कशासाठी कुणी ही भांडू नका रे

Submitted by सुधाकर.. on 2 July, 2012 - 13:51

कशासाठी कुणी ही भांडू नका रे
उगाच हा खेळ असा मांडू नका रे.

सुंदर हे जग आहे, नासू नका रे
माणसात दैत्यासम भासू नका रे.

कुणास ही कुणी शिव्या मोजू नका रे
दगडाला देव म्हणुन भजू नका रे

मर्यादेच्या पलीकडे जाऊ नका रे
सत्वालाही डाग कधी लावु नका रे.

हसणारी कळी कधी तोडू नका रे
कुणाचे ही सुख कधी ओढू नका रे

दुजासाठी दुजे होत नडू नका रे
स्वतःसाठी स्वतःच रडू नका रे.

जोडलेल्या नात्यास तोडू नका रे
माणसात माणुसकी सोडू नका रे.

शब्दांवर माझ्या असे चिडू नका रे
सोडताना श्वास मला भिडू नका रे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भांडणे नकोत, म्हणूनच लोक प्रतिसाद द्यायचे टाळत आहेत का?

Happy

सोडताना श्वास मला भिडू नका रे.

हे काय समजले नाही.. श्वास सोडताना म्हणजे रोज सोडतो तसा की कायमचा सोडतो तेंव्हा भिडू नका.... नेमका काय अर्थ आहे? श्वास ( कायमचा) सोडल्यावर माणूस मरेलच ना? मग तो भिडेल कसा?

सोडताना श्वास मला भिडू नका रे.>>>>>>>>
छान

या ओळीत गझलेचा भाव आहे

इथे न समजण्याचे कारण ; मला वाट्ते .............बाकीची कविता मनाच्या श्लोकासारखी अन् ही ओळ गझलेसारखी हे पचायला जरा जड जातय बहुधा !!

एकूण कविता मस्तच जमलीय बरका ऑर्फी...