कक्षा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कालपरवा लाडक्या शिरिषाच्या
झुळुका घरभर खेळत होत्या
रोजच्या रख्ख उन्हाला
गुलाबी फुलांचा सहवास होता!

सुसह्य होते माझे दिवस
कुणाची तरी सावली शिरी होती
सुंगधित होत्या माझ्या रात्री
ती मौज मी लुटली होती!

माझे घर रस्त्यावर होते
सगळे काही वाहत असताना
तेवढे हे एकच झाड
निश्चल उभे डोलत होते!

आपली कक्षा रुंदावण्यासाठी
नभाची पोकळी त्याने घेतली होती
मात्र..अरुंद रस्त्याच्या मधे येऊन
रुजत जाण्यात चुकले होते!

यशवंत/बी

विषय: 
प्रकार: 

छान..

छान कविता.

नभाची पोकळी घेणारे जर झाड असेल तर 'त्यानी' ऐवजी 'त्याने' करा.
जर झाड कापणारे असतील तर 'त्यानी' ऐवजी 'त्यांनी' करा.

गंमत म्हणजे कवी यशवंत आणि कवी बी दोघंही मराठीतले जुन्या काळचे नावाजलेले कवी आहेत.
तुमच्या कवितेखाली दोन्ही नावे पाहून त्या योगायोगाची गंमत वाटते.