माझी पहिली डेट

Submitted by अपरिचित on 27 February, 2013 - 02:18

पुणे. मार्च २००७. शुक्रवार संध्याकाळ. वेळ ६-६:३० ची. नेहमीप्रमाणे नेहमीच्याच बालाजीनगर मधील नेट कँफ़ेत गेलो. नेहमीप्रमाणे १० मिनिटात मेल चेक केले. मी पाठवलेल्या नौकरीसाठीच्या अर्जाला कुठुन तरी उत्तर मिळाले असेल, अशी आशा असायची. उर्वरित ५० मिनिटे याहुसाठी राखीव ठेवलेले असायचे. याहुवर वेब कँमेरा लावुन देशी/परदेशी मित्र-मैत्रिणिसोबत गप्पा मारणे, ह्यातच इतका गुंग असाय़चो की, ओर्कुट किंवा मायस्पेस वगैरेकडे ढुंकुनसुद्धा बघत नव्हतो. मेल चेक केल्यानंतर याहु चँटला लाँगीन केले. कोण-कोण हजर आहे ह्यावर नजर भिरवली. होते तसे बरेचशे आँनलाईन. पण त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी मी नव्हतो आलो. "ती" होतीच तिथे आँनलाईन. तसे आम्ही फोनवर बोलायचो अधुन-मधुन. क्वचितपणेच मी तिला फोन करत असे. पण तिचे समस/फोन मात्र नियमीतपणे येत असत. तशी आमची कधीही भेट झाली नव्हती, ना की आम्ही एकमेंकाना चेहरा ओळखुन होतो. दोनेक महिन्यापुर्वीच आमची एका याहु रुम मध्ये भेट झालेली. याहू परंपरेनुसार आपापले ए.स.ल.,आवडी-निवडी शेअर केले, सुत जूळले. वारंवार याहुवर गप्पा मारु लागलो. वीस-एक दिवस झाले असतील, तिनेच माझा मोबाईल क्रमांक मागितला. आनंदाने दिला. फोनवर सुद्धा गप्पा रंगायच्या. पण प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. पुण्यातच कुठे तरी राहत होती. भेटण्याची तर ईच्छा होती पण भेटीचा योग आला नव्हता. मी स्वता:हुन कधी विषय सुद्धा काढला नाही. खात्री होती, ज्याप्रमाणे तिने स्वता:हुन मोबाईल नंबर घेतला त्याप्रमाणे तीच स्वता:हुन भेटीस बोलावेल. असो.

आज ती सुद्धा माझ्या मागोमाग याहुवर उपस्थित झाली. ऒपचारीक बोलणे झाले. उद्या शनीवार असल्याने तिचा कुठेतरी इंटरव्यु असणार हे माहीती होते. शेवटी ती एक जावा प्रोग्रामर. त्यासंदर्भात तिला विचारणा केली, तर कळाले की उद्या सकाळी ११:११-३० च्या सुमारास तिचा अप्पर इंदीरानगरजवळ कुठेतरी इंटरव्य़ु होता.बोलता बोलता तिनेच विषयाला हात घातला आणी उद्या शनीवारी ४च्या सुमारास सारसबागेत भेटण्याचे ठरले. तसेही शनिवार असल्याने माझे ओँफ़ीस दुपारी २:०० लाच सुटणार होते. घरी येण्यासाठी बी.आर.टी. बसने साधारणपणे एक तास आणी तय्यारी करुन बागेत जाण्यासाठी सुमारे अर्धा तास लागणार होता म्हणजे वेळ माझ्याकडे व्यवस्थीत होता. भेटण्याची वेळ, ठिकाण ठरली होती. आम्ही कधीही वेब-कँमेरेवर गप्पा मारल्या नव्ह्त्या. त्यामूळे एकमेंकाना कसे ऒळखणार ह्यावर खलबते झाली. ती "लवेंडर" रंगाचा ड्रेस परिधान करुन येणार होती. उद्याच्या भेटीची आस घेऊन बाय केले.

