सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.
कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.
इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.
हा धागा सध्या ग्रूपपुरताच मर्यादित ठेवला आहे.
हा अडमने चालू केलेला कथाकथी धागा. मायबोलीवरच्या उत्तम कथा त्याने इथे संकलित करून ठेवलेल्या आहेत. दिवाळी अंकांमधील कथा पटकन सापडत नाहीत कित्येकदा, तेव्हा या धाग्याचा उपयोग होऊ शकेल.
नीरजाच्या कथेवरचा माझा
नीरजाच्या कथेवरचा माझा प्रतिसाद इथे आणत आहे.
(खालील प्रतिसाद लिहिताना माझा आणि मराठी साहित्याच्या अभ्यासाचा गेल्या सात पिढ्यामधे कसलाही संबंध नाही, हे आधीच नमूद करेत. त्यामुळे हे मुद्दे माझ्या वैयक्तिक अनुभवावरून आले आहेत. यामधे तांत्रिक बाबीमधे मी अडाणी आहे. अनुभव म्हणजे माझे (मर्यादित) लेखन आणि (मर्यादित) वाचन, जनसंपर्क इतकेच!!)
कथा का लिहिली जाते? कारण, कथालेखकाला एखादी "गोष्ट" सांगायची असते. ही गोष्ट म्हणजे एखादी घटना असेल, एखाद्या घडलेल्या घटनेचे प्रतिसाद असतील किंवा एखाद्या पात्राच्या मनात चाललेली खळबळ असेल किंवा एखाद्या पात्र करत असलेले स्मरणरंजन असेल- अथवा याहूनही निराळे काही असू शकेल. कित्येक कथांमधे लेखकाने काल्पनिक सृष्टीचा आधार घेऊन लेखन केलेले असते. त्यामुळे ठोस संदेश अथवा प्रभावी निरीक्षण हवेच असे नाही. मात्र, ठोस चित्रचितारणी अपेक्षित आहे.
कथालेखक बर्याचदा आधी घटना ठरवून घेतो आणि मग त्यावर आधारित पात्रांची रचना करतो. मात्र उलट करून म्हणजे आधी पात्ररचना ठरवून त्याभोवती घटनांचे जाळे विणणे हे फार मजेदार असू शकते. (जे वरच्या कथेमधे घडत आहे) पात्ररचना करताना आपली पात्रे एकदा तयार केले की वेगवेगळ्या घटनांच्या बास्केटमधे टाकून ते पात्र कसे रीअॅक्ट करते ते बघणे हे कथा लिहिण्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग.
नंदिनी, मला तुमच्या दोन
नंदिनी, मला तुमच्या दोन विधानांमध्ये विसंगती आढळली.
ती विधाने अशी:
>>>आधी पात्ररचना ठरवून त्याभोवती घटनांचे जाळे विणणे हे फार मजेदार असू शकते. (जे वरच्या कथेमधे घडत आहे) पात्ररचना करताना आपली पात्रे एकदा तयार केले की वेगवेगळ्या घटनांच्या बास्केटमधे टाकून ते पात्र कसे रीअॅक्ट करते ते बघणे हे कथा लिहिण्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग.<<<
>>>मला म्हणूनच नीरजाने निवडलेला हा फॉर्म आवडला.<<<
यात विसंगती ही आहे, की 'आधी पात्ररचना ठरवून मग पात्र कसे वागते ते पाहणे' हे नीधप यांनी केलेले नाही. तसे त्यांच्या कथेतील लेखिकेचे झाले ही त्यांची कथा आहे. म्हणजे, त्यांच्याच त्याच कथेबद्दल बोलायचे तर 'नीरजा (किंवा लेखिका) हे कथेतील पात्र कथा रचताना कोणकोणत्या विविध मानसिक अवस्थांना पोहोचते व कोठे कसे गोंधळते व स्वतःशी चिंतन करते' हे दाखवणे मूळ कथेतमध्ये त्यांचे 'निश्चीतपणे' ठरलेले आहे. त्यांनी निवडलेला फॉर्म तो नव्हे. त्यांच्या कथेतील लेखिकेने तो (कथा लिहिताना तीवर स्वतःच भाष्यही करणे हा) फॉर्म निवडलेला आहे. ( लेखिका या त्या स्वतःचही असू शकतात,म्हणजे हा नीरजा यांचा स्वानुभवही असू शकतो). पण 'कथा रचताना माझे असे झाले' हे सांगणे त्यांचे निश्चीत आहे. अनिश्चीत आहे ते लेखिका या पात्राने रचलेल्या कथेतील पात्रांचे वर्तन , जे तुम्ही इन्टरेस्टिंग म्हणत आहात.
