अप्रकाशित............................................................................

Submitted by भारती बिर्जे.. on 9 January, 2014 - 10:23

काही अपरिहार्य कारणामुळे हे लेखन लेखिकेने अप्रकाशित केले आहे ....................................................................................................................

जिगीषा (भारती ..)
२०१७च्या दिवाळीपूर्वी Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!!! काय मस्त लिहिलेस

आवडत्या शेरलॉक होम्सवर अस काही वाचायाचा आनंद निराळाच

महेश,

थोडीशी होम्सगिरी करूया. छाया हे नाव कॉनन डॉईल वापरण्याची शक्यता कमी आहे. कारण इंग्रजीत छ वर्ण नाही. त्यामुळे ही कथा लेखिकेने स्वत: लिहिली असावी. तसेच अनुवादित असती तर लेखिकेने तसा उल्लेख केला असता (लेखिकेचा चांगुलपणा गृहीत धरतोय).

आ.न.,
-गा.पै.

असे करता येते का प्रसिद्ध कॅरॅक्टर्सच्या बाबतीत, म्हणजे कोठे काही परवानगी वगैरे घ्यावी लागत नाही का ?
म्हणुन विचारले.

मनापासून आभार जाई, मामी ,गा पै Happy
महेश, ही माझी होम्स कथेच्या ढंगात लिहिलेली स्वरचित कथा आहे.
अशा प्रकारचंच लेखन मी आतापर्यंत इथे केलंय . पूर्वी एका प्रतिसादात अशा प्रकारच्या लेखनास 'अ‍ॅपोक्रिफल' म्हणतात असं वाचलं होतं.
तुम्ही म्हणता तसं यात परवानगी वगैरेचा प्रश्न येतो का याची योग्य ठिकाणी विचारणा करून माहिती मिळवण्याचा येथेच प्रयत्न करत आहे.

तसं असल्यास मी माझं लेखन बंद करेन.हाकानाका Happy

यावर एक उपाय आहे, तुम्ही मुळ पात्रांना नविन नाव द्या काहीतरी, पुर्णपणे देशी बाजाचे.
रमेश मंत्रींनी पुर्वी असे केले होते, जेम्स बॉण्डचा जनू बाण्डे Happy

जिगिषा....

वेलकम बॅक. बर्‍याच दिवसांनी आपले इथे आगमन झाल्याचे दिसल्ये....त्याचा आनंद तर आहेच, पण तो द्विगुणीत झाला तुमच्यासोबत होम्स आणि डॉ.वॅटसनही अगदी रहस्याला प्रेमगुलाबात गुंफून घेऊन आल्याचे वाचले त्यावेळी. सुरुवातीलाच भारतीय वर्णनाची पात्रे वाचल्याक्षणीच लक्षात आले की निश्चित्तच जिगिषा यानी ट्वाईस टोल्ड स्टोरी तंत्राचा वापर केला असणार. पण कथानक पुढे गेल्यावर लक्षात आले की ती दोन प्रमुख पात्रे वजा केल्यास सारा डोलारा हा पूर्णपणे जिगिषाच्या कल्पनेचा विस्तार आहे जो प्रभावशाली तर आहेच शिवाय वाचकाला थेट २२१ बेकर स्ट्रीटकडेच जायाला उद्युक्त करतो.

भारती यानी श्री.महेश यांच्या 'नामबदल' तंत्राचा वापर करा या सूचनेला पाठिंबा दिला आहे; पण मला विचाराल तर त्याची काहीही गरज नाही. "अ‍ॅपोक्रिफल" चा वापर जागतिक पातळीवर सर्वमान्य असा साहित्य प्रकार आहे. गाजलेल्या साहित्यकृतीमधील पात्रांना जसेच्या तसे उचलले जाते आणि गरजेनुसार कथेची उभारणी करण्यात येते. आपल्याकडील जी.ए.कुलकर्णी यानी या तंत्राचा विलक्षण आणि घट्ट बांधणीने उपयोग केल्याचे दाखले आहेत. त्यातही सर्वन्टेसच्या 'डॉन क्विक्झोट' या जगप्रसिद्ध कादंबरीतील डॉन आणि सॅन्को या दोघांना घेऊन त्यानी रचलेली 'यात्रिक' ही कथा तुम्ही वाचली नसेल तर मी म्हणेन जरूर वाचा. मूळ कादंबरी ज्या ठिकाणी संपते नेमक्या त्या ठिकाणापासून डॉनचा त्याच्या ललाटी अटळ असलेला प्रवास अविरत चालू होता.....ही किमया अ‍ॅपोक्रिफल आणि जी.एं.च्या लेखणीची.

