"मराठी भाषा दिवस" स्पर्धा

२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. यावर्षी त्यानिमित्ताने काही उपक्रम चालू करण्याचा मायबोली प्रशासनाचा विचार चालू होता. यासंदर्भात संयोजनासाठी 'संयुक्ता'ला विचारण्यात आल्यावर त्या सूचनेला भरभरून प्रतिसाद मिळाला.

त्या विचारमंथनातून खालील ३ उपक्रम्/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. मायबोलीच्या इतर उपक्रमांप्रमाणेच या नवीन उपक्रमालादेखील सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.

१. बोलगाणी - बालगीत/बडबडगीत स्पर्धा


२. इवलेसे रोप - लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा


३. सप्रेम नमस्कार - सर्वांसाठी खुला उपक्रम.

Submit to kanokani.com

सुंदर!स्मित

मस्त उपक्रम आहे !! स्मित

छान उपक्रम ... स्मित

हे पाहिलेच नव्हते. सही उपक्रम. स्मित
नक्की पाठवणार प्रवेशिका.

आपल्या प्रवेशिकांचे स्वागत आहे स्मित

सह्ही!

खुपच छान उपक्रम!!

छान. उपक्रमाला शुभेच्छा. स्मित

साहेबाने दिलेला मेमो /शो कॉज नोटीस या पत्रात येते काय? अ ओ, आता काय करायचं

हस्ताक्षरात लिहिलेले पत्रलेखनाचा उत्तम नमुना असलेले कुठलेही पत्र चालेल.

आता एव्हढी सवय झालीय शासकीय पत्रांची की येथे पण 'प्रिये.........
आपला विश्वासू' असे लिहिल्या जाईल सवयीने. बघूया. चांगला उपक्रम आहे.