तुमच्या पहिल्या उतार्यातील शेवटच्या विधानाशी सहमत असून माझ्या मूळ प्रतिसादात ती बाबही समाविष्ट झालेली आहे असे नमूद करतो.
या धाग्याची कल्पना छान आहे.
-'बेफिकीर'!
'पहिल्या उतार्यातील' म्हणजे
'पहिल्या उतार्यातील' म्हणजे कंसानंतरच्या उतार्यातील.
बेफिकीर, मी प्रतिक्रिया लिहत
बेफिकीर, मी प्रतिक्रिया लिहत असताना एक वाक्य भलतीकडचे भल्तीकडे येऊन बसले होते. इथे कॉपीपेस्ट केल्यावर ते वाक्य काढलेले आहे.
त्यामुळे आता विसंगती नाही.
असो. या चर्चेमधे चूक अथवा बरोबर कुणी नाही. किंबहुना विचारांना क्लॅरीटी मिळावी म्हणून तर या बीबीचा उद्देश.
आता मला नीरजाने घेतलेला हा फॉर्म का आवडला ते सांगते.
या कथेमधे लेखिका (इथे लेखिका हे स्वतंत्र पात्र आहे असे समजून चालू!) कथेचा विचार करताना मूळापासून करत आहे. म्हणजे "असं व्हायला तर हवं. पण ते कसंही अतार्किकरीत्या न घडता" एका सुस्पष्ट रीत्या घटनांच्या साखळीमधून घडावं ही जी लेखिकेची अपेक्षा आहे. या अपेक्षेमधून निर्माण होणारा तिचा स्वत:शी अथ॑वा पात्रांशी होणारा संवाद आहे, तो मला या कथेमधे जास्त भावला.
या कथेमधे लेखिका (इथे लेखिका
या कथेमधे लेखिका (इथे लेखिका हे स्वतंत्र पात्र आहे असे समजून चालू!) कथेचा विचार करताना मूळापासून करत आहे. म्हणजे "असं व्हायला तर हवं. पण ते कसंही अतार्किकरीत्या न घडता" एका सुस्पष्ट रीत्या घटनांच्या साखळीमधून घडावं ही जी लेखिकेची अपेक्षा आहे. या अपेक्षेमधून निर्माण होणारा तिचा स्वत:शी अथ॑वा पात्रांशी होणारा संवाद आहे, तो मला या कथेमधे जास्त भावला.
<<<
सहमत आहे. 'असं व्हायला तर हवं' या भागाबाबत, ते ज्या स्टेजला लेखिकेला (कथेतील पात्र असलेली लेखिका) वाटते त्याबद्दल मी मूळ प्रतिसादात काही म्हणालो आहे, वेळ असल्यास वाचून कळवा.
प्रतिसाद स्वतः मागे घेतला
प्रतिसाद स्वतः मागे घेतला आहे.
अनिश्चीत आहे ते लेखिका या
अनिश्चीत आहे ते लेखिका या पात्राने रचलेल्या कथेतील पात्रांचे वर्तन , जे तुम्ही इन्टरेस्टिंग म्हणत आहात. >>> हो.