आता थोडे तुमच्या राजकुमारी माया/छायाकडे जातो.
काल रात्रीच ही कथा वाचली होती. अगोदर सांगितल्याप्रमाणे मी ह्या कथेला डॉयलच्या "अ केस ऑफ आयडेंटिटी" घेऊन गेलो होतो. मिस मेरी सदरलॅण्डदेखील आल्या नजरेसमोर. पण राजकुमारींचा उल्लेख आल्यावर समजले की शेरलॉक होम्स असलेल्या नसलेल्या कुणातरी एका भारतीय राजकन्येच्या प्रेमाने विव्हल होणार....झालेही तसेच. होम्स कर्तृत्वाच्या फार थोड्या केसीस असतील की जिथे रक्तपात नसून बौद्धिक द्वंद्व आहे. तुमच्या कथा चिकित्सेने आणि त्यावर असलेल्या कौशल्याच्या आधारे तुम्ही इंग्लंडमधील सर्वाधिक व्यस्त अशा एका व्यक्तीला आपल्याकडील मुलीच्या मोहात पाडले यातच कथेचे पूर्ण वैशिष्ठ्य दिसून येते. "...मला काही वेगळ्याच सुखसंवेदनांनी घेरलं आहे !..." शेरलॉक होम्सची ही शुद्ध कबुली त्याच्या मनी वसलेल्या संवेदनाचे योग्य रूप आहे.

आभार महेश, भारती, पण सूचना विचारात अशासाठी घेता येत नाही की मला त्याच व्य्रक्तीरेखांमध्ये परकायाप्रवेश करण्यात रस आहे !

आणि अशोक यांचा अभ्यस्त प्रतिसाद वाचून मला हायसं वाटलं आहे. अशोक, जी.ए. कुलकर्णी यांनी या प्रकारचे लेखन केल्याचे तुम्ही माझ्या लेडी शॅलॉट च्या धाग्यावरही लिहिले होते.लेडी शॅलॉटचे प्रतीक घेऊन जी.एं.नी एक सुंदर कथा लिहिली होती व ती तुमच्या संग्रही आहे अशा अर्थाचा तो प्रतिसाद होता ( तो संग्रह अवश्य कधीतरी मला वाचायला द्या ) .
वरील प्रतिसादात सर्वन्टेसच्या 'डॉन क्विक्झोट' वरही जी.एं.नी यात्रिक कथा रचल्याचे लिहून तुम्ही मला पुरते आश्वस्त केले आहे. खूप खूप धन्यवाद !

होम्स प्रेमात, तोही भारतीय राजकुमारीच्या, मनोहर कल्पना आहे Happy होम्सला परीपूर्ण माणूस केलंस एकदम. मायासुद्धा त्याला साजेशी अगदी तोलामोलाची रेखाटलीयेस.

जिगिषा, तंतोतंत होम्सकथा उतरलीये. मांडणी जमली आहे. तुझाही होम्सचा चांगलाच अभ्यास दिसतो आहे. फक्त एक-दोन ठिकाणी वाक्यरचना बदलता आली तर पहा - उदा. नोकराने पाहुण्यांची घोषणा केली ऐवजी वर्दी दिली (भाषांतरीत असल्यासारखी वाटली त्यामुळे), अस्खलित राणीच्या इंग्लिश भाषेत ऐवजी राणीच्या अस्खलित... बस्स!

