शालेय मुलांसाठी सायन्स प्रॉजेक्ट/ आर्टस अँड क्राफ्ट इ.

Submitted by मी_आर्या on 12 February, 2013 - 05:23

नमस्कार,

सध्या शाळेत केजी पासुन मुलांच्या शाळेत आर्ट्स अँड क्राफ्ट एक्जिबिशन, सायन्स फेअर वै. होतात.
मुलांना शाळेतुनच विषय दिला असेल तर ठीक नाहीतर काय करावं हा विचार करतच वेळ जातो. आई वडीलही मुलांना त्यांचं अडेल तिथे मदत करतातच. इथे आपल्या मुलांच्या प्रॉजेक्ट्साठी काय काय बनवले/ ठेवले होते किंवा त्या साठी नव नविन आयडीयाज या गोष्टी शेअर करुयात.

सुरुवात करते माझ्यापासुन. मला कमित कमी खर्चात आणि अव्हेलेबल नॅचरल रिसोर्सेसमधे पण हुबेहुब आणि नॅचरल वाटाव्यात अशा वस्तु मुलाने बनवाव्यात असे वाटत होते. त्यामुळे मी त्याला तशाच आयडीया दिल्यात.

१) मुलगा के जी मधे होता तेव्हा त्यांना क्लेपासुन मिठाई बनवायला सांगितलं होतं.
मी मुलाला दिवाळीतला गिफ्ट येतो तसा हार्टशेप बॉक्स दिला . वेगवेगळ्या रंगाची क्ले घेउन त्याचे पेढे, गुलाबजाम,सोनपापडी, जिलबीचे आकार करायला सांगितले.
गुलाबजाम करतांना एकदम डार्क ब्राउन कलरची क्ले नव्हती म्हणुन डार्क पर्पल कलरची क्ले घेउन त्याला लांबुळका आकार करुन तो खरा खुरा वाटण्यासाठी चक्क साखरेत घोळण्याची आयडीया दिली. एवढा डिट्टो जमला होता, की टीचर्स आणि पॅरेन्ट्ससुद्धा उत्सुकतेने बघत होते. एक मिठाई तळलेल्या कुरड्यांच्या चुर्‍यात घोळली. तर पिवळ्या रंगाच्या क्लेचा चौकोनी तुकडा/ ठोकळा करायला सांगितला. मुलाला रेझर हातात धरता येणार नाही म्हणुन आम्हीच त्यावर बारीक बारीक चिरा दिल्या....हुबेहुब सोनपापडी दिसायला लागली.

२) १ली त असतांना मुलाला पुन्हा मातीची फळं बनवायला सांगितली होती. यावेळेस फळांच्याच आकाराची बनवायची आणि क्ले खुप लागेल म्हणुन काळी माती आणली. गाळुन घेउन ती भिजवली. तिची छान खर्याखुर्या आकाराची आंबा, पेरु, चिक्कु, पपई, सफरचंद, सिताफळ,केळी अशी फळ बनवली. थोडा वेळ वाळवायला ठेवली (खुप वाळली की तडे जातात). अर्धवट वाळलेली असतांनाच त्यांना त्या त्या फळाप्रमाणे कलर दिले. त्यांना देठाच्या जागी काडीने आधीच छिद्र करुन ठेवलं. दुसर्‍या दिवशी ऐन शाळेत जायच्या वेळेस बागेतली पेरुची, आंब्याची, सिताफळाची, चिक्कुची पानं तोडुन आणली आणी देठाच्या जागी खोचुन ठेवली.

३)मुलगा ४थीत असतांना ख्रिसमसच्या वेळेस जनरली सगळ्या मुलांना सांगतात तसच यांनाही ख्रिसमस ट्री, सांता इ. बनवायला सांगितलं होतं. आम्ही एक रिकाम्या खोक्याचं घर बनवलं, थर्माकोलचा ख्रिसमस ट्री, त्याला मधुन मधुन कापुस चिटकवलेला. घराच्या वर आणि आजुबाजुला भुरभुरलेला बर्फ दाखवण्यासाठी कापुसाचे अगदी छोटे छोटे गोळे करुन लावले. आणि मुख्य म्हणजे घराचा दरवाजा दाखवतांना आयडीया केली ती अशी की पिवळ्या रंगाचा जिलेटीन पेपर घेउन त्याला दाराच्या आकारात, त्या प्रपोर्शनमधे कापलं. त्यावर अधिक (+)या आकारातली पांढर्या पेपरची छोटीशी पट्टी चिटकवली. जिलेटीन पेपरमुळे काचेचं दार आणि पिवळ्या रंगाच्या जिलेटीनने आतुन बाहेर येणारा लाईटाचा पिवळा प्रकाश असा इफेक्ट आला. हे असं घर 'होम अलोन' मधे पाहिल्याचं आठवत होतं. Happy