आमच्या कॉलेजमधे क्रीएटीव्ह रायटिंगसाठी दोन पात्रे देऊन त्याभोवती कथा लिहून आणायची अशा काही असाईनमेंट होत्या. मला तरी तो प्रकार इतका भावला, की मी आजतागायत त्याच पद्धतीने लिहितेय. दुसरा एक प्रकार म्हणजे कथेच्या पहिल्या चार पाच ओळी दिलेल्या किंवा शेवटच्या चार पाच ओळी. त्यानुसार कथा लिहून काढायची.
कथा गुलमोहोरावर देण्याआधी इथल्यापैकी कुणालाही, खाजगी संपर्कातून पाठवून तपासायला द्यावी.>>> दिनेशदा, माझ्या कथा तरी मी त्या क्षेत्रातल्या संबंधित व्यक्तीच्या नजरेखालून जाऊ देते. अगदीच शक्य नसेल तर किमान "हे संदर्भ बरोबर आहेत का?" हे चेक करून घेते. त्यांनी बदल सुचवला तर स्विकारायचे की नाही हे मला कथेनुसार ठरवता येते.
मी अजून तिथे डोकावलेलो नाही, अजून तेच चाललेय काय ? अजून बरेच मुद्दे आहेत, माझ्याकडे.?>>.जाऊ द्या आता.
मस्त धागा नंदिनी. हम्म...
मस्त धागा नंदिनी.
हम्म... ..घटनाक्रम अशी कथा लिहीत नाही. म्हणून्च ती महिनोन्महिने पडुन राहते.
गोष्ट हा ढोबळ आराखडा झाला. सुरवात, मध्य, अंत, वातावरणनिर्मीती, पात्र निर्मीती.
सर्वात गाडं अडतं ते सांगणे आणि दाखवणे यात.
म्हणुन इमाने एतबारे 'लिहावे नेटके' सोडवते.
मला जी शैली आवडते त्यात वाचकाला स्पुनफिडींग करायचे नाही हा पहिला नियम.
मला स्वतःला कथा लिहीताना tense चा प्रॉब्लेम येतो.
एकदा लिहील्यावर संपादनात अजूनच जीव जातो.
मला स्वतःला कथा लिहीताना
मला स्वतःला कथा लिहीताना tense चा प्रॉब्लेम येतो> टेन्स म्हणजे काळ म्हणायचे आहेत का तुला?
मी दिवाळी अंकामधे एक कथा वाचली नुकतीच त्यामधे भूतकाळामधे कथा सुरू होते; मधेच वर्तमानकाळ चालू होतो; परत भूतकाळ.. हे असं करण्यासाठी काही खास कारण पण नव्हतं.
वैयक्तिकरीत्या मला एक वाचक म्हणून "मी येते. खुर्चीवर बसते. तो माझ्याकडे बघतो. पाणी पिते आणि मग पर्समधून मोबाईल काढते" या टाईपची वाक्यं असलेल्या कथा आवडत नाहीत.
मला जी शैली आवडते त्यात वाचकाला स्पुनफिडींग करायचे नाही हा पहिला नियम.
>> म्हणजे नक्की कसं रैना? उदाहरण देऊ शकशील का?
प्रतिसाद स्वतः मागे घेतला
प्रतिसाद स्वतः मागे घेतला आहे.
छान धागा, नंदिनी. या
छान धागा, नंदिनी.
या धाग्याची प्रोग्रेस कशी-कशी होते हे पाहण्यास मी उत्सुक आहे.
(हा धागा ही पहिली पायरी मानून या आधारावर भविष्यात एखादी कथा-कार्यशाळा घडेल ही आशा.)
मला वाटतं, कथा गुलमोहोरावर देण्याआधी इथल्यापैकी कुणालाही, खाजगी संपर्कातून पाठवून तपासायला द्यावी. अशी मदत करायला कोण कोण तयार आहेत, त्यांची इथे नावे द्यायची.
>>> मी तयार आहे.
(हा धागा ही पहिली पायरी मानून
(हा धागा ही पहिली पायरी मानून या आधारावर भविष्यात एखादी कथा-कार्यशाळा घडेल ही आशा.)
>> आमेन.