सकाळी हडपसरला आँफ़ीस मध्ये गेलो, लक्ष तसे नव्ह्तेच. काम सुद्धा विशेष असे काही नसल्याने निवांत होतो. दुपारी अंदाजे १च्या सुमारास फोन खणखणला. तिचाच होता. इंटरव्यु लवकर आवरल्याने ती दुपारी दोनच्या सुमारास फ़्री होणार होती. तिने २ वाजता बोलावले. वेळ बदलल्याने तिने भेटण्याचे ठिकाण सुद्धा सारसबाग बदलुन "राजीव गांधी, कात्रज" ला बोलावले. झाली. माझी धांदल उडाली. कलिगला काहीतरी थातुरमातुर कारण देऊन लगेच निसटलो. माझ्याकडे निव्वल एक तास होता. ह्यावेळी बस मिळेल की नाही ह्याची शाश्वती नव्हती. ओँफ़ीसबाहेर पडलो, विचार केला, प्रथमच भेटण्यास जात आहे, काहीतरी गिफ़्ट घेऊन जायलाच हवे. पण आता मोक्याच्या क्षणी काय करावे काही सुचेनासे झाले होते. कुठे गिफ़्ट्चे एखादे दुकान दिसते का बघितले. गिफ़्ट काय घ्यावी ह्याबद्दल मनात काहीच आराखडे नव्हते. जे मनाला पटेल ते घ्यावे असा विचार करुन बघत होतो. एक दुकान दिसले. तेथे इंटेरीअर डेकोरेशनसाठी लागणारे बरेचशे साहित्य होते. त्यापैकी काचेचा जवळपास एक फुटाचा "हंसाचा जोडा" चांगला दिसला. घेतला विकत. बसची वाट बघण्यापेक्षा रिक्षा केली, मगरपट्टा ते कात्रज. गिफ़्ट आणी रिक्षाचे भाडे ह्या दोघांनी चांगलीच कात्री लावली होती खिशाला. ती रक्कम नाही नाही म्हणता माझ्या तेव्हाच्या एकुण पगाराच्या २०% होती. पर कोई बात नहीं. निघेपर्य़ंत १:३० झाले. १० मिनिटातच तिचे फोन आला "अरे कुठपर्यंत आलास ? कुठे पोहोचलास ? लवकर निघायला काय झाले होते ? लवकर ये, एक गडबड झालीये." "गडबड ! कसली गडबड ?" "ते आल्यावरच सांगेल, पण तू ये रे लवकर."

४०-४५ मिनिटात पोहोचलो एकदाचा भारती विद्यापीठासमोर. तेथून पाच-एक मिनिटाचे पायी अंतर. रिक्षाच्या आरश्यात स्वता:चाच चेहरा एकदा न्याहाळून घेतला. थोडेशी धाकधूक असल्याने, डोळे बंद करून १ ते १० अंक मोजले आणी तिच्याकडे जाण्यासाठी कूच केली. बागेच्या प्रवेशद्वारावर आलो. शनिवार असल्याने दुपार असून सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. ऊन सुद्धा चढलेले होते. रसवंती, आईसक्रीमची दुकाने मांडलेली होती. पण नजर मात्र तिला शोधत होती. फोन करून तिला सरळ भेटता आले असते पण मला भेटण्यासाठीची तिची उत्सुकता बघण्याचे इच्छा होती. त्या रंगीबेरंगी वातावरणात मला मात्र "लवेंडर" शिवाय दुसरा रंग दिसतच नव्हता. ३-४ मिनिटे झाली असतील ती काही दिसेना. इतक्यात तिचाच फोन परत आला. फोन उचलला. "अरे, आलास की नाही अजून ? किती वेळ ताटकळत ठेवणार आहेस ?" मी काही उत्तर देणार तितक्यात ती दिसली. एका दुकानच्या सावलीत खांबाच्या आडोशाला उभी होती. फोनवर काहीही न बोलता मी कट केला. तिच्याकडे जाऊ लागलो. जराश्या भांबावलेल्या नजरेने ती इकडे-तिकडे बघत होती. जवळ गेलो. सामोरा उभा राहिलो. हलकीशी स्मित चेहऱ्यावर घेऊन हळुवार आवाजात तिचे नाव पुकारले. तिच्याही चेहऱ्यावर मला भेटण्याचा, बघण्याचा आनंद दिसला. नजरेला नजर देत काही वेळ दोघेही उभे होतो. बहुधा १-२ मिनिटे झाली असतील. कदाचित कमी किंवा जास्त सुद्धा. सुडणार होती दिसायला. गोरा भालप्रदेश व त्यावर छोटीशीच लावलेली बिंदी, तिचे ते कोरेलेले पण आखीव भुवया, बोलके व पाणीदार डोळे, रेखीव नाक, धनुष्यागत दिसणारे तिचे हलकेसे लालसर ओठ. खालचा ओठ जरासा जाड आणी मोठ्यापेक्षा किंचित लहानच होता. गोल हनुवटी. छान दिसत होती. काही क्षण कोणीच बोलत नव्हतं. स्मितचेहऱ्याने जणू डोळ्यानीच बोलणे सुरु केले होते. थोड्या वेळाने मी विचारले, "कशी आहेस ?". थोडीशी लाजतच उत्तरली "छान आहे. तू कसा आहेस ?"
आणि मग आमचे बोलणे, गप्पाटप्पा सुरु झाले. तसे आम्ही बऱ्याचदा फोनवर बोललोच होतो पण प्रत्यक्षातील बोलणे मात्र नाविन्यपूर्ण वाटत होते. तिने बोलताना केलेले हातवारे, वाक्यानुरूप तिच्या चेहऱ्यावर ओसंडणारा उत्साह, डोळ्यात येणारी चमक, हे सगळे मी माझ्या डोळ्यात साठवत होतो. तसा मी थोडा शांत स्वभावाचा असल्याने मी केवळ वाक्यागणिक एखादे शब्द उच्चारात होतो.
हॉटेलवाला काही बोलू नये म्हणून २-३ दा उसाचा रस पिउन झाला होता. ५०-५५ मिनिटे झाली असतील कदाचित. मग ती म्हणाली "आता मला निघायला हवे. येतोस मला सोडायला ?" मी न म्हणून कसे चालणार होते. हो म्हणून लांबपर्यंत मान हरवली.

