निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank u पपीहाबद्दल माहिती आणि लिंक्स दिलेल्या सर्वांना. मलापण पपीहा नक्की कुठला पक्षी, प्रश्नच पडायचा.

आज तु घरीच आराम करतोयस का???????

आणि तुला पपिहा कशाकरता हवा होत?? काही लिहितोय्स का? सोबत फोटो टाकतोय्स का?? :आशावादी बाहुली:

आज तु घरीच आराम करतोयस का???????>>>>नाही ऑफिसमध्येच आहे. Happy Amsterdam आणि Slovakवाल्यांची कृपा झालीय. आज काम थोडं कमी आहे. Wink

काही लिहितोय्स का? सोबत फोटो टाकतोय्स का?? >>>>तसं काहीही नाही. Happy

अरे पण माबो चालत नाही ना तिथे??>>>>अ‍ॅक्सेस आहे पण कधीतरी वापरतो Happy

जागू, जिप्सी ... इथेच होतो ... एक अन एक पोस्ट वाचतो ... खूप दिवसानी लेहिले एवढेच ... सगळ्यांचे इतर विषयावरचे लेखी ही वाचतो
जागू चे मास्या वरचे, बुलबुल चे.. जिप्सी चे ट्रेकिंग चे ........... बाकी जाणकारांची माहिती इत्यादी

साधना, असं नाही म्हणायचं हं मला, मी आधीपासुनच डोक्यावर हात ठेवुन बसलीये कारण मी लिंबुटिंबु आहे. Proud

शाल्मली सर्च केलं तर हे मिळालं:
http://www.maayboli.com/node/33985

त्या झाडाला फुलं येत असतील असं वाटत नाहीये. माझ्या ऑफिसात खुप झाडं आहेत त्याची. फुलं मात्र मी एकदाही पाहिली नाहीयेत.

शेफ्लेरा सर्च केलं तर ही लिंक मिळाली :
http://www.maayboli.com/node/21956

पण त्यावर जे दिसतंय त्या होड्या नाहीत.
मी त्या होडीचा फोटो टाकेन उद्याच.

सावरी म्हणजे तर आपलं म्हातारीचं झाडं ना?
ते नाही.

मी खुपच अडाणी आहे ना?
आत्ताशी शिकतेय Sad
आत्ताशी आवड निर्माण होतेय निसर्गाबद्दल. ते पण इथलंच वाचुन..... काही नवं दिसलं की इथे विचारायची घाई होते. माहीतीतलं दिसलं की इथल्याशी रिलेट करता येतंय का ते पहाते Happy
मज्जा येतेय इतकेंच म्हणेन Happy

पण त्यावर जे दिसतंय त्या होड्या नाहीत.
मी त्या होडीचा फोटो टाकेन उद्याच.>>>>>मग बहुतेक "जंगली बदाम" असेल. Happy

रिये, हे आहे का बघ?
http://www.maayboli.com/node/31551

ए जिप्स्या नाही Proud
हे माहीत आहे मला.
ज्याबद्दल मी बोलतेय ना त्याच्या एंड प्रॉडक्टचा आकार अगदी होडी सारखा असतो. रंग सुद्धा!

ओके टिचरजी Proud
(त्यांनतर ते काहीतरी अगदीच साधं निघालं तर मला काही म्हणायचं नाही आधीच सांगुन ठेवतेय Proud )

मग जिप्स्या म्हणतोय ते खरेय... नाहीतर ते शाल्क्मली आहे...

त्यांनतर ते काहीतरी अगदीच साधं निघालं तर मला काही म्हणायचं नाही आधीच सांगुन ठेवतेय )

निसर्गात सगळेच स्पेशल असते. साधे काहीच नसते.. सो चिल..

,.

स्निग्धातै, खरतर त्या होड्या थोड्याफार तशाच दिसतात. पण त्यातुन जे बाहेर आलंय ना पांढरं म्हातारीच्या केसांसारखं, तसलं नसतं त्या होड्यांमध्ये. टिपिकल पापुद्रा म्हणतात ना तसा प्रकार असतो. आकार आणि रंग थोडासा वेगळा असतो.
माझ्या ऑफिसमधल्या डेस्कवर आहे ती होडी.
नेमकी आज मी सुट्टीवर आहे Sad
उद्या नक्की टाकेन.
इथे अनेकांना माहीत असेल ती असं वाटतंय कारण ते खुप कॉमन झाड आहे. Happy

Varshu tai he urvashi che jhad. Ranichya baget aahe na?

हो गा , जागु, राणी च्या बागेतील आहे ही उर्वशी..

स्निग्धा.. थांकु.. लगेच लिंकेवर क्लिक करून पाहिलं... Happy

बोले रे पपीSSSSSSSSSSSSSS गाण्यात चक्क पोपट दाखवलाय. आणि बोले रे म्हटले की तो पोपटच असणार.... अजुनही संशय येत असेल तर पपीच्या पुढचा शब्द 'हरा' हा पाहावा....
>>>>>>>> Biggrin
जागुलीचा खंडू आणि लाल कृ.क. खूपच गोड.

उर्वशी - शास्त्रीय नाव Amherstia nobilis . या झाडाचे मूळस्थान म्यानमार. म्हणुन प्राईड ऑफ़ बर्मा. फॅमिली/ कुळ - Caesalpiniaceae.
सर्वांना माझी एक नम्र विनंती - ज्या कुठल्या झाडाचे फोटो टाकत आहोत त्यापुढे असे शास्त्रीय नाव व कुळदेखील कृपया टाकावे म्हणजे हे आपल्या सहजच स्मरणात राहील. इथे आता वर्षूदीने ही माहिती कॉपी-पेस्ट करुन त्या फोटोखाली टाकावी - म्हणजे फोटो व माहिती असे दोन्हीही वाचकाला मिळेल. Happy

@ शशांक- मी एडिट करून दिनेश च्या लेखाची लिंक टाकलीये.. दिनेश ला विचारून ती माहिती कॉपी पेस्ट करीन इकडे Happy

माझ्या तामणीला अगदी छोटेसे कोंब फुटलेत ...
आधी महिनाभर झाड अगदी निष्पर्ण झाले होते.
आता आधी फुलांचे तुरे येतील का पानं येतील ?
माझ्या बागेतला या झाडाचा पहिलाच पुष्पोत्सव आहे हा !

मग बहुतेक "जंगली बदाम" असेल. स्मित

रिये, हे आहे का बघ?
http://www.maayboli.com/node/31551 >>>>>>

अशी झाडे युनिव्हर्सिटी समोरच्या मैदाना भोवती आहेत. कुलाबा परिसरात आहेत. एक माझ्या रहात्या परिसरात आहे. पण याचे अखंड फळ कधी मिळाले नाही. काळ्सर झालेले कवच मिळाले. ऑफिसमधे पिन्स ठेवायला वापरत होते.

आता पुन्हा माझ्या ऑफिसचा भाजीपाला:
आज entrance ला ही कुंडी ठेवली होती. कुंडीत काठयांचा मांडव करून वेल चढवला आहे. कशाचा आहे माहीत नाही. चुकुन खाली पडलेले फळ (बी?) हाताळले तर बोट जांभळट-गुलबट रंगाचे झाले. एक मैत्रीण म्हणाली याच्या पानाची भजी करतात. तिच्याकडे याला मायाळू म्हणतात. मला मायाळूची भाजी माहीत आहे पण ती वेगळी दिसते.
office vel.jpgoffice vel 2.jpg

जांभळा मायाळू : पुढील पानावर चर्चा झाली आहे..... जागू, दिनेशदा धन्यवाद!!

Pages