ललिता, अशी लिस्ट तयार झाली की हेडरमधे अपडेट करायची का?
ललिता, खरंच असा प्रतिसाद
ललिता, खरंच असा प्रतिसाद पाहिजे !
मी पण माझ्या क्षेत्राशी, ( कॉमर्स / निसर्ग / पाककला / भूगोल / लॉजिक ) यासंबंधित संदर्भ तपासून द्यायला तयार आहे.
नंदिनी, अशी नावे, हेडर मधे ठेवणार का ?
हेडर अपडेट >>> चालेल
हेडर अपडेट >>> चालेल की!
संदर्भ तर तपासले गेलेच पाहिजेत.
मुळात आपण लिहिलेली कथा (लिखाण चालू असताना आणि पूर्ण झाल्यावरही) आपणच पुनःपुन्हा वाचून पाहिली तर जवळजवळ ८०% बारीकसारीक चुका सुधारता येतात.
मी लिखाण पूर्ण झाल्यावर २-३ वेळा कथा मोठ्यांदा वाचून पाहते. एकटीशीच. कंटिन्युइटीच्या दृष्टीनं तेव्हा जे-जे मुद्दे लक्षात येतात, ते नुसतं मनातल्या मनात वाचतानाही लक्षात येत नाहीत असा माझा अनुभव आहे.
दिनेशदा, तेच म्हणत आहे.
दिनेशदा, तेच म्हणत आहे. सर्वांना चालत असेल तर हेडरमधे अपडेट करूया.
मी पत्रकारिता, अॅडव्हर्टायझिंग, पीआर, गृहिणी
या क्षेत्रांमधे मदत करू शकते.
ज्याला आपण एडिटिंग म्हणू शकतो (शुद्धलेखन तपासणे नव्हे) करू शकते.
मला दिनेश यांची सूचना तितकीशी
मला दिनेश यांची सूचना तितकीशी नाही पटली.
टेक्निकल संदर्भ, शुद्धलेखन हे सर्व बहुतेकदा आंतरजालावर उपलब्ध असते.
======================
'वाचकाला स्पूनफीडिंग करायचे नाही हा पहिला नियम' ही मला वाटते शैली नसून तत्व आहे. हे तत्व अनेक कवींनी आपापल्या काव्यात वेळोवेळी (नकळतपणेही / नकळतपणेच) अंमलात आणले. (काहीनी कळून सावरूनही).
लेखन करताना आपण लेखनाच्या कंटेंटमध्ये जितके अधिक गुंततो तितका आपल्यासमोरून 'वाचक / श्रोता / रसिक / अभ्यासक / समीक्षक' हा वर्ग बाजूला जातो आणि ते मला अधिक भावते. (येथे एक अवांतर - गझलेसारख्या कलाकृतींचे तसे नाही कारण तंत्रामुळे अनेकदा अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून चालावे लागते व त्यामुळे नुसतेच गुंतत जाण्यामुळे गझल तयार होऊ शकत नाही.) (असेच ओवी, अष्टाक्षरी अश्या कलाकृतींच्या आकृतीबंधामुळे व इतर कलाकृतींच्या बाबतीत त्यांच्यात्यांच्या अंगभूत कारणांमुळे होऊ शकते). (शिवाय - या गोष्टी पाळायच्या की नाहीत हा पुन्हा ज्याचा त्याचा निर्णय हे आहेच). पण बहुतांशी इतर लेखन हे लेखनाच्या तपशीलात, वर्णनात, कलरिंगमध्ये, सखोलतेत इत्यादी, अधिकाधिक गुंतल्यामुळे, समरस झाल्यामुळे उत्तम होऊ शकते. (यात हे म्हणायचे नाही की टेक्निकल संदर्भ अभ्यासू नयेत, तो मुद्दा वर डॉटेड लाईनच्या वरती संपला, येथे फक्त लेखनाच्या सकसतेबाबत म्हणायचे आहे).