निघालो. आमच्या प्रथम भेटीच्या परतीच्या प्रवासाला निघालो. भारती विद्यापीठासमोरील बी.आर.टी. बस स्थानकासमोर उभा राहिलो. गर्दी आहे हे कारण देऊन १-२ बस मुद्दामून जाऊ दिल्या. तसेही आम्हास दूर तसे काही जायचे नव्हते. ती राहायला "अप्पा बळवंत चौकात" होती. माझा तसा पास होता. कात्रज पासून स्वारगेट मार्गे हडपसर पर्यंत. दहा एक मिनिटे झाले असतील, तुलनेने एक रिकामी शट्टर बस आली. त्यात चढलो. ती जवळच बसली. अबकचे दोन तिकीट मागितले तर कळाले की ती बस डेक्कन मार्गे शिवाजीनगरला जाणारी होती. म्हणजे आम्हाला "स्वारगेट" पर्यंतच बसता आले असते. मी थोडासा गोंधळलो. पण ती म्हणाली "स्वारगेट ते स्वारगेट. काहीही हरकत नाही." स्वारगेट पर्यंत दोघेही शेजारीच बसून सुद्धा काहीही बोलत नव्हतो. बहुधा काही सुचतच नव्हते. स्वारगेटला उतरलो. तिला सांगितले, "अगं, माझा पास असल्यामुळे मी कधी बघतच नाही कुठली बस आहे ती. जवळपास सगळ्याच गाड्या स्वारगेट पर्यंत येतातच." आता परत धांदल उडू नये म्हणून सरळ रिक्षा केली. नशिबाने दुतर्फा गर्दी होती. रिक्षा हळू हळू जात होती. तिने सावकाशपणे तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले. दोघेही नि:शब्द होतो. १०-१५ मिनिटातच तिच्या घरासमोरील गल्लीत रिक्षा उभी केली. ती उतरली. पाणीदार डोळ्यात हसू आणि चमक घेऊन ती उतरली. पाठमोरी होऊन घराकडे गेली. एकदा-दोनदा मागे वळून हात हलवला. मीही प्रत्युत्तर दिले. ती वळाली आणि मी सुद्धा निघालो माझ्या पहिल्या भेटीची आठवण डोळ्यात आणि मनात साठवून..........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००७ - पहिली date
.
.
.
.
.

२०१३ - मा बो वर लिखाण ...

मधल्या काळात लग्न केले कि नाही..

राग मानू नका "अपरिचित" राव ... पण कथा आवडली. (टीप: लोक्स किती ही काही म्हणाले तरी सर्व काही सांगू नका)

विनायकराव, एके ठिकाणी विषय निघाला आणी आपण सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करुन बघावा म्हणुन वरील लिखाण केले.
मित्रांनीच येथील दुवा ( लिंक ) दिली.
तसा इथे हा माझा लिहिण्याचा पहिलाच अनुभव.

आता कोणी कितीही चढवले तर नंतर काय झाले हे मी थोडीच ना सांगणार आहे... [:D]

सुडणार होती दिसायला.

>> तुम्हाला 'सुंदर' म्हणायचंय का? Uhoh

मस्त होती डेट. पुढे लिहा कि काहितरी..