पुनर्मीलन - शाळेतील सवंगड्यांचे

Submitted by आशिका on 3 April, 2014 - 06:50

पुनर्मीलन अर्थात Re-union ही काही नवी संकल्पना राहिली नाही आता. मात्र प्रत्येकासठी ही शाळेतील मित्रांची re-union अगदी खाशी आठवण असते, मनाच्या कोपर्यात कायम जपुन ठेवण्यासरखी....

जूनमध्ये एक दिवस फेसबूकवर एका शाळेतल्या मैत्रिणीने ping केले, जी सध्या U.K. स्थित आहे की मी जुलै महिन्यात ३ आठवड्यासाठी येतेय आणि आपण १३ जुलै, शनिवारी नक्की भेटायचे. ठिकाण तु ठरव. बस्स हेच निमित्त घडले re-union चा virus माझ्या डोक्यात घुसायला. कस, कुठे शोधायचे सगळ्याना याचे विचारचक्र सुरु झाले कारण शाळा सोडली तेव्हा मोबाइल सोडा, साधे फोनही नव्हते घराघरात, कसे सम्पर्कात रहाणार होतो एकमेकांच्या?

काही मुली सम्पर्कात होत्या माझ्या, पण मुले.... हो एक जण माझ्या माहेरच्या बिल्डिन्गमधेच रहात होता, त्याला ping केले आणि virus चा संसर्ग त्याच्याकडे सुपुर्द केला. त्यालाही आवडली कल्पना, त्याच्या सम्पर्कात काही जण होते तर काही माझ्या, बाकीच्याना FB च्या माध्यमातुन शोधायचे ठरले. टारगेट सेट केले होतेच १३ जुलै, लागलो कामाला, मजा आली, ती FB वर मुलींना शोधताना, आडनाव तर राहु दे पण पहिले नावही वेगळे आणि FB वर हे नवे नावच फक्त, आली पंचाइत, नाही म्हणायला १० वीचा ग्रुप फोटो होता आधार म्हणुन, पण त्यातील चेहरा आणि FB वरचा प्रोफाइल पिक यांची सांगड घालणे कर्मकठीण. (प्रसरण पावण्याचा सिद्धांत इथे चांगलाच लागू झाला होता). मग शाळेच्या नावाचा संदर्भ देऊन शोध मोहिम चालू केली. ज्या वर्गमैत्रिणी सम्भवत होत्या, त्यांचे नम्बर शोधुन त्याना सम्पर्क केला की " अग, मी अमुक अमुक या शाळेची, हि batch, तु हिच का?" व. व. काही ठिकाणी मासा बरोबर गळाला लागला तर काही ठिकाणी निराशा पदरी आली. असे करता करता १०-१५ दिवसांत आमची मित्रांची यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत-वाढत ३२ वर स्थिरावली. टारगेट होते ४५, १३ जणांचा शोध जारी आहे अजुन...

३२ पैकी २ U.K., U.S. मधील, बाकी ३० जण मुम्बईच्या अवती-भवतीचे, सर्वानी कसलेही आढेवेढे न घेता होकार दिला, सगळेच उत्सुक होते एकमेकाना भेटायला. आम्ही ४ संयोजक होतो.भेटीचे ठिकाण मुम्बईत सोयीचे ठरले काही जण पूणे, पनवेल, पेण येथुन येणार होते. हौल बुक केला, जेवणाचा मेनु, लहान-मोठे खेळ ठरवले , गिफ्ट्स, बक्षिसे, केक सर्व खरेदी केली. कार ची सोय केली . तोपर्यन्त e-mail, whatsapp वर ग्रुप्स तयार झालेच होते, मस्करी, मजा सुरुच होती, आता फक्त सर्वजण वाट पहात होते १३ जुलैची !

आणि तो दिवस उगवला, ५ वाजेपर्यंत सर्व जमले. एक्मेकांना बघुन अगदी आनंदाचे भरते येत होते, गळाभेटी घडत होत्या, आनंदाचे चित्कार उठत होते, कोणाला ओळखणे कठिण वाटत होते, बालपणीच्या टोपण नावाने हाकारणे चालू होते. मुलगे तर प्रमाणाबाहेर बदलले होते, काहींचे पोट प्रुथ्वीच्या गोलाईशी स्पर्धा करत होते तर काहींचा भालप्रदेश बराच रुन्दावला होता.