पुन्हा एकदा:
आंतरजालामुळे त्वरीत प्रतिसाद ही सोय उपलब्ध असल्याने प्रचंड प्रमाणावर मंथन, सुधारणेस वाव, हिरमोड वा आनंद होणे अश्या अनेक गोष्टी त्वरीत होऊ लागल्या. यामुळे आंतरजालीय लेखन हे 'कोण काय म्हणू शकेल' हा घटक नकळतपणे डोक्यात ठेवून होण्याचे प्रमाण हे छापील पुस्तकांपेक्षा बरेच अधिक आहे. तरीही, आपल्या लेखनात आपण समरस झालो तर कलाकृती चांगली होते असे वाटते, रादर दॅन, वाचकाला काय द्यायचे, काय नाही, किती संदिग्धता ठेवायची, कोणत्या तपशीलास किती स्पर्शायचे याचा विचार आधीच ठरवून करून उतरलेल्या कलाकृतीपेक्षा!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
साधारणतः असा विचार केला, की
साधारणतः असा विचार केला, की सर्वसामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन आयुष्यात एखादे लेखन 'का वाचावेसे' वाटत असेल, तरः
वर्तमानपत्र, कामकचेरीतील कागद, हॉटेलचे मेन्यूकार्ड, चिरंजिवांचे प्रगतीपुस्तक, मंडळींनी रचलेली मंगलाष्टके, सोसायटीचा अहवाल अश्या स्वरुपाचे लेखन जर वगळले:
तर सामान्यतः स्वतःच्या खास स्वारस्यातील विषय (जसे राजकारण, क्रीडा), 'मनोरंजन व छंद' आणि ज्ञानवर्धक लेखन वाचले जाते. (हा मुद्दा माझ्याच वरील मुद्याशी काँट्रॅडिक्ट करणारा नव्हे की वाचकाला समोर ठेवायचे की नाही, हा मुद्दा वेगळा म्हणून लिहू पाहात आहे). हे जे 'वाचकवर्गात होते' त्याबद्दल आहे.
वरील तीन बाबींमध्येही, मनोरंजन व छंद याकडे कल अधिक दिसतो याचे कारण माणसाला मिळालेला फुरसतीचा वेळ त्याला मनाजोगा व्यतीत करावासा वाटत असतो म्हणून!
हा फुरसतीचा वेळ साधारण ९० च्या दशकापासून (पुन्हा - 'साधारण'! इतरांचे अनुभव वेगळे असू शकतील) कमी पडू लागला असे आढळेल. त्यामुळे माणूस एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे जर वाचन करणारा नसेल, तर तो सहसा 'मनोरंजन व छंद' या सदरातील वाचन करताना आढळतो. (हेही खरे, की ज्ञानवर्धन हाच छंद असू शकतो).
बेफि, मी तिकडे घातलेला गोंधळ
बेफि, मी तिकडे घातलेला गोंधळ वाचलात का ? त्यावरुनच अशी कल्पना सुचलीय. अर्थात ही मदत ज्यांना हवी असेल, त्यांच्यासाठीच !
मराठी नाटकांच्या बाबतीत हे ( बहुदा ) होतेच, त्यामुळे शेवटी सादर होणारी, कलाकृती ( परत बहुदा ) बांधीव असते.
तो मला गोंधळ वाटला नाही
तो मला गोंधळ वाटला नाही दिनेश, जर तुम्ही दिवाळी अंकावरील चर्चेबाबत म्हणत असाल तर. अनेकदा 'हलके घ्या' अशी विनंती करून तुम्ही ते मुद्दे लिहिलेले होतेत. त्यामुळे कोणी रागवायला नको होते.
इतर काही संदर्भ असला गोंधळाचा, तर माहीत नाही.
मुद्दाम नाटकातला एक संदर्भ
मुद्दाम नाटकातला एक संदर्भ देतो. सई परांजपे यांनी लिहिलेले नाटक होते, सख्खे शेजारी. त्यात दुबई च्या करन्सी ला दिनार हा शब्द पावरला होता. (आँखे चित्रपटातल्या गाण्यातही ही तोच शब्द होता.) हा संदर्भ या थोर लोकांनी तपासला असता, तर हे न्यून नसते राहिले. दुबईतल्या मराठी प्रेक्षकांना, ते नक्कीच खटकत होते.