आणखी नवहोम्सकथांच्या प्रतिक्षेत...

अशोकजी, धन्यवाद, या प्रतिसादामुळे आम्हास देखील ज्ञानप्राप्ती जाहल्याचा संतोष आहेच. Happy
@जिगिषा : पु.ले.शु.

सई....

तुला १० पैकी १०.....

माझ्या वरील प्रतिसादात मी "....अस्खलित राणीच्या इंग्लिश भाषेत ऐवजी राणीच्या अस्खलित...." हे वाक्य घेतले होते; पण नंतर काढून टाकले....अशासाठी की त्यासाठी स्वतंत्रच नंतर लिहावे असे मनी आले....आता ते काम तूच केलेस.

महेश..... थॅन्क्स.

Happy

जिगिषा, शीर्षकात 'आणि मी'चे प्रयोजन समजले नाही... वॉटसन साखरेसारखा विरघळलेला असतो कथेत, त्याचे निवेदक म्हणुन स्वतंत्र असे अस्तित्व दाखवणे अभिप्रेत आहे का तुला?

धन्यवाद महेश,हा मुद्दा ऐरणीवर आला तुमच्यामुळे Happy
सई ,आभार ग. दोन्ही सूचना मान्य. लिहिण्याच्या गडबडीत हे बारकावे राहून गेले.शीर्षक मात्र बदलत नाही, मला त्या तिघांच्याही व्यक्तिरेखा समान ठाशीवतेने रंगवायच्या होत्या असं असेल, म्हणजेच तुझ्या शब्दात सांगायचं तर निवेदक म्हणून वॉटसनला तितकंच महत्व लिहिताना देणं माझ्या मनात होतं .. माणसाच्या नामकरणासारखं असतं हे शीर्षक देणं Happy
अशोक ,>>होम्स कर्तृत्वाच्या फार थोड्या केसीस असतील की जिथे रक्तपात नसून बौद्धिक द्वंद्व आहे. << खूप दिवस होम्स मनात घोळत होता पण शब्दात उतरत नव्हता , शेवटी तो आला पण अगदी वेगळ्याच अंदाजात..

होम्स आता प्रताधिकारमुक्त आहे.
जिगिषा, अगदी खुशाल लिहा होम्सकथा. कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही तुम्हाला.
छान लिहिताय. Happy

".....वॉटसन साखरेसारखा विरघळलेला असतो कथेत...."

~ सईने केलेले डॉ.वॅटसन यांचे हे वर्णन अगदी अचूक तर आहेच शिवाय अशी उपमा जिला सुचते ती व्यक्तीही तितकीच गोड स्वभावाची असणार !

अरेच्या , धन्यवाद स्वाती,तुम्हाला इथं पाहून आणि ही लिंक पाहून खूप आनंद झालाय :)लिंक माहितीप्रद आहे,''The idea is to balance the monopoly financial incentive and rights of a creator against the public interest in the free exchange of ideas.'' अगदी पटलं हे वाक्य.

मस्त लिहिलंय. आवडली कथा Happy

कथेतील भाषा ही अनुवादित साहित्यात असते तशीच वाटतेय. पण होम्सची कथा असल्याने छान वाटतंय तसं वाचायला Happy

जिगिषा,
छान लिहिताय. पण एक सुचवावंस वाटतंय.
>ही माझी होम्स कथेच्या ढंगात लिहिलेली स्वरचित कथा आहे.
होम्स कथा मूळ इंग्रजीतून मराठीत आली तेंव्हा त्या त्या भाषांतरकाराने त्यांना भावल्या तशा अंगांनी ते भाषांतर केले. तुम्ही इथे लिहलेला ढंग एका विशिष्ट मराठी भाषांतरकाराचा आहे मूळ कथेचा नाही. तुम्ही त्याच ढंगात न लिहताही वेगळा परिणाम साधू शकता. किंवा तूमचा स्वतःचा ढंग निर्माण करू शकता.
मराठीत एकापेक्षा अधिक भाषांतरकारांनी होम्सच्या कथेचा अनुवाद केला आहे. काही बाल/कुमार साहित्यातही आहेत. त्या तुलनात्मक रितीने वाचल्या तर कदाचित माझे म्हणणे तुमच्या लक्षात येईल.