स्थानापन्न झाल्यावर संयोजकानी सुत्रे हाती घेतली, स्वागत झाले आणि प्रत्येकाला स्टेजवर पाचारण करण्यात आले, १०वी नंतरचा प्रवास वर्णन करण्यासाठी. हे सांगता-ऐकताना थट्टा-मस्करी चालूच होती, शाळेच्या आठवणी निघत होत्या.

U.K., U.S. मधल्या मुलाना वेळ दिली होती skype वर on-line येण्यासाठी. त्यानी आपला परिचय तेथुन दिला व काही वेळापुरता हा सोहळा अनुभवला.

एक मुलगा एक कोलाज घेउनच स्टेजवर आला आणि ते त्याने दाखवताच सर्व जण एका रम्य भूतकाळात जाऊन पोहोचले....

वय वर्षे ११, इ. ६वीचा आमचा वर्ग, काही कारणाने मुले वि. मुली असे भांडण झाले होते, सर्वानी शिक्षाही भोगली होती आणि या प्रसंगावरुन बाईंनी वर्गात एक उपक्रम करवुन घेतला होता. प्रत्येकाने रफ वहीच्या पानाच्या ४४ चिट्टठया करायच्या होत्या, त्यावर आपल्या सार्या सहकार्यान्ची नावे लिहायची होती (स्वतःचे सोडुन)व नावापुढे त्या प्रत्येकाचा मला आवडत असलेला एक गुण / त्याच्याबद्दलची सदिछा लिहायची होती, अट एकच कि प्रत्येकाने चान्गलेच लिहायचे. बाईनी नंतर सर्व चिट्ठ्या गोळा केल्या व दुसर्या दिवशी sorting करुन प्रत्येकाला आपापल्या चिट्ठ्या मिळाल्या. आपल्याबद्दल आपल्या प्रत्येक वर्ग मित्राला काय वाटते याचा सुंदर संग्रहच आता प्रत्येकाकडे होता. आज इतक्या वर्षानी या मुलाने तो जपुन ठेवलेला ठेवा सर्वाना दाखवायला आणला होता. हा उपक्रम किती जण विसरुनही गेले होते पण आज आठवणी उफाळुन आल्या, जेव्हा हा वाचुन दाखवत होता प्रत्येकाची टिप्पणी.
एकीने याच्याबद्दल लिहिले होते की काल मी भांडले तुझ्याशी पण तू खूप यशस्वी व्हावस असच मला वाटत. हा मुलगा आज chemical engineer आहे (IIT मधला), यश, पैसा सर्व काही आहे पण दुर्दैवाची बाब अशी की ज्या मैत्रिणीने हे स्वप्न पाहिले होते त्याच्यासाठी ते पूर्ण झालेले बघायला तीच राहिली नाही या जगात. १० वी नंतर एका अपघातात तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या आठवणीने सर्व गहिवरले.

यानन्तर काही खेळ घेतले, गप्पा-टप्पात जेवण झाले सर्वानी मिळुन केक कापला आणी एकमेकान्च्या कायम टचमधे राहण्याचे, मदत मागण्याचे, करण्याचे आश्वासन देण्यात आले एकमेकाना, समारोप होउन सर्व जण एकत्रच तेथुन निघालो, जणू काही पुन्हा हरवून न जाण्यासठीच !!

मात्र ते आश्वसन अजुनही शाबूत आहे त्यानुसरच मर्गक्रमणाही चालु आहे, असेच एकत्र राहण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, सुहास्य, मामी, आरती प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@ आगाऊ - लिन्क मस्तच आहे. आमच्याकडे teacher ने दिलेली नाही तर प्रत्येकाच्या अक्षरातील चिट्ठ्या आहेत.

@ आशिका, छान लिहिलंय. आवडलं! पुनर्मिलनाचा विचार मनात आल्यापासून तो प्रत्यक्षात आणेपर्यंतचा प्रवास वाचताना मी त्यात गुंगून गेलो होतो. आपण हे सर्व कसे जमवून आणताय, याची उत्सुकता लागून राहिली होती. हे कार्य घडवून आणणं तसं खरोखरच अवघड होतं. पण आपण यशस्वीरित्या पार पाडलंत, त्याबद्दल आपले अभिनंदन!! सर्वांची भेट झाल्यावर किती मन भरून आलं असेल, नाही? हे वाचून माझ्या मनात विचार आला कि आमच्याही शाळासोबत्यांच्या पुनर्मिलनाचा योग कधी येईल? खरंच! मलाही कधी कधी त्यांची फार आठवण येते.