तोच गोंधळ बेफि... लॉजिकल
तोच गोंधळ बेफि... लॉजिकल संदर्भ कुठे नेटवर मिळतात ? मोठ्या (वयाने ) लेखकांना कदाचित घरचा हक्काचा वाचक असतो, तो सगळ्यांनाच असतो, असे नाही ना ! त्यामूळे इथे आपण, या पहिल्या वाचकाची जबाबदारी घ्यायचीय.
मला बहुधा नीट लिहिता आले
मला बहुधा नीट लिहिता आले नाही, पुन्हा प्रयत्न करतो.
टेक्निकल संदर्भ तपासणे हे महत्वाचे आहे हे अर्थातच मान्य. (गुड मॉर्निंग मॅडम या कादंबरीवर मला जी सुधारणा सुचवण्यात आली होती ती मी आदरपूर्वक स्वीकारलेली होती व आदरपूर्वक स्वीकारल्याची निदर्शक अशी किमान दोन विधाने माझ्या प्रतिसादात अजूनही आहेत. 'लाथाळी' झाली ती वेगळ्याच विषयावर झाली, फक्त त्याच प्रतिसादांमध्ये झाली इतकेच).
पण हे टेक्निकल संदर्भ आंतरजालावर उपलब्ध आहेत, शुद्धलेखन उपलब्ध आहे. तरीही एखाद्या जाणकाराचे मत घेण्यात वाईट काहीच नाही. पण मला तरी असे वाटत आहे की ते या धाग्यान्वये फॉर्मली करण्याचा प्रयत्न न करता ज्याने त्याने 'वन टू वन' बेसिसवर करावे. काही वेळा इगो इश्यूज उद्भवू शकतात वगैरे! ते कुठे हवे आहे?
मुद्दाम नाटकातला एक संदर्भ
मुद्दाम नाटकातला एक संदर्भ देतो. सई परांजपे यांनी लिहिलेले नाटक होते, सख्खे शेजारी. त्यात दुबई च्या करन्सी ला दिनार हा शब्द पावरला होता. (आँखे चित्रपटातल्या गाण्यातही ही तोच शब्द होता.) हा संदर्भ या थोर लोकांनी तपासला असता, तर हे न्यून नसते राहिले. दुबईतल्या मराठी प्रेक्षकांना, ते नक्कीच खटकत होते. >> दिनेश बहुतेक वाचक फक्त "कथा" वाचतात, तुम्हाला उद्देशीत असलेली न्युने त्यामधे सहज खपून जातात. एखाद्याला ती प्रचंड खटकू शकतात पण त्याचा मूळ कथेवर किती परिणाम होतो आहे ह्यावर त्याचा किती बाऊ करायचा हे अवलंबून असायला हवे असे माझे मत आहे. लेखकाला जर ती सुधारावीशी वाटली तर उत्तम पण मूळ कथेला धक्का न लागता ती खपून जात असतील तर न बदलणे ह्या पर्याय लेखकासाठी बाकी ठेवूया का ? शेवटी ती कथा आहे नि technical manual नाही.
तपासायला देण्याचा मुद्दा
तपासायला देण्याचा मुद्दा फारसा पटला नाही. माझ्या कथेवर प्रामाणिक प्रतिक्रिया देणारी माझी मित्रमंडळी आहेत, जवळचे लोक आहेत त्यांना मी हे सांगू शकते करायला. त्यासाठी माबोच्या द्वारे हे करायची मला गरज वाटत नाही. माफ करा. अर्थात कुणाला माझ्याकडून अशी मदत अपेक्षित असल्यास किंवा माझ्या क्षेत्रासंदर्भाने काही माहिती हवी असल्यास वेळेचं कसं काय असेल त्या त्या वेळेला ते बघून मदत करायला मी नक्की तयार आहे.
