आषाढ विरहिणी ....

Submitted by पुरंदरे शशांक on 16 July, 2013 - 02:06

आषाढ विरहिणी ....

आषाढसरी कोसळती बेफाम डोंगरावरती
लख्खशी कोरडी झाडे पानातून अश्रू झरती

ते उनाड पक्षी लपती अश्रूंना घेऊन पोटी
पाण्यातून वहात गेल्या त्या गंधफुलांच्या वाती

अर्थाविण येणे सुकणे अश्रूंचे वहात जाणे
वार्‍यावर विरून जाते चिंबसे गीत विराणे ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक दोन शब्दांचे प्रयोजन नीट लक्षात आले नाही. जसे 'पानातून अश्रू', 'गंधफुलांच्या वाती'!

मात्र या लहानश्या कवितेने एक खूप चांगली कविता वाचल्याचे समाधान दिले. आवडली.

धन्यवाद!

ते उनाड पक्षी लपती अश्रूंना घेऊन पोटी

अर्थाविण येणे सुकणे अश्रूंचे वहात जाणे
<<<

या दोन ओळी अधिक आवडल्या.

काही ठिकाणी लघु गुरू किंचित बदलले असते तर प्रॉपर वृत्तातही बसलीच असती (अर्थात, आत्ताही उच्चारांनुसार वृत्तात येत आहेच). पहिली द्विपदी गझलेच्या मतल्यासारखी झालेली आहे.

अतिशय सुंदर ,
मात्र या लहानश्या कवितेने एक खूप चांगली कविता वाचल्याचे समाधान दिले. आवडली. बेफिकीर यांच्याशी सहमत .

हा पाऊस काही उदास, हळव्या आठवणींचा आहे - आतल्या आत अश्रू ढाळणार्‍या अशा आठवांचा- पानातून झरणारे दु:खच जणू ..... बाहेर कितीही कोरडेपणाचा आव आणला तरी आत ते दु:ख झरतच आहे ....
दु:ख पोटात ठेवलेल्या त्या उनाड आठवणी केव्हा फडफड करुन उठतात ते कळतही नाही .... त्या आठवांचा आता केवळ एक गंधच मागे उरलेला ..... तो वाहून जातो असं वाटतं खरं पण त्यालाही एक चिवटपणा आहेच वातींसारखा ....

सर्व रसिकांचे मनापासून आभार .....