हा बदलता चेहरा माझाच आहे ना

Submitted by वैवकु on 22 January, 2013 - 07:01

हा बदलता चेहरा माझाच आहे ना
चेहर्‍याच्या आत मी साधाच आहे ना

हास पाहू तू तुला माझी शपथ आहे
हे रडत म्हणतोय... मी वेडाच आहे ना

पांडुरंगा त्यास का म्हणताय लोकांनो
विठ्ठ्लाचा रंग तर काळाच आहे ना

मृगजळासम वाटते आता तुझे होणे
आस-ओला भावही सुकलाच आहे ना

हे मला वाटू नये मी भेटल्यावरती
भेट ज्याची घ्यायची तो हाच आहे ना

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिखल्या ,स्वातीजी ,राज ,दिनेशदा ,जोशी साहेब मनःपूर्वक धन्स
___________________________________________

दिनेशदा तुम्ही लावताहात तसा अर्थ नाही आहे त्याचा ..............
[टीपः खाली शेराचा अर्थ लावताना ..अव्यक्त शब्द ठळक तर शब्दाचा अर्थ खुलवंण्यासाठीचे तिरप्या अक्षरात कंसात दिलेत ]

मृगजळासम वाटते ( म्हणजे ते दिसते तर खरे ; पण असत नाही! ) आता (मला.. मी) तुझे होणे
(कारण ).....
(माझ्या मनातला) आस-ओला (अतीव इच्छेने भिजलेला ) भावही सुकलाच आहे ना (म्हणून )
_____________________________________________
पण दिनेशदा तुम्हाला तसे वाटणे साहजिकच आहे शेर जरा अजून स्पष्ट व्हायला हवा
होता
तो तितका झाला नाही त्याबद्दल क्षमस्व
_____________________________________________

जोशी साहेब मृगजळाचा शेर आवडल्याबद्दल विशेष आभार
_____________________________________________

सर्वांचे पुनश्च आभार

Pages