४) ५वीत असतांना त्याला वर्गात ठेवण्यासाठी 'वृक्ष व त्यांचे उपयोग' यावर चार्ट बनवायचा होता. नुसतं रंगिबेरंगी स्केचपेनने लिहिण्यापेक्षा खरोखरची फळं,फळभाज्या, धान्य, मसाल्याचे पदार्थ, सुका मेवा, एवढच काय रबर, कागद,पेन्सील, कपाशी, इ. इ वापरायचं ठरलं.
चार्टवर फळ चिकटवणं अवघड होतं....कारण कागदाचं वजन वाढलं असत. एक छोटं सफरचंद घेउन ते बरोब्बर मधोमध अर्ध कापलं. कडा आणि कडेचा थोडा पांढरा भाग तसाच ठेउन ते पोखरुन काढलं. त्या अर्ध्या भागाच्या कडेवर फेव्हिकॉल लावुन तसच ते फळ चार्टला चिकटवुन टाकलं. लवंग, मिरे, दालचिनी छोटे छोटे असल्याने तसेच चिकटवले. तर ज्वारी, बाजरी, गहु , मका त्या त्या कणसाचं ड्रॉईंग काढुन त्यावर तसे दाणे चिटकवले(मक्याचे दाणे मोठे असल्याने ते ही उभे अर्धे केले, व मक्याच्या कणसाची वरुन असतात ती पाने त्या आकारात कापुन त्यातुन मक्याचे कणिस डोकवतांना दाखवले). कागदासाठी छोटी डायरी चिटकवली त्यावर अर्धे पेन्सिल, आणि छोटसं रबरही लावुन दिले. सुका मेवा...काजु, बदाम, पिस्ता ही अर्धे कापुन लावले. कपाशी साठी नुसता कापुस लावला तर तो वाईट दिसेल म्हणुन कपाशीचं बोंड बनवलं. त्यातही मसाला वेलचीचे टरफल घेउन ते इंग्रजी व्ही आकारात चिटकवुन त्याच्या पुढे कपाशीच्या बोंडाच्या आकारात कापुस चिटकवला.
टीचरला चार्ट भारी आवडलेला.

