चित्रपटदृश्यं बघताना पडणारे प्रश्न

Submitted by गजानन on 30 April, 2014 - 14:42

चित्रपटातले एखादे दृश्य बघताना अनेकदा 'असे का?' प्रश्न पडतात. कधी कधी त्यामागे काहीच लॉजिक नसते (असे वाटते) तर कधी कधी त्यामागे रंजक किस्से घडलेले असतात. "एखाद्या गोष्टीचे त्या दृश्यात प्रयोजन काय?" अशासारख्या प्रश्नांसाठी हा बाफ.

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात दिनकरराव भोसले खेतवाडीतून निवडणूक लढवणार म्हटल्यावर संतप्त जनसमुदाय त्याच्या घरावर चालून येतो. त्या समुदायाला सामोरे जाण्यासाठी दिनकरराव घराच्या गच्चीवर येतो. त्याचवेळी वर आकाशात एक विमान बरोबर त्याच्या डोक्यावर येते, क्षणभर त्याचा वेग मंदावतो आणि मग ते झर्रकन पुढे निघून जाते. दिनकररावाच्या भाषणादरम्यान आणखी एकदा तेच (? आणि लगेच? ) विमान त्याच्या डोक्यावरून त्याच दिशेने उडताना दाखवलेय. हे मुद्दाम दाखवलेय की निव्वळ योगायोग?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages