न्युयॉर्कच्या गप्पा

न्युयॉर्क राज्यातल्या मायबोलीकरांचं हितगुज.

Submit to kanokani.com

इथे कुणीच नाही काहो??
मी टेरीटाऊन मधे सहा महिने राहणार आहे.
बोला बोला

'गेले तप, आले तप
आले गेले टपटपाटप'

"हे काय ?"
" हितगुज दिवाळी अंकाच्या 'गेले तप, आले तप' या मध्यवर्ती संकल्पनेवर केलेली कविता."

"अस्सं होय ! अहो, पण ती कविता यमकवालीच पाहिजे असे नाही. "

अन् कविताच पाहिजे असे मुळीच नाही... या संकल्पनेवर लिहिलेल्या कविता, ललित, लेख, कथा अशा सर्वांचे स्वागत आहे ! खरे तर, कुठल्याही विषयावर लिहिलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे हार्दिक स्वागत आहे. मग लिहून पाठवताय ना दिवाळी अंकाला ?

रविवार काही फार दूर नाही, सप्ताहांत सत्कारणी लावा !

मराठीत दिवाळी अंक प्रकाशित व्हायला लागले त्याला यंदा १०० वर्षं पूर्ण झाली. मायबोलीचा दिवाळी अंक हा आंतरजालावरचा पहिलाच म्हणून या प्रवासातला एक मानाचा मानकरी!

गेली ८ वर्षं सातत्याने मायबोलीने दर्जेदार दिवाळी अंकांची भेट वाचकांना दिलेली आहे. यंदाचा अंक त्याला अपवाद कसा असेल?

उत्सुकता वाटते आहे ना या वेळी काय वाचायला मिळेल त्याची?

*****************************************************

जगप्रसिध्द अशी पाच शहरं. प्रत्येकाला खास आपला असा चेहरा-मोहरा. प्रत्येकाची आपापली खासियत...
आधी वडिलांची नोकरी, नंतर माझी नोकरी आणि मुळातच असलेली भटकायची आवड यामुळे आत्तापर्यंत जगप्रसिध्द अशा अनेक शहरांना भेट देण्याचा योग आला. ही कहाणी आहे मनात घर करून गेलेल्या ५ शहरांची.

अ टेल ऑफ फाईव्ह सिटीज... सांगतायत पराग सहस्त्रबुद्धे (adm)

******************************************

हे नखरे नाहीत किंवा अतिस्वच्छता नाही. पंचतारांकित सोयींची अपेक्षाही नाही. किमान सुविधांची गरज आहे.
पूर्वीच्या बायका कसं करायच्या हा युक्तिवादही उपयोगाचा नाहीये. कारण, पूर्वीच्या बायका पण प्रवास करायच्या आणि हे सगळं सहन करायच्या. पण एकतर त्यांनी लाजेकाजेपोटी हे सहन केलं असेल आणि कदाचित आम्ही आज जितक्या फिरतो तितक्या त्या सगळ्या फिरत नसणार त्यामुळे ह्या समस्या तेव्हा काहीजणींच्याच असणार.

एका महत्त्वाच्या, पण दुर्दैवाने दुर्लक्षित विषयाला वाचा फोडली आहे अज्जुका यांनी

*********************************************

कधी ही डायरी- सखी-सोबती, जन्माची एकच साथीदार मिळाल्यासारखी. नवसाची. तर कधी जन्माची वैरी. अगदी हाडवैरी. अशी की पुन्हा तिच्याकडे फिरून पहावं वाटू नये. कधी दर दिवसाला उतावीळ होणारी अभिसारिका, तर कधी महिने-वर्षे वाट बघणारी समजूतदार, जोडीदार..

कधी पै-पैचा हिशेब, तर कधी भावनांची अमर्याद उधळण. कधी स्वच्छ प्रतिबिंब, तर कधी आपलंच एक गढूळ, डहुळलेलं अंग.

हे सगळं म्हणजे डायरी असेल का? की यातलं नक्की काय असेल?

- 'आज दिनांक' - डोकावू या साजिरा यांच्या रोजनिशीत.

*****************************************************

याशिवाय वैभव जोशी, प्रसाद शिरगांवकर, सत्यजीत, सामुराई यांच्या कविता, गज़ल, वात्रटिका, बालकविता..

केदार जोशी, चिन्या यांनी घेतलेला महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पानांचा आढावा,

फारेंड यांचं क्रिकेटप्रेम, संदीप चित्रेंचं अमिताभ-वेड, ट्यूलिपला खुणावणारा गुलज़ार यांचा चंद्र..

*****************************************************

हे आणि असं बरंच उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळण्याचं एकच ठिकाण..... मायबोली दिवाळी अंक २००८!!!

नमस्कार मित्रांनो,
मी सध्या न्युजर्सी मध्ये राहातो. मी सध्या Sr. .Net/SharePoint Consultant म्हणुन corp to corp जॉब शोधत आहे(anywhere USA). जर कुणाचे contacts वैगेरे असतील तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया मला santosh.dabholkar@gmail.com या आयडी वर संपर्क करा.
सध्या US job market फार वाईट असल्याने मी मायबोलीच्या हितगुजचा पर्यायसुद्धा try करत आहे.

धन्यवाद
बंडु

१९३९ मधिल सबवे नकाशा

http://www.flickr.com/photos/35221084@N08/3380541241/sizes/o/

in short nothing changed for past 70 years.

http://www.reuters.com/article/domesticNews/idUSTRE5472AD20090508

Statue of Liberty crown to reopen for public from July 4th.

त्यानंतर लॉटरी पण नाव यायला हव ना? स्मित
तरिहि जुले नंतर ny plan करायला हव

Me ithe L2 Dependent visa war ale ahe.Sadhya White Plains NY la rahate.Mala h/w and n/w madhe 5 warshacha exp. ahe.Pan sadhya mandi mule job milat nahiye.Jar tumhala konti consultancy mahit asel.Ki je contract war job detat.Tar please mala kalawa.

only in NYC,

देवा वर विश्वास ठेवु नका असा उपदेश देणार्‍या जहिराती city bus वर एक महीना दिसनार.

http://cityroom.blogs.nytimes.com/2009/06/25/ads-for-atheism-appear-on-m...

ईतर घडामोडींमढे शहरात झालेल्या खुणांचा नकाशा
http://projects.nytimes.com/crime/homicides/map?ref=nyregion

भारतीय वंशांच्या लोकांशी संवाद साधता यावा म्हणून NYPD ने क्रिकेट खेळायला सुरवात केली

http://video.nytimes.com/video/2009/06/28/nyregion/1194841233622/school-...

नमस्कार मी सर्वेश मी रोचेस्टर मधे येतोय औगस्ट मधे कुणी आहे का तिथे

बहुतेक 'परागकण' असतात रोचेस्टरला.

काल बीबीसी बातम्या मधे न्यूयॉर्क मधल क्रिकेट दाखवल. एन वाय पी डी ने आयोजीत केलेल्या स्पर्धे बद्दल. तुमच्या पैकी कोणी खेळत का त्यात.
शिवाय मला एक नविनच माहिती मिळाली. पहिला आंतरराष्ट्रीय सामना मॅनहॅटन मधे झाला. १८४६ मधे. कॅनडा विरूध्द अमेरिका. तो कॅनडाने २३ धावांनी जिंकला.

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.

C O N G R A T U L A T I O N S

promo_bhasha111.jpg

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

http://www.agnantimeze.com/ इथले ग्रेप लीव्ह्ज रोल्स खूप मस्त असतात असे फूड नेटवर्कवर बघितले.

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

नमस्कार मायबोलीकरांनो!