५) मुलगा ७वीत होता त्यावेळेस त्याला civics चा प्रॉजेक्ट करायला सांगितला होता.एक साधारण शहराकडे झुकणार्या गावाचं मॉडेल बनवायचं होतं. त्यात जुन्या कौलारु घरांबरोबरच सिमेंटची बिल्डींग, स्कुल, कॉलेज, बँक, रस्ते, रस्ते सुशोभीकरण, पोस्ट ऑफीस, पाण्याची टाकी, कॉलेज ग्राउंड, त्यावर स्विमिंग टँक हे सगळं बनवायचं ठरलं. एक मोठी जुनी वुडन फ्रेम उलटी करुन त्यात हे सगळे बसवायचं होतं.
साहित्याची जमवाजमव सुरु केली. 'सुरु'च्या झाडाची सुकलेली फळं (झाडांसाठी), आयड्रॉप्स/ इयरड्रॉप्सचे येतात तसे रिकामे खोके (घरासाठी),पुठ्ठ्याचा खोका घेउन त्याच्या कागदात एक झिग्जॅग आकाराची लेयर असते ती कौलारु/पत्र्याच्या घरांसाठी, गहु निवडतांना सापडतात ते ओंब्याच्या स्वरुपातले गहु(छोट्या झाडांसाठी) घेतले.
सर्वात आधी रस्ता बनवला. इंग्रजी एस आकाराचा नागमोडा रस्ता कागदाचा कापला. त्याला ग्रे रंग दिला.नंतर त्यावर ब्रशने डिंक लावुन वरुन माझ्याकडे होती ती नर्मदा रेती भुरभुरली. झाला मस्त डांबरी रोड तयार. रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी चौकात छान सर्कल काढले. सुरुच्या झाडाची वाळलेल्या फळांना हिरवा रंग देउन रस्त्याच्या साईडने चिटकवले.
सुदैवाने, त्याच सुमारास माझ्या वडीलांचे डोळ्याचे मोतीबिंदुचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आय्ड्रॉप्सचे भरपुर बॉक्स मिळाले. तसच घरात झालेल्या फर्निचरच्या कामाने छोटे छोटे लाकडी ठोकळे घरांसाठी वापरले. त्यावर त्या पुठ्ठ्यातुन झिगझॅग आकाराची लेयर काढुन ते कौलांसारखे चिटकवुन त्याला तपकिरी रंग दिला. बॅंकेच्या आधुनिक इमारतीला निळ्या जिलेटीन पेपरचा फॉर्म्युला वापरायला सांगितला. म्हणजे बाहेरुन ती काचेची बिल्डींग वाटत होती.
शाळेला षटकोनाच्या तीन बाजुंसारखा आकार (/-\ असा) दिला. शाळेला कंपाउंड, कंपाउंडच्या बाजुने झाडं, अर्धगोलाकार गेट, गेटवर शाळेचे नाव, फाटक, शाळेच्या भिंतींवर फुले, आंबेडकरांचे फोटो. आणि शाळेच्या मुख्य ऑफीसच्या एंट्रीला झाडांचे सर्कल... हे सगळं बनवायला सांगितलं.
कॉलेजची बिल्डींग, त्यासमोर ग्राउंड. तिथे एका कोपर्यात थोडा उंचावर स्विमिंग टँक. स्विमिंग टँकसाठी एका छोट्या चौकोनी खोक्यावर आयताकार खाच केली. त्या खाचेत त्याच आकाराचा निळाशार पाण्याचा फोटो(एका मासिकातुन कापुन)लावला. वरुन आयताकार काच बसवली.
पाण्याची टाकी: याला जरा डोकं चालवावं लागलं. काळ्या मातीचे चार ठोकळे बनवले. ते ओले असतांनाच त्यांच्यात एकसारक्या आकाराच्या झाडुच्या काड्या खुपसुन बसवल्या व नंतर वाळायला ठेवले. ते आमच्या टाकीचे पिलर झाले. वरुन एक साधारण आकाराचा गोल प्लॅस्टीकचा डबा पालथा मारला. त्याला वरुन बदामी रंगाचा कागद चिटकवला. त्या झाडुच्या काड्या दिसु नयेत म्हणुन त्यांनाही बाहेरुन बदामी कागदाच्या पट्ट्या लावुन ते झाकुन टाकले. लहानपणी कार्यानुभवात कागद फोल्ड करुन फॅन करायचो. त्याची आठवण ठेवुन तसाच पण छोटासा जिना खालपासुन वरपर्यंत तयार केला व दिला तो ही चिकटवुन.
पोस्ट ऑफीससाठी कौलारु घर व त्याच्यापुढे एक छोटीशी दंडगोलाकार पुंगळी ठेवली(लाल रंग अर्थातच दिला होता)त्यावर मुलांची बड्डे कॅप बनवतो तशीच त्रिकोणी टोपी बनवुन ठेवली. झाली पोस्टाची पेटी तयार.

दुर्दैवाने, या एकाही मॉडेलचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे Sad
पण मॉडेलची एक आयडीया यावी म्हणुन हे ड्रॉईंग टाकत आहे.
final

आमचे मॉडेल जजेस व स्कुल प्रिन्सिपॉलने अ‍ॅप्रिशियेट केले हे वेगळे सांगायला नकोच. Wink

धन्यवाद!
आपल्याकडेही अशा काही आयडीया असतील तर त्या इथे शेअर कराव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं टर्कि डेकोरेशन असतं? म्हणजे नक्की कसं करतात? पहिल्यांदाच ऐकतेय मी! आधीचे फोटो टाक ना प्लीज.

मामी तुमची कन्या दुपारी डिस्ने चॅनेल बघते का? त्यावर दुपारी ४ वाजता आर्ट अ‍ॅटॅक नावाचा कार्यक्रम असतो. त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे नमुने बनवुन दाखवतात. मुलीला क्राफ्ट आवडत असल्यास एकदा बघा.

अंजली, पेपर प्लेट वापरता येइल चेहर्‍यासाठी. त्याला वर आडवी पट्टी हेड बॅन्ड म्हणून. हेड बॅन्डला पिसे लावायची.
किंवा टिपी रोल किंवा तत्सम( साईज किती मोठी हवी त्याप्रमाणे प्रिंगल्सचा रोल, कॅन वगैरे) वापरुन करता येइल. रोल/कॅन ला कन्स्ट्रशन पेपर लावायचा. चेहरा, हेड बॅन्ड, साईडला हातही लावता येतील. तसे केल्यास एक पिलग्रिम आणि एक नेटिव अमेरिकन शेजारी शेजारी उभे करता येतील.
आमच्या कडे फुल प्रोजेक्ट केला होता. टोटेम पोल, टेपी, होडी ऑल द वर्क्स!

अंजली,
शाळेची लायब्ररी वेगवेगळ्या थीम्सनुसार दारासकट सजवायचे काम ४ वर्षे केलेय. लेकाकडे वर्ग सजावटीची जबाबदारी असायची. त्यामुळे भरपूर अनुभव आहे. Happy

Pages