चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी क्वीन आणि भूतनाथ रिटर्न्स पाहिले
क्वीन आवडला
त्यातला हंगामा गाण्यावर आम्ही ग्रुप ने एन्जॉय केल मस्त
फ्रेंच टोस्ट चा प्रसंग भारी
आणि सिकंदरही

भूतनाथ रिटर्न्स एकदम फॅमिली एंटरटेन मेंट पिक्चर आहे
चित्रपट गृहतली सर्व लहान मूल एन्जॉय करत होती
दुसरा भाग थोड़ा लांबट वाटतो लहान मुलांच्या दृष्टीने
पण माझ्या सोसायटी मधल्या मुलांनी एन्जॉय केला अस दिसल
त्यांची रिएक्शन मस्त पिक्चर था अशी होती
अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणेच सरस आहे
अक्रोड उर्फ़ पार्थ भालेरावच काम अप्रतिम झालय
मस्त एक्टिंग केलिये
बोमन इराणी , उषा जाधव , संजय मिश्रा आपल्या भूमिकेत छाप सोडून जातात

मनोरंजन प्लस शिकवण ( मतदानाच महत्व ) अस मस्त पैकेज दिलेय

टु स्टेट्स :
एकदा बघायला मस्तं , लाइट फिल गुड मुव्ही Happy
पुस्तकाशी बर्यापैकी प्रामाणिक (तरीही पुस्तक जास्तं धमाल आहे.)
कलाकरांचा मस्तं वावर ..
आलीया भट्ट आणि अमृता सिंग प्रचंड आवडल्या .. रोनीत रॉय छोट्याशा रोल मधेही जबरी !
रेवति आणि आलीयाच्या वडिलांचा रोल केलेला अ‍ॅक्टरही चांगले सपोर्ट करतात .
अर्जुन कपुर थोडा ठोंब्या वाटतो आणि ड्रंक असल्यासारखा अर्धे डोळे करून बोलतो बरेचदा पण काम चलाउ आहे तो , तशीही आलीया टोटली भाव खाऊन जाते आणि सगळी कसर भरून काढते :).
आलीयाचे लाँग स्कर्ट्स ,ड्रेसेस , साड्या मस्तं आहेत आणि ती अतिशय सुंदर दिसते सगळ्या गेटप्स मधे !
सिनेमात काही तमिळ आणि पंजाबी गाणी आहेत ती चांगली वाटतात .

!!!!स्पॉयलर!!!! ( ज्यांनी पुस्तक वाचले नाही आणि सिनेमा पाहिला नाही त्यांनी वाचु नये )
पुस्तकातले काही प्रसंग खूप हसु आलं होतं ते हवे होते सिनेमात :).
उदा:
क्रिश पंजाबी आईला आनन्या बद्दल कन्व्हिन्स करताना अनन्या साउथ ची असली तरी त्याच्यापेक्षा गोरी आहे सांगत असतो , त्यावर त्याची आई भारी डॉयलॉग टाकते , " ओह द फेअर साउथ इंडीयन गर्ल्स आर इवन मोअर डँजरस , लुक व्हॉट हेमा मालिनी आणि श्रीदेवी डिड , दे ट्रॅप्ड मॅरिड पंजाबी मेन"
सिनेमात अर्थात हेमा मालिनी आणि श्रीदेवी नावं टाळलीयेत , पण हा डॉयलॉग जर घेतला असता तर खर्या खुर्या अर्जुन कपुरची काय बरं प्रतिक्रिया असती :)??? मनातल्या मनात तरी अनुमोदन दिलं असतं त्यानी Wink
लग्नाच्या प्रसंगात अनन्याचे बाबा पातळ व्हाइट लुंगी कि धोतर नेसायला सांगतात आणि नेमकी क्रिश ने मिक्कि माउस ची अंडरवेअर घातलेली दिसते जी तमाम क्राउड मधे हशा पिकवते , हा पुस्तकातला प्रसंग पण घेतला नाही सिनेमात .. खूप सही लिहिलाय पुस्तकात !

