तात्यांचा अनुभव खोटा किंवा चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. पण कडवट अनुभवातूनही जेव्हा माणसे आनन्द शोधून म्हणा किंवा ते बाजूला ठेऊन म्हणा जेव्हा जगू पाहतात त्यांचेविषयी मला नेहमी कुतुहल, कौतुक वाटते आणि जगण्याला उभारीही येते. बर्याच वेळा मला त्यांच्यासारखे वागायलाही जमत नाही पण त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
बर्याचदा दोन नातेवाईक इतके भांडतात इतके भांडतात की असे वाटते की ते आयुष्यात पुन्हा एकमेकाचे तोंड पाहणार नाहीत. आठ दिवसानी त्याना हसत खेळत गप्पा मारताना पाहिले की आपल्यालाच एक सुखद भावना निर्माण होते. साने गुरुजींची टिंगल करण्याचे दिवस आहेत पण त्यांची ओळ आठवते
'असावे सौख्य जगतात" तात्यानी फोरास रोडचा विषय काढलाय म्हणून आठवले तिथे जे प्रवीण पाटकरांचे काम आहे आणि अहमदनगरचे आमचे डॉ. गिरिश कुलकर्णी जे स्नेहालय नावाची संस्था वेश्यावस्तीत चालवतात ते पाहिल्यावर मन थक्क होते. ही उर्जा कोठून आणतात म्हनण्यापेक्षा यातून काय होणार आहे हे मानसिक मळभ ही मंडळी कसे दूर करतात हा खरा अभ्यासाचा विषय आहे.
एक दारूबन्दी अधिकारी होते. हल्ली दारूबन्दी हा चेष्टेचाच विषय आहे. त्यातही शासनात दारूबन्दी खाते आहे हाही एक विनोदच म्हणायचा. मी त्याना विचारले दारू पिण्याला एवढी प्रतिष्ठा प्राप्त झालेली असताना तुम्ही कसे काय काम करता हो. हे म्हणजे पु लंच्या भाषेत ताम्बट आळीत सतार वाजविण्यासारखे आहे. त्यानी सांगितले मला या कामाची आवड आहे. आणि अगदीच परिणाम होत नाही असे समजू नका, एखाद्या कार्यक्रमाने कधी कधी सम्पूर्ण गाव बदलून जाते ते समाधान काही औरच असते.
नन्दुरबार जिल्ह्यात माझा ग्रामीण भागाशी माझा जवळून संबंध येतो. तिथल्या आदिवासींच्या धर्मात आणि विधींमध्ये दारूचे महत्व असाधारण आहे. त्यातील काही ट्राईब्जमध्ये पाचविच्या दिवशी पल्स पोलिओसारखे दारूचे थेम्ब अर्भकाला पाजतात. असा हा बालपणीच बाप्तिस्मा झालेला माणूस आयुष्यभर काय करीत असेल हे सांगायलाच नको. दारू हे व्यसन नसून संस्कृतीचा व जीवनशैलीचा भाग झालेला असल्याने त्यात guilty वाटन्याचे अथवा चुकीचे काही करतोय हे वाटण्याचे कारणच नाही. पण त्यामुळे विशेश्त: उपाशी पोटी पीत राहिल्याने पार वाट लागते. बायकाही त्याला अपवाद नाहीत. (मागे V&C वर स्टेट्समधल्या हळदीकुंकवात बायकानी दारू प्यावी का यावर चर्चा झालेली आठवते का?)
अशा या प्रदेशात म्हणजे नन्दुरबार जिल्यात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रभावामुळे काही गावात दारूबन्दी झाली हे पाहून थक्क व्हायची पाळी माझी होती.
आता हे करताना स्वाध्यायीना काहीच अडचणी आल्या नसतील का? पूर्वीच्या मिशनर्याच्या चिवटपणाने त्यानी हे केलेच...
(दारू पिण्यात वाईट ते काय आहे असे हितगुजवरील बहुतांश मंडळी मानतात, पण तात्यांसारखे संवेदनाशील लोक दारू पिऊन मारझोड करणार्या नवर्यांचा राग राग करतात म्हणजे ते नक्कीच वाईट असले पाहिजे. ही मारझोड नन्दुरबारात, सदाशिव पेठेत,मलबार हिलवर आणि न्यू जर्सीतही होते असा अनुभव आहे..)
तर मला एक शेरही आठवला,
शेख करता है मस्जिदमे खुदा को सजदे,
उसके हर सजदेमे असर हो ये जरूरी तो नही....
तेव्हा काहीतरी करीत राहिले पाहिजे प्रत्येक वेळी त्याच्यातून काही निष्पन्न होईलच याची आशा कशी करता येईल म्हणून औपचारि तर औपचारिक पण हे दिन, सप्ताह या गोष्टी साजर्या झाल्या पाहिजेत असे मला वाटते...
तुमचं काय मत्त हाये ह्येच्यावर म्या इच्यारतू....
रॉबीन, मस्तच हो.. आमचं मत अस हाय की आम्ही उघड्या डोळ्यांनी ह्या दारूपायी घर .. संसार.. मुलाबाळांची आयुष्य उद्धस्त होताना पायीले हाये, तेंव्हा असा दिवस साजरा करणे म्हणजे अशा गोष्टींना प्रेरणा देऊन समाजघातक कृत्य करणे होय.