लेख पाचवा - निगेटीव पेंटींग , ग्लेझींग, स्प्लॅटर , स्क्रेपींग इ. तंत्र

Submitted by पाटील on 8 March, 2014 - 09:22

या लेखात आपण अजुन काही तंत्र थोडक्यात पाहु आणि त्यांचा वापर करुन काही सोप्पई चित्र करुया.

पहीले तंत्र - निगेटीव्ह पेंटीग - यात आधि येक रंग मारुन तो सुकू द्यावा ,नंतर त्या भोवती दुसरा किंवा पहिल्या रंगा पेक्षा डार्क शेड वापरुन आपण आपल्याला हव तो आकार मिळवायचा. आपल्याला ह्वा तो आकार न रंगवता त्या भोवती रंगवाचे म्हणजे आकारा बाहेरचा निगेटिव्ह शेप रंगवायच्जा म्ह॑णुन निगेटिव्ह पेंटींग.
इथे मी येक झाडाच्या आकार मिलवायचा प्रयत्न केला आहे
negative.jpg

दुसरे तंत्र - ग्लेझिंग - आधि येक रंग मारुन तो सुकु द्यायचा , त्यावर खालचा रंग दिसेल असा दुसर्‍या रंगाचा पातळ थर द्यायचा , यामुळे आपल्याला व दोन्ही रंगाच्या मिश्रणाने मिळते त्या तिसर्‍या शेडचा इफेक्ट मिळेल.
इथे मीऑ पहिल्यांदा पिवळ्या रंगाचा वॉश दिला . तो सुकल्यावर लाल रंगाचा पातळ हात दिला . त्यातुन थोडा ऑरेंज शेडचा इफेक्ट मिळाला.
galzing.jpg

स्प्लॅटर - टुथ ब्रश किंवा पेंट ब्रश रंगात बूडउन ब्रिसल्स मधुन बोट फिरुऊन किंवा ब्रश बोटावर आपटुन रंगाचे शिंतोडे पेपरवर उडवायचे. काही टेक्स्चर मिळवायला , किंवा चित्र थोडे स्टायलाईज करायला हे तंत्र वापरता येते.
splatter.jpg
स्क्रेपींग - रेंग ओला असतानाच ब्रशचे मागचे टोक किंवा येखादा कडक प्लस्टिक चा तुअकडा इत्यादिने त्यावर रेषा ओढायच्या , झाडाच्या फांद्या ईं दाखवायला हे तंत्र वापरता येते मात्र यात पेपर फाटणार
नाही याची काळजी घ्या.

scrpng.jpg

आता या तंत्रांचा वापर करुन दोन चित्र करुया.
पहिल्यांदा कागदावर चित्र रेखाटुन घेतले
L1.jpg
त्यानंतर वॉटर लिलिज रंगवुन सुकु दिल्या.
त्यानंतर पिवळ्या+ निळ्या रंगाचा वॉश वॉटर लिलीज सोडुन पुर्ण कागदभर लावला. यात मधे मधे नीळा, पिवळा रंग कमी जास्त करीत थोडे वेऋएसहन /पाण्याचा इफेक्ट आणला.
l2.jpgl3.jpg
आता चित्र पुर्ण सुकु दिले.
त्यानंतर या हिरव्या रंगात बर्न्ट सिएना+ कोवाल्ट ब्लू अ‍ॅड करुन डार्क हिरवा रंग तयार केला आणि तो लिलीज ची पाने सोडुन त्याभोवती नीगेटीव्ह तंत्राने रंगवला. हे चित्र सुकताना लिली मधे अजुन कही डीटेल्स टाकुन चित्र संपवले.
l4.jpgl5.jpg

आता दुसरे चित्र
चित्र रेखाटुन , काही बॅगराऊंड वेट इन वेट पद्धतीने ब्लॉक करुन घेतले
fh1.jpg
ते सुकल्यावर घराचा भाग ब्लॉक करुन घेतला.
fh2.jpg
हे स्रव करताना रेलिंगचा भाग /पुढिल तुळ्शी वृंदावनाचा भाग पांढराच राहिल याची काळजी घेतली.
त्या नंतर चित्र सुकल्यावर थोडया दार्क किरब्या शेडने झाडांचा आकार लुल्जली /बोल्ड ब्रश स्त्रोक्स्ने केला तर माग्ची काही झाडे /पालवी निळसर हिरव्या रंगात केली. हे सर्व सुकु देउन पिवळ्या भिंतीवर निळ्या+ लाल अशा जांभुळक्या रंगाच्या पातळ थराने ग्लेझिंग तंत्राने घरावर पडलेली सावली बोल्ड ब्रशस्ट्रोकस्नी रंगवली. पिवळा व जांभळा हे विरुद्ध रंग (हे आपण कलर्व थिअरिच्या वेळेला डिस्कस करु) अस्ल्याने सावलीचा रंग छान ग्लेझींग ने हा इफेक्ट छान आला.
FH3.jpg

त्यानंतर निळा+लाल+ बर्न्ट सियेना असा डार्क रंग घेउन निगेटिव्ह पेंटिंग तंत्राने रेलींग आणि खांब यांचे आकार मिळवले , फोरग्राऊंड्च्।ई हीरवी झूडपे ही सुद्धा निगेटिव्ह पद्धतीने उटुन दिअसतील हे बघीतले.
fh4.jpg
त्यानंतर थोडा हिरवा रंग स्प्लॅटर केला आणि चित्र संपवले
fh5.jpg
PS: माझा पीसी खराब झाल्याने OS रीईन्स्टॉल करावी लागली आणि फोटो एडीटर चालत नाहीये, त्यामुळे काही ठीकाणी रंग मुळ चित्राबरोबर मॅछ होत नसतील तसेच दोन स्टेप्स मधे सुद्धा रंगात फरक दिसत असेल त्याबदाल क्षमस्व.
या लेखा बरोबर आपण आवश्यक त्या सर्व तंत्रांवर बोललो आहोत. अजुन बरीच छोटो मोठी तंत्र असली तरी त्यावाचुन सध्या आपले काही अडणार नाही Happy यापुढील लेखात आपण बेसिक कलर थिअरी आणि चित्र चांगले होण्यासाठी कसा वापर करायचा हे पाहु.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के- सुंदर झालेय , खास करुन आकाश आणि मागचा डोंगर , (मी स्नो स्केप्स , बर्फ कसा रंगवायचा त्याचे ट्युटोरिअल करणार होतो पण आत्ता प्लॅन ड्रॉप Wink )
घर्/स्ट्रक्चर सुंदर
झाडी/ झाडं खुप कोरीव काम केल्या सारखी आली आहेत त्यात थोडा फ्री प्लो यायला हवा

ब्रश मध्ये जास्त रंग घेतला तर फ्री फ्लो येईल का? माझ्याकडे छोटे पेपर्स आहेत त्यात सगळं छोटं छोटं काढावं लागतंय. मग झाडी काढताना थोडाच रंग घ्यावा लागतोय कारण चित्राच्या मानाने एक एक स्ट्रोक मोठा येतो. काहीतरीच प्रॉब्लेम्स असतात ना माझे? Uhoh

तुम्ही प्लिज स्नो स्केप्स, बर्फ शिकवाच. न शिकताना मनाने काढणं हे नेहमीच चांगलं येईल असं नाही. टेक्निक्स कळली की चित्रं नेहमीसाठी सुधारेल.

आपण झाडं पेंट करायचा अभ्यास सुरुवातीला केला होता, थोडक्यात झाडांचे फॉलीयेज येक आकार (mass)म्हणुन रंगवावावा आणि त्याला काही पानांचे डिटेल्स दाखवायचे, सगळि पानं नी पान दाखवायचे टाळायचे.
माझे या लेखाच्या प्रतिक्रियेमधले 11 March, 2014 चे पोस्ट पहा, त्यात येक झाड असे रंगवलेय

मी आधी फॉलिएजचा एक आकार काढून घेतेय आणि मग दाट आणि बर्‍याच शेड्स असलेली झाडी दाखवण्यासाठी त्याच्यावरुन ब्रशने स्ट्रोक्स देतेय. काही फोटोंमध्येच खूप पानं पानं आणि ती सुद्धा दाटीवाटीने दिसतात त्यामुळे तसं करतेय. घरासमोरचं झाड मात्र मी आधी आकार न रंगवता नुसत्या स्ट्रोक्स नी रंगवलंय अधुन मधुन मागचं घर दिसावं म्हणून.

आता एखादं चित्र तुम्ही दाखवलंय तसंच फॉलिएज काढून बघते. फ्री फ्लो जमयलाच हवाय.

थँक्स Happy

Pages