२ स्टेट्स स्पॉयलर ( ज्यांनी पुस्तक वाचले नाही आणि सिनेमा पाहिला नाही त्यांनी वाचु नये )

लग्नाच्या प्रसंगात अनन्याचे बाबा पातळ व्हाइट लुंगी कि धोतर नेसायला सांगतात आणि नेमकी क्रिश ने मिक्कि माउस ची अंडरवेअर घातलेली दिसते जी तमाम क्राउड मधे हशा पिकवते , हा पुस्तकातला प्रसंग पण घेतला नाही सिनेमात ..
>>डिजे, हा सीन ट्रेलर मधे होता, पण फायनल एडिटींग मधे उडवलाय.
हि घे युट्युब लिंक Happy
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=wJoKzHakE_o

आलीयाच्या वडिलांचा रोल केलेला अ‍ॅक्टर <<
शिव सुब्रमण्यम त्याचं नाव.
नाना पाटेकरच्या प्रहारमधे होता तो. थिएटरचा माणूस.
स्क्रीनप्ले रायटरही आहे तो. फार मस्त अ‍ॅक्टर आहे.

मी रेवती आणि अमृता सिंग यांच्यासाठी बघणार. मला दोघीही फार्फारफार्फार्फार आवडतात.

लग्नाच्या प्रसंगात अनन्याचे बाबा पातळ व्हाइट लुंगी कि धोतर नेसायला सांगतात आणि नेमकी क्रिश ने मिक्कि माउस ची अंडरवेअर घातलेली दिसते जी तमाम क्राउड मधे हशा पिकवते , हा पुस्तकातला प्रसंग पण घेतला नाही सिनेमात ..> मला पण हा सीन घेतला पाहिजे होता असे वाटले. पुस्तक खरोखर धमाल आहे. Happy

मी काल मद्रास कॅफे बघितला.
जॉन चे निर्माता म्हणून खरेच कौतूक करायला पाहिजे.
चित्रपट जबरदस्त आवडला. खास करून त्या घटनेची आठवण मनात असल्याने असेल.
संवाद, पात्रनिवड, ध्वनि, पटकथा सगळ्याच बाबतीत उत्तम आहे.
एल एल बी... पेक्षा या चित्रपटाला राष्ट्रिय पुरस्कार मिळायला हवा होता असे वाटले. जर जॉन अश्या निर्मितीचे धाडस करू शकतो तर एक देश म्हणून त्याला आपण साथ द्यायला हवी होती. आणि हे केवळ भावनेच्या भरात नव्हे तर चित्रपटाच्या वरील सर्व बाजू लक्षात घेऊन मी म्हणतोय.

एल. एल. बी.. ठिकठाक वाटला. अनेक प्रसंगात कोर्टाचा अवमान करणारी दृष्ये आहेत. अगदी साधी गोष्ट कितीही
कनिष्ठ कोर्ट असो, वकील कधीही न्यायाधिशांकडे पाठ करत नाहीत. याचे भान याच नव्हे तर अनेक चित्रपटात राखलेले दिसत नाही.

एफेम गोल्डवर सुभाष घईच्या कांची या चित्रपटाचे प्रमोशन चालले आहे.
एका गाण्याचे शब्द : तू मुछटंडा तू सेक्सी
तू चलती फिरती टॅक्सी
ना रुकनेवाली टॅक्सी

शोधले तर गाण्याचे शब्द आणि संगीत दोन्ही सुभाष घईचेच आहेत.

<<... कांची या चित्रपटाचे प्रमोशन चालले आहे.>> गाण्यावरून तरी फारच 'टॅक्सींग' असावा हा तथाकथित सिनेमा, असं वाटतंय !! Wink

टु स्टेट्स पाहिला पण पुस्तकाइतका नाही आवडला. पुस्तक तर आजही हातात घेतलं कि तेवढ्याच उत्सुकतेने परत परत वाचलं जातं.
लग्नाच्या प्रसंगात अनन्याचे बाबा पातळ व्हाइट लुंगी कि धोतर नेसायला सांगतात आणि नेमकी क्रिश ने मिक्कि माउस ची अंडरवेअर घातलेली दिसते जी तमाम क्राउड मधे हशा पिकवते , हा पुस्तकातला प्रसंग पण घेतला नाही सिनेमात .. खूप सही लिहिलाय पुस्तकात ! >>> चेतन भगतने फेसबुकच्या पेजवर या प्रसंगाचे चित्रण असलेला ट्रेलर व्हिडीओ टाकला होता पण सिनेमात नाही दिसला हा प्रसंग.
क्रिश आणि अनन्याचं ब्रेक-अपही तितकं इफेक्टिव नाही वाटलं.
अर्जुनच्या लूक्सविषयी दीपांजलीशी सहमत.
आलीयाचे लाँग स्कर्ट्स ,ड्रेसेस , साड्या मस्तं आहेत आणि ती अतिशय सुंदर दिसते सगळ्या गेटप्स मधे !>>>> शेवटच्या लग्नाच्या गेटअपमध्ये तर एकदम क्लास्स!

अर्जुन आणि आलिया .........दोघे ही प्रचंड जाडे होते आधी............ दोघांनी ही मेहनतीने स्वतःचे वजन कमी केले

अर्जुन आणि आलिया .........दोघे ही प्रचंड जाडे होते आधी............ दोघांनी ही मेहनतीने स्वतःचे वजन कमी केले

बरं मग????????

शिका काहीतरी

त्यांना चित्रपटात कामे मिळणार होती.. आम्हाला थोडेच कोण विचारणार? मग काय फायदा मेहनत करुन.....

"अर्जुन आणि आलिया .........दोघे ही प्रचंड जाडे होते आधी............ दोघांनी ही मेहनतीने स्वतःचे वजन कमी केले" - प्रत्येकाला आपआपल्या काम-धंद्याप्रमाणे कसब शिकावच लागतं.

आम्ही पण मुलीच्या प्रचंड आग्रहामुळे भूतनाथ पाहिला. Happy मला सेकंड हाफ फार बोर वाटला.
पण त्या मुलाचे काम मस्तय.

भुतनाथ रिटर्न ५ वर्षे वयाखालिल मुलांना तसा बोरच होईल, ९-१० वर्षांच्या मुलांनाही तसा यथा तथाच कळेल, कारण राजकारण, मतदान या गोष्टिंशी तसा खोलात त्यांचा संबन्ध येत नसतो.

मी काल सिडीवर, शाहिद बघितला. मला खुपच आवडला. राजकुमारचे काम अप्रतिम. ( त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ना ?) बाकी सर्वच पात्रांची निवड अप्रतिम. कुणी अभिनय करतेय असे वाटत नाही. सर्व चित्रिकरण त्या त्या जागी केल्याने सर्वच खरे वाटते. कोर्टातील वातावरण आणि प्रसंग इतक्या अचूकपणे चित्रीत झालेले पहिल्यांदाच बघितले. अवश्य पहा.

मी काल, "पांगिरा" बघितला. कादंबरी वाचली नव्हती म्हणून कथानकाचा अंदाज येत नव्हता.
पण सर्वच कलाकारांच्या सकस भुमिका, अस्सल राजकारण, अस्सल संवाद यामूळे आवडला.
किशोर कदम, संतोष जुवेकर, शर्वाणी पिल्ले, उपेंद्र लिमये, श्रीराम रानडे, चिन्मय मांडलेकर असे काही ओळखीचे चेहरे आहेत पण त्यांच्या इतकेच बाकीचे कलाकारही आपली छाप पाडून जातात. चिन्मय ची ही भुमिका खुपच वेगळी आणि अस्सल वठलीय.

अगदी काहीच ढोबळ चुका आढळल्या.
नायिकेला प्रत्येक प्रसंगात नव्या कपड्यात दाखवलीय. गावात येते तेव्हा तिच्याकडे फार मोठी बॅग नसते, मग एवढे कपडे कुठून आणते ? गावात येताना गाडी चालवत आणते, नंतर ती गाडी कुठे दिसत नाही.

गाव आणि त्याच्या वरच्या अंगाला डोंगरवाडी असे कथानकात असले तरी चित्रीकरणात जाणवत नाही. पाण्याची
कमतरता असणार्‍या गावातले डोंगरही जास्तच हिरवेगार दिसतात.
कांद्याला ओली पात असतानाच खुडणी करतात का ? मग बाजारात नेताना नेहमीचे कांदेच दिसतात.

असो पण एकंदर वेगळा विषय आणि कलाकारांच्या अभिनयासाठी अवश्य बघा.

बच्चे कंपनींसाठी कोणते नवे हिंदी/इंग्रजी/मराठी चित्रपट आलेत का?

हो.. सलाम नावाचा एक मस्त मराठी सिनेमा लागला आहे. मी काल पहिला. आवडला. पहिला अर्धा भाग धमाल मज्जा. नंतरचा अर्धा भाग खूप संवेदनशील. शाळकरी मुलांना घेऊन जा.

मुख्य रोल करणारी मुलं (२ महत्वाची पात्रं आणि त्यांचे ६ मित्र), मुलांचे पालक, शिक्षक, शाळा आणि त्यांचा सुंदर गाव. सगळच मस्त.

दिग्दर्शक , कथा, संवाद - किरण यद्न्योपवीत.

Pages