मायबोलीवर मी जेव्हा कथा लिहिते तेव्हा तो बहुतांशी पहिला ड्राफ्ट असतो (अपवाद आत्ता टाकलेली कथा ही मी माबोवर टाकली नव्हती पण काही तीनचार जणांना नक्कीच वाचायला दिली होती). माझे मीच परत परत किंवा थोड्या काळाने पाटी कोरी करून वाचणे, काही महत्वाचे प्रतिसाद, मोठ्याने वाचून बघणे आणि परत विचार करणे असे अनेक उपाय असतात कथेचे क्राफ्ट सुधारायला.
असामी त्या एकाच कथेत
असामी त्या एकाच कथेत तांत्रिक आणि आशयाची पण अनेक न्यून होती. ( अजूनही आहेत. फी ड्यू होती, हे अगदी पत्र आल्यावरच कळले ? आधी माहीत नव्हते ? त्या काळात पैश्याची सोय अगदी बेग / बॉरो ने नसती करता आली ? ) पण आता तिथले आक्रमक पवित्रे बघून तिथे जावेसेही वाटत नाही...
हे माझ्या स्वभावाविरुद्ध आहे ( म्हणजे कुणाची कथाकल्पना मी चोरणार नाही ) पण त्या काळात एखाद्या जर्मन मित्राने केलेली मदत, मग त्याचा पत्ता हरवणे , अनेक वर्षे त्याचा शोध, मग त्याच्या उपकाराची परतफेड.. असा एक चांगला आराखडा झाला असता. अगदी घड्याळाचाच संदर्भ द्यायचा होता, तर एका ज्यू मित्राने, आपल्या वडीलांची आठवण म्हणून ठेवलेले एखादे घड्याळ दिले, त्याने त्याचे पैसे घ्यायला दिलेला नकार, मग कथानायकाला तेच दुर्मिळ घड्याळ, लिलावात मिळाले, ते त्याने खुप मोठी किम्मत मोजून घेतले, आणि परत त्या मित्राचा शोध, त्याला झालेला आनंद... हे सर्वोत्तम पर्याय आहेत असे माझे म्हणणे नाही, पण निदान विचाराला दिशा तर मिळाली असती ना ?
ज्याला अशा विचारांना दुसरी दिशा असू शकते, असे वाटेल, त्यांना तशी दिशा दाखवायचा, एक प्रयत्न, एवढाच आमचा हेतू आहे.
सगळ्यांना, चालतय तर चालू द्या, हे तर आहेच. बालगंधर्वाना, जर्दोसी साड्या नेसवायच्या तर मग लोकमान्याना, हिरवी पगडी घालता येईल आणि हार्ट ओपन करुन, त्यातले आंत्रपुच्छ काढून टाकता येईल.. शेवटी कथाच तर आहे.
सगळ्यांना, चालतय तर चालू
सगळ्यांना, चालतय तर चालू द्या, हे तर आहेच. बालगंधर्वाना, जर्दोसी साड्या नेसवायच्या तर मग लोकमान्याना, हिरवी पगडी घालता येईल आणि हार्ट ओपन करुन, त्यातले आंत्रपुच्छ काढून टाकता येईल.. शेवटी कथाच तर आहे. >> with due respect, तुमचे हे विधान तुम्हाला माझा मुद्दा अजिबात कळला नाहीये हे स्पष्ट करतेय. मी एखाद्या specific कथेबद्दल बोलत नसून कुठल्याही कथेमधील "घटनाक्रमा" बद्दल बोलत आहे.
सगळ्यांना, चालतय तर चालू
सगळ्यांना, चालतय तर चालू द्या, हे तर आहेच. बालगंधर्वाना, जर्दोसी साड्या नेसवायच्या तर मग लोकमान्याना, हिरवी पगडी घालता येईल आणि हार्ट ओपन करुन, त्यातले आंत्रपुच्छ काढून टाकता येईल.. शेवटी कथाच तर आहे. <<<
मझा आया
कथेतील त्रुटी सांगता सांगता
कथेतील त्रुटी सांगता सांगता तुम्ही स्वतः मधील बऱ्याच त्रुटी सांगून गेलात !
चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा !
चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा !
दिनेशदा, तुमचा थोडासा गोंधळ
दिनेशदा, तुमचा थोडासा गोंधळ होतोय. तुम्ही प्लीज त्या एका कथेचा संदर्भ सोडून इतर मुद्दे लिहाल का? आता जाऊ द्या ती कथा. झक मारली आणि ही कथा लिहिली, असे लेखकाला आता वाटायला लागले असेल.
कथेमधील तपशील हे थोड्याफार फरकाने गडबडणारच. कारण, अगदी जार्गन वापरून लिहिलेली कथा या संबंधित क्षेत्राव्यतिरीक्त इतरांना समजणे कठीण होणार. त्यामुळे एक लेखक म्हणून कितीपर्यंत जार्गन वापरायची, त्या क्षेत्राची किती बॅकग्राऊंड वापरायची हे आपल्याला ठरवावे लागणार. मुळात कथेमधे घटनेला, पात्रांच्या वर्तनाला महत्त्व द्यायचे की रिसर्चला हे लेखकाचे स्वतंत्र मत असू शकते. त्याऊप्पर वाचक वाचताना डोक्यामधे नक्की काय ठेवून वाचतील आणि त्यातलं नेमकं त्यांना काय आवडेल अथवा आवडणार नाही; हे आपल्याला माहित नसतं. माझ्या एका कथेमधे मी भायखळ्यावरून जाणार्या एका बस क्रमांकाचा उल्लेख केला होता. तो बस क्रमांक चुकीचा आहे हे एका प्रतिसादकर्त्याने तत्परतेने सांगितले होते.
नी, इथे कथा तपासायला देणे म्हणजे चेकिंग नव्हे; थर्ड पार्टीला वाचायला देऊन मग त्यामधल्या संभाव्य टेक्निकल अथवा लॉजिकल चुका शोधणे. थोडक्यात, तू जे करते आहेस तेच. फक्त कुणाला "या क्षेत्रामधले कोण सांगेल?" असा प्रश्न आणि इच्छा असल्यास ते या बीबीवरून करता येइल. अर्थात हे कंपल्सरी वगैरे अजिबात नाही.
बहुतांशी इतर लेखन हे लेखनाच्या तपशीलात, वर्णनात, कलरिंगमध्ये, सखोलतेत इत्यादी, अधिकाधिक गुंतल्यामुळे, समरस झाल्यामुळे उत्तम होऊ शकते. (यात हे म्हणायचे नाही की टेक्निकल संदर्भ अभ्यासू नयेत, तो मुद्दा वर डॉटेड लाईनच्या वरती संपला, येथे फक्त लेखनाच्या सकसतेबाबत म्हणायचे आहे).
. याने लेखन अधिक सकस होइलच. शिवाय लेखकाचे आंतरजालभर संदर्भ शोधण्याचे कष्ट वाचतील
याचा अर्थ लेखकाने स्वत: रीसर्च करूच नये असे नव्हे. जरूर करावे, पण लिहून झाल्यावर एकदा दुसर्याला दाखवून घेतल्याने अधिक फायदा होतो असे माझे मत. अ॑र्थात वैयक्तिक मत.
>>> बेफिकीर, लेखनाच्या तपशीलामधेच चुका असू नयेत अशी अपेक्षा आहे. (माझीतरी असते) टेक्निकल संदर्भ सोडून देऊ, किमान भौगोलिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक तपशीलांमधेच चुका नसाव्यात. {भौगोलिक चुका म्हणजे काय? यासाठी बरजात्याचा मै प्रेम की दिवानी हू बघावा} या अशा बाबी आंतरजालावर सहज उपलब्ध आहेत हे मान्य. पण जर त्यामधला एक अगदीच "मुरलेला" माणूस असेल; तर तो पटकन चुका सांगू शकेल आणि त्याला पर्याय पण देऊ शकेल...
Pages