस्कार. आमची अन अशा मातान्ची भेट रोजच घडते . आमच्या प्रोफाइलवरील फोटोत खिशाला लाल चिन्ह आहे. त्यावरुन समजेलच. Happy

कृपया सैन्यावरुन वादावादी करु नये. लगो, तुम्ही पहिल्यांदा साळसूदपणे सदाशिव पेठेचा उल्लेख केलात. त्याचा अर्थ कुणाला समजत नाही असे समजू नये. कृपया तुमची ही या बद्दलची आंतरजालावरची शेवटची पोस्ट असूदे. कृपया. धन्यवाद.

शरद,

तुमचं निरीक्षण अगदी समर्पक आहे. सैन्यात भेदभाव नाही. मी जे लिहिले ते इंग्रजांच्या सैन्यभरतीच्या धोरणासाबंधी आहे. फरक स्पष्ट व्हावा! Happy

इंग्रजांचे चमचे आज देशाचे सताधारी आहेत म्हणून काळजी वाटते.

आ.न.,
-गा.पै.

<अब्दालीने १७६१ साली बूच मारल्याने शौर्याचा मलावरोध झाला असेल...>
उदाहरणासठी जरी हे वाक्य घेतल्या गेलं असेल तरी अतिशय हीन दर्जाचं वाक्य.

श्रीयू,

>> उदाहरणासठी जरी हे वाक्य घेतल्या गेलं असेल तरी अतिशय हीन दर्जाचं वाक्य.

माणूस तसं वाक्य!

खुद्द अब्दालीने मराठ्यांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे.

आ.न.,
-गा.पै.

+++बुधवार पेठेतील माताना नमस्कार. आमची अन अशा मातान्ची भेट रोजच घडते . आमच्या प्रोफाइलवरील फोटोत खिशाला लाल चिन्ह आहे. त्यावरुन समजेलच +++

तुम्ही घेतलेल्या ड्युआडी नावावरुन आम्हाला कळतय की तुम्ही स्त्री / मातांना किती व कशी किंमत देता !!