पटलं अजयजी,आभार. या कथेत अनुवादित मराठीचा परिणाम आहे,हेतू असा की जणू ओरीजिनल कथाच अनुवादित करून वाचतोय असं वाटावं जे याआधीच्या लेखनात झालेलं नाही Happy तसं पुन: होण्याचा संभव नाही..

जिगिषा.....

तुम्ही श्री.अजय यांच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर वाचले. काहीतरी गोंधळ होतोय असे मला वाटते. त्या अनुषंगाने माझा हा विचार.....

तुम्ही म्हणता त्यानुसार वाचकाने जर "जणू ओरिजिनल कथाच अनुवादित करून वाचतोय असं वाटावं..." असे बंधन स्वतःवर घालून घेणे म्हणजे त्याच्या विचार स्वातंत्र्याचा तो संकोच होऊ शकतो. एक लेखिका म्हणून तुम्ही होम्स आणि वॅटसन याना घेऊन स्वःसामर्थ्यावर एक कथा रचली, तिला भारतीय पात्रांची जोड देवून; म्हणजेत मुळातच तुम्हाला स्वतंत्र अशी कथा निर्माण करायची होती हे तर उघडच आहे. मग असा निर्णय तुमचा असेल तर वाचकाने 'मी एक अनुवादित कथा वाचतोय....' असा तुमचा आग्रह कशाबद्दल हे एक कोडेच ठरेल.

अपोक्रिफल कथानकांत तर मूळ पात्रांना सहीसही असे उचलले असले तरी कथेचा डोलारा मात्र भिन्न पार्श्वभूमीत घडतो शिवाय परिसराचे वर्णनही अस्सल इथल्या मातीतीलच वाटले पाहिजे अशी दक्षता घेणे हे लेखकाचे कार्य होय. कथेवर अनुवादाची छाया दिसून येणे हा तुमचा दोष नसून त्या मूळ पात्रांनी जागतिक वाङ्मयात मिळविलेले अचाट स्थान कारणीभूत आहे. होम्स आणि वॅटसन ही नावे वाचताच वाचकाचे लक्ष लेखकाच्या अनुवाद क्षमतेकडे जाईल हे सत्य, पण ज्यावेळी तो कथा वाचायला सुरुवात करेल त्यावेळी हेही स्पष्ट होत जाईल की या कथानकाचा पाया सर्वस्वी नव्या लेखिकेच्या करामतीवर उभारण्यात आला आहे. म्हणजेच अशा कथांचा ढंग आगळा निर्माण करणे हे लेखिकेच्या हाती आहे....जे तुम्ही केल्याचा दाखला दिसतोच.

कथा नेपोलियन आणि जोसेफाईन यांच्या प्रेमकहाणीची असो वा रॉबर्ट ब्राऊनिंग आणि एलिझाबेथ बॅरेट यांच्या प्रेमाची असो....त्यांच्या पत्रव्यवहारावरून त्यांच्या संबंधी अनेक भाषांतून अनेक अनुवाद वेळोवेळी प्रसिद्ध होत गेले आहेत. ते वाचताना आपण एखादा 'अनुवाद' वाचत आहोत अशी बिलकुल भावना मनी येत नाही. कित्येकवेळा त्यातील शब्दमांडणीही खटकत नाही. इ.स. १७९६ च्या नोव्हेम्बरमध्ये नेपोलियनने जोसेफाईनला लिहिलेल्या पत्राची सुरुवात अशी आहे : " I arrive at Milan, I rush to your apartment...." पत्र दोनशे वर्षापेक्षाही जास्त जुने, त्याकाळी "अपार्टमेन्ट" ही संज्ञा अस्तित्वात असेल का ? हा प्रश्न मला खरं तर पडायला हवा होता...पडलाही...पण मी ते टाळून पुढे गेलो कारण मला त्यातून नेमके काय घ्यायचे याचा बोध झाला होता. कारण त्या अनुवादकर्त्याने वाचकाला हवा तो ढंग त्या रचनेतून निर्माण केला होता.

तुमचे वाचन जसे सशक्त आहे तितकेच एखादी कृती शब्दबद्ध करण्याची हातोटीही तुमच्यात आहे. त्याचा आधार घेऊन....किंबहुना लहान तोंडी मोठा घास घेऊन....म्हणतो की वाचकाचा अनुनय न करता तुम्हाला जसे भावेल तसेच लेखन इथे...वा अन्यत्रही....प्रसिद्ध करीत गेलात तर ते मराठी साहित्यात भूषणास्पद स्थानावर विराजमान होईल.

पण लेखकाने/लेखिकेने जर जाणूनबुजून "मूळ कथा सर आर्थर कॉनन डॉयल यांची असून तिचा कोणा भाषांतरकाराने केलेला अनुवाद" अशा आकृतीबंधात लिहिलं असेल तर त्या लेखनाला त्यामुळे काय कमीपणा येतो? उलट तिने सर डॉयल आणि अनुवादकर्ते दोघांनाही ट्रिब्यूट दिली आहे, आणि उत्तम प्रकारे दिली आहे याचं कौतुक नाही का?

>>एक लेखिका म्हणून तुम्ही होम्स आणि वॅटसन याना घेऊन स्वःसामर्थ्यावर एक कथा रचली, तिला भारतीय पात्रांची जोड देवून; म्हणजेत मुळातच तुम्हाला स्वतंत्र अशी कथा निर्माण करायची होती हे तर उघडच आहे. मग असा निर्णय तुमचा असेल तर वाचकाने 'मी एक अनुवादित कथा वाचतोय....' असा तुमचा आग्रह कशाबद्दल हे एक कोडेच ठरेल.

अगदी अगदी, माझेही हेच मत आहे. पुन्हा एकदा मराठी जेम्स बॉण्डचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाहीये.

जनू बाण्डे लोकसत्ता वाचत असताना एकाने येऊन त्याला चतुरंग पुरवणी मागितली,
आणि ती पुरवणी घेत आभारादाखल काहीतरी पुटपुटला, जे फक्त जनूलाच कळू शकले,
ते होते परवलीचे वाक्य "ऑई थॉर टुझे ऑपकार"
ऐकताक्षणीच पुर्ण लोकसत्ता त्या व्यक्तीला देऊन त्याच्याकडची बॅग घेऊन जनू सोलापूरकडे जाणार्‍या रेल्वेत शिरला. Lol
(अर्थात मंत्रींच्या मुळ कथेतले केवळ परवलीचे वाक्य आठवत आहे, बाकीची फोडणी मी दिलेली आहे)

पण लेखकाने/लेखिकेने जर जाणूनबुजून "मूळ कथा सर आर्थर कॉनन डॉयल यांची असून तिचा कोणा भाषांतरकाराने केलेला अनुवाद" अशा आकृतीबंधात लिहिलं असेल तर त्या लेखनाला त्यामुळे काय कमीपणा येतो? उलट तिने सर डॉयल आणि अनुवादकर्ते दोघांनाही ट्रिब्यूट दिली आहे, आणि उत्तम प्रकारे दिली आहे याचं कौतुक नाही का? >>>> +१

मला तरी जिगिषाने मुद्दामहून अशा भाषेत लिहिले असावे असेच वाट्ले आणि म्हणून कथा जास्त भावली. तिचं पूर्ण भारतीयीकरण केलं तर चार्मच निघून जाईल.

अशोक,महेश , थोडा खुलासा करायचा प्रयत्न Happy अशोक, अनुवादाबद्दल तुम्ही म्हणता ते १०१% बरोबरच आहे.तुमच्या कळकळीबद्दल अजिबात शंका असण्याचा प्रश्नच नाही , हे सर्व संदर्भ वाचूनही आकलन वाढत जाते आहे .तुम्ही म्हणता तसे चांगला अनुवाद वाचताना ''ते वाचताना आपण एखादा 'अनुवाद' वाचत आहोत अशी बिलकुल भावना मनी येत नाही'' ..
खरेय, पण हा मुळात अनुवाद नाहीच ! ओरिजिनल लिहिताना हा फॉर्मशी केलेला एक खेळ आहे.
हे अन याआधीचं याप्रकारचं लेखन करताना फॉर्म मुद्दाम कधीही ठरवला नव्हता, पण लिहीताना प्रत्येक वेळी वेगळा सूर लागला त्याचा आनंद घेत गेले. जसे की वुडहाऊससाठी पत्र ही स्पर्धेचीच मागणी होती, त्यासाठी त्या पत्रभाषेतला जिव्हाळा,लेडी शॅलॉट या कवितेसाठी लिरिकल गद्य तर रिबेका या कादंबरीसाठी ललित पद्य असे प्रयोग होत गेले. या साऱ्या ललितकृती मी फक्त इंग्लीशमधूनच अर्थातच वाचल्या होत्या.
यावेळी प्रथमच होम्स हा विषय असा होता जो मी मुळातूनही वाचलाय अन मराठीत अनुवादितही. त्या अनुवादित भाषेचा बाज या कथेतल्या भाषेला लिहितालिहिता येत गेला त्याची मी मजा घेतली. अजयजींनी अचूक अधोरेखित केले ते,त्यांना दिलेल्या प्रतिसादातही मला असेच म्हणायचे होते की या लेखनानुभवापुरताच हा फ्लेव्हर आहे, बंधन नाही, ही शैली पुनरुक्तही होणार नाही.
स्वाती अन मामींना जाणवलंय ते.
पुनश्च आभार सर्वांचे या साऱ्या प्रेमाच्या सूचनांबद्दल.

पण लेखकाने/लेखिकेने जर जाणूनबुजून "मूळ कथा सर आर्थर कॉनन डॉयल यांची असून तिचा कोणा भाषांतरकाराने केलेला अनुवाद" अशा आकृतीबंधात लिहिलं असेल तर त्या लेखनाला त्यामुळे काय कमीपणा येतो? उलट तिने सर डॉयल आणि अनुवादकर्ते दोघांनाही ट्रिब्यूट दिली आहे, आणि उत्तम प्रकारे दिली आहे याचं कौतुक नाही का?>>>>

स्वातीला आणि मामींनाही १००% अनुमोदन. जिगिषा, तू केलेला खेळ इथे मजा वाढवतो आहे. कथा आवडण्यात त्या फॉर्मचासुद्धा महत्वाचा वाटा आहे. फॉर्मला कुठेही धक्का न लावता त्यात पूर्णपणे सर्वस्वी नवे तपशील भरून ती प्रभावी लिहिणे ही अवघड कसरत आहे.
केवळ नावे तीच ठेवून बाकी सगळे बदलून कथा परिणामकारक झाली असती का शंका आहे.

पण लेखकाने/लेखिकेने जर जाणूनबुजून "मूळ कथा सर आर्थर कॉनन डॉयल यांची असून तिचा कोणा भाषांतरकाराने केलेला अनुवाद" अशा आकृतीबंधात लिहिलं असेल तर त्या लेखनाला त्यामुळे काय कमीपणा येतो? उलट तिने सर डॉयल आणि अनुवादकर्ते दोघांनाही ट्रिब्यूट दिली आहे, आणि उत्तम प्रकारे दिली आहे याचं कौतुक नाही का?>> नक्कीच.

मला उल्ट एक फॉर्म म्हणून हा प्रकार जास्त भावला. तुम्ही डॉयल किंवा भाषांतर वाचत नाही आहात, हे माहितअसूनसुद्धा डोळ्यासमोर शेरलॉक त्याचे ते २२१ बेकर स्ट्रीट आणी तो वैतागलेला वॉट्सन डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. आवडलं हे